एलोन मस्क यांनी एका मेलमध्ये सांगितले की ते आता ट्विटर साठी फक्त एक्सेप्शनल (अपवादात्मक) कर्मचारी निवडतील,आता हे एक्सेप्शनल कर्मचारी म्हणजे नक्की काय यांमध्ये आणि सामान्य कर्मचाऱ्यांमध्ये काय फरक आहे बरं...?
आणि त्यांच्यात अशी कोणती कौशल्य आहेत हे समजून घेऊ
१/९ #मराठी
🚀 वाढीची मानसिकता:
अपवादात्मक कर्मचारी ते आहेत जे त्यांच्या शिकण्याच्या आणि वाढण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात आणि नवीन आव्हाने स्वीकारण्यास आणि त्यांच्या चुकांमधून शिकण्यास तयार असतात. सतत शिकत राहायचे पुढे जात राहायचे बस थांबायचं नाही ! #GrowthMindset
२/९
🗣️ मजबूत संभाषण कौशल्ये:
अपवादात्मक कर्मचारी त्यांच्या कल्पना स्पष्टपणे आणि संक्षिप्तपणे मांडण्यास सक्षम असतात आणि ते सहकारी, ग्राहक आणि भागधारकांशी प्रभावीपणे संवाद साधू शकतात. आज कौशल्य कितीही असो पण संभाषण कौशल्य नसेल तर इतर त्यामागे झाकली जातात. #CommunicationSkill
३/९
⚖️ फेक्सीबल/ लवचिक : अपवादात्मक कर्मचारी लवचिक असतात आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम असतात आणि आवश्यकतेनुसार त्वरीत वळू शकतात. परिस्थीती कोणतीही असो स्वतःला त्यामध्ये कसं बदलायच ही लवचिकता दूरपर्यंत जाण्यास मदत करते. #Flexibility
४/९
🧑🔧 कामाची आवड: अपवादात्मक कर्मचारी ते काय करतात याबद्दल उत्कट असतात आणि यशस्वी होण्याच्या इच्छेने प्रेरित असतात, त्यांना त्यांचं काम मनापासून आवडत, फक्त पैसा मिळेल म्हणून न आवडत काम करणारे त्यामध्ये १००% देऊ शकत नाहीत. #work_passion
५/९
💡 सर्जनशीलता / क्रियेटीव्ह : अपवादात्मक कर्मचारी चौकटीबाहेर विचार करू शकतात आणि समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधू शकतात. ते आपल काम नवीन आणि चांगल्या पद्धतीने कश्या प्रकारे करू शकतील याचा मार्ग शोधून काढतात. #Creativity
६/९
👼 भावनिक बुद्धिमत्ता: अपवादात्मक कर्मचारी त्यांच्या स्वतःच्या भावना समजून घेण्यास आणि व्यवस्थापित करण्यास सक्षम असतात आणि इतरांशी सहानुभूती दाखवण्यास सक्षम असतात, भवनांसोबत वाहत न जाता योग्य निर्णय ते घेतात. #emotional_Intelligence
७/९
🧑💻 ज्ञानाची तहान आणि टीम प्लेअर: अपवादात्मक कर्मचारी जिज्ञासू आणि जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात आणि सतत नवीन माहिती आणि अंतर्दृष्टी शोधत असतात, सोबतच सर्वांसोबत चर्चा करून माहिती जाणून घेतात सर्वांसोबत काम करतात.. #Team_Player#LoveForLearning
८/९
🚨आत्म-जागरूकता:
अपवादात्मक कर्मचारी त्यांची स्वतःची ताकद आणि कमकुवतपणा ओळखण्यास सक्षम असतात आणि फीडबॅक घेण्यास आणि सुधारण्यासाठी बदल करण्यास इच्छुक असतात. कोणाकडून नवीन शिकण्यास नेहमी तयार असतात. #Self_Awareness
९/९
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
दिवसेंदिवस उष्णता वाढतेय, आग ओतणारा सूर्य आता अधिकाधिक प्रखर होत चाललाय, २०२० मध्ये निघालेल्या स्कायमेट वेदर च्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर ही उच्च तापमान असलेले भारतातील नव्हे तर जगातील सर्वात उष्ण ठिकाणे होती.
🧵
#१/११ #मराठी#आरोग्य#महाराष्ट्र
महाराष्ट्र आपल्या उष्ण आणि दमट हवामानासाठी ओळखला जातो, ज्यामुळे योग्य खबरदारी न घेतल्यास अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. महाराष्ट्रातील कडक उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाची माहिती.
#२/११
💧हायड्रेटेड राहा, निरोगी राहा:
उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याची झपाट्याने घट होते. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स समतोल राखण्यासाठी गमावलेले पाणी पुन्हा शरीराला देणे अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे बाहेर जाताना पाणी सोबत ठेवा, ठराविक कालावधीने पाणी पीत रहा.
#३/११
आजकल सगळीकडे एकच चर्चा आहे AI 🤖 वेगवेगळ्या AI ने मार्केट मध्ये धुमाकूळ घातलाय, फक्त लिहा इमेज तयार, फक्त विचारा प्रोग्रॅम रेडी आणि बरच काही !! CHAT GPT तर आता सर्वांनाच माहित आहे. आता गंभीर प्रश्न असा कि हे AI आपल्याला जॉब-व्यवसायात मदत करतील कि आपलयाला रिप्लेसचं करतील?
1/10
Chat GPT बद्दल बोलायला गेलं तर हि आजपर्यंत सर्वात जलद गतीने पसरलेली वेबसाईट / टेक्नॉलॉजी आहे, १ मिलियन म्हणजेच १० लाख लोकांपर्यंत पोहोचायला जिथे फेसबुक, नेटफ्लिक्स यांना जवळपास वर्ष लागलं तिथे CHAT GPT फक्त ५ दिवसांत १ मिलियन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचला. 🌐👨🏻💻
2/10
Chat GPT आहे तरी काय ? 💬 जस आपण एलेक्सा, गूगल व्हॉइस यांना प्रश्न विचारतो आणि ते इंटरनेट वर उपलब्द माहितीवरून त्याच उत्तर बोलून देतात तसच CHAT GPT हे शब्दांतुन म्हणजेच लिहून तुम्हाला उत्तर देतो. म्हणजेच तुम्ही त्याच्याशी बोलून तुम्हाला जी माहिती हवी आहे ती घेऊ शकता.
3/10
इथे तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येते आणि तिकडे हातातील काम ठप्प होत. हेच आहे आजच मॉडर्न डीस्ट्रॅक्शन. डीस्ट्रॅक्शन अनेक प्रकारात येऊ शकते. हे फक्त एक उदाहरण होत याला कोणी अपवाद नाही सर्वांसोबतच हे होतच पण लक्ष्यात घ्या, ते सुधारले जाऊ शकते.
ते कसं ? हे आजच्या थ्रेड मध्ये बघू.
१/१२
१. एक रात्र-आधीचे नियोजन:
उत्पादनक्षम दिवसासाठी, आदल्या रात्रीच योग्य नियोजन करणे चांगले. तुमचा फोन आणि इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाण्यापूर्वी रात्री बनवलेली कामांची आणि प्रायोरिटी ची लिस्ट समोर दिसेल अशी ठेवा मगच योग्य कार्य स्वतःसाठी निवडा.
२/१२
२. स्वतःसाठी एक विचलित-मुक्त मोड स्थापित करा: इंटरनेटवर विचलित करणाऱ्यां ॲड्स आणि वेबसाइट ब्लॉकर साठी ॲप वापरा. मोबाईल नोटीफिकेशन बंद करा शिवाय, शांत ठिकाणी काम करणे, फोन बंद करणे आणि तो नजरेआड करणे हे लक्ष केंद्रित करण्याचे काही मार्ग आहेत.
३/१२
पुस्तक : दोगलापन
लेखक : अशनिर ग्रोव्हर (भारत पे संस्थापक, MD)
हे पुस्तक अमेझॉन वर बेस्ट सेलर म्हणून दिसत होते आणि अचानक कूकू एफएम वर मराठी मध्ये समोर आले.भारत पे आणि ग्रोव्हर मधील वाद आणि मीडिया मध्ये रंगलेल्या गोष्टी डोक्यात फिरू लागल्या, म्हणून हे ऑडियोबुक ऐकायला सुरू केलं
१/८
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात तसच भारत पे केस ची ही दुसरी बाजू अशनीर यांच्यादृष्टिने या पुस्तकात बघायला मिळाली.
दिल्ली ते मुंबई, स्टार्ट उप कल्चर आणि उद्योजक म्हणून प्रवास या पुस्तकातून तुम्हाला घडेल.
यात कोण बरोबर कोण चूक ह्या गोष्टी बाजूला ठेवून प्रवासाची मजा घ्या.
२/८
सहसा कोणताही उद्योजक शेरहोल्डरस, मित्रपरिवार आणी सोसायटी मधील इमेज या सर्व गोष्टी समोर ठेऊन सार्वजनिकपणे काय बोलतात याबद्दल सावधगिरी बाळगतात, परंतु ग्रोव्हर या नियमांचे पालन करत नाहीत.
याचा अनुभव शार्क टँक बघणाऱ्यांना आलाच असेल. तसच काहीस या पुस्तकातही दिसेल.
३/८ #मराठी
कोणत्याही मुलाखतीची सुरुवात सहसा याच प्रश्नाने होते, मग या प्रश्नाचे स्वरूप वेगळे असू शकते पण उत्तर मात्र तुम्हाला तुमच्या स्वतःच्या परीचयानेच द्यायचे असते, उत्तर सोपे असते स्वतःबद्दल सांगायला कोणाला आवडत नाही, यातच गोंधळ उडतो, काय सांगावे कश्याबद्दल सांगावे हेच सुचत नाही. 1/8
या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्यासाठी, तो प्रथम का विचारला जातो हे समजून घ्या. मुलाखत घेणाऱ्याला तुमच्या जीवनकथेत अजिबात रस नसतो तर तुम्ही त्या क्षेत्रात किती चांगले आहात आणि कंपनीसाठी योग्य आहात का हे जाणून घेणे आणि पुढील मुलाखत प्रक्रियेला दिशा मिळवून देणे हा उद्देश असतो
2/8
तुमचा परिचय म्हणजे समोरच्या व्यक्तीवर तुमची कायमची-पहिली छाप सोडण्याची संधी आहे.
अतिशय चांगले उत्तर द्या: मुलाखत घेणारा तुमच्यावर अधिक प्रश्नांचा भडिमार करेल.
चुकीचे उत्तर द्या, तथापि, तुम्हाला त्वरित "ओके उमेदवार" म्हणून लेबल केले जाईल.
उत्तरापेक्ष्या मौल्यवान असे प्रश्न..
आपण अनुभवले असेल की कधी कधी लहान मूल भरपूर प्रश्न विचारून अगदी भंडावून सोडतात. मोठेपणी आपण जे प्रश्न स्टुपिड म्हणून टाळतो ते खरतर निरागस असतात, त्यांचं कुतूहल असतं, गोष्टी शिकण्याची सुरुवात असते.
हेच प्रश्न विचारायचे आपण आता विसरतोय का ?
#१/७
खरतर शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी प्रश्न विचारणे महत्वाचे आहे. हे आम्हाला नवीन कल्पना एक्सप्लोर करण्यास, आमच्या ज्ञानाचा विस्तार करण्यास आणि आमच्या गृहित धरलेल्या समजुतींना आव्हान देते.
जसे जसे आपण मोठे होत गेलो तस गोष्टी समजू लागल्या काही पूर्ण तर काही अर्धवटच.
#२/७
प्रश्न हे विचारांचे प्रवेशद्वार आहेत हे आपण विसरूनच गेलो, हे अस का ते तस का हे लहानपणी सहज विचारायचो आता "हे कसं विचारायचं" इथेच येऊन थांबत. लहानपणी लोक काय म्हणतील हा न्यूनगंड नव्हता आता तो शिकण्यातील सर्वात मोठा अडथळा बनत चाललाय.
#३/७