तुमचा सोनार तुमच्याकडून सोन्याचे योग्य पैसे घेतोय का?
काल अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अनेकांनी सोने खरेदी केली असेलच. जरी केली नसेल तरी भारतीयांचे सोन्याबाबतचे प्रेम पाहता सोने खरेदीला खरे तर मुहूर्ताची गरज नसते. #म#मराठी#gold
मात्र हीच सोने खरेदी करताना किती भारतीय सोन्याच्या किमतीकडे लक्ष देतात? आपण एखाद्या सोनाराकडे वर्षानुवर्षे सोने घेतोय म्हणजे तो आपल्याला फसवणार नाही अशी सगळ्यांचीच धारणा असते. त्याच नादात बरेचदा सोनार सोन्याची किंमत कशी मोजतोय? यावर कोणी फारसे लक्ष देत नाही.#म#मराठी#gold
आज घडीला भारतामध्ये सोन्याच्या बिलींगसाठी कुठलाही स्टॅंडर्ड पॅटर्न नाही. म्हणूनच एका सोनाराकडून दुसऱ्या सोनाराकडे गेल्यास सोन्याची किंमत बदलताना दिसते. प्रत्येक शहराची तालुक्याची एक ज्वेलरी असोसिएशन असते आणि प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून सोन्याचा दर जाहीर केला जातो. #म#मराठी
त्यामुळे सोन्याचे दर प्रत्येक शहरांमध्ये वेगवेगळे असू शकतात.
आपण घेतलेल्या सोन्याच्या दागिन्याची किंमत साधारणपणे कशी मोजतात? हे आता पाहूया.
सोन्याच्या दागिन्यांची किंमत = सोन्याची किंमत (१४ कॅरेट, १८ कॅरेट, २२ कॅरेट) x दागिन्याचे ग्रॅममधील वजन + मेकिंग चार्जेस + ३% जीएसटी. हा जीएसटी दागिन्याची किंमत आणि मेकिंग चार्जेस या दोन्हींवर लागतो.
मेकिंग चार्जेस समजा १०% धरले तर ते होतील ५४,००० x १०% = ५४०० रुपये
दागिन्यांची एकूण किंमत =५४,००० + ५४०० = ५९,४०० रुपये
यावर ३% जीएसटी होईल १७८२ रुपये
हॉलमार्किंग चार्जेस होतील ४५ रुपये (हदागिन्यांचे वजन कितीही असले तरी ही किंमत सरकारी नियमानुसार ४५ रुपयेच असेल.) #म#मराठी#gold
दागिन्यांची फायनल किंमत = ५४,००० + ५४०० + १७८२ + ४५ = ६१,२२७ रुपये
समजा तुमच्या दागिन्यांमध्ये स्टोन्स किंवा हिरे असतील काह सोनार त्याचेही वजन दागिन्याच्या वजनामध्ये धरतात. खरेतर अशा स्टोनचे किंवा हिऱ्याचे वजन वजा करून मगच दागिन्याचे वजन मोजले पाहिजे.#म#मराठी#gold
पुढच्यावेळी सोनेखरेदीला जाल तेव्हा तुमचा सोनार बिलाची रक्कम कशी मोजतोय याकडे नक्की लक्ष द्या.
आपण विकत घेतलेल्या सोन्याच्या शुद्धतेबाबत कायमच आपल्या मनामध्ये एक शंका असते. यावर उपाय म्हणून ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजेच बीआयएस ने एक स्मार्टफोन ऍप्लिकेशन डेव्हलप केलेले आहे. #म#मराठी
या ॲपचं नाव बीआयएस केअर ॲप असे असून त्या ॲपद्वारे हॉलमार्क सर्टिफाइड गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरी च्या शुद्धतेबाबत खात्री पटवता येते.बीआयएस ही भारतातील स्टॅंडर्ड बनवणारी एक राष्ट्रीय संस्था आहे. #म#मराठी
31 मार्च 2023 नंतर सहा आकडी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID शिवाय कुठल्याही प्रकारचे सोन्याचे दागिने विकण्यास बीआयएसने मनाई केली आहे.#म#मराठी
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बरेच जण सोने खरेदी करतात. मात्र फिजिकल गोल्ड सांभाळणे, त्याची काळजी घेणे या सगळ्या गोष्टींमुळे सध्या बऱ्याच जणांचा डिजिटल गोल्ड विकत घेण्याकडे कल वाढतो आहे असे दिसते. डिजिटल गोल्ड विकत घेण्याचे चार मार्ग आपण या थ्रेडमधून पाहणार आहोत. #म#मराठी
गोल्ड ईटीएफ
फिजिकल गोल्डची किंमत ट्रॅक करणारे जे म्युच्युअल फंड आहेत त्यांना गोल्ड ईटीएफ असे म्हटले जाते. तुम्ही या फंडांमध्ये केलेली गुंतवणूक वापरून फंड मॅनेजर गोल्ड बुलियन विकत घेतो. गोल्ड ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित, नियम आणि अटींना धरून असते. #म#मराठी
गोल्ड ईटीएफ लिस्टेड असतात आणि त्यामध्ये नियमितपणे ट्रेड सुद्धा होतात. गोल्ड ईटीएफमध्ये चांगली लिक्विडिटी देखील असते आणि ते लिस्टेड असल्यामुळे त्यांच्यामध्ये ट्रेडिंग करणे देखील सोपे असते. #म#मराठी
गेल्या ९ महिन्यात तब्बल ५३ लाख ॲक्टिव ट्रेडर्सने एनएसईवर ट्रेड करणं बंद केलंय. काय असेल कारण? जाणून घेऊयात या थ्रेडच्या माध्यमातून...
Thread 👇
नक्की RT द्या. #ShareMarket#StockMarket#Traders#Marathi#म#मराठी
आयपीएलच्या पार्श्वभूमीवर रिलायन्सने एक मोठा डाव टाकला आहे. यंदाची आयपीएल रिलायन्सच्या जिओ सिनेमा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर संपूर्णपणे मोफत दाखवण्यात येणार आहे. आयपीएलच्या टीव्ही प्रसारणाचे हक्क स्टारकडे आहेत. #म#मराठी#IPL2023#IPLonJioCinema
मात्र स्टारच्या जास्तीत जास्त युजर्सला आपल्याकडे वळवण्यासाठी रिलायन्सने आता मोठी खेळी केली आहे.
आपल्या हाताशी असलेल्या तीन मोठ्या केबल नेटवर्क कंपन्या वापरून रिलायन्स जवळपास १ कोटी ७० लाख युजर्सला आयपीएल पाहण्यापासून वंचित ठेवू शकते. #म#मराठी#IPL2023#IPLonJioCinema
भारतामध्ये एकूण १४ कोटी टीव्ही केबलवर चालतात. या १४ कोटींपैकी १ कोटी ७० लाख टीव्हींवर खालील तीन कंपन्यांचे कनेक्शन्स आहेत.
जी टी पी एल हाथवे - ८० लाख
हाथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेड - ४७ लाख
डेन नेटवर्क लिमिटेड - ४० लाख #म#मराठी#IPL2023#IPLonJioCinema
कंपनीने आपल्या इक्विटी कॅपिटल वर किती रिटर्न्स जनरेट केलेत? हे आपल्याला रिटर्न ऑन इक्विटी हा रेशो सांगतो. मात्र या रेशोमध्ये कंपनीने डेट म्हणून घेतलेले कॅपिटल विचारात घेतले जात नाही. #म#मराठी
रिटर्न ऑन कॅपिटल एम्पलॉइड या रेशो मध्ये मात्र कंपनीचे डेट विचारात घेतले जाते आणि म्हणूनच हा रेशो कंपनीच्या रिटर्न्सबद्दल अधिक व्यापक चित्र स्पष्ट करतो. #म#मराठी
कंपनीने प्रत्येकी १ रुपया कॅपिटलवर किती प्रॉफिट जनरेट केला आहे?हे आपल्याला रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा रेशो सांगतो.
आजच्या तारखेला नेस्ले इंडिया कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड १५२.६१% आहे.म्हणजेच दर १०० रुपये कॅपिटल मागे कंपनीने १५२.६१ रुपयाचा प्रॉफिट जनरेट केलेला आहे. #म
थ्रेडः
भूतानमध्ये भारतीयांना ड्युटी फ्री सोनं खरेदी करता येणार आहे. भारतात सध्या सोनं ५७ हजारांच्या आसपास आहे तर भुतानमध्ये ४० हजारांच्या आसपास. #म#मराठी#gold 1/n
परंतू यासाठी भूतान सरकारने दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली अट म्हणजे भारतीयांना भूतानमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट फी अर्थात एसडीएफ द्यावी लागणार आहे. जी १२०० रुपये असेल. #म#मराठी#gold 2/n
दुसरी अट म्हणजे तुम्हाला भूतान सरकारच्या टुरिझम डिपार्टमेंटने सर्टिफाय केलेल्या हॅाटेलमध्ये एक रात्र राहावे लागेल. #म#मराठी#gold 3/n