🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaU

Sep 9, 2020, 11 tweets

मुंबई PoK तुलनेमुळे कंगनाला संपुर्ण राज्याचा द्वेष पत्करावा लागला व त्यामुळे कंगना राणावत ला केंद्र सरकारने 'Y+' श्रेणी सुरक्षा दिली हे आपल्या सर्वांना माहित आहे.आजच्या थ्रेडमध्ये भारतात एकुण किती सुरक्षा प्रकार अस्तित्वात आहेत व त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया! #म #धागा

एखादा व्यक्ती वलयांकित असेल,अति महत्त्वाचा असेल,समाजामध्ये एखाद्या प्रतिष्ठीत पदावर अथवा वेगळ्या उंचीवर असेल (थोडक्यात VIP) तर अशा व्यक्तीला जीवनाला धोका असु शकतो ह्या कारणाने भारतामध्ये एकुण ५ प्रकारच्या सुरक्षा श्रेणी दिल्या जातात.
'X,Y,Z,Z+ आणि SPG'

'X' श्रेणी:- ही सर्वात प्राथमिक श्रेणी असुन ह्या श्रेणीमध्ये २ सुरक्षा रक्षक दिले जातात.ह्यामध्ये एकही commando दिला जात नाही फक्त दोन सशस्त्र पोलीस दिले जातात.

'Y' श्रेणी:- ही वरून ४ नंबरची श्रेणी असुन ह्यामध्ये एकुण ११ रक्षक उपलब्ध करून दिले जातात.ह्यात १ किंवा २ NSG(national security guard ज्यांना आपण black cats म्हणतो) २ वैयक्तिक सुरक्षा रक्षक आणि बाकी उरलेले सशस्त्र पोलिस असतील.ह्या प्रकारची सुरक्षा कंगनाला दिली आहे.

'Z' श्रेणी:- ही श्रेणी वरून ३ नंबरला असुन ह्यामध्ये एकुण २२ सुरक्षारक्षक दिले जातात.त्यात ४ ते ५ NSG आणि राहिलेल्या मध्ये दिल्ली पोलीस,ITBP(Indo Tibetian Border Police) किंवा CRPF(Central Reserve Police Force) यांचा समावेश असतो व एक गाडी देखील दिली जाते.

'Z+' श्रेणी:-ही श्रेणी वरून २ नंबरला असुन ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांचा आकडा ३६ ते ५५ पर्यंत जाऊ शकतो.त्यात १० च्या आसपास NSG Commandos असु शकतात.ह्या रक्षकांकडे अत्यंत आधुनिक शस्त्र असतात व ते सर्व Martial arts,karate मध्ये निपुण असतात.राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ही रक्षा आहे.

SPG(special protection group):-‌हे रक्षाकवच फक्त देशाचे पंतप्रधान व माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिले जाते.ह्यात किती सुरक्षारक्षक असतात हा आकडा गुपित आहे.१९८४ ला इंदिरा गांधी यांची हत्या केली गेली म्हणुन १९८५ ला बिरबलनाथ कमीटीच्या सल्ल्याने १९८८ ला SPG तयार केला.

अतिरिक्त माहिती:- जेव्हा १९८९ला व्हि.पी.सिंगची सरकार आली तेव्हा त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 'SPG' सुरक्षा काढुन घेतली.त्यानंतर राजीव गांधींची हत्या झाल्यावर व्हि.पी.सिंग वर देशभरातुन मोठ्या प्रमाणात टिकेला सामोर जाव लागलं होत.
ह्या घटनेनंतर SPG act मध्ये सुधारणा

करून माजी पंतप्रधान व त्यांच्या कुटुंबीयांना १० वर्षांपर्यंत SPG श्रेणी रक्षा पुरवली जाईल अस सांगण्यात आले.२००३ मध्ये वाजपेयी सरकार आल्यावर त्यांनी १० वर्ष कालावधी कमी करून १ वर्षावर आणला.SPG रक्षा ऐच्छिक असुन मनमोहनसिंग यांच्या मुलीने ती नाकारली होती.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SPG रक्षा उपलब्ध आहे.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling