🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaU

Sep 28, 2020, 12 tweets

मित्रांनो..
तुम्ही 2-3 दिवसांपासून ऐकलच असेल की अमेरिकेची दुचाकी क्षेत्रातील नामांकित कंपनी '#HarleyDavidson' ने भारताच्या बाजारातुन आपला गाशा गुंडाळण्याची घोषणा केली.तर आज आपण आंबा🥭-Harley Davidson🏍️ चे नाते,नक्की काय झाल की कंपनी भारत सोडुन चालली हे पाहुया..
#म #मराठी #रिम

Harley Davidson(HD) ही अमेरिकन कंपनी असुन 1903 साली हिची स्थापना झाली..ह्या कंपनीबद्दल सांगायच म्हणल तर ज्यावेळीस अमेरिकेमध्ये महामंदी आली होती त्यावेळीस 'Indian motors' आणि HD या दोनच वाहन उत्पादक कंपन्या तग धरू शकल्या होत्या.🙏या कंपनीचे जगभरात अनेक फॅन्स आहेत🔥🔥♥️♥️

तर आता एव्हढा मोठा इतिहास असणारी कंपनी एकाएकी भारताच्या बाजारपेठेला सोडुन जाण्यामागे उद्देश काय? हे पाहुया..
HD च्या भारतातील पदार्पणाची सुरूवात आंब्यापासुन होते..हो बरोब्बर!!!
2007 साली जेव्हा मनमोहनसिंग भारताचे पंतप्रधान होते व जाॅर्ज बुश हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा

दोन्ही देशांमध्ये एक करार झाला त्यानुसार भारत आपले 'आंबे' अमेरिकेत विकु शकत होता व त्याबदल्यात अमेरिकेतील एक कंपनी भारतात व्यवसाय करू शकत होती..ती कंपनी म्हणजे Harley Davidson.🙏
एक गोष्ट सांगावीशी वाटते की,‌ भारताची अमेरिकेसोबत असलेली आंब्याची डिल यशस्वी झाली नाही कारण

भारत जगभरात 50,000 टन आंबा निर्यात करतो तर त्यातील फक्त 6000-10,000 टन आंबा अमेरिका घेते.दुसरी गोष्ट अमेरिका-भारत अंतर खुप असल्यामुळे आंब्याचा व्यवहार न परवडण्यासारखा होता व तिसरी गोष्ट म्हणजे अमेरिका आंबा आयातीवर मोठा कर वसुल करायला लागला आणि व्यवस्थित वितरण करेनासे झाला🙏🙏

त्यात भारतानेदेखील Harley Davidson च्या सामुग्रीवर 100% custom duty लावायला चालु केले.थोडक्यात 1 रुपयाची गोष्ट 2 रूपयाला🙏..त्यामुळे पहिलाच महाग असणारी गाडी आणखी महाग झाली, म्हणुन दोलाण्ड ट्रंपने भारताला 'Tariff king' संबोधले होते.
शेवटी ट्रंपच्या दबावामुळे भारताने 50% CD केली..

2010 पासुन आत्तापर्यंत Harley Davidson च्या 25000 गाड्या विकल्या गेल्या असुन 'Royal Enfield' ची 'Bullet' एका महिन्यात एव्हढ्या गाड्या विकते.आता कंपनीने एकंदरीत विचार करून भारतामधुन exit घेण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे या कंपनीचे बवाल,हरियाणा मधील 70 कामगार बेरोजगार होऊ शकतात..

***तुमच्यासाठी अतिरिक्त माहिती:-
1)धोनीसह भारतातल्या 25000 लोकांकडे या कंपनीच्या गाड्या आहेत.कंपनीने जरी exit घेतली असली तरी आपल्या ग्राहकांना ती सर्व्हिस पुरवणार आहे🙏👍
2)Harley Davidson चे बेसिक माॅडेल 5 लाखांपासुन चालु होते,तेव्हढ्या किंमतीत 7 Hero Splendor+ येतात.

3)धोनीकडे जी गाडी आहे तिची किंमत 18 लाखापासुन पुढे चालु होते(1745cc) व आपल्या सर्वांचे लाडके सरन्यायाधीश यांनी ज्या गाडीवर बसुन फोटो काढले होते त्या Harley Davidson model च्या किंमतीची सुरूवात 51 लाखांच्या पुढे चालु होते(2000cc)..ती गाडी एका भाजप कार्यकर्त्याची होती🙏😄

4)आजच्या पिढीचा Cruiser bike पेक्षा Sports bike मध्ये Interest वाढल्यामुळे आणि किंमतीत असलेल्या तफावतीमुळे लोक Harley Davidson पेक्षा Royal Enfield च्या 2.5-3 लाखांत येणार्या 650cc गाड्या घेण्यात पसंती दर्शवत आहेत..🙏👍

5)Harley Davidson च्या आधी 2017 मध्ये General motors या कंपनीने भारतातुन गाशा गुंडाळला आहे.'General motors' किंवा 'GM'ची असणारी 'Chevrolet' कंपनी आपल्या सर्वांना माहितच असेल..🙏👍
@CovidWarriorM5 @prathameshs1189 @gpekmaratha @d_d_dhuri @sub_naikade @Digvijay_004 @MarathiDeadpool

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling