कोविड आजाराूतून बरे झाल्यानंतर पोषण आहारासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी "दीर्घकालीन कोविड रिकवरी और पोषण प्रबंधन" वेबिनार
प्रसारण-
1/n
#COVID19 आजारातून बरे झाल्यानंतर पोषण आहारासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी वेबिनारला सुरुवात.
बरे झालेल्या रुग्णांमध्ये 4 आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहतात. काही रुग्णांमध्ये 12 आठवड्यांपेक्षा अधिक काळ दिसून येतात-डॉ निखिल बांते.
#Unite2FightCorona
#COVID19 तून बरे झालेल्या रुग्णांमध्ये थकवा, अपचन, दीर्घकाळ अंगदुखी, दोन महिन्यानंतरही चव न येणे, झोप न येणे, डिप्रेशन जाणवते-डॉ निखिल बांते.
#Unite2FightCorona
#PostCOVID त्रासाची लक्षणे:
बहुतांश #COVID रुग्ण 2 - 4 आठवड्यात बरे होतात. मात्र, काही रुग्णांमध्ये 4 आठवड्यानंतरही लक्षणे राहतात, ती Acute Post COVID Syndrome म्हणून ओळखली जातात, तर, 12 महिन्यानंतरही दिसून येणाऱ्या लक्षणांना Post COVID Syndrome असे म्हणतात: डॉ निखिल बांते
#PostCOVID लक्षणे
थकवा, श्वसनाला त्रास, छातीत धडधड होणे, मोठ्या प्रमाणात घाम येणे, सांधे आणि स्नायू दुखी, चव आणि वास न येणे, निद्रानाश
मानसिक लक्षणे
नैराश्य
चिंता
: डॉ निखिल बांते
#Unite2FightCorona
#PostCOVID-19 लक्षणांची दोन मुख्य कारणे आहेत
विषाणू केवळ फुफ्फुसांवर परिणाम करत नाही, तर यकृत, मेंदू आणि मूत्रपिंडावरही आघात करतो. म्हणून यातून पूर्णपणे बरे होण्यास जास्त कालावधी लागतो: डॉ बांते
LIVE
विषाणुमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती अति सक्रिय होते, विषाणू आणि शरीराच्या लढाईत शरीरात अनेक रसायनांचा वापर होतो, ज्यामुळे अवयवांमध्ये जळजळ निर्माण होते. काही रुग्णांमध्ये हा दाह जास्त काळ राहतो: डॉ निखिल बांते
#PostCovid #Unite2FightCorona
#PostCovid: अभ्यासातून दिसून येते की 50%- 70% रुग्णांमध्ये #COVID19 मधून बरे झाल्यानंतर 3-6 महिन्यांतरही लक्षणे दिसून येतात.
सौम्य आणि तीव्र संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसून आली: डॉ निखिल बांते
#Unite2FightCorona
#PostCOVID मध्ये भीतीदायक बाब म्हणजे #thromboembolism, यात रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन रक्ताच्या गाठी निर्माण होतात.
रक्तात गाठी निर्माण झाल्यामुळे ह्रदयविकार उद्वभवण्याची शक्यता असते. मात्र, हे प्रमाण<5% post-#COVID19 रुग्णांमध्ये आढळते : डॉ बांते
फुफ्फुसात रक्तगाठीची लक्षणे म्हणजे-रक्तप्रवाहात अडथळा (Pulmonary embolism) - श्वसनास त्रास, कमी रक्तदाब जाणवतो, या रुग्णांनी तातडीने रुग्णालयात दाखल व्हावे: डॉ निखिल बांते
#PostCovidCare बद्दल तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
COVID मधून बरे झाल्यानंतर जर बोलताना त्रास जाणवत असेल, शरीराच्या एका भागात अर्धांगवायू /अशक्तपणा जाणवत असेल तर हे स्ट्रोकचे लक्षण आहे. त्यामुळे रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे: डॉ बांते
#PostCovid संसर्गामध्ये दिसून येणारी लक्षणे
कोरडा खोकला जास्त काळ राहतो
बरे होण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हा फुफ्फुसांच्या कडकपणामुळे देखील खोकला टिकू शकतो-: डॉ निखिल बांते
#Unite2FightCorona
#postCOVID सिंड्रोममध्ये आणखी एक घटक म्हणजे पल्मोनरी फायब्रोसिस, रुग्ण बरे होताना फुप्फुसावर डाग पडल्यामुळे होतो.
90% रुग्णांना याचा त्रास होत नाही मात्र 10% रुग्णांना दीर्घकाळासाठी पूरक ऑक्सिजनची आवश्यकता आहे- डॉ निखिल बांते
#Unite2FightCorona
जे #COVID19 रुग्ण ऑक्सिजन उपचारावर होते, त्यांनी बरे झाल्यानंतर फुफ्फुसांची तपासणी करावी. यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता लक्षात येईल: डॉ बांते
#COVID19 मधून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवतो, मात्र लक्षात घ्या हा ह्रदयविकार नाही. बरे झालेल्या रुग्णांमध्ये केवळ <3% रुग्णांमध्ये हा त्रास जाणवतो: डॉ बांते
#PostCovid संसर्गामध्ये दुसरा प्रकार म्हणजे जिवाणू संक्रमण, काही रुग्णांमध्ये बुरशीजन्य संक्रमणही आढळते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे हे घडते. तसेच मूत्रमार्गात संसर्गही आढळतो: डॉ बांते
#Unite2FightCorona
#PostCovid बुरशीजन्य संसर्ग प्रामुख्याने तीव्र मधुमेह, अवयव प्रत्यारोपण केलेले आणि कॅन्सर रुग्णांमध्ये आढळते.
सुदृढ व्यक्तींमध्ये बुरशीजन्य संसर्ग सामान्यतः आढळत नाही: डॉ बांते
#Unite2FightCorona
कोविडमधून बरे झाल्यानंतर घ्यावयाचा पोषक आहार
कोविडमध्ये शरीरातील पचनसंस्थेवर परिणाम झालेला असतो. त्याचा आघात प्रतिकारक शक्तीवर होतो.
लवकरात लवकर शरीराचे डिटॉक्सीफिकेशन करण्याची आवश्यकता: पोषणतज्ज्ञ @IshiKhosla1
#Unite2FightCorona
#Unite2FightCorona
✅आपला आहार दाह शमन करणारा असावा.
कार्बोहायड्रेटचा आहारात समावेश करावा
साखरेचा वापर कमीत कमी असावा.
#Unite2FightCorona
समतोल आहार
ज्या व्यक्तींना पचनाचा त्रास आहे, त्यांनी एकच वेळ आहार घ्यावा.
प्रथिने- आहारात प्रथिनांचा वापर असावा. रोगाशी लढताना मोठ्या प्रमाणात प्रथिनांचा ऱ्हास झालेला असतो. यासोबत भाज्यांचा आहारात समावेश करावा, यामुळे फायबर मिळते- @IshiKhosla1
Protective Foods
आहारात रंगीबेरंगी भाज्यांचा समावेश करावा (Rainbow Diet)
दुपारच्या जेवणात सलाड आणि कच्च्या भाज्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात करावा.
तेल आणि स्निग्ध पदार्थ- दही, तूप, मोहरी तेल, ओमेगा-3 मिळते. याचा अतिशय समतोल वापर करावा.
@IshiKhosla1
Protective Foods
Vitamin D-20 पेक्षा कमी असलेल्या कोविड रुग्णांना जास्त त्रास जाणवला.
Vitamin D-30 पेक्षा अधिक असलेल्या रुग्णांना कोणताही त्रास झाला नसल्याचे आतापर्यंत दिसून आले-@IshiKhosla1
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
व्हिटामीन डी, सी, झिंक, बी-कॉम्प्लेक्स, मॅग्नेशिअम
🍎पपई, सुके जर्दाळू, मशरुम खावे.
तुळशी, गुळवेल, अद्रक, लसूकण, कडूनिंबाची पाने, आवळा ज्यूस, मध, हळद, अश्वगंधा, काळी मिरी याचा वापर करावा (विशेषतः काढा करण्यासाठी) :- @IshiKhosla1
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
❌मद्य, साखरेची मात्रा जास्त असलेले पदार्थ
✅नियमितपणे मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या
✅नियमितपणे हलकासा व्यायाम, योग, ध्यानधारणा करावी
✅सरकारी नियमांचे पालन करा:- @IshiKhosla1
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.