तो दिवस होता ७ जुलै १९१० !
फ्रान्समधल्या मार्सेलिस बंदरावर हिंदुस्थानास निघालेली 'मोरिया' बोट काही काळासाठी स्थिरावली होती.
त्या बोटीत साखळदंडात कैद होते #स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
इंग्रजांचे अतिशय #डेंजरस् कैदी !
(१/१८)
पिस्तुलं जमविली होती, बॉम्ब बनविण्याचं प्रशिक्षण मिळवलं होतं.
अगदी भारतात सुद्धा ते तंत्र आणि बॉम्ब पाठविले होते.
(२/१८)
सावरकरांच्या ब्रिटिशविरोधी कारवायांमुळे त्यांना अटक करण्याची संधीच ब्रिटिश शोधत होते.
(३/१८)
लंडनमध्ये मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीचा वध केला, त्यातून स्फूर्ती घेऊन इकडे भारतात अनंत कान्हेरे आणि त्यांच्या साथीदारांनी जॅक्सनचा खात्मा केला. ज्योतीने ज्योत पेटते ती ही अशी.
आता सावरकरांची अटक निश्चित होती आणि ती झालीही.
(४/१८)
आंतरराष्ट्रीय निर्बंधांनुसार फ्रेंच पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर ब्रिटिश काही करू शकणार नाहीत हा सावरकरांचा कयास होता.
(६/१८)
आंतरराष्ट्रीय स्तरावर या उडीनं काय साधलं तर मार्सेलिस महापौर जां जोरे यांनी हा फ्रान्सच्या सार्वभौमत्वाचा अपमान आहे असं म्हणत सावरकरांच्या अटकेचा प्रश्न उचलून धरला.
(७/१८)
कार्ल मार्क्स यांचे नातू नि फ्रेंच वृत्तपत्र 'ल्यूमानिते' चे संपादक जाँ लोंगे यांनीही याबाबत एक जळजळीत लेख लिहिला.
८/१८
या उडीचे सावरकारांना अपेक्षित असे पडसाद उमटले. त्रिखंडात ही उडी गाजली ती ही अशी !
(९/१८)
सावरकरप्रेमी गाय आल्ड्रेड,श्यामजी कृष्ण वर्मा, मादाम कामा आणि इतरांचेही सावरकरांच्या सुटकेसाठी आटोकाट प्रयत्न सुरु होतेच पण त्यास म्हणावं तसे यश काही मिळत नव्हते.
१०/१८
सावरकरांनी त्या साऱ्या घटनेचा साद्यंत वृत्तांत लिहून ते निवेदन गुप्तपणे युरोपमध्ये पाठवलं.
(११/१८)
या दबावामुळेे फ्रान्सनं ब्रिटनकडे, सावरकरांना फ्रान्सला परत पाठविण्याची पुन्हा मागणी केली आणि ब्रिटनलाही यावेळी या मागणीपुढे नमतं घ्यावं लागलं.
१२/१८
१६ फेब्रुवारी १९११ ला या प्रकरणाची सुनावणी सुरु होऊन २४ फेब्रुवारी १९११ ला घाईघाईनं ब्रिटिशांच्या बाजूनं निर्णयही देण्यात आला.
या धक्कादायक निकालाविरुद्ध इंग्लंडमधील मॉर्निंग पोस्ट,डेली न्यूज, जर्मनीतील पोस्ट-
(१३/१८)
फ्रेंच पंतप्रधान ब्रिआँ यांना मात्र या निर्णयाची जबरदस्त किंमत मोजावी लागली. फ्रेंच लोकसभेला तोंड देणं टाळण्यासाठी त्यांनी राजीनामाच दिला.
अर्थात या निर्णयापूर्वीच भारतात ३०/१/१९११ लाच सावरकरांना २ जन्मठेपेच्या -
१४/१८
वीर सावरकरांच्या सुटकेचा प्रयत्न जरी अयशस्वी झाला असला तरी त्यांची ती उडी पूर्णपणे यशस्वी झाली कारण सावरकरांच्या इच्छेनुसार भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जगभर निनादला होता.
आता अख्या जगाचं लक्ष भारताकडे होतं.
(१५/१८)
त्यांची ही 'जगविख्यात उडी' आपल्या लक्षात आहेच आजपासून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जाणून घेण्याचा संकल्प करू या !
ही उडी घेताना सावरकर मात्र २७ वर्षांचे होते.
(१६/१८)
(१७/१८)
मी केवळ माझ्या शब्दात मांडण्याचा प्र्रयत्न केला एवढंच !
वृत्तपत्रर छायाचित्रर सौजन्य - श्री. चंदशेखर साने सर FB Page.
#स्वातंत्र्यवीरसावरकर
#राष्ट्रहितसर्वोपरि
#वंदेमातरम्
(१८/१८)
ह्या चुकीबद्दल क्षमा असावी.