My Authors
Read all threads
✍️✍️
चार महिन्यांपूर्वीची गोष्ट. मी ऑफिसला जात होतो. गाडी चालवत होतो.एक महिला माझ्याविरुद्ध दिशेने गाडी घेऊन येत होती. ती माझ्याकडे खुप कुतूहलाने पाहत हसत होती. कोणीतरी अनोळखी महिला माझ्याकडे का पाहतेय? चेहऱ्यावर काही लागलयं का? म्हणून आरशात पाहत होतो इतक्यात समोरून👇👇👇👇
एक गाडी आली आणि मला जोरदार धडक दिली. मला भानावर यायला अगदी १० मिनिटे लागली. लोक धावले त्यांनी माझी मदत केली. सगळं स्थिरसावर व्हायला मला वेळ लागला. पण या सगळ्या गडबडीत त्या महिलेचा चेहरा काही डोळ्यासमोरून जात नव्हता. मी ऑफिस मध्ये पोहचलो. जखमांवर मलम लावायला सुरुवात केली.
तशा जळजळत असलेल्या जखमा थंड होऊ लागल्या. डोळे बंद करून खिडकीतून बाहेर दिसत असलेला हिरवागार निसर्ग मी न्याहाळत होतो. इतक्यात वीज चमकावी तशी अगदी त्याच गतीने ती महिला मला पुन्हा आठवली. आता बंद डोळ्यानेच तिचा चेहरा मला स्पष्टपणे दिसत होता आणि मला धक्काच बसला.
शिट अस कसं होऊ शकतं? मी तिला विसरू शकतो?अगदीच नाही मी तिला विसरलो नव्हतो.फक्त तिच्यात झालेल्या आमूलाग्र बदलाने मी तिला ओळखलं नव्हतं. ती होती "साधना" माझं पहिलं प्रेम. तितकीच सुंदर तेव्हाही होती आणि आज त्याहीपेक्षा सुंदर दिसत होती.आता सरसर सरसर भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून सरत होता
मला पहिलं प्रेम झालं मी नववीत असताना. क्रिकेटचं मला आधीपासूनचं भयंकर वेड होतं. त्यात सतत मॅचेस व्हायच्या. शेजारच्या कॉलनीत एक मोठं मैदान होतं. तिकडे आम्ही क्रिकेट खेळायला जायचो. मैदान तस मोठं होतं. समोर एक नवीन बिल्डिंग नुकतीच बांधली होती. सामना सुरु झाला मी फलंदाजी करत होतो.
समोर बिल्डिंगच्या बाजूला सीमारेषा जवळ असल्याने माझी फटकेबाजी नेहमी तिथेच व्हायची. २,४ चेंडू खेळलो आपल्या पट्ट्यात चेंडू आला मग काय थेट षटकार ठोकला. टाळ्या वाजल्या खऱ्या पण शिव्या जास्त पडल्या कारण चेंडू समोर बाल्कनीत गेला होता. आता चेंडू परत आणणार कोण यावरून वाद सुरू झाला.
आम्ही सगळेच बिल्डिंगखाली जाऊन उभे राहिलो. आवाज देऊ लागलो. इतक्यात बाल्कनीत एक सुंदर मुलगी आली आणि खुप लेक्चर देऊ लागली. मुलं विनवण्या करत होती पण ऐकणारी ती कोण? मग मलाच पुढाकार घ्यावा. मी एक दोन गोड गोड डायलॉग चिटकवले मग काय तिने थेट बॉल माझ्याकडे भिरकावला आणि हसली.
आता हसली म्हणजे फसली.या मताचा मी नव्हतो पण मित्रांना आयतं कारण मिळालं होतं. मित्र मला तिच्या नावाने चिडवू लागले. रोज क्रिकेट व्हायचं मी रोज चेंडू तिकडे मारायचो. ती बाल्कनीत यायची चेंडू द्यायची. माझ्याकडे पाहून हसायची. आता चेंडू बाल्कनीत जायची गरज नव्हती कारण हल्ली सतत
कपडे वाळत घालणे, सतत बाहेर येणे, खिडकीतून डोकावणे, दुकानात जायला मुद्दाम ग्राऊंडवर येणे. मला पाहताच हसणं, ओढणी भिरकावणं, गालावरची बट मागे सारणं सगळं सगळं सुरू होतं. खरंतर हा प्रकार मला नवा होता. शहरात असलो तरी त्याकाळी मुलं आणि मुलींमध्ये एकत्र वावरण्यात आज इतकी सहजता नव्हती.
त्यामुळे मनात फार फार भीती असायची. खरं सांगायचं तर ती फार फार सुंदर होती. मी तिच्या समोर शून्य होतो. ती पंजाबी होती. तिचे आई बाबा म्हणजे कपडा उद्योगतलं शहरातलं नामवंत नाव होतं. तिचे कपडे आणि चॉईस याबाबतीत तोड नव्हती. एखाद्या मॉडेलला मागे टाकेल अशी ती आणि मी म्हणजे टाईमपास
चित्रपटातला "दगडू". अगदीच इतका नाही पण तिच्यासमोर जवळपास शून्य.
आता सगळीकडे आमच्याबद्दल चर्चा रंगू लागल्या. तिचा होकार मला जवळपास १००% फिक्स आहे अस सर्वांना वाटतं होतं. तो काळ मुलगा मुलगी एकमेकांशी सहजतेने बोलतील असा अजिबात नव्हता आणि मला एकट्या मुलीशी बोलायचा अनुभव नव्हता.
दिवस सरत होते. दिनक्रम तसाच सुरू होता. तिचं मुद्दाम कारणं काढून सतत बाहेर येणं. मी तिचा पाठलाग करणं. किंवा योगायोगाने आम्ही एकमेकांसमोर येणं. आमची शाळाही एक होती. फक्त मुलींची शाळा सकाळी आणि मुलांची दुपारी होती. तिकडेही पाहणं व्हायचं. लाजणं,हसणं, पलटणं सगळं सुरू होतं.
पुढे काहीच होतं नव्हतं पण या अबोल नजरेने व्यक्त होणाऱ्या या भावनेतचं खरं प्रेम दडलेलं असतं. या मताचा मी होतो. मला तिच्या होकाराची गरज कधीच वाटली नाही. मी खुश होतो पण कदाचित ती खुश नव्हती. तिची शाळा सुटताना माझी शाळा भरायची. या २ मिनिटांत आम्ही रोज एकमेकांना मनभरून पहायचो.
एकमेकांना पाहताना सगळी शाळा आम्हाला पाहतेय याचं भान आम्हांला उरायचं नाही. खरंतर शाळेतली सर्वात सुंदर मुलगी मला भाव देतेय या कारणाने शाळेत प्रसिध्द असलेला मी आता सुप्रसिद्ध झालो होतो. इथे आमच्यात काहीच नव्हतं पण बातम्या मात्र शिक्षकांपर्यंत पोहोचल्या होत्या.
शिक्षक स्पष्ट बोलत नसायचे. पण एकतर लाड करायचे किंवा टोमणे द्यायचे. कदाचित शाळेतलं हे पहिलं गाजलेलं अफेअर म्हणून त्यांनाही कौतुक असेल किंवा शिक्षकांनाही त्यांचं प्रेम आठवलं असेल. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टोमणे देऊन लाड करून ते थोड फार समर्थन करायचे. खरं सांगू जाम भारी वाटायचं.
शेवटी मी पुढाकार घेईल की ती पुढाकार घेईल यात काळ लोटत असताना. शाळेच्या आवारात शाळा सुटल्यावर तिने मला खुणावल. इकडे ये म्हणाली ती पुढे मी मागे असे चालत थोडे लांब गेलो. तिच्यासोबत एक मैत्रीण होती. त्या दोघी थांबल्या. मी त्यांच्यापासून खूप लांब थांबलो. मैत्रीण निरोप घेऊन आली.
मी थरथरत होतो. आजूबाजूला कोणी ओळखीच्या व्यक्तीने पाहिलं तर काय होईल? ही भीती मनात होती. पाय लटलटत होते. श्वासांचा जोर वाढला होता. तिच्या मैत्रिणीने मला जवळ येऊन सांगीतल ती तुझ्यावर प्रेम करते. तुझं मत काय? मी म्हंटल माझं सुद्धा तेच मत आहे. फक्त मी माझ्या मित्रांना विचारुन सांगतो.
अस उत्तर देऊन मी तिकडून पळ काढला. मी शाळेत गेलो. दिवसभर तेच विचार डोक्यात होते. आजवर सगळं ठीक होतं. पण आता ती हो बोलली आहे. यापुढे काय करायचं असतं प्रेमात? हातात हात घालून चालणं, भेटणं बोलणं वगैरे मला जमणार नव्हतं. मी घाबरलो होतो. यापेक्षा अव्यक्त असलेलं प्रेम किती छान होतं.
हे मला सतत वाटायचं. मित्रांशी चर्चा करून दुसऱ्या दिवशी मी तिला लांबूनच ईशारा करून हो सांगितलं. होकारा नंतर पुढे काय करायचं हे सांगणारा लव्हगुरु माझ्या आयुष्यात नव्हता. भेटायचं, बोलायचं या सगळ्यांना मी घाबरत होतो. माझे पहिले पाढे पंचावन्न तेच छान होते.
सहा महिने हाच दिनक्रम गेला.
तिला वाटायचं भेटावं, बोलावं पण मला जाम भिती वाटायची. इतक्या दिवसात आम्ही फक्त एकदाच भेटलो होतो. तोही तिचा होकार ऐकायला. मग एक दिवशी मित्रांनी बोलावलं काय सुरू आहे तुझं? तुम्ही भेटता का? बोलता का? मी म्हंटल अजिबात नाही. मित्र म्हणाले भेट तीला आज टेरेसवर तिच्या. खुणाव तिला ती नक्की
येईल. माझी ईच्छा नव्हती पण तरीही थरथरत केलेली ही पहिली हिंमत. संध्याकाळी ७ वाजता मी तिला खुणावलं मी तुझ्या टेरेसवर येतोय आपण भेटूया. ती अजिबात चाचपडली नाही. थेट येते म्हणाली मी फार घाबरलो होतो. कसाबसा टेरेसवर पोहोचलो अंधार पडलेला होता. आम्ही दोघे एकांत शांतता थोडा पिवळसर प्रकाश.
वाहणारा वारा तिचे उडणारे केस सगळं सगळं वातावरण सेट होते. माझे मित्र पलीकडून टेरेसवरून पहात होते. एकाने मला तिला किस करायला सांगितलं होतं. मुळात स्पर्शभावना म्हणजे प्रेम हे नव्हे तर प्रेम म्हणजे पवित्र भावना. माझं प्रेम मला पवित्र ठेवायचं होतं.मला या गोष्टी नको होत्या.
मित्र तिकडून खुणावून माझ्यावर दबाव टाकत होते. पहिल्यांदा भेटलो होतो मी. विषयही नव्हते. मग घाबरत थरथरत विषय काढला म्हंटल माझे मित्र असं असं म्हणताहेत तुझं मत काय आहे? ती म्हंटली ते काहीच चुकीचं बोलत नाहीयेत. बरोबर बोलताहेत. तिचा बिंधास्तपणा पाहून थक्क झालो.
माझ्यात हिंमत नव्हती. ती पुढे सरकली मीही पुढे सरकलो. श्वासांचा जोर वाढला. डोळे मिटले गेले. हात पुढे सरसावले. अजून पुढे जाणार इतक्यात तिचा मोठा भाऊ आला.मला मारहाण झाली तिला मारहाण झाली. मला ढकलून खाली काढलं गेलं. न केलेल्या चुकीची शिक्षा दोघांना मिळाली होती.
तिला खूप खूप मारलं.
मी रडत रडत घरी आलो. रात्रभर अंथरुणात रडत होतो मी. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो नेहमीच्या वेळेत तिची शाळा सुटल्यावर वाट पाहिली. ती आली तिने त्यादिवशी माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. मी ढसाढसा रडलो. तिला त्याची किंमत नव्हती. ती आमची शेवटची भेट. त्यानंतर मी ठरवलं यापुढे तिला आयुष्यात
तिला कधीच चेहरा दाखवायचा नाही. ते तत्व मी आजपर्यंत तंतोतंत पाळलं. अनेक वर्षे लोटली तिचं लग्न झालं. ती बाहेर देशात गेली होती. आता परत पुन्हा १६ वर्षांनी ती मला आज दिसली होती. मी भूतकाळात हरवलो होतो. इतक्यात माझा फोन वाजला. आमच्या दोघांत निरोप घेऊन येणारी ती मैत्रीण तिचा कॉल होता.
मी कॉल घेतला.ती म्हणाली तुषार "साधनाचा" कॉल आलेला.ती परत आलीये पुण्यात. तिने तुला सकाळी पाहिलं बाईकवर. तिला तुला भेटायची खुप ईच्छा आहे. मी तिचा फोन कट केला. तिचा नंबर ब्लॉक केला. माझ्यासाठी एक गोष्ट एकदा संपली की संपते. माझ्यासाठी आयुष्यात तत्व महत्वाची आहे #समाप्त
#काल्पनिक_कथा
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Keep Current with TUSHAR KHARE 🇮🇳

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!