साधूंची हत्या झाली, मागा CBI तपास
अर्णब गोस्वामी वर केस झाली, मागा CBI तपास
सुशांत राजपूत ने आत्महत्या केली, मागा CBI तपास
महाराष्ट्रतलं पोलीस काय फक्त गर्दी नियंत्रण करायला आणि ट्रॅफिक कंट्रोल करायला आहे का...?
त्या CBI ला जीचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने पिंजऱ्यातला पोपट असा केला होता.
त्या CBI ला जीचे दोन सर्वोच्च अधिकारी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून सर्वोच्च न्यायालया पर्यंत भांडत गेले होते.
त्या CBI ला जीला आरुषी तलवार केस 12 वर्षात सोडवता...
त्या CBI ला जीने व्यापम घोटाळ्यात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टाने फेटाळून लावला आहे.
त्या CBI ला जीने 2018 मधे दाखल केलेल्या करप्शन केसेस मधे 45% केसेस त्यांना सिद्ध करता आलेल्या नाहीत.(डेक्कन क्रोनिकल ची बातमी)
त्या CBI ला जीला गुवाहाटी उच्च न्यायालयाने असंविधानिक म्हंटले आहे ज्यावर CBI ने सर्वोच्च न्यायालयात स्टे घेतला आहे. म्हणजे मुळात CBI च्या...
बिहार-युपी पोलिसांबद्दल तर बोलायला नको एवढी वाईट अवस्था आहे. भर रस्त्यात 8 पोलीसांना कुणीतरी मारलं आणि मग पोलिसांनी देखील तसंच मारलं असल्या गोष्टी इकडे होत नाही. कुठल्याही सूज्ञ माणसाला एखाद्या प्रकरणाचा तपास युपी बिहारच्या पोलिसांनी करावा...
कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हे तपास हा राज्यांचा विषय आहे. ती राज्यांची घटनात्मक जबाबदारी आणि घटनात्मक अधिकार आहे. राज्यातील पोलीस व्यवस्थित तपास करत नसतील किंवा त्यावर काही आक्षेप असतील तर त्याबद्दल दाद मागण्यासाठी रीतसर...
मात्र उठसूट कुणीही उठून राज्यातील पोलीस बिनकामचे असल्यासारखं CBI कडे तपास द्या म्हणायचं किंवा राज्यातलं सरकार बदललं म्हणून पोलिसांकडून तपास...
आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रतल्या प्रकरणावर भरभरून व्यक्त होणारे आपापल्या राज्यातल्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प बसतात.
त्यामुळे मुंबई पोलिसांचं संघटित ट्रोलिंग करणाऱ्या लोकांनी थोडं आपल्या राज्यातल्या परिस्थितीवर सुद्धा बोलावं. इथली परिस्थिती आणि इथले पोलीस हे बिहार यूपीच्या तुलनेत
संख्याबळ, इन्फ्रास्ट्रक्चर आणि बजेट यानुसार महाराष्ट्र पोलीस देशात पहिल्या तीन क्रमांक मधे आहे आणि युपी बिहार शेवटच्या तीन क्रमांकात आहे.
त्यामुळे या लोकांनी इकडे टिका करण्यावर मेहनत घेतात तशी थोडी आपल्या राज्यातल्या परिस्थितीवर पण घ्यावी 🙂