मित्रानो आत्ता पितृपक्ष सुरु आहे ,आजचा हा धागा पितृपक्षाची कथा आणि अन्नपूर्णा ह्या देवतेचे महत्व अशा २ गोष्टीची सांगड घालून रचलेला आहे

मला असे वाटते कि पितृपक्षाचा गाभा आहे अन्नदान.

अन्नदान व अन्नपूर्णा ह्यांचे अद्वैत आहे

हा धागा ट्विटरवरील समस्त अन्नपुर्णाना समर्पित आहे
अन्नपूर्णा या देवतेला एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

दत्तसंप्रदायात श्रीदत्ताला नैवेद्य दाखवला जातो ,
त्यानंतर लगेच अन्नपूर्णेलाही दाखवला जातो

अन्नपूर्णेला एवढे महत्त्व का दिले जाते

यासंबंधी शंकर पार्वतीची कथा प्रसिद्ध आहे

अन्नाचे एवढे महत्त्व श्री शंकराला मान्य नव्हते
दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली.
पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपुर्णाच.
तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहा:कार माजला.
अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेवटी पार्वतीलाच दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या स्वरूपात काशीला अवतीर्ण झाली.
तिने अन्नदान सुरू केले.
भगवान श्रीशंकरालाही सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचे महत्त्व समजले
ते स्वतः कटोरा घेऊन पार्वतीकडे भिक्षा मागायला आले.
अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे

जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
समस्त प्राणीमात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत
@Vishakh50862352
अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देत राहते
अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते
म्हणूनच अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे
जिथे अन्नदानाचा विषय येतो तिथे पितृपक्षाचे महत्व हि अधोरेखित होते

महाभारत युद्धात कर्णाचा मृत्यू झाला
@gajanan137
स्वर्गात असताना त्याला सोने दागिने देऊ केले गेले,
अन्नाच्या जागी सोन्याचे प्रयोजन त्याला कळले नाही ,
तेव्हा इंद्राने त्याला सांगितले तू आयुष्यभर सोने चांदी दान केलेस
पण कधी पूर्वजांना अन्नदान केले नाहीस
कर्ण म्हणाला मला मझे पूर्वज माहित नव्हते
@RajeGhatge_M @TheDarkLorrd
कर्णाला त्याची चूक सुधारण्याची संधी दिली गेली
व १६ दिवस परत पृथ्वीवर पाठवले गेले
ह्या १६दिवसात आपल्या पूर्वजांना अन्नदान करून कर्णाला मोक्ष प्राप्ती झाली
मित्रानो हा मोक्ष दुसरीकडे कुठे हि नाही तर तर या जन्मी आणि याची डोळा दुसऱ्याला अन्नदान करून त्याला कृतार्थ होताना बघण्यात
आज आणि इथेच आहे
आपण बघतो घरोघरच्या अन्नपूर्णा अशा आपल्या आई आजी नेहमीच सांगत आल्या अरे किंवा अग आल्यासरशी दोन घास खाऊनच जा
आपल्या पूर्वसूरींना दोन घासात माणसं जुळवण्याचे गणित कळले होते.दोन घास" आपण कमी खावे परंतु अन्न हे दान करण्यातच खरे सुख असते, आनंद असतो
आपण एखाद्याला पैसे देऊ शकतो, कपडे देऊ शकतो,
परंतू स्वतःच्या ताटातील अन्न देणे हे वेगळे आहे
अन्न हे अनेक वासनांचे बीज आहे,
माणसाचे मन हे अन्नाशी निगडीत आहे.
म्हणूनच अन्न आणि वृत्तींचा, व्यक्तिमत्त्वाचा अतूट संबंध आहे
जेव्हा आपण दुसऱ्याशी "दोन घासाची" भागीदारी करतो तेव्हा अहंकाराचा, वासनांचा त्याग करत असतो.
असे हे अन्न कसे असते?
ते अन्न सुग्रास असले पाहिजे.
अन्न बनवणाऱ्याची मनस्थिती समाधानी असली पाहिजे.
त्यांनी ते अन्न समाधानानी बनवले असले पाहिजे.
तेच पदार्थ घेऊन वेगवेगळ्या लोकांनी बनवलेल्या अन्नाची चव वेगवेगळी असते.
याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते.
म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले गेले पाहिजे.
तिने शुचिर्भूत होऊन अन्न शिजवले पाहिजे.
आपल्याकडे मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णेची मूर्ती त्यासाठीच दिली जाते.
तिने अन्नपूर्णेची सेवा , उपासना करून, उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते

आपल्या अनेक वासना या अन्नाद्वारे पूर्ण होत असतात
पुष्कळ संन्याशीहि असे असतात की ज्यांच्या वासना अन्नात अडकून बसलेल्या असतात.
खाण्याच्या अनेक इच्छा अपूर्ण असतात.
शरीर आहे तिथे वासना असणारच.
त्या पूर्ण झाल्याशिवाय संपत नाहीत.
मित्रमंडळ जमा करून चिवड्याचा ढीगच्या ढीग फस्त करताना कसा आनंद मिळतो हे अनेकांनी अनुभवले असेल.
शेवटी जीवन हे आनंद निर्मिती साठीच आहे .
छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा खूप आनंद भरला आहे,
परंतु आपल्याला त्याची कल्पनाच नसल्यामुळे तो आनंद आपण घेत नाही अन्नामुळे शरीरात चैतन्य उत्पन्न होते .
अगदी शरीर सोडल्यानंतर सुद्धा या चैतन्याची आवश्यकता लिंग देहाला असते
@BalshaliBharat
उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते.
शुचिर्भूत होऊन आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे.
त्या अन्नात प्रेम असते.
म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते
केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो
म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते
आपल्याला बघा नेहमी अनुभव येतो नैवेद्याचा शिरा हा नेहमीच अतिउत्तम होतो .
उत्तम संसार करून सर्व प्रकारच्या वासना भोगून पूर्ण केल्या पाहिजेत
तेव्हाच माणूस परमेश्वर चिंतनाकडे वळू शकतो.
असमाधानी माणूस ध्यानधारणा करू शकत नाही
म्हणूनच शंकराचार्य म्हणतात-
"अन्नपूर्णे सदापूर्णे
शंकरप्राण वल्लभे
ज्ञान वैराग्य सिध्यर्थं
भिक्षांदैहि च पार्वती "
चला तर आपल्या घरच्या अन्नपूर्णेचे कृत्द्य्नातापूर्वक स्मरण करून
भुकेल्या जीवाला दोन घास भरवताना आपण हि म्हणू या

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥
जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा,राष्ट्रधर्म वाढवावा

Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा,राष्ट्रधर्म वाढवावा Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rajrajsi

8 Sep
मित्रानो शुभ संध्याकाळ आज भाद्रपद कृष्ण षष्ठी तिथी
श्री ज्ञानेश्वरी जयंती,
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा

पण आजच्या दिवंशी श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी हा ग्रंथ या दिवशी लिहून पूर्ण केला असा काहींचा समज झाला असेल परंतु ते खरे नाही
@gajanan137
पैठणनिवासी शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांनी इ.स.१५८४ साली याच तिथीस या ग्रंथाची शुद्धप्रत तयार करुन पूर्ण केली.
याच्या मागची गोष्ट आज मी आपल्यापुढे ठेवणार आहे
झाले असे कि, समाधीस्थानात गळ्याभोवती विळखा घातलेली अजानवृक्षाची मूळी काढण्याच्या निमित्ताने
@Vishakh50862352
संत ज्ञानेश्वरमहाराजांनी संत एकनाथमहाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि आळंदीला बोलावून घेतले.
नाथमहाराज आळंदीला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि, माऊलींची समाधी सापडत नाहिये.
परिसरात चौकशी केली तर असे कोणते स्थान येथे असल्याचे खात्रीलायक कोणाला माहित नसल्याचे कळले.
Read 17 tweets
7 Sep
मित्रानो नमस्कार आजचा धागा हा पूर्वनियोजित धागा नसून काल रात्री एक बातमी वाचनात आली जी कालच घडली
पण दिवसभर रिया चा अमली पदार्थांचा शो दाखवणाऱ्या कुठल्याही प्रसार माध्यमांनी ह्या बातमी ला जागा दिली नाही
कदाचित आज पेपर मध्ये आली असली तर माहित नाही
@gajanan137 @RajeGhatge_M
पण हा धागा हिंदूंसाठी न्यायिक लढा उभारून तो जिंकणाऱ्या व स्वतः चे नाव देशाच्या न्यायिक प्रक्रियेत अजरामर करणाऱ्या एका हिंदू मठाधीशाला समर्पित आहे

हिंदूंवर व त्यांच्या मठांवर/देवस्थानांवर खानग्रेसी, कम्युनीच, लेफ्ट-लिबरल मीडिया, लाल-बिंदी ब्रिगेड, अर्बन नक्षली, सेक्युलर,
क्रिसलामिस्ट्स वगैरे लोकांचा डोळा आधीपासूनच होता.

ही जमात हिंदूंना टार्गेट करायची थेरं काही आज करत नाहीयेत.

याची सुरुवात स्वतंत्र भारतात खूप आधी झाली होती.

त्यांचं कारस्थान ओळखून त्यावेळी एक साधू याविरुद्ध उभे राहिले!
@Vish_kc @TheDarkLorrd
Read 16 tweets
3 Sep
मित्रानो,शुभ संध्याकाळ आजचा धागा आहे
"एका अभागी मुलीच्या भाग्याची कथा"
सुरुवात आपण फ्लॅशबॅक ने करू या आपण जाऊया४२वर्षे मागे १९७८ मध्ये ,स्थळ आहे श्रीवत्स अनाथालय पुणे १३ ऑगस्ट १९७८ ची सकाळ अनाथालयाला जाग येते एका चिमुरडीच्या रडण्याने,संचालक दरवाजा उघडून बघतात @gajanan137
दृश्य असते नेहमीचेच कधीही न बघावे पण बघावे लागणारे,कुणी एक निर्दयी आईबाप आपल्या नवजात चिमुरडीला अनाथालयाच्या पायऱ्यांवर सोडून गेलेले असतात ,त्यादिवशीची कथा हि काही वेगळी नव्हती,संचालकांनी त्या मुलीला नाव दिले लैला

लैला हि श्रीवत्स मध्ये येऊन ३ च आठवडे झाले तो दिवस उजाडला
मिशिगन अमेरिका येथील एक जोडपे हेरेन आणि स्यू हे भारतीय आणि अमेरिकी जोडपे ज्यांनी पहिली मुलगी हि भारतातूनच दत्तकघेतली होती त्यांना एक मुलगा दत्तक घ्यायचा होता त्यांनी श्रीवत्स अनाथालयाला भेट दिली दुर्दैवाने म्हणा किंवा जास्त योग्य ठरेल सुदैवाने त्याना कोणी पसंद आले नाही
Read 11 tweets
31 Aug
आजचा धागा "अमीर रूपातील इस्लामिक आतंकी"
मित्रानो आज रुपेरी पडद्यावरील नायकाच्या चेहऱ्यामागे दडलेला देशविरोधी खलनायक पाहू या ज्याचा पहिला चित्रपट होता"कयामत से कयामत तक"यात जो चॉकलेट हिरो होता तो आज देशाच्या शत्रूचा पुरस्कार करणारा इथेच वाढून खाऊन पिऊन
@gajanan137 @kul_anagha
इथल्याच बहुसंख्य हिंदू समाजाची टिंगलटवाळी करणारा भेसूर चेहरा म्हणून पुढे आला आहे

पापा कहते हैं बड़ा नाम करेगा
बेटा हमारा ऐसा काम करेगा
मगर ये तो, कोई ना जाने
के मेरी मंज़िल, है कहाँ

असे म्हणत तो रुपेरी पडद्यावर झळकला आणि साऱ्या तरुणाईच्या हृदयाची धडकन बनला
@TheDarkLorrd
पण आज कळते आहे वरील गाण्याची शेवटची ओळ आज त्याची मंजिल दाखवते आहे ती आहे ISIS च्या धर्तीवरचे खिलाफत चे काफिर म्हणजे हिंदू मुक्त राज्य

त्याने जाळं खूप छान विणलं, अगदी कोळ्यासारखं अनेकजण या जाळ्यात अलगद अडकले...त्याचं हसणं, दिसणं.. तरुणाईची craze ठरलं
@shivajirao29 @RajeGhatge_M
Read 17 tweets
30 Aug
मित्रानो नमस्कार गणेशोत्सव सुरु आहे श्रीगणेश बुद्धीदाता आपल्या बुद्धीला चालना देणारा आहे,आजचा धागा गणितातील करामतींनी आणि शोधांनी ज्यांचे नाव प्रख्यात गणितज्ञ म्हणून “द वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मैथेमेटिशियन” या स्वीडनहुन प्रकाशित झालेल्या ग्रंथात समाविष्ट झालेले आहे
@gajanan137
अशा एका मराठमोळ्या व्यक्तीला समर्पित आहे,माझ्यासाठी हि हा धागा खास आहे त्याचा खुलासा शेवटच्या काही ट्विट्स मध्ये होईलच चला तर आज पाहूया काही खास गणितातील अंक आणि त्यांचे वैशिष्ट्य

गणितात तुम्हांला रस असेल, तर गणित एक गंमत असते. या विषयात काही मजेदार अंकही आहेत
@TheDarkLorrd
हॅपी नंबर, आर्मस्ट्राँग नंबर, ड्यूडने नंबर..यादी आणखी थोडी मोठी आहे.या यादीत दोन भारतीय नव्हे,तर महाराष्ट्राशी संबंधित नावं पण आहेत. एक आहे कापरेकर अंक आणि दुसरं आहे कापरेकर कॉन्स्टंट किंवा स्थिरांक!! कुणी कापरेकर इतके प्रसिद्ध असतील असं वाटलं नव्हतं ना?
@researchanand
Read 30 tweets
27 Aug
'गणेशोत्सवातील नवलाईची बातमी'
जगातील सर्वात मौल्यवान गणेश मूर्ती
जगातील सर्वाधिक महाग गणेशमूर्ती म्हणून सुरत या हिरेनगरीत हिर्‍याच्या व्यवसायात असलेल्या कनुभाई आसोदिया यांच्या घरच्या गणेशमूर्तीची नोंद केली गेली आहे.१८२.३कॅरटची ३६.५वजनाची ही हिर्‍याची मूती स्वयंभू आहे
@gajanan137
कनुभाई सांगतात १२ वर्षांपूर्वी बेल्जियम येथून त्यांच्याकडे आलेल्या कच्च्या हिर्‍यांमध्ये हा हिरा होता व निरखून पाहताना त्याला नैसर्गिकरित्याच गणेशाचा आकार आल्याचे त्यांना दिसले व त्यांनी हा हिरे गणेश आपल्या देवात ठेवला. आज हा गणेश हे त्यांचे आराध्य दैवत बनले आहे. @TheDarkLorrd
आपोआप गणेशाचा आकार निर्माण झाला असेल तर त्याला स्वयंभू गणेश म्हटले जाते.
कनुभाई सांगतात या मूर्तीची किंमत करण्याचे कारण कधी पडलेच नाही कारण श्रद्धेची किंमत करता येत नाही. मात्र हिरे पारख्यांनी या हिर्‍याची किंमत ६०० कोटींपेक्षा अधिक केली आहे. @Vishakh50862352
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!