👩🔧 वाढत्या बेरोजगारीचा चुकीची शिक्षण पद्धती जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं का?
मला वाटतं.☺️
आपली शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांना फक्त साक्षर बनवायचं काम करते. उच्च्शिक्षित किंवा उच्च्विद्याविभुषित व्यक्ती सुद्धा आपल्या शिक्षण व्यवस्थेत अर्थसाक्षर झालेला नसतो. #म#मराठी#महाराष्ट्र
मुळात आर्थिक विषयांचं ज्ञान आपल्या शिक्षण पद्धतीतून मिळतच नाही. आपल्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी उच्च्शिक्षित होऊन सरकारी नोकरी मिळवायचे स्वप्न बघतो. नोकरी करायची स्वप्ने दाखवणारी शिक्षणपद्धती कधीच उत्कृष्ठ शिक्षण पद्धती असू शकत नाही.
आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पैसा कसा मिळवावा, पैसा कसा वाढवावा, पैसा कसा वाचवावा इत्यादी बाबत विद्यार्थी अनभिज्ञ असतो. त्यामुळेच तर लाखो रुपये पगार असलेले तरुण महिन्याच्या शेवटी कंगाल झालेले दिसतात. त्यामुळेच तर अनेक उच्च्शिक्षित तरुण बेरोजगार पाहायला मिळतात.
त्यामुळेच तर आपला युवक वर्ग रोजगारासाठी सरकारवर अवलंबून असलेला पाहायला मिळतो. त्यामुळेच तर बेरोजगारी आणि नैराश्य यातून हजारो लाखो तरुणांच्या आत्महत्या पाहायला मिळतात. हे बदलणार कधी? नोकरी करण्याची स्वप्ने पाहणारा तरुण वर्ग नोकऱ्या देण्यासाठी धडपडताना कधी पाहायला मिळणार?
आपल्या तरुणांची बौद्धिक क्षमता, चिकाटीने काम करण्याची मेहनत करण्याची तयारी रोजगार निर्मिती मध्ये कधी रूपांतरित होणार? माझा महाराष्ट्र स्टार्टअप्सचा हब कधी बनणार? माझा महाराष्ट्र उद्योजकांचा महाराष्ट्र कधी बनणार? बनेल. नक्की बनेल. त्यासाठी
आपल्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवावे लागतील. अर्थसाक्षरता हा विषय अगदी शालेय वयापासून अभ्यासक्रमात समाविष्ट झाला पाहिजे. विद्यार्थी जेव्हा पदवी घेऊन विद्यापीठातून बाहेर पडेल तेव्हा त्याच्याकडे १०० रुपयांचे १००० रुपये कसे करायचे याच ज्ञान, कला किंवा कौशल्य असायला पाहिजे.
नोकरी मिळो अगर ना मिळो स्वतःची उपजीविका करण्याएवढे पैसे तरी त्याला कमावता आले पाहिजेत. नोकरीसाठी वणवण फिरण्यापेक्षा नोकऱ्या निर्माण करण्यासाठी धडपडणारी युवा पिढी तयार झाली पाहिजे.सोबत अडचणीच्या काळात उपयोगी ठरणारी बचतीची हुशारी हवी.
आपला #माधवपाटील #MaadhavPatiLL
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
💃 ऑक्सफर्ड विद्यापीठ देणार महाराष्ट्रातील सर्व महिलांना व्यवस्थापन विषयाची डॉक्टरेट 💃
कालची गोष्ट.
सकाळी ७ वाजल्यापासून तिची धडपड पाहतोय,
१२ वाजले तिला झोपायला,१७ तास काम 🥺 .
मी तर मेलो असतो 🤪
दिवाळी साजरी करणे म्हणजे खायचे काम नाही. #म#मराठी#महाराष्ट्र#स्त्री#महिला
कुटुंबाला फराळ खायला घालणे म्हणजे बाप रे...
पण आपली आई,ताई,वहिनी, आजी, काकू , अत्या , मावशी यात तरबेज.आणि लुडबुड करणारी मुलगी तर उद्याची शेफ असते.
आणि बायको बद्दल न बोललेले बरे. कारण ती सगळं चांगलच करत असते पण समाज "बायको" या नावाखाली, त्या व्यक्तीला हसण्यावारी नेतात.@dnyanada24
दिवाळीत प्रत्येक महिलेची तळमळ,प्रेम,आत्मियता पाहून डोळ्यात पाणी आले राव. दिवाळीच का,पण ती २४x७ x ३६५ राबते,आपल्या माणसांसाठी. तीला साडी,सोने देणारे आपण कोण?
बघा ना,एक चहा करून पाजला तरी खुष होते.ती सगळं कमावू शकते हे नक्की. खरंच महिला ह्या घर नाही दुनिया चालवतात असे मला वाटते.
भारतात खाजगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. खाजगीकरणाचा फायदा कदाचित पैशांमध्ये असेल पण #आरक्षण संपेल,स्वप्नं भंगतील आणि बेरोजगारी वाढेल हे नक्की. विमानतळ आणि रेल्वेनंतर आता सरकारी बँकांचे खाजगीकरण होण्याच्या मार्गावर आहे.
उद्या आपल्या भारतात कशाचे खाजगीकरण होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. उद्या जंगलांचे, हवेचे, पाण्याचे, वाघांचे, नद्यांचे, सैन्याचे अगदी न्यायालयांचे, कशाचेही खाजगीकरण होऊ शकते. आणि ते जनतेच्या हातात नाही. तसा प्रत्येकाला सारा भारत प्यारा.
पण किमान आपल्या आवडीच्या अमुक-अमुक गोष्टींचे खाजगीकरण करू नका यासाठी प्रत्येक *#कॉमन_मॅन' ने सरकारला सांगितले पाहिजे. म्हणूनच हे विनंती पत्र. #समुद्र हा #केंद्रसरकार च्या अखत्यारीतला विषय. पण त्याआधी तो माझा, तुमचा, आपला आहे असेच