💃 ऑक्सफर्ड विद्यापीठ देणार महाराष्ट्रातील सर्व महिलांना व्यवस्थापन विषयाची डॉक्टरेट 💃
कालची गोष्ट.
सकाळी ७ वाजल्यापासून तिची धडपड पाहतोय,
१२ वाजले तिला झोपायला,१७ तास काम 🥺 .
मी तर मेलो असतो 🤪
दिवाळी साजरी करणे म्हणजे खायचे काम नाही. #म#मराठी#महाराष्ट्र#स्त्री#महिला
कुटुंबाला फराळ खायला घालणे म्हणजे बाप रे...
पण आपली आई,ताई,वहिनी, आजी, काकू , अत्या , मावशी यात तरबेज.आणि लुडबुड करणारी मुलगी तर उद्याची शेफ असते.
आणि बायको बद्दल न बोललेले बरे. कारण ती सगळं चांगलच करत असते पण समाज "बायको" या नावाखाली, त्या व्यक्तीला हसण्यावारी नेतात.@dnyanada24
दिवाळीत प्रत्येक महिलेची तळमळ,प्रेम,आत्मियता पाहून डोळ्यात पाणी आले राव. दिवाळीच का,पण ती २४x७ x ३६५ राबते,आपल्या माणसांसाठी. तीला साडी,सोने देणारे आपण कोण?
बघा ना,एक चहा करून पाजला तरी खुष होते.ती सगळं कमावू शकते हे नक्की. खरंच महिला ह्या घर नाही दुनिया चालवतात असे मला वाटते.
दिवाळीसाठी प्रत्येक महिलेचे नियोजन 📝 महिना दोन महिने आधी सुरू होते.कितीही अडचणी आल्या तरी दिवाळीत सर्वांना खुष ठेवण्यासाठी ती धडपडत असते.
या दिवाळीचे खरे नेतृत्व 🙋 ती महिलाच करत असते.फक्त फराळ नाही पण घरातल्या प्रत्येकाला काय गिफ्ट,कपडे घ्यायचे काय नाही याचा विचार ती करत असते.
सगळ्यांच्या आवडी निवडी पाठ असतात तिला.
प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर तिचे नियंत्रण 💃 असते. एखादा जिन्नस कमी पडला तरी तो पदार्थ तितकाच चवदार करण्याचा हातखंडा तिच्यात असतो.
प्रत्येक पदार्थ कसा झाला हे विचारल्याशिवाय तिला समाधान मिळत नाही.असा फीडबॅक घेणे क्वचितच पाहायला मिळतो.
दिवाळीत आधी काय करायचे नंतर कोणता प्रदार्थ म्हणजे परत लोड येत नाही. महिलांचा
आयोजन 🏷️ या प्रकारात कोणी हात धरू शकत नाही.
फराळ ही एक गोष्ट झाली पण रोजचा नाश्ता , जेवण , धुनी भांडी, फरशी व बाथरूम सफाई आणि नोकरी , बचत सांभाळून दिवाळी सुरू असते. @supriya_sule@ChakankarSpeaks
आणि हो त्यात टिव्ही वरचा आवडता कार्यक्रम सुद्धा अटेंड करतात.😀
माझ्यासाठी प्रत्येक महिला ही व्यवस्थापनात पीएच.डी असलेली व्यक्ती आहे.
जर मी #ऑक्सफर्ड किंवा #केंब्रिज विद्यापीठाचा #कुलगुरू असतो तर,
महाराष्ट्राच्या सर्व महिलांना सरसकट
व्यवस्थापनाची डॉक्टरेट 🎓 दिली असती. ☺️
खरतर,
... तीला अशा पदवीची गरजच नाही.
कारण प्रत्येक महिला मुलभूतरित्या आपआपल्या क्षेत्रात एक नंबर असते.
चला तिच्याकडून आपणही काही धडे गिरवू या.😀
ती कुटुंबाची काळजी घेते, आपण
तिची काळजी घेऊ या.
तिचं खरी लीडर असते, निडर असते. #माधवपाटील#MaadhavPatiLL #येडामाध्या#मराठी#म#माझेकुटुंब
👩🔧 वाढत्या बेरोजगारीचा चुकीची शिक्षण पद्धती जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं का?
मला वाटतं.☺️
आपली शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांना फक्त साक्षर बनवायचं काम करते. उच्च्शिक्षित किंवा उच्च्विद्याविभुषित व्यक्ती सुद्धा आपल्या शिक्षण व्यवस्थेत अर्थसाक्षर झालेला नसतो. #म#मराठी#महाराष्ट्र
मुळात आर्थिक विषयांचं ज्ञान आपल्या शिक्षण पद्धतीतून मिळतच नाही. आपल्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी उच्च्शिक्षित होऊन सरकारी नोकरी मिळवायचे स्वप्न बघतो. नोकरी करायची स्वप्ने दाखवणारी शिक्षणपद्धती कधीच उत्कृष्ठ शिक्षण पद्धती असू शकत नाही.
आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पैसा कसा मिळवावा, पैसा कसा वाढवावा, पैसा कसा वाचवावा इत्यादी बाबत विद्यार्थी अनभिज्ञ असतो. त्यामुळेच तर लाखो रुपये पगार असलेले तरुण महिन्याच्या शेवटी कंगाल झालेले दिसतात. त्यामुळेच तर अनेक उच्च्शिक्षित तरुण बेरोजगार पाहायला मिळतात.
भारतात खाजगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. खाजगीकरणाचा फायदा कदाचित पैशांमध्ये असेल पण #आरक्षण संपेल,स्वप्नं भंगतील आणि बेरोजगारी वाढेल हे नक्की. विमानतळ आणि रेल्वेनंतर आता सरकारी बँकांचे खाजगीकरण होण्याच्या मार्गावर आहे.
उद्या आपल्या भारतात कशाचे खाजगीकरण होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. उद्या जंगलांचे, हवेचे, पाण्याचे, वाघांचे, नद्यांचे, सैन्याचे अगदी न्यायालयांचे, कशाचेही खाजगीकरण होऊ शकते. आणि ते जनतेच्या हातात नाही. तसा प्रत्येकाला सारा भारत प्यारा.
पण किमान आपल्या आवडीच्या अमुक-अमुक गोष्टींचे खाजगीकरण करू नका यासाठी प्रत्येक *#कॉमन_मॅन' ने सरकारला सांगितले पाहिजे. म्हणूनच हे विनंती पत्र. #समुद्र हा #केंद्रसरकार च्या अखत्यारीतला विषय. पण त्याआधी तो माझा, तुमचा, आपला आहे असेच