आज काल अनेक लग्न ही वेगवेगळ्या जातीत होत आहेत प्रेमप्रकरणातुन तर काही प्रेमप्रकरणांना सैराट सारख्या घटनेला सामोर जाव लागत . माझा मुद्दा जरा वेगळा आहे काही बौध्द सध्या खुपच मुलतत्ववादी होताना दिसत आहेत मुलामुलींच प्रेमप्रकरण लग्न असल कि लग्न आमच्या
बौध्द पध्दतीने व्हायला पाहीजे , वराने किंवा वधुने जी इतर जातीय किंवा इतर धर्मिय आहे त्यांने बौध्द व्हायला पाहीजे म्हणजे काय तर लग्नाच्या आधी धर्मांतराचा सोहळा व नंतर २२ प्रतिज्ञा बोलायच्या व शपथ घ्यायला सांगायच बहुतांश वेळेस वधुस हि परिक्षा द्यावी लागते कारण तीला बौध्द घरात
यायचे असते . ज्यावेळेस ती २२ प्रतिज्ञा ऐकते व बोलते तेव्हा तिच्या मनाची काय अवस्था होत असेल कोण जाणे जर ती हिंदु असेल आणि ती जर मुस्लिम किंवा ख्रिश्चन असेल तर ती विचार करते कि या २२ प्रतिज्ञा आम्ही तर पालन करतो त्यामुळ आपल्याला काही अवघड नाही बौध्द जगणे .
अशाच एका आंतरधर्मीय विवाहाची चर्चा मी करणार आहे कारण असे नमुने आपल्या आजु बाजुला खुप आहेत . याठिकाणी मी व्यक्तींची खरी नाव लिहीत नाही परंतु त्यांच्या नावावरून त्यांचा धर्म लक्षात येईल आणि हे जोडप माझ्या मित्रपरिवारातल आहे , त्यांची माफि मागुन त्यांच्या विवाहाचा हा किस्सा मी
आपणास सांगत आहे कारण काही बौध्द सध्या कसे वागत आहेत हे दिसुन येईल .
माझी एक मैत्रिण आहे हिना शेख व मित्र आहे संजय कांबळे या दोघाचं काॅलेजपासुनच प्रेम मग हे प्रेमप्रकरण लग्नापर्यंत पोहचायला लागल दोन्ही घरातुन बराच विरोध झाला पण शेवटी प्रेम जिंकल व मंगल परिणय ठरला मग काय लग्नाची
तयारी सुरु झाली मुलीच्या घरचे बोलले आपको जैसे शादी करना है करो हम आधा खर्चा दे देते है , मध्येच संजयचा मामा बोलला ते सर्व ठिक आहे पण हिनाला म्हणजेच वधुला बौध्द करुन घ्यावे लागेल ते हिनाच कुटुंब बोलल हिना अब आपके पास रहेगी तो उसे आप जैसा हि रहना पडेगा हमे कोई शिकायत नही है ।
मग मंगल परिणय दिनाचा दिवस उजाडला दोन्ही कडचे पाहुणे हाॅलवर जमा झाले मग पहिला विधी बौध्द भिक्षुनी हिनाच्या धर्मांतराचा केला व हिनाकडुन २२ प्रतिज्ञा बोलवुन घेतल्या हिना खुश होती कारण तीच लग्न होणार होत आणि प्रेम जिंकल होत तसेच २२ प्रतिज्ञा ह्या देखील अशा आहेत कि पालन करणे सोप आहे
कारण मुस्लिम असल्यामुळे ती हिंदु धर्मातील कोणत्याच गोष्टीच पालन करत नव्हती त्यामुळे हे सर्व सोप आहे अस तिला वाटल आणि खरच खुप सोप आहे बौध्द जीवन जगणे .
परंतु मजा पुढे आहे
मंगल परिणय झाला नंतर दोन दिवसाने जोडप चैत्यभुमिला गेल अभिवादन करायला हिना याआधी ही संजय बरोबर अनेकदा
चैत्यभुमीवर जावुन आली होती परंतु लग्नानंतर ती पहिल्यांदा गेली व आता तर ती बौध्द होती त्यामुळे पहिल्यांदा बौध्द म्हणुन ती चैत्यभुमीवर गेली होती मनोभावे तीने बाबासाहेबांना अभिवादन केल .
तिथुन फिरुन रात्री घरी आले तर संजयची आई वडिल हिनाला बोलले उद्या आपल्याला गावी जायच आहे गाव
यांच पश्चिम महाराष्ट्रातील सधन जिल्ह्यात . उद्या गावी जायच म्हणुन सामानाची आवराआवर झाली चांगला ५ दिवस राहण्याचा बेत होता त्यामुळे तेवढ सामान बांधव गेल व दुसर्या दिवशी सायं प्रवास चालु झाला व ९ तासाने गावात जावुन संपला,
रात्रीचे ३ वाजले होते दरवाजा खोलला गेला घर चांगल टुमदार होत मग सर्वजण थोड्यावेळात झोपी गेले .
सकाळी सात वाजता संजय च्या आईने हिनाला उठवल व किचन मध्ये बोलवल ती तिकडे जात असतानाच तिला काही छोटे मोठे देवाच्या मुर्ती असलेल देवघर दिसल ती तशीच पुढे किचन मध्ये गेली तेव्हा सासु बोलली
आता फ्रेश होवुन घे भावकीतील लोक येतील तुला पहायला त्यामुळ ती लगेच तयार झाली सासु म्हटल्याप्रमाणे आजुबाजुच्या भावकीतील आया बाया नवीन सुनला पहायला आल्या व हिनाच्या सौंदर्याच कौतुक करु लागल्या हे सर्व ऐकुन हिनाला खुप बर वाटत होत .
तेवढ्यात संजयचा मामा बोलला आक्के आज गोंधळ घालायला पाहीजे व गाव जेवण मग ठरल यांच हिनाला काही कळेना गोंधळ काय ? संजय ने तिला सांगितल वो गाव की रित होती है । गाव आते है तो करना पडता है । ती काय बोलणार बिचारी गप्प बसली मग रात्री गोंधळ मुरळ्या नाचविणे हे सर्व प्रकार झाले गावजेवण झाल
गोंधळ आणि मुरळ्या नाचविणे हे काही हिनाला रुचत नव्हत तीच्या मनात गोंधळ सुरु झाला होता .
त्यानंतर दुसरा दिवस उजाडला सगळ कुटुंब महालक्ष्मीच्या दर्शनाला जायला निघाल. तिनं संजयला विचारल हम महालक्ष्मी दर्शन को क्यों जा रहे है ।
संजय बोलला वो रीत है गाव की , महालक्ष्मी नंतर ज्योतीबा दर्शन पण झाले मग हे सर्व घरी परतले .
एकदिवस मग फिरण्यात गेला हिनाच्या संसाराची सुरुवात पण झाली होती ह्या धामधूमीत दोन दिवसांनी पुन्हा मुंबई ला जायच ठरल व नेहमी प्रमाणे मामा म्हटला आक्कीला जाता जाता जेजुरी ला जावुन येवु मग
यांच ठरल जेजुरीस जायच तिथे पोचले तिथे पायथ्याजवळ तिला बाबासाहेबाचा पुतळा दिसला तिला वाटल ह्यांच्या दर्शनासाठीच आलो आहोत तिला थोड बर वाटल कारण तिने मनातून बाबासाहेब स्विकारले होते पण हे कुटुंब थेट जेजुरी गडाजवळ पोहचल व हार फुल हळद घेतली व संजय ला बोलला मामा हिनाला उचलून घे आणि
पायरी चढ त्या सर्व पायरी चढून वर पोहचले तर सर्वत्र हळद पिवळा रंग व खंडोबाच मंदिर हे पाहुन हिना पार चक्रावुन गेली होती .
हे सर्व आटपुन देवदर्शन सोहळा कुटुंब मुंबई ला परत आले . हिनाच्या मनात प्रचंड कल्लोळ माजला होता तिने आल्यानंतर दोन दिवसांनी मला फोन लावला व बोलली की विजय
मला त्या २२ प्रतिज्ञा परत वाचायच्या आहेत ज्या लग्नात माझ्याकडुन वदवुन घेतल्या व मला शपथ घ्यायला सांगितल्या मी तीला बोलल पाठवतो व्हाॅटस्अपवर काय झाले ती बोलली सांगते तुला आधी पाठव मी तिला बावीस प्रतिज्ञा पाठवुन दिल्या ,
व विचार मनात आला कि काय अस घडल आहे कि हिनाला २२ प्रतिज्ञा पुन्हा वाचायच्या आहेत .
तेवढ्यात दहा मिनिटात तिचा परत फोन आला व मला बोलली विजय तु उद्या घरी ये जेवायला मी बोललो ठिक आहे.
मी त्यांच्या घरी पोहचलो संजय च्या आईने स्वागत केले गावांहून आणलेला ऊस खायला दिला ,
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या तेवढ्यात संजय आला मला पाहुन बोलला बर झाल आलास कालच आम्ही गावांहून आलो आहोत तु आला असता सोबत तर बर झाल असत तेवढ्यात हिना बोलली विजय अच्छा हुआ आप नही आये ,
नाहीतर माझी जी अवस्था झाली तीच तुझी झाली असती मला वाटल थकलो असतो मी बोललो अस काही नाही मी थकणारा नाही .
ती बोलली मी थकण्याबद्दल नाही बोलत २२ प्रतिज्ञा आणि संजय च्या घरातील लोकांच्या धार्मिक वागण्याबद्दल बोलत आहे.
संजय ची आई बोलली मध्येच रीती असतात पोरी कराव्या लागतात .
तेव्हा ती धडकपणे बोलली मग ह्या हिंदु धर्मातील रीती परंपरा तुम्ही पाळता तर मला का २२ प्रतिज्ञा दिल्या मी तर हिंदु धर्मातील एक ही गोष्ट पाळत नाही उलट तुम्ही मला म्हणजे मी बौध्द असताना तुम्ही लोकांनी मला हिंदुच्या मंदिरात नेवुन मला बौध्द हि नाही ठेवलत आणि आधीची मुस्लिम ही .
असले कसले तुम्ही बौध्द दाखवता एक करता एक ।
मी सुन्न झालो ऐकुन
नंतर लक्षात आले कि आपण जेव्हा इतरांना आपल्या धर्मात या म्हणतो २२ प्रतिज्ञा घ्या म्हणतो तेव्हा त्या आपण पाळतो का आपल्या घरात याचा विचार करणे पण गरजेच आहे .
हिना ने माझ्या समोर संजयला व तिच्या सासरच्या लोकांना सुनावल मी तेव्हाच तुमच्या मुलाबरोबर संसार करेल जेव्हा तुम्ही बौध्द व बौध्दच जीवन जगाल . इथून पुढे मला कुठल्या ही इतर धर्माच्या देवाची पुजा करावयास सांगु नका .
आता त्यांच्या संसारास जवळ जवळ ७ वर्ष पु्र्ण झाले आहेत विनावाद हे कुटुंब बौध्द मार्गी जीवन जगत आहे .
अशी धमक खरतर संजयने दाखवायला पाहीजे होती पण तो त्याच्या आई वडिल व मामाच्या विरोधात बोलु शकत नव्हता .हिनामुळ एक अर्धवट बौध्द कुटुंब पुर्ण बौध्द २२ प्रतिज्ञानुसार जीवन जगु लागल .
आंतरजातीय विवाह केलेल्या अशा असंख्य हिनांनी असा प्रयत्न करावा जर कुटुंब अर्धवट असेल तर हिनान जसं तिच्या आधीच्या धर्माचा थोडा ही संस्कार मुलावर न पडु देण्याच मनाशी पक्क केल आहे तसा विचार सूनांनी करावा हि अपेक्षा धरताना सासु ,
सासरा व पतीने पण आपण खरच बौध्द वागत आहोत का कि फक्त सूनेकडून अपेक्षा धरत आहोत .
बौध्दांनो विचार करा .
🙏 नमोबुद्धाय🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या गाजलेल्या भाषणांपैकी एक अतिशय महत्वाच भाषण म्हणजे संविधान सुपूर्द करण्याअगोदर
संविधान सभेसमोरील आजच्या दिवशी म्हणजेच
'25 नोव्हेंबर' 1949 ला केलेलं शेवटच भाषण..
आजची देशाची राजकीय परिस्थिती आणि पक्षीय राजकारण बघितलं तर बाबासाहेबांनी त्यावेळीच्या भाषणात केलेले सुतोवाच आज किती खरे ठरत आहेत यावरूनच त्यांच्या दूरदृष्टीची आणि सखोल अभ्यासाची जाणीव होते.
यास्तव आज देशाच हे संविधान आणि संविधानिक मूल्ये किती मौलिक आहे याची प्रत्येक भारतीयाने विचार करण्याची गरज आहे.
आज इच्छा इतकीच आहे की, उद्याचा हा संविधान दिन कोणत्या एका जातीचा उत्सव दिन होण्याऐवजी प्रत्येक भारतीय नागरिकाचा उत्सव दिन व्हावा...
सिद्धार्थ गौतम यांनी गयेच्या उरुवेला क्षेत्रातील धर्मारण्य या वनात सहा वर्षे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला. शेवटी शरीर कृश झाले. उभारी राहिली नाही.
तेव्हा त्यांनी विचार केला की जे ध्येय मनाच्या साह्याने गाठायचे आहे, त्यासाठी शरीर प्रकृती चांगली हवी. भूक-तहान-थकवा यांनी जो गळून गेला आहे त्याला नवा प्रकाश कसा प्राप्त होईल? असे विचार मनात येऊन सिद्धार्थ गौतमांनी वैराग्य मार्गाचा त्याग केला.
व सुप्पतीठ्ठ या घाटावर स्नान करून ते मातंगवापी या स्थळाकडे निघाले. त्याच वेळी सेनानीग्राम या गावातील सेनानी या गावप्रमुखाची मुलगी सुजाता खीर घेऊन नवस फेडण्यास आली होती. तिने कृश झालेल्या सिद्धार्थ गौतमांना पाहिले व वृक्ष देव समजून त्यांनाच खीरीचे पात्र दिले.
Dukhha means suffering in Buddhist Philosophy....!!!
मनुष्यप्राणी हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुखासाठी झटत असतो. दु:खाची सावली सुद्धा त्याला नकोशी वाटते. लहान मुल सुद्धा हातातून खेळणे काढून घेतले तर रडू लागते.
मी, माझी मालकी आणि माझे सुख यातच मनुष्य रममाण असतो. आणि मग सुख मिळवीण्याच्या लालसेपायी तो अनेकदा दु:खाच्या वणव्यात होरपळतो. पण त्याला हे कळत नाही की जीवनातील दुःख आणि सुख हे येणाऱ्या ऊन-पावसा प्रमाणे आहे. पण दुःखाची तीव्रता ही जीवनात माणसाला जास्त वाटते.
दुःखाचे बसलेले चटके तो सहसा विसरत नाही. मराठी संत साहित्यात देखील अनेक संतांनी दुःखा वरती लिहून ठेवले आहे. संत तुकाराम म्हणतात'या जगात सुख जवा एवढे तर दुःख पर्वता एवढे आहे'. तर आता पाहूया हे दुःख म्हणजे नक्की आहे तरी काय ?
⭕ #*लबाडलांडगढोंग_करतेय #ओबीसीसावधहो* ⭕
- अनिल भोईर, ओबीसी कार्यकर्ता
काळच भारतीय जनता पक्षा कडून ओबीसीच्या विविध मागण्या करिता मोर्चा आयोजित करणार आहेत असे कळाले, अशीच नाटक काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली होती.
काँग्रेस असो व भाजपा दोन्ही पक्षांनी ओबीसींचा वापर फक्त मतपेटी म्हणूनच केला आहे. ओबीसींच्या जनगणनेच्या चळवळीच्या इतिहासात डोकावून पाहिले तर अगदी नेहरूनि गुंडाळलेला अन इंदिरा गांधीनि अडगळीत टाकलेला कालेलकर आयोग असो,
वा सत्तेसाठी कालेलकर आयोग मंजूर करू असे आश्वासन देणारे पण सत्तेत आल्यावर वेळ काढून नेण्यासाठी नवीन मंडळ आयोग स्थापणारे मोरारजी देसाई असोत,मंडळ आयोगाला विरोध म्हणून रथयात्रा काढणारे लालकृष्ण अडवाणी,ओबीसींना शैक्षणिक आरक्षण मिळू नये म्हणून दैवगोडा सरकार पाडणारे
1- *सतयुग*= जिस युग में केवल ब्राह्मण ही पढ़-लिख सकते थे। इसलिये वे जो बोलते थे, वही सत्य समझा जाता था, इसलिये ब्राह्मण उसे सतयुग कहता है ।
2- *द्वापर* = जिस युग में ब्राह्मणो के साथ क्षत्रिय भी पढ़ने लगे । यानी दो वर्ण पढ़ने लगे इसलिये ब्राह्मणों ने उसे द्वापर युग कहा।
3- *त्रेतायुग* = जिस युग में सवर्ण (बाह्मण, क्षत्रिय, वैश्य )
यानी तीनों वर्ण पढ़ने लगे, इसलिये ब्राह्मणों ने इसे त्रेतायुग कहा।
4- *कलयुग* = जिस युग में ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, के साथ-साथ शूद्र (ओबीसी, एससी, एसटी) भी पढ़ने लगे। इसलिये ब्राह्मणों ने इसे कलयुग यानी अशुभ/अधर्म/राक्षसी पाप का युग कहकर बदनाम करने लगे।
अवश्य वाचा तुमची कोरोनाची भीती निघून जाईल
डॉ.राजेंद्र गाडेकर
मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. 1918 सालच्या साथीत सुमारे दीड कोटी लोक मेले होते.
जगात प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक मरतच असतात. मरणाचा रेट तपासला तर एक सेकंद किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी कोणीतरी मरत असते. या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य आहे.
अमेरिकेमध्ये काही महिन्यांपूर्वी 12 ते 25 हजार लोक एन्फ्लुएंजा या आजाराने मृत्यू पडले. गेल्या वर्षी इटलीमध्ये 60 हजार लोक मेले. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशात साथीने, व्हायरल इन्फेक्शनने लाखो लोक मरत असतात. प्रत्येक वर्षी फक्त व्हायरल इन्फेक्शनने जगात सुमारे दीड लाख लोक मरतात.