डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या गाजलेल्या भाषणांपैकी एक अतिशय महत्वाच भाषण म्हणजे संविधान सुपूर्द करण्याअगोदर
संविधान सभेसमोरील आजच्या दिवशी म्हणजेच
'25 नोव्हेंबर' 1949 ला केलेलं शेवटच भाषण..
आजची देशाची राजकीय परिस्थिती आणि पक्षीय राजकारण बघितलं तर बाबासाहेबांनी त्यावेळीच्या भाषणात केलेले सुतोवाच आज किती खरे ठरत आहेत यावरूनच त्यांच्या दूरदृष्टीची आणि सखोल अभ्यासाची जाणीव होते.
यास्तव आज देशाच हे संविधान आणि संविधानिक मूल्ये किती मौलिक आहे याची प्रत्येक भारतीयाने विचार करण्याची गरज आहे.
आज इच्छा इतकीच आहे की, उद्याचा हा संविधान दिन कोणत्या एका जातीचा उत्सव दिन होण्याऐवजी प्रत्येक भारतीय नागरिकाचा उत्सव दिन व्हावा...
[ भाषणाचा काही ठराविक भाग खाली वाचकांसाठी देत आहे. वेळ काढून, आवर्जून नक्की वाचावा ]
●●●
"..…माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील
तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही.
तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर
आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या
स्वरूपावर अवलंबून नसतो.
संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करून देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे.
.…केवळ बाह्य स्वरूपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्या मते, पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे.
याचा अर्थ हा की, 'क्रांतीचा रक्तरंजित मार्ग' आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्या वेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते.
परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत, तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते आपल्या हिताचे होईल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणा-या सर्वांना #जॉनस्टुअर्टमिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, “लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये.
तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.”
संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही.
परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त #डॅनियल_ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही,
कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही.”
इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे,
कारण भक्ती किंवा ज्याला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल.
परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो. तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे की अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीतसुद्धा परिवर्तन करायलाच हवे.
राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.
सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्त्वे म्हणून मान्यता देतो.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्त्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुस-यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही.
समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरीत्या अस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल.
भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत: अभाव आहे, ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे.
त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्त्वावर आधारित आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात, तर बाकीचे निष्कृष्ट अवस्थेत असतात.
आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहींजवळ गडगंज संपत्ती आहे, तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील.
राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत.
अशा परस्परविरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही.
ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे.
अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत, ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उद्ध्वस्त करतील.
…स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे, याबद्दल शंका नाही.
परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदा-या टाकलेल्या आहेत, याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे, कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही.
यापुढे जर काही वाईट घडले, तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा, नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे.
आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही, याची चिंता ते करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे,
ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये.
देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही."
.....आज या ठिकाणी मी माझे भाषण आता संपवले असते परंतु माझे मन देशाच्या भवितव्याबाबत इतके चिंताग्रस्त झाले आहे की त्यासंबधीतील माझी मते व्यक्त करण्यासाठी या प्रसंगाचा मी उपयोग करावा असे मला वाटते.
26 जानेवारी 1950 ला भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल. पण त्याच्या स्वातंत्र्याचे काय होईल ? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवेल की पुन्हा गमावून बसेल ? हा विचार प्रथम माझ्या मनात उभा राहतो. असे नाही की भारत यापूर्वी कधी स्वतंत्र न्हवता.
मुद्दा हा आहे की असलेले स्वातंत्र्य त्याने एकदा गमावले आहे. तो पुन्हा ते दुसऱ्यांदा गमावेल का ? भवितव्याबाबतचा हाच विचार मला अधिक चिंताग्रस्त करत आहे.
भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले असे नव्हे तर ते देशातील काही बेईमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते.
महंमद बीन कासीमने सिंध प्रांतावर आक्रमण केले त्यावेळी दहार राजाच्या सैनिकांनी महंमद बीन कासीमाच्या हस्तकाकडून लाचा स्वीकारल्या आणि आपल्या राजाच्या बाजूने लढण्याचे नाकारले.
मोहंमद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण देणारा जयचंद होता.
आणि त्याने मोहंमद घोरीला पृथ्वीराज विरुद्ध लढण्यासाठी
स्वतःच्या आणि सोळंकी राजांच्या मदतीचे आश्वासन दिले.
जेंव्हा शिवाजी राजा रयतेच्या मुक्तीसाठी लढत होता. त्यावेळी इतर मराठा सरदार, रजपूत राजे मोगल सम्राटांच्या बाजूने युद्ध लढत होते.
जेंव्हा शीख राज्यकर्त्यांचा निःपात करण्याचा प्रयत्न इंग्रज करत होते. तेंव्हा त्यांचा प्रमुख सेनापती गुलाबसिंग शांत बसला. आणि शिखांचे राज्य वाचवण्यासाठी त्याने शिखांना कोणतीही मदत केली नाही.
या इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय ?
आज मी या विचाराने चिंताग्रस्त झालो आहे.
जातीच्या आणि संप्रदायाच्या आपल्या जुन्या शत्रू सोबतच भिन्न आणि परस्परविरोधी विचारप्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांचीही भर पडणार आहे. ह्या वास्तवाच्या जाणिवेने मी अधिकच चिंतातुर झालो आहे.
भारतीय लोक आपल्या आपल्या तत्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील ? की देशापेक्षा तत्वप्रणालीला मोठे मानतील ? मला माहित नाही.. परंतु एवढे मात्र निश्चित की जर ●पक्षांनी स्वतःच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले. तर आपले स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही●
आणि कदाचित कायमचे घालवले जाईल.
या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटीबद्ध व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे...."
.[ स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ]
खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सिद्धार्थ गौतम यांनी गयेच्या उरुवेला क्षेत्रातील धर्मारण्य या वनात सहा वर्षे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला. शेवटी शरीर कृश झाले. उभारी राहिली नाही.
तेव्हा त्यांनी विचार केला की जे ध्येय मनाच्या साह्याने गाठायचे आहे, त्यासाठी शरीर प्रकृती चांगली हवी. भूक-तहान-थकवा यांनी जो गळून गेला आहे त्याला नवा प्रकाश कसा प्राप्त होईल? असे विचार मनात येऊन सिद्धार्थ गौतमांनी वैराग्य मार्गाचा त्याग केला.
व सुप्पतीठ्ठ या घाटावर स्नान करून ते मातंगवापी या स्थळाकडे निघाले. त्याच वेळी सेनानीग्राम या गावातील सेनानी या गावप्रमुखाची मुलगी सुजाता खीर घेऊन नवस फेडण्यास आली होती. तिने कृश झालेल्या सिद्धार्थ गौतमांना पाहिले व वृक्ष देव समजून त्यांनाच खीरीचे पात्र दिले.
Dukhha means suffering in Buddhist Philosophy....!!!
मनुष्यप्राणी हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुखासाठी झटत असतो. दु:खाची सावली सुद्धा त्याला नकोशी वाटते. लहान मुल सुद्धा हातातून खेळणे काढून घेतले तर रडू लागते.
मी, माझी मालकी आणि माझे सुख यातच मनुष्य रममाण असतो. आणि मग सुख मिळवीण्याच्या लालसेपायी तो अनेकदा दु:खाच्या वणव्यात होरपळतो. पण त्याला हे कळत नाही की जीवनातील दुःख आणि सुख हे येणाऱ्या ऊन-पावसा प्रमाणे आहे. पण दुःखाची तीव्रता ही जीवनात माणसाला जास्त वाटते.
दुःखाचे बसलेले चटके तो सहसा विसरत नाही. मराठी संत साहित्यात देखील अनेक संतांनी दुःखा वरती लिहून ठेवले आहे. संत तुकाराम म्हणतात'या जगात सुख जवा एवढे तर दुःख पर्वता एवढे आहे'. तर आता पाहूया हे दुःख म्हणजे नक्की आहे तरी काय ?
⭕ #*लबाडलांडगढोंग_करतेय #ओबीसीसावधहो* ⭕
- अनिल भोईर, ओबीसी कार्यकर्ता
काळच भारतीय जनता पक्षा कडून ओबीसीच्या विविध मागण्या करिता मोर्चा आयोजित करणार आहेत असे कळाले, अशीच नाटक काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली होती.
काँग्रेस असो व भाजपा दोन्ही पक्षांनी ओबीसींचा वापर फक्त मतपेटी म्हणूनच केला आहे. ओबीसींच्या जनगणनेच्या चळवळीच्या इतिहासात डोकावून पाहिले तर अगदी नेहरूनि गुंडाळलेला अन इंदिरा गांधीनि अडगळीत टाकलेला कालेलकर आयोग असो,
वा सत्तेसाठी कालेलकर आयोग मंजूर करू असे आश्वासन देणारे पण सत्तेत आल्यावर वेळ काढून नेण्यासाठी नवीन मंडळ आयोग स्थापणारे मोरारजी देसाई असोत,मंडळ आयोगाला विरोध म्हणून रथयात्रा काढणारे लालकृष्ण अडवाणी,ओबीसींना शैक्षणिक आरक्षण मिळू नये म्हणून दैवगोडा सरकार पाडणारे
आज काल अनेक लग्न ही वेगवेगळ्या जातीत होत आहेत प्रेमप्रकरणातुन तर काही प्रेमप्रकरणांना सैराट सारख्या घटनेला सामोर जाव लागत . माझा मुद्दा जरा वेगळा आहे काही बौध्द सध्या खुपच मुलतत्ववादी होताना दिसत आहेत मुलामुलींच प्रेमप्रकरण लग्न असल कि लग्न आमच्या
बौध्द पध्दतीने व्हायला पाहीजे , वराने किंवा वधुने जी इतर जातीय किंवा इतर धर्मिय आहे त्यांने बौध्द व्हायला पाहीजे म्हणजे काय तर लग्नाच्या आधी धर्मांतराचा सोहळा व नंतर २२ प्रतिज्ञा बोलायच्या व शपथ घ्यायला सांगायच बहुतांश वेळेस वधुस हि परिक्षा द्यावी लागते कारण तीला बौध्द घरात
यायचे असते . ज्यावेळेस ती २२ प्रतिज्ञा ऐकते व बोलते तेव्हा तिच्या मनाची काय अवस्था होत असेल कोण जाणे जर ती हिंदु असेल आणि ती जर मुस्लिम किंवा ख्रिश्चन असेल तर ती विचार करते कि या २२ प्रतिज्ञा आम्ही तर पालन करतो त्यामुळ आपल्याला काही अवघड नाही बौध्द जगणे .
1- *सतयुग*= जिस युग में केवल ब्राह्मण ही पढ़-लिख सकते थे। इसलिये वे जो बोलते थे, वही सत्य समझा जाता था, इसलिये ब्राह्मण उसे सतयुग कहता है ।
2- *द्वापर* = जिस युग में ब्राह्मणो के साथ क्षत्रिय भी पढ़ने लगे । यानी दो वर्ण पढ़ने लगे इसलिये ब्राह्मणों ने उसे द्वापर युग कहा।
3- *त्रेतायुग* = जिस युग में सवर्ण (बाह्मण, क्षत्रिय, वैश्य )
यानी तीनों वर्ण पढ़ने लगे, इसलिये ब्राह्मणों ने इसे त्रेतायुग कहा।
4- *कलयुग* = जिस युग में ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, के साथ-साथ शूद्र (ओबीसी, एससी, एसटी) भी पढ़ने लगे। इसलिये ब्राह्मणों ने इसे कलयुग यानी अशुभ/अधर्म/राक्षसी पाप का युग कहकर बदनाम करने लगे।
अवश्य वाचा तुमची कोरोनाची भीती निघून जाईल
डॉ.राजेंद्र गाडेकर
मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. 1918 सालच्या साथीत सुमारे दीड कोटी लोक मेले होते.
जगात प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक मरतच असतात. मरणाचा रेट तपासला तर एक सेकंद किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी कोणीतरी मरत असते. या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य आहे.
अमेरिकेमध्ये काही महिन्यांपूर्वी 12 ते 25 हजार लोक एन्फ्लुएंजा या आजाराने मृत्यू पडले. गेल्या वर्षी इटलीमध्ये 60 हजार लोक मेले. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशात साथीने, व्हायरल इन्फेक्शनने लाखो लोक मरत असतात. प्रत्येक वर्षी फक्त व्हायरल इन्फेक्शनने जगात सुमारे दीड लाख लोक मरतात.