Dukhha means suffering in Buddhist Philosophy....!!!
मनुष्यप्राणी हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुखासाठी झटत असतो. दु:खाची सावली सुद्धा त्याला नकोशी वाटते. लहान मुल सुद्धा हातातून खेळणे काढून घेतले तर रडू लागते.
मी, माझी मालकी आणि माझे सुख यातच मनुष्य रममाण असतो. आणि मग सुख मिळवीण्याच्या लालसेपायी तो अनेकदा दु:खाच्या वणव्यात होरपळतो. पण त्याला हे कळत नाही की जीवनातील दुःख आणि सुख हे येणाऱ्या ऊन-पावसा प्रमाणे आहे. पण दुःखाची तीव्रता ही जीवनात माणसाला जास्त वाटते.
दुःखाचे बसलेले चटके तो सहसा विसरत नाही. मराठी संत साहित्यात देखील अनेक संतांनी दुःखा वरती लिहून ठेवले आहे. संत तुकाराम म्हणतात'या जगात सुख जवा एवढे तर दुःख पर्वता एवढे आहे'. तर आता पाहूया हे दुःख म्हणजे नक्की आहे तरी काय ?
दीघ निकाय मधील महासतिपठ्ठान सुत्तात भगवान बुद्ध म्हणतात "भिक्खूंनो, दुःख काय आहे ? जन्म होणे दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मरण दुःख आहे, शोक करणे दुःख आहे, रडणे-ओरडणे दुःख आहे, पीडित होणे दुःख आहे, चिंतित होणे दुःख आहे, त्रस्त होणे दुःख आहे, आप्रियांचा संबंध दुःखकारक आहे,
प्रियजनांचा वियोग दुःख आहे, इच्छेची पूर्तता न होणे दुःख आहे. थोडक्यात पाच उपादान स्कंद दुःख आहेत. व्यथा, भोग, त्रास, ताप, कष्ट, क्लेश, वैफल्य, त्रागा, पीडा, कारुण्य, विशाद, अशांतता, असमाधान, शोषण, चिंता, निराशा, व्याकुळता इत्यादी दुःखांच्या अनेक छटा आहेत.
सर्व आयुष्यभर मनुष्याला त्या पीडित असतात. त्यामुळे मनुष्यप्राणी हतबल होऊन जातो. आणि दुःख मुक्तीचा मार्ग माहीत नसल्याने काल्पनिक देवांचा धावा करतो. भगवान बुद्धांचा दुःख नष्ट करणाऱ्या व परमसुख देणाऱ्या निर्वाणाचा मार्ग भारतातून जरी लोप पावला तरी १२ व्या शतकातील
ज्ञानेश्वरांपासून १७ व्या शतकातील रामदासांपर्यंत अनेक संतांच्या अभंगात दुःख नष्ट करण्यासाठी सदाचरणाचा मार्ग व्यक्त झाला आहे. ज्यामधून बुद्ध तत्वज्ञानच प्रतिबिंबीत होते.
संत साहित्यावर बुद्ध विचारांचा पगडा का आढळतो या बाबत अनेक भारतीय विद्वान मूग गिळून बसले आहेत.
वास्तविक पापकर्मे त्यागण्याचा व पुण्यकर्मे अर्जित करण्याचा उपदेश संतांच्या अभंगातून ठिकठिकाणी आढळतो. 'जसे बीज असेल तसेच फळ प्राप्त होईल' हा बुद्धांचा कम्म सिद्धांत सर्व संतांनी सांगितला. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' असे तुकारामांनी देखील लिहिले आहे.
बौद्ध धर्माचा पायाच मुळी 'जग हे दुःखमय असून त्यातून मुक्त होण्यासाठी सदाचरणाचा अष्टांगिक मार्ग' या तत्त्वावर उभारला आहे. या सृष्टीत अनित्यता भरलेली असून देखील मनुष्याची त्याबद्दलची आसक्ती खूप आहे. जी पुन्हा पुन्हा जन्माला घालीत असते असे बुद्धांनी स्पष्ट केले आहे.
संत ज्ञानेश्वरांनी परिवर्तनशीलतेचा केलेला उल्लेख बुद्ध तत्वज्ञानाशी सुसंगत वाटतो. संत नामदेव हा प्रपंच खोटा व आभासी आहे व तेथे दुःख अनंत आहे असे म्हणतात. संत एकनाथ म्हणतात चौर्यांऐशी लक्ष योनी भोगूनही दुःख संपत नाही. सुखाचा प्रत्येक क्षण हळूहळू नष्ट होत आहे.
थोडक्यात "चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा" या प्रमाणे सर्व संतांनी प्रिय वस्तूंचा हळूहळू होणारा नाश व त्यांचा वियोग यातच दुःखाचे कारण मांडले आहे.
बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा त्यांना प्रतित्यसमुत्पाद या सिद्धांता बरोबर चार आर्यसत्ये आणि आर्यअष्टांगिक मार्गाचा बोध झाला. हाच दुःख मुक्त होण्याचा मार्ग असून अखिल मानवजातीप्रती करुणा उत्पन्न होऊन बुद्धाने तो अडीज हजार वर्षांपूर्वी विशद केला.
आणि पुन्हा सांगितले आहे की "भिक्खुंनो, सुवर्णकार जसे सोने तापवून व दगडावर घासून त्याची परीक्षा करतो तशी माझ्या वचनांची परीक्षा करून नंतरच ते ग्रहण करा. केवळ माझ्या गौरवप्रभावाने प्रभावित होऊन ग्रहण करू नका".
असा उदार दृष्टिकोन बुद्धांशिवाय इतर कोणत्याही धर्म संस्थापकाने दाखविलेला नाही. सर्व धर्मग्रंथात सुद्धा विचार स्वातंत्र्याची एक ओळ ही आढळत नाही, हे सत्य आहे.
जे सुज्ञ आहेत ते अभ्यास करून त्या मार्गावरून चालून स्वतःच दीपस्तंभ होत आहेत. आणि जे सुख म्हणजे नक्की काय असतं, हे शोधण्यासाठी धावत आहेत ते प्रत्यक्षात अंधारात चाचपडत आहेत.
--- संजय सावंत ( नवी मुंबई )
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या गाजलेल्या भाषणांपैकी एक अतिशय महत्वाच भाषण म्हणजे संविधान सुपूर्द करण्याअगोदर
संविधान सभेसमोरील आजच्या दिवशी म्हणजेच
'25 नोव्हेंबर' 1949 ला केलेलं शेवटच भाषण..
आजची देशाची राजकीय परिस्थिती आणि पक्षीय राजकारण बघितलं तर बाबासाहेबांनी त्यावेळीच्या भाषणात केलेले सुतोवाच आज किती खरे ठरत आहेत यावरूनच त्यांच्या दूरदृष्टीची आणि सखोल अभ्यासाची जाणीव होते.
यास्तव आज देशाच हे संविधान आणि संविधानिक मूल्ये किती मौलिक आहे याची प्रत्येक भारतीयाने विचार करण्याची गरज आहे.
आज इच्छा इतकीच आहे की, उद्याचा हा संविधान दिन कोणत्या एका जातीचा उत्सव दिन होण्याऐवजी प्रत्येक भारतीय नागरिकाचा उत्सव दिन व्हावा...
सिद्धार्थ गौतम यांनी गयेच्या उरुवेला क्षेत्रातील धर्मारण्य या वनात सहा वर्षे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला. शेवटी शरीर कृश झाले. उभारी राहिली नाही.
तेव्हा त्यांनी विचार केला की जे ध्येय मनाच्या साह्याने गाठायचे आहे, त्यासाठी शरीर प्रकृती चांगली हवी. भूक-तहान-थकवा यांनी जो गळून गेला आहे त्याला नवा प्रकाश कसा प्राप्त होईल? असे विचार मनात येऊन सिद्धार्थ गौतमांनी वैराग्य मार्गाचा त्याग केला.
व सुप्पतीठ्ठ या घाटावर स्नान करून ते मातंगवापी या स्थळाकडे निघाले. त्याच वेळी सेनानीग्राम या गावातील सेनानी या गावप्रमुखाची मुलगी सुजाता खीर घेऊन नवस फेडण्यास आली होती. तिने कृश झालेल्या सिद्धार्थ गौतमांना पाहिले व वृक्ष देव समजून त्यांनाच खीरीचे पात्र दिले.
⭕ #*लबाडलांडगढोंग_करतेय #ओबीसीसावधहो* ⭕
- अनिल भोईर, ओबीसी कार्यकर्ता
काळच भारतीय जनता पक्षा कडून ओबीसीच्या विविध मागण्या करिता मोर्चा आयोजित करणार आहेत असे कळाले, अशीच नाटक काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली होती.
काँग्रेस असो व भाजपा दोन्ही पक्षांनी ओबीसींचा वापर फक्त मतपेटी म्हणूनच केला आहे. ओबीसींच्या जनगणनेच्या चळवळीच्या इतिहासात डोकावून पाहिले तर अगदी नेहरूनि गुंडाळलेला अन इंदिरा गांधीनि अडगळीत टाकलेला कालेलकर आयोग असो,
वा सत्तेसाठी कालेलकर आयोग मंजूर करू असे आश्वासन देणारे पण सत्तेत आल्यावर वेळ काढून नेण्यासाठी नवीन मंडळ आयोग स्थापणारे मोरारजी देसाई असोत,मंडळ आयोगाला विरोध म्हणून रथयात्रा काढणारे लालकृष्ण अडवाणी,ओबीसींना शैक्षणिक आरक्षण मिळू नये म्हणून दैवगोडा सरकार पाडणारे
आज काल अनेक लग्न ही वेगवेगळ्या जातीत होत आहेत प्रेमप्रकरणातुन तर काही प्रेमप्रकरणांना सैराट सारख्या घटनेला सामोर जाव लागत . माझा मुद्दा जरा वेगळा आहे काही बौध्द सध्या खुपच मुलतत्ववादी होताना दिसत आहेत मुलामुलींच प्रेमप्रकरण लग्न असल कि लग्न आमच्या
बौध्द पध्दतीने व्हायला पाहीजे , वराने किंवा वधुने जी इतर जातीय किंवा इतर धर्मिय आहे त्यांने बौध्द व्हायला पाहीजे म्हणजे काय तर लग्नाच्या आधी धर्मांतराचा सोहळा व नंतर २२ प्रतिज्ञा बोलायच्या व शपथ घ्यायला सांगायच बहुतांश वेळेस वधुस हि परिक्षा द्यावी लागते कारण तीला बौध्द घरात
यायचे असते . ज्यावेळेस ती २२ प्रतिज्ञा ऐकते व बोलते तेव्हा तिच्या मनाची काय अवस्था होत असेल कोण जाणे जर ती हिंदु असेल आणि ती जर मुस्लिम किंवा ख्रिश्चन असेल तर ती विचार करते कि या २२ प्रतिज्ञा आम्ही तर पालन करतो त्यामुळ आपल्याला काही अवघड नाही बौध्द जगणे .
1- *सतयुग*= जिस युग में केवल ब्राह्मण ही पढ़-लिख सकते थे। इसलिये वे जो बोलते थे, वही सत्य समझा जाता था, इसलिये ब्राह्मण उसे सतयुग कहता है ।
2- *द्वापर* = जिस युग में ब्राह्मणो के साथ क्षत्रिय भी पढ़ने लगे । यानी दो वर्ण पढ़ने लगे इसलिये ब्राह्मणों ने उसे द्वापर युग कहा।
3- *त्रेतायुग* = जिस युग में सवर्ण (बाह्मण, क्षत्रिय, वैश्य )
यानी तीनों वर्ण पढ़ने लगे, इसलिये ब्राह्मणों ने इसे त्रेतायुग कहा।
4- *कलयुग* = जिस युग में ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, के साथ-साथ शूद्र (ओबीसी, एससी, एसटी) भी पढ़ने लगे। इसलिये ब्राह्मणों ने इसे कलयुग यानी अशुभ/अधर्म/राक्षसी पाप का युग कहकर बदनाम करने लगे।
अवश्य वाचा तुमची कोरोनाची भीती निघून जाईल
डॉ.राजेंद्र गाडेकर
मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. 1918 सालच्या साथीत सुमारे दीड कोटी लोक मेले होते.
जगात प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक मरतच असतात. मरणाचा रेट तपासला तर एक सेकंद किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी कोणीतरी मरत असते. या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य आहे.
अमेरिकेमध्ये काही महिन्यांपूर्वी 12 ते 25 हजार लोक एन्फ्लुएंजा या आजाराने मृत्यू पडले. गेल्या वर्षी इटलीमध्ये 60 हजार लोक मेले. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशात साथीने, व्हायरल इन्फेक्शनने लाखो लोक मरत असतात. प्रत्येक वर्षी फक्त व्हायरल इन्फेक्शनने जगात सुमारे दीड लाख लोक मरतात.