सिद्धार्थ गौतम यांनी गयेच्या उरुवेला क्षेत्रातील धर्मारण्य या वनात सहा वर्षे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला. शेवटी शरीर कृश झाले. उभारी राहिली नाही.
तेव्हा त्यांनी विचार केला की जे ध्येय मनाच्या साह्याने गाठायचे आहे, त्यासाठी शरीर प्रकृती चांगली हवी. भूक-तहान-थकवा यांनी जो गळून गेला आहे त्याला नवा प्रकाश कसा प्राप्त होईल? असे विचार मनात येऊन सिद्धार्थ गौतमांनी वैराग्य मार्गाचा त्याग केला.
व सुप्पतीठ्ठ या घाटावर स्नान करून ते मातंगवापी या स्थळाकडे निघाले. त्याच वेळी सेनानीग्राम या गावातील सेनानी या गावप्रमुखाची मुलगी सुजाता खीर घेऊन नवस फेडण्यास आली होती. तिने कृश झालेल्या सिद्धार्थ गौतमांना पाहिले व वृक्ष देव समजून त्यांनाच खीरीचे पात्र दिले.
वरवर पाहता हा एक निव्वळ योगायोग वाटेल. पण खरेतर त्यास निसर्गाचा चमत्कार किंवा धम्माचा आशीर्वाद म्हणणे जास्त योग्य राहील. कारण ज्याक्षणी त्यांना अन्नाची अत्यंत आवश्यकता होती त्याच वेळी सुजाताने पौष्टिक खीर करून आणावी हा निसर्गाचा आधार खूप महत्वाचा होता. मौल्यवान होता.
खीर ग्रहणाने त्यांना नवीन उभारी आली. व एकाग्रता साधली जाऊन त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यामुळे ते अन्न हे निश्चितच अतिशय श्रेष्ठ दर्जाचे असावे असे अनुमान काढता येते.गूळ, दूध, तूप आणि उच्च प्रतीचा तांदूळ असे सर्वोत्तम घटक त्यात आल्यामुळे ती खीर पौष्टिक आणि चविष्ट झाली असावी.
शिवाय सुजाताने अत्यंत श्रद्धेने आणि तन्मयतेने ती तयार केलेली असल्यामुळे सर्व घटकांचे त्यात योग्य प्रमाणात मिश्रण झाले. यात ज्या गाईचे दूध मिसळले असेल ती गाय देखील उरुवेलाच्या परिसरातील हिरवागार चारा खाऊन निसर्गाशी एकरूप झालेली असावी.
म्हणून त्या रम्य परिसरातील चवदार पाण्याचा गूण दुधात उतरला असावा.
निसर्ग सानिध्यात शिळेवर बसुन जेव्हा त्यांनी ही खीर ग्रहण केली तेव्हा निश्चितच त्यांना उभारी आली. पुरेसे बळ प्राप्त झाले. त्यामुळे त्यांनी निरंजना नदी पार करून गयेच्या अरण्यात गेल्यावर दृढ निश्चय करून समाधिस्त झाले.
एकाग्रता साधता आली. त्याच वैशाख पौर्णिमेच्या उत्तर रात्री त्यांना ज्ञानप्रकाश प्राप्त झाला. बुद्धत्व प्राप्त झाले. चराचर सृष्टीतील दुःखाचे मूळ कारण सापडले व त्यावरील उपाय देखील प्राप्त झाला. सारे भूत-भविष्य जाणले.
म्हणूनच ज्या अन्न सेवनाने त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्या सुजाताच्या खीरीचा वाटा निश्चितच मोलाचा मानला पाहिजे. यास्तव साधकाने - उपासकाने आपला आहार हा अत्यंत कमी घेऊ नये तसाच जास्त ही घेऊ नये. जो काही मोजका वा मध्यम आहार घेण्यात येईल तो मात्र पौष्टिक असावा.
अनेक बौद्ध देशांत सुजाता सिद्धार्थ गौतमांना खीर दान करीत आहे असे शिल्प आढळून येते. तसेच या प्रसंगाची भित्तिचित्रे सुद्धा रेखाटलेली आढळतात. खिरदान म्हणजेच अन्नदान करणे हे एक मोठे पुण्यकर्म भारतीय इतिहासात व परंपरेत आढळते. हा एक महत्वाचा क्षण आहे.
म्हणूनच भाताचा गोड पदार्थ करणे हे भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. इतर धान्यापेक्षा तांदळाची प्रतिष्ठा भारतीय भोजनामध्ये किंवा आशिया खंडात खूप आहे. ती इतर युरोपीय देशात बिलकूल दिसून येत नाही.
अनेक धर्मांच्या अनेक सामाजिक प्रथांमध्ये तांदळाचा वापर जास्त करण्यात येतो. उदाहरणार्थ ओवाळणे, ओटी भरणे, अक्षता टाकणे, भिक्षा देणे, लोम्ब्या लावून तोरण तयार करणे, पिंडपात करणे इत्यादी.
शिवाय जी स्त्री रुचकर अन्नपदार्थ तत्परतेने व तन्मयतेने तयार करते ते निश्चितच सर्व कुटुंबासाठी प्रेरणादायी, पालन-पोषण करणारे असतात. या जगात बल्लवाचार्य लाखो आहेत.
परंतु त्यांच्यापेक्षा जेंव्हा घरातील स्त्री पौष्टिक अन्न शिजवून त्याच्या चवीने कुटुंबातील सदस्यांना तृप्त करते तीच खरी सुजाता होय. म्हणूनच आजही सुजाताचा स्तूप बकरौर गावात उभा असून त्याला सुजातागढी असे देखील म्हणतात.
एकेकाळी त्याच्या समोर अशोक स्तंभ देखील उभा होता. पण सन १८०० मध्ये त्याला गयेमध्ये इतरत्र हलविण्यात आले. अशा या सुजाता मातेस माझा प्रणाम...!
--- संजय सावंत ( नवी मुंबई )
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या गाजलेल्या भाषणांपैकी एक अतिशय महत्वाच भाषण म्हणजे संविधान सुपूर्द करण्याअगोदर
संविधान सभेसमोरील आजच्या दिवशी म्हणजेच
'25 नोव्हेंबर' 1949 ला केलेलं शेवटच भाषण..
आजची देशाची राजकीय परिस्थिती आणि पक्षीय राजकारण बघितलं तर बाबासाहेबांनी त्यावेळीच्या भाषणात केलेले सुतोवाच आज किती खरे ठरत आहेत यावरूनच त्यांच्या दूरदृष्टीची आणि सखोल अभ्यासाची जाणीव होते.
यास्तव आज देशाच हे संविधान आणि संविधानिक मूल्ये किती मौलिक आहे याची प्रत्येक भारतीयाने विचार करण्याची गरज आहे.
आज इच्छा इतकीच आहे की, उद्याचा हा संविधान दिन कोणत्या एका जातीचा उत्सव दिन होण्याऐवजी प्रत्येक भारतीय नागरिकाचा उत्सव दिन व्हावा...
Dukhha means suffering in Buddhist Philosophy....!!!
मनुष्यप्राणी हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुखासाठी झटत असतो. दु:खाची सावली सुद्धा त्याला नकोशी वाटते. लहान मुल सुद्धा हातातून खेळणे काढून घेतले तर रडू लागते.
मी, माझी मालकी आणि माझे सुख यातच मनुष्य रममाण असतो. आणि मग सुख मिळवीण्याच्या लालसेपायी तो अनेकदा दु:खाच्या वणव्यात होरपळतो. पण त्याला हे कळत नाही की जीवनातील दुःख आणि सुख हे येणाऱ्या ऊन-पावसा प्रमाणे आहे. पण दुःखाची तीव्रता ही जीवनात माणसाला जास्त वाटते.
दुःखाचे बसलेले चटके तो सहसा विसरत नाही. मराठी संत साहित्यात देखील अनेक संतांनी दुःखा वरती लिहून ठेवले आहे. संत तुकाराम म्हणतात'या जगात सुख जवा एवढे तर दुःख पर्वता एवढे आहे'. तर आता पाहूया हे दुःख म्हणजे नक्की आहे तरी काय ?
⭕ #*लबाडलांडगढोंग_करतेय #ओबीसीसावधहो* ⭕
- अनिल भोईर, ओबीसी कार्यकर्ता
काळच भारतीय जनता पक्षा कडून ओबीसीच्या विविध मागण्या करिता मोर्चा आयोजित करणार आहेत असे कळाले, अशीच नाटक काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली होती.
काँग्रेस असो व भाजपा दोन्ही पक्षांनी ओबीसींचा वापर फक्त मतपेटी म्हणूनच केला आहे. ओबीसींच्या जनगणनेच्या चळवळीच्या इतिहासात डोकावून पाहिले तर अगदी नेहरूनि गुंडाळलेला अन इंदिरा गांधीनि अडगळीत टाकलेला कालेलकर आयोग असो,
वा सत्तेसाठी कालेलकर आयोग मंजूर करू असे आश्वासन देणारे पण सत्तेत आल्यावर वेळ काढून नेण्यासाठी नवीन मंडळ आयोग स्थापणारे मोरारजी देसाई असोत,मंडळ आयोगाला विरोध म्हणून रथयात्रा काढणारे लालकृष्ण अडवाणी,ओबीसींना शैक्षणिक आरक्षण मिळू नये म्हणून दैवगोडा सरकार पाडणारे
आज काल अनेक लग्न ही वेगवेगळ्या जातीत होत आहेत प्रेमप्रकरणातुन तर काही प्रेमप्रकरणांना सैराट सारख्या घटनेला सामोर जाव लागत . माझा मुद्दा जरा वेगळा आहे काही बौध्द सध्या खुपच मुलतत्ववादी होताना दिसत आहेत मुलामुलींच प्रेमप्रकरण लग्न असल कि लग्न आमच्या
बौध्द पध्दतीने व्हायला पाहीजे , वराने किंवा वधुने जी इतर जातीय किंवा इतर धर्मिय आहे त्यांने बौध्द व्हायला पाहीजे म्हणजे काय तर लग्नाच्या आधी धर्मांतराचा सोहळा व नंतर २२ प्रतिज्ञा बोलायच्या व शपथ घ्यायला सांगायच बहुतांश वेळेस वधुस हि परिक्षा द्यावी लागते कारण तीला बौध्द घरात
यायचे असते . ज्यावेळेस ती २२ प्रतिज्ञा ऐकते व बोलते तेव्हा तिच्या मनाची काय अवस्था होत असेल कोण जाणे जर ती हिंदु असेल आणि ती जर मुस्लिम किंवा ख्रिश्चन असेल तर ती विचार करते कि या २२ प्रतिज्ञा आम्ही तर पालन करतो त्यामुळ आपल्याला काही अवघड नाही बौध्द जगणे .
1- *सतयुग*= जिस युग में केवल ब्राह्मण ही पढ़-लिख सकते थे। इसलिये वे जो बोलते थे, वही सत्य समझा जाता था, इसलिये ब्राह्मण उसे सतयुग कहता है ।
2- *द्वापर* = जिस युग में ब्राह्मणो के साथ क्षत्रिय भी पढ़ने लगे । यानी दो वर्ण पढ़ने लगे इसलिये ब्राह्मणों ने उसे द्वापर युग कहा।
3- *त्रेतायुग* = जिस युग में सवर्ण (बाह्मण, क्षत्रिय, वैश्य )
यानी तीनों वर्ण पढ़ने लगे, इसलिये ब्राह्मणों ने इसे त्रेतायुग कहा।
4- *कलयुग* = जिस युग में ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, के साथ-साथ शूद्र (ओबीसी, एससी, एसटी) भी पढ़ने लगे। इसलिये ब्राह्मणों ने इसे कलयुग यानी अशुभ/अधर्म/राक्षसी पाप का युग कहकर बदनाम करने लगे।
अवश्य वाचा तुमची कोरोनाची भीती निघून जाईल
डॉ.राजेंद्र गाडेकर
मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. 1918 सालच्या साथीत सुमारे दीड कोटी लोक मेले होते.
जगात प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक मरतच असतात. मरणाचा रेट तपासला तर एक सेकंद किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी कोणीतरी मरत असते. या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य आहे.
अमेरिकेमध्ये काही महिन्यांपूर्वी 12 ते 25 हजार लोक एन्फ्लुएंजा या आजाराने मृत्यू पडले. गेल्या वर्षी इटलीमध्ये 60 हजार लोक मेले. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशात साथीने, व्हायरल इन्फेक्शनने लाखो लोक मरत असतात. प्रत्येक वर्षी फक्त व्हायरल इन्फेक्शनने जगात सुमारे दीड लाख लोक मरतात.