⭕ #*लबाडलांडगढोंग_करतेय #ओबीसीसावधहो* ⭕
- अनिल भोईर, ओबीसी कार्यकर्ता
काळच भारतीय जनता पक्षा कडून ओबीसीच्या विविध मागण्या करिता मोर्चा आयोजित करणार आहेत असे कळाले, अशीच नाटक काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आली होती.
काँग्रेस असो व भाजपा दोन्ही पक्षांनी ओबीसींचा वापर फक्त मतपेटी म्हणूनच केला आहे. ओबीसींच्या जनगणनेच्या चळवळीच्या इतिहासात डोकावून पाहिले तर अगदी नेहरूनि गुंडाळलेला अन इंदिरा गांधीनि अडगळीत टाकलेला कालेलकर आयोग असो,
वा सत्तेसाठी कालेलकर आयोग मंजूर करू असे आश्वासन देणारे पण सत्तेत आल्यावर वेळ काढून नेण्यासाठी नवीन मंडळ आयोग स्थापणारे मोरारजी देसाई असोत,मंडळ आयोगाला विरोध म्हणून रथयात्रा काढणारे लालकृष्ण अडवाणी,ओबीसींना शैक्षणिक आरक्षण मिळू नये म्हणून दैवगोडा सरकार पाडणारे
अटलबिहारी वाजपेयी असोत, वा 2014 ला निवडून आल्यानंतर मद्रास हायकोर्टात ओबीसींची जनगणना करणार नाही असे शपथपत्र सादर करणारे व 2019 च्या निवडणुकी आधी ओबीसींची जनगणना करू असे आश्वासन देऊन निवडुन येणारे बोलबच्चन नरेन्द्र मोदी असोत वा मंडळ बंडल आहे सांगणारे व 2006 ला
ओबीसींना उच्च शिक्षणात मिळणाऱ्या आरक्षणाला विरोध करणारे बाळासाहेब ठाकरे असोत या प्रत्येक नेत्यांनी व त्याच्या प्रस्थापित पक्षानि ओबीसींची कायम दिशाभूल आणि शोषण करायचंच काम केलं आहे.
अगदी आम्ही 2019 च्या निवडणुकी आधी ओबीसी जातीनिहाय जनगणना या विषयावर जनजागृती करत असताना तुम्ही
भाजपा ला विरोध म्हणून खोट सांगताय नरेंद्र मोदी प्रणित भाजपा हा कसा ओबीसींची जनगणना करणार आहे व नरेंद्र मोदी हे स्वतः ओबीसी आहेत असे छातीठोकपणे सांगणारे भाजपचे ओबीसी कार्यकर्ते मात्र आज तोंडावर पडले आहेत आणि आपल्या गळ्यात बांधलेल्या गुलामीचे साखळदंड फेकून द्यायच्या ऐवजी स्वतःच्या
राजकीय अस्तित्वाच्या भितीपोटी केंद्र सरकारला व आपल्या पक्षाला जाब न विचारता व आपल्या पदाला चिकटून राहून ओबीसींच्या मागण्या साठी मोर्चे काढायची भाषा करता आहेत.
2021 च्या जनगणनेत पण भाजपा आणि मोदी सरकार ओबीसींची जनगणना करणार नाही हे जवळ जवळ स्पष्ट झालंय पण
ओबीसींच्या विविध संघटना नेटाने लढा देत आहे आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले, हजारो सभा झाल्या, सर्व प्रकारची आंदोलने करून, लाखो पत्र, ई-मेल, केंद्र शासनाला देशभरातून पाठवण्यात आली, करोडो ट्विट्स करण्यात आली मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करून पुतांना मावशीचे प्रेम दाखवणारे आज
ओबीसींच्या मागण्यासाठी मोर्चे काढायची भाषा करता हेत हे संतापजनक आणि तेवढेच हास्यास्पद आहे.
माझी सर्व ओबीसी बांधवाना एकच विनंती आहे की तुमच्या मताची लचके तोडायला आलेले हे लांडगे वेळीच ओळखा व याचा बंदोबस्त करा. भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी मनसेच्या ओबीसी कार्यकर्त्यांना
एकाच विनंती आहे स्वताच स्वाभिमान जागृत ठेवून आपल्या पक्षश्रेष्टीना ओबीसीं जनगणनेच्या मुद्यावर जाब विचारा व ओबीसी सेल काढण्याऐवजी ओबीसी चळवळीचं काम प्रामाणिक पणे करणाऱ्या कार्यकर्त्यांना, चळवळींना व संघटनांना बळ द्या,
उगाच फेल असलेल्या ओबीसी सेल मध्ये चतकोर तुकड्या साठी व पदासाठी वेळ वाया घालवू नका व समाजाला पक्षाच्या गळ्यात बांधू नका.
मुळात आतपर्यंत सत्तेवर आलेलें काँगेस भाजपा याची नेतृत्व ही कायम ब्राह्मण नेतृत्वाच्या हाताखाली राहिली आहे.
काँग्रेस म्हणजे छुपे संघी असलेल्या लोकांचा पक्ष व भाजपा म्हणजे उघड संघी व टोकाचा ब्राह्मणवाद पाळणारा व येथील मूळ हिंदूंवर वैदिक समाजच वर्चस्व कसे राहील व राजसत्ता व प्रशासन व्यवस्था आपल्याच ताब्यात कशी राहील अश्या ध्येयाने पछाडलेल्या लोकांचा पक्ष.
त्यातल्या त्यात भाजपवर संघाचं जास्त वर्चस्व असल्याने आपसूकच तो शेटजी भटजीचा पक्ष आहे हे जगजाहीर आहे, तिथे ओबीसींना फक्त पोजिशन मिळेल पॉवर नाही. मुळात संघाची भूमिका ही कायमस्वरूपी आरक्षण विरोधी राहिली आहे, बहुजन समाजाला उघड विरोध हे करू शकत नसल्याने विषय डायवर्ट करण्यासाठी हे
मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन अश्या अल्पसंख्याक समाजाला टार्गेट हे लोक करत असतात, यामुळे आपसूकच नकळतपणे ओबीसी याच्या मागे ओढला जातो ही लबाडी आता ओबीसींच्या लक्षात यायला हवी. बहुजन चळवळी डायव्हर्ट करण्यासाठी ओवेसी, केजरीवाल, चंद्रशेखर आझाद ही पात्रही यांनीच उभी केलीत.
अश्रफ (उच्चवर्णीय मुसलमान) ओवेसीनि हिंदूंवर गरळ ओकायची व हिंदुत्ववादाच्या नावाखाली sc, ST आणि ओबीसींनि एकत्र येऊन बहुजन चळवळीना फाटे फोडायचे, प्रखर हिंदुत्वावादी अशी आभासी प्रतिमा माध्यमानि उभे केलेल्या नरेंद्र मोदींवर केजरीवाल यांनी गरळ ओकायची आणि नुकसान मात्र बहुजन ओबीसींच्या
नेतृत्वाच्या समाजवादी पक्ष, जनता दल या पक्षांनी सोसायच ही नियोजित योजना आहे.
ओबीसी चळवळी या देशात आता वेग धरू लागल्या आहेत, मोठया प्रमाणात जनजागृती होत आहे. प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ते आपली नोकरी व्यवसाय सांभाळून प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून चळवळीचं काम करतात त्यांना बळ
देण्याची गरज आहे व पक्षासाठी ओबीसींच्या मताची दलाली करणाऱ्या राजकीय नेते व कार्यकर्त्याच्या ढुंगणावर लात मारण्याची तयारी ओबीसी बांधवांनी ठेवली पाहिजे. पण जे ओबीसी नेते राजकीय नेते ओबीसींच्या साठी उघड भूमिका घेत असतील
त्यांना पाठिंबा देण्याची व बळ देण्याचाही समजूतदार पणा समाजाने दाखवला पाहिजे.
जे भाजपा ओबीसी मोर्चाचे लोक ओबीसींच्या मागण्यासाठी आंदोलनाची भाषा करत आहेत त्यांनी, केंद्र सरकारला विचारावं की 1. सरकारने ओबीसींच्या शिष्यवृत्ती मध्ये कपात का केली?
2. 2019 च्या निवडणुकीत ओबीसी जंगणेच आश्वासन देऊन पण 2021 च्या प्रस्तावित जनगणनेत ते ओबीसींची स्वतंत्र जनगणना करायला का तयार नाहीत.
3. ओबीसींच्या संसदीय समितीने क्रीमिळेअर ची अट 15 लाखाची शिफारस असताना, तातडीने BP शर्मा कमिटी बसवून ती 12 लाख पर्यंत कमी का केली गेली तसेच शेती आणि
नोकरीतील उत्पन्न जे क्रीमिळेअर साठी पकडत नव्हते त्याचा क्रीमिळेअर मध्ये आणण्याचा अट्टहास केंद्र सरकार का करते?
4. युनिव्हर्सिटी मध्ये 13 पॉईंट रोस्टर का लागू केले गेले?
5.सरकारने लॅटरल एन्ट्री च्या नावाखाली UPSC च्या परीक्षेच्या ऐवजी थेट खाजगी क्षेत्रातून IAS ऑफिसर भरतीचालू केली आहे . भरती केलेल्या अधिकाऱ्यात एकही OBC, SC आणि ST उमेदवार का नाहीये. दिवसरात्र UPSC चा अभ्यास करणाऱ्या मुलावर हा अन्याय नाही का?
6. क्रिमिलेयरची अट लावून ओबीसी च्या 314 *UPSC पास झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारने घरी बसवले आहे हे म्हणजे स्पर्धा परीक्षेची दिवसरात्र तयारी करणाऱ्या मुलाचं मानसिक खच्चीकरण नाही का?
7.मागील फडणवीस सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना असलेल्या परदेशी शिष्यवृत्ती साठीच्या असलेल्या 20 जागा सरकारने बंद करून खुल्या प्रवर्गासाठी ठेवून ओबीसींवर अन्याय केला आहे. तुम्ही ओबीसी समाजातील प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारला किती वेळा प्रश्न विचारला?
8. रोहिणी कमिशन द्वारे ओबीसीच सब कॅटेगरिसशन करून सरकार ओबीसी च्या मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही ओबीसी म्हणून केंद्र सरकारला प्रश्न का विचारात नाही येत
9. आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर मिळत असताना ओबीसींना आर्थीक निकष का लावले गेले आहेत, क्रीमिळेअर ची अट रद्द करण्याची हिम्मत प्रस्थापित भाजपा सरकार करेल का?
अशे नांनावधी प्रश्न या ओबीसी सेल च्या व मोर्चाच्या लोकांनी कधी सरकारला व पक्षाच्या नेतृत्वाला ओबीसी सेल च्या लोकांनी कधी विचारले आहेत का? आणि विचारून पक्ष आणि नेतृत्व त्याची दखल नसेल तर अश्या पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यायची तुमची तयारी आहे का?
म्हणून तमाम ओबीसी बांधवाना एकच विनंती योग्य आयोग्याची पारख करा व चळवळींना, प्रामाणिक कार्यकर्त्यांना व संघटनांना बळ द्या.
जय जगतगुरु तुकाराम महाराज, जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम, जय भारत, जय ओबीसी🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या गाजलेल्या भाषणांपैकी एक अतिशय महत्वाच भाषण म्हणजे संविधान सुपूर्द करण्याअगोदर
संविधान सभेसमोरील आजच्या दिवशी म्हणजेच
'25 नोव्हेंबर' 1949 ला केलेलं शेवटच भाषण..
आजची देशाची राजकीय परिस्थिती आणि पक्षीय राजकारण बघितलं तर बाबासाहेबांनी त्यावेळीच्या भाषणात केलेले सुतोवाच आज किती खरे ठरत आहेत यावरूनच त्यांच्या दूरदृष्टीची आणि सखोल अभ्यासाची जाणीव होते.
यास्तव आज देशाच हे संविधान आणि संविधानिक मूल्ये किती मौलिक आहे याची प्रत्येक भारतीयाने विचार करण्याची गरज आहे.
आज इच्छा इतकीच आहे की, उद्याचा हा संविधान दिन कोणत्या एका जातीचा उत्सव दिन होण्याऐवजी प्रत्येक भारतीय नागरिकाचा उत्सव दिन व्हावा...
सिद्धार्थ गौतम यांनी गयेच्या उरुवेला क्षेत्रातील धर्मारण्य या वनात सहा वर्षे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला. शेवटी शरीर कृश झाले. उभारी राहिली नाही.
तेव्हा त्यांनी विचार केला की जे ध्येय मनाच्या साह्याने गाठायचे आहे, त्यासाठी शरीर प्रकृती चांगली हवी. भूक-तहान-थकवा यांनी जो गळून गेला आहे त्याला नवा प्रकाश कसा प्राप्त होईल? असे विचार मनात येऊन सिद्धार्थ गौतमांनी वैराग्य मार्गाचा त्याग केला.
व सुप्पतीठ्ठ या घाटावर स्नान करून ते मातंगवापी या स्थळाकडे निघाले. त्याच वेळी सेनानीग्राम या गावातील सेनानी या गावप्रमुखाची मुलगी सुजाता खीर घेऊन नवस फेडण्यास आली होती. तिने कृश झालेल्या सिद्धार्थ गौतमांना पाहिले व वृक्ष देव समजून त्यांनाच खीरीचे पात्र दिले.
Dukhha means suffering in Buddhist Philosophy....!!!
मनुष्यप्राणी हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुखासाठी झटत असतो. दु:खाची सावली सुद्धा त्याला नकोशी वाटते. लहान मुल सुद्धा हातातून खेळणे काढून घेतले तर रडू लागते.
मी, माझी मालकी आणि माझे सुख यातच मनुष्य रममाण असतो. आणि मग सुख मिळवीण्याच्या लालसेपायी तो अनेकदा दु:खाच्या वणव्यात होरपळतो. पण त्याला हे कळत नाही की जीवनातील दुःख आणि सुख हे येणाऱ्या ऊन-पावसा प्रमाणे आहे. पण दुःखाची तीव्रता ही जीवनात माणसाला जास्त वाटते.
दुःखाचे बसलेले चटके तो सहसा विसरत नाही. मराठी संत साहित्यात देखील अनेक संतांनी दुःखा वरती लिहून ठेवले आहे. संत तुकाराम म्हणतात'या जगात सुख जवा एवढे तर दुःख पर्वता एवढे आहे'. तर आता पाहूया हे दुःख म्हणजे नक्की आहे तरी काय ?
आज काल अनेक लग्न ही वेगवेगळ्या जातीत होत आहेत प्रेमप्रकरणातुन तर काही प्रेमप्रकरणांना सैराट सारख्या घटनेला सामोर जाव लागत . माझा मुद्दा जरा वेगळा आहे काही बौध्द सध्या खुपच मुलतत्ववादी होताना दिसत आहेत मुलामुलींच प्रेमप्रकरण लग्न असल कि लग्न आमच्या
बौध्द पध्दतीने व्हायला पाहीजे , वराने किंवा वधुने जी इतर जातीय किंवा इतर धर्मिय आहे त्यांने बौध्द व्हायला पाहीजे म्हणजे काय तर लग्नाच्या आधी धर्मांतराचा सोहळा व नंतर २२ प्रतिज्ञा बोलायच्या व शपथ घ्यायला सांगायच बहुतांश वेळेस वधुस हि परिक्षा द्यावी लागते कारण तीला बौध्द घरात
यायचे असते . ज्यावेळेस ती २२ प्रतिज्ञा ऐकते व बोलते तेव्हा तिच्या मनाची काय अवस्था होत असेल कोण जाणे जर ती हिंदु असेल आणि ती जर मुस्लिम किंवा ख्रिश्चन असेल तर ती विचार करते कि या २२ प्रतिज्ञा आम्ही तर पालन करतो त्यामुळ आपल्याला काही अवघड नाही बौध्द जगणे .
1- *सतयुग*= जिस युग में केवल ब्राह्मण ही पढ़-लिख सकते थे। इसलिये वे जो बोलते थे, वही सत्य समझा जाता था, इसलिये ब्राह्मण उसे सतयुग कहता है ।
2- *द्वापर* = जिस युग में ब्राह्मणो के साथ क्षत्रिय भी पढ़ने लगे । यानी दो वर्ण पढ़ने लगे इसलिये ब्राह्मणों ने उसे द्वापर युग कहा।
3- *त्रेतायुग* = जिस युग में सवर्ण (बाह्मण, क्षत्रिय, वैश्य )
यानी तीनों वर्ण पढ़ने लगे, इसलिये ब्राह्मणों ने इसे त्रेतायुग कहा।
4- *कलयुग* = जिस युग में ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, के साथ-साथ शूद्र (ओबीसी, एससी, एसटी) भी पढ़ने लगे। इसलिये ब्राह्मणों ने इसे कलयुग यानी अशुभ/अधर्म/राक्षसी पाप का युग कहकर बदनाम करने लगे।
अवश्य वाचा तुमची कोरोनाची भीती निघून जाईल
डॉ.राजेंद्र गाडेकर
मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. 1918 सालच्या साथीत सुमारे दीड कोटी लोक मेले होते.
जगात प्रत्येक वर्षी कोट्यवधी लोक मरतच असतात. मरणाचा रेट तपासला तर एक सेकंद किंवा 1.8 सेकंदाला कुठेतरी कोणीतरी मरत असते. या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. जन्म, जरा, मृत्यू हे महात्मा बुद्धाने सांगितलेले अटळ सत्य आहे.
अमेरिकेमध्ये काही महिन्यांपूर्वी 12 ते 25 हजार लोक एन्फ्लुएंजा या आजाराने मृत्यू पडले. गेल्या वर्षी इटलीमध्ये 60 हजार लोक मेले. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशात साथीने, व्हायरल इन्फेक्शनने लाखो लोक मरत असतात. प्रत्येक वर्षी फक्त व्हायरल इन्फेक्शनने जगात सुमारे दीड लाख लोक मरतात.