वेळेचे नियोजन जमले तरच आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम होऊ शकतो.
वेळेचे नियोजन आणि पैसा या माझ्यामते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
आपण किती वेळ काम करतो यापेक्षा आपण नक्की काय आणि कशासाठी करतोय याची स्पष्टता आपले नेमके उत्पन्न,आर्थिक परिस्थिती ठरवत असते. #आर्थिकसाक्षरता#मराठी#म १/७
उदाहरणच द्यायचे झाले तर कल्पना करा तुम्ही तुमच्या शहरातल्या एखाद्या रेस्टॉरेंटमधे सहकुटुंब जेवायला गेलाय.
तुम्हाला सर्वांना चांगलीच भूक लागलीये पण तिकडे सर्व टेबल फुल आणि वेटर, रिसेप्शन आणि इतर सर्वच कर्मचारी नुसते फक्त धावपळ करताना दिसताहेत... तुम्हाला कसातरी टेबल मिळतो २/७
तुम्ही ॲार्डरही देता पण तुमचे पदार्थ वेळेवर येतच नाहीत.
तुम्ही इतरांच्या डिशेसकडे कधीही न पाहणारे पण यावेळी पाहत असता.
थोडीफार चुकचुक,ऐ ऐ, दादा, मामा केल्यावर कसेतरी तुम्हाला तुमचे जेवण टेबलवर मिळते मग रोटी, कमी पडते त्याची ॲार्डर देऊनही ती वेळेवर येत नाही..
वेटरला वारंवार ३/७
सांगूनही तो मुद्दाम पाहूनही न पाहिल्यासारख करतो..
आपण पुर्णपणे थकून जातो... मुलाबाळांकडे पहात नकळत कपाळावर हात मारतो आणि परत इथे परत कधीही न येण्याचे मनोमन ठरवतो.
यात ते हॉटेल कर्मचारी खरतर पहाटेपासून ते मध्यरात्री पर्यंत काबाडकष्ट करत असतात पण वेळेच्या अयोग्य नियोजनामुळे ४/७
यांचे मानसिक स्वास्थ्य तर बिघडतेच पण कायमस्वरूपी आर्थिक तोटाही सहन करावा लागतो... कारण एकदा तुटलेले गिऱ्हाईक पुन्हा त्याच्याकडे येईलच याची खात्री संपलेली असते.
फक्त कष्ट करून फायदा नसतो त्याची योग्य वेळ निवडावी लागते, वेळेचे चांगले नियोजन (Time Management) आणि आहेत त्या ५/७
माणसांच्या कामाचे नियोजन व्यवस्थित केले तरच त्या कष्टाचा आर्थिक फायदा होऊ शकतो..
बर हे तत्व कोणत्याही व्यवसायात, कामात, आपल्या रोजच्या जगण्यात लागू पडते.
कोणतेही काम करताना ते खरचं करायला हवे का? कोणत्या वेळी तुम्हाला अधिक सहजपणे करायचेय, तिथे जोर लावायचाय आणि त्याचे नियोजन ६/७
कसे हवे या सर्वांचा विचार व्हायला हवा.
हे असे वेळेचे योग्य नियोजन केले तर आपला आर्थिक फायदा हा नक्कीच होतो आणि तो झाला तरच बचत! आणि बचत झाली तरच पुढचे आर्थिक नियोजन!
म्हणूनच मी नेहमी सांगतो वेळेचे नियोजन आणि आर्थिक साक्षरता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत!
साधारणपणे २००३ च्या गणेशोत्सवादरम्यान आमची टिम भिलाईमध्ये एका मोठ्या वायर ड्रॉ करणाऱ्या कंपनीमध्ये एका भल्यामोठ्या ॲनलिंग फरसेनच्या एनर्जी कॉंन्सरव्हेशन प्रोजेक्टवर काम करत होती.
प्रोजेक्ट डेडलाईन जवळ आलेली आणि त्यात अर्ध्याहून अधिक आपले मराठी सहकारी. भर गणेशोत्सवात ते इकडे अडकून पडल्यामुळे मला रोज सडकून टोमणे ऐकायला लागायचे.
त्यांचा कामात काही प्रॅाब्लेम नसायचा पण जेवायला एकत्र बसले की मला हैरान करून सोडायचे.
कंपनीचे मालक स्वत: या कामात लक्ष देऊन
२/२३
होते. त्यांच्याही ही गोष्ट लक्षात यायची,पण मी त्यांना याबद्दल काहीच बोलत नसे.
आम्ही सर्वांनी अत्यंत कष्टाने तो प्रोजेक्ट रेकॅार्ड वेळेत पुर्ण केलाच शिवाय त्यांना साधारणपणे वर्षाला दिड कोटी रुपयांची बचत होईल अशी नवी सिस्टीम लावून दिली.
गेल्यावर्षी एक तरूण माझ्या परिचितांच्या रेफरंन्सने भेटायला आलेला. त्यांचे काही प्रोडक्ट आम्ही घ्यावे अशी त्याची अपेक्षा होती. पण अगदी २/५ मिनिटात माझ्या लक्षात आले की यांच्या एकाही उत्पादनाचा आपल्याला काहीएक उपयोग नाही आणि त्याच्याही हे
तो मुलगा मात्र एकदम हुशार दिसत होता त्यामुळे संवाद सुरुच होता.तसे त्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे ज्यांनी त्याला माझ्याकडे पाठविले होते ते मला गुरूसमान होते,मी या मुलाच्या वयापेक्षाही लहान असताना त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बरीच काम मिळवून दिली
२/१५
होती.
तो मुलगा काही फार स्ट्रॉंग रेकमेंडेडही नव्हता. त्यांनी मला फक्त पाच मिनिटे भेट म्हणून सांगितलेले तरी मलाच त्या मुलात एक वेगळाच स्पार्क जाणवला होता आणि त्यामुळे मी त्याच्याशी गप्पा सूरू ठेवल्या.
मुलगा गुजराती होता पण तो माझ्याशी इंग्रजी आणि मराठीतून संवाद साधण्याचा
३/१५
‘आमच्या आईवडिलांनी आम्हाला चांगले शिक्षण व संस्कार दिले’, हे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो,वाचतो. माझ्या किंवा मागच्या एकदोन पिढ्यातले अनुभवी लोक हे नेहमी म्हणायचे.
सृष्टीचा, मानवजातीचा हा अलिखित नियमच आहे की प्रत्येकाला वाटते माझ्या मुलाने/मुलीने खूप मोठे व्हावे, जग जिंकावे.
आपण मराठी लोक तर मुलाबाळांबाबतीत फार भावूक असतो. अगदी कोणताही त्याग करायला तयार असतो.
पण हे सर्व ते लहान असतानाच. जेव्हा
२/२१
खरच वेळ येते,तेव्हा बरेच मराठी “मध्यमवर्गीय” पालक आपल्या मुलांना वास्तवाची जाणीव करून देतात.(अंथरूण पाहून पाय पसरावे,चित्ती असू द्यावे समाधान,बाबांना बीपीचा त्रास आहे,त्यांना ‘टेन्शन’ नको वगैरे वगैरे.
ती स्वप्न जणू आपल्यासाठी नाहीतच वा मग त्यांचा मार्गच बदलायला भाग पाडतात.
३/२१
तेवढ्यात अचानक केबिनचा दरवाजा उघडून एक सहकारी आत आला आणि म्हणाला की माझा एक अत्यंत महत्वाचा व्हीडीओ कॅाल चालू आहे आणि तो बराच वेळ चालणार आहे.
आता ट्रेनी इंजिनियर पदासाठी एक मुलगा इंटरव्हूवला आलाय.
खरतर त्याला सकाळची वेळ दिली होती पण कदाचित प्रवासाचे कोणतेच साधन उपलब्ध
२/१४
न झाल्याने तो उशीरा आलाय आणि आता कोविडकाळात इतका वेळ त्याला बसवून ठेवणे योग्य नाही. तुम्हाला वेळ असेल तर त्याला भेटता का?
मी तसाही निवांतच होतो आणि बरेच दिवस असा इंटरव्हूव घेतला नव्हता, तसं माझ्यासाठीच ती संधी वाटली आणि लगेच त्या मुलाला आत पाठवून द्यायला सांगितले.
३/१४
या लेखाचे फक्त वाचन न होता त्यावर चर्चा व्हावी, त्यातल्या सूचनांवर योग्य पातळीवर विचार व्हावा,त्यासाठी तुमची मदत झाली तर मनापासून आनंद असेल.
आपण दिलेल्या प्रेम आणि आदराबद्दल मनापासून आभार! #सकाळ परिवाराचे आज विशेष आभार हा लेख सर्वदूर पोहचविण्यासाठी!
१/२३ #SundayThread#शिवमोहर
महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची समाज सुधारकांची, बुद्धीवंतांची तसेच फक्त भारतालाच काय पण जगाला नवी दिशा देणाऱ्या आणि आपल्या देशाची कित्येक आघाड्यांवर ओळख करून देणाऱ्या महामानवांची समृद्ध भूमी आहे.
त्यांच्या कर्तृत्वाची “शिवमोहर” लखलखीत पणे सर्वत्र चमकते आहे.
२/२३
बऱ्याचदा मराठी माणसं आपण औद्योगिक क्षेत्रात थोडे मागे आहोत असे सर्रास बोलतात पण मला ते अजिबात मान्य नाही.गेल्या 20/25 वर्षात खुप बदल झालाय आणि तो अत्यंत सकारात्मक आहे.
खरंतर महाराष्ट्र ही जागतिक औद्योगिक विकासाची गेल्या २५० वर्षाहून जास्त काळ परंपरा असलेली भूमी आहे.
३/२३
आजमितीस महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरी आपण महाराष्ट्राच्या बाजूलाच ऊभे रहायला हवे. हाच महाराष्ट्रधर्म आहे.
या देशावर अन महाराष्ट्रावर आतोनात प्रेम आहे म्हणूनच ही मातृभूमी “कर्मभूमी” म्हणून निवडलीये.
आज राज्यसरकार लस मोफत
१/९
प्रत्येक सुज्ञ नागरिकाला हे कळतेय की आज सरकारची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. परंतु या अवस्थेतही लोकांचे जीव अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम ऊपाय आहे.
सरकारच्या या निर्णयाचे फक्त टाळ्या वाजवून स्वागत करण्यापेक्षा त्यांना
२/९
आपल्याला जी शक्य असेल ती आर्थिक मदत “ऐच्छिक” स्वरुपात देणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजतो.
जर आपल्या मदतीने कोणाचे प्राण वाचणार असतील तर त्यासारखे दुसरे पुण्यकर्म कोणतेही नाही.
खरतर मी अशा केलेल्या मदतीचा बाजार मांडत नाही,परंतु काही सहृदयी मित्रांच्या आग्रहामुळे व्यक्त झालोय.
३/९