‘आमच्या आईवडिलांनी आम्हाला चांगले शिक्षण व संस्कार दिले’, हे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो,वाचतो. माझ्या किंवा मागच्या एकदोन पिढ्यातले अनुभवी लोक हे नेहमी म्हणायचे.
सृष्टीचा, मानवजातीचा हा अलिखित नियमच आहे की प्रत्येकाला वाटते माझ्या मुलाने/मुलीने खूप मोठे व्हावे, जग जिंकावे.
आपण मराठी लोक तर मुलाबाळांबाबतीत फार भावूक असतो. अगदी कोणताही त्याग करायला तयार असतो.
पण हे सर्व ते लहान असतानाच. जेव्हा
२/२१
खरच वेळ येते,तेव्हा बरेच मराठी “मध्यमवर्गीय” पालक आपल्या मुलांना वास्तवाची जाणीव करून देतात.(अंथरूण पाहून पाय पसरावे,चित्ती असू द्यावे समाधान,बाबांना बीपीचा त्रास आहे,त्यांना ‘टेन्शन’ नको वगैरे वगैरे.
ती स्वप्न जणू आपल्यासाठी नाहीतच वा मग त्यांचा मार्गच बदलायला भाग पाडतात.
३/२१
आपल्याकडे कित्येक कुटुंबात तर सर्रास हे प्रकार पाहायला मिळतात.
कधीकधी आईवडिलांची आयुष्यभराची जमापुंजी, शेती वाडी, घर बाजारात मांडावे लागते. आईचे दागिने, सोसायटीतून कर्ज, शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून उधारी, किंवा बऱ्याचदा अंतःकरणातून दुःखी होऊन शेवटी प्रवास अर्धवटच सोडावा लागतो.
४/२१
काही जण शिक्षणासाठी कर्ज घेऊन कोवळ्या वयात स्वत:च्याच मुलांना premature करून टाकतात. बरं ते ही काही वर्षांपूर्वीपर्यंत ठीक होते. कारण कर्जाची गरज मुलाला १७/१८ वर्षी पडायची.
पण आजची परिस्थिती काय आहे?
हल्ली मूल जन्माला घालण्याआधीच लाख-दोन लाख खर्च येतो…(हॉस्पिटलचे तर
५/२१
पॅकेजेस आहेत तसे) पुढे ते बाळ २/३ वर्षांचे होईपर्यंत अजून दोनेक लाख तर सहज खर्च होतात.
(बारसं, पहिला वाढदिवस, इतर सण सोहळे सोडून).
अगदी “सरकारी” लसींची आजची अवस्था पाहता मेट्रो सिटीमध्ये तर किती मध्यमवर्गीय सरकारी लसीकरण केंद्रात जात असतील याबद्दल मला शंकाच आहे.
लगेच पुढे
६/२१
पावसाळयात कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे वाढलेली प्रीस्कूल्स (कोणतीही खास परवानगी नसते)पण दोन-अडीच वर्षाच्या लेकराला पाच-पन्नास हजार खर्चून पालकही त्या शाळेत कोंबतात.
पुढे मुख्य शाळेची (पहिलीच्या पण आधी बरं) धावाधाव,मुंबई पुण्यासारख्या शहरात खासगी शाळांची फी पहा, लाख-दोन लाख
७/२१
तर डोनेशन असते बाकी फी वेगळी…
हायस्कूल आणि फक्त दहावीपर्यंत मुलांना शिकवायचे म्हटले तरी ५ ते १० लाख खर्च येतोय.
या शिवाय या स्पर्धेच्या युगात रहायचे म्हणून ऑलंपियाड, विविध भाषा, पाचवीपासूनच Spellbee, IEO, IMO, IGKO, NSO, NCO, Ucmas आणि काय काय भानगडींची तयारी करून घेणारे
८/२१
क्लासेस. (काहीजण तर पाचवीपासूनच IIT च्या प्रिपरेशन्सची पण तयारी करतात.)
पुढे दहावी- बारावी यासाठीचे विविध क्लासेस, विविध Entrance Exam ची तयारी यासाठीचा खर्च, ते करिअर गाइडन्स आणि सिलेक्शनचा मनस्ताप मिळून त्यासाठी चार-पाच लाखाचा खर्च.
आणि मग सुरू होणार असते खरी मारामारी
९/२१
महाविद्यालय किंवा उच्चशिक्षणासाठीचा खर्च.
भारतातील सद्यस्थिती पाहता इथल्या शिक्षणाच्या दर्जावर न बोललेलेच बरे.
काही नामांकित कॅालेजेस/ शिक्षणसंस्था सोडल्या तर बाकी ठिकाणी आनंदी आनंदच आहे.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या राज्यात तडीपार, दारूविक्या
१०/२१
अशिक्षित, वाममार्गाने ऊद्योगधंदे करून राजकारणात आलेल्या क्षुल्लक राजकारण्याला पण आदराने?? “साहेब” म्हणतात आणि ज्ञानदानासारखं पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना आणि गुरुजींना “सेवक” म्हटले जाते. (यापेक्षा वाईट म्हणजे ६००० रुपड्यांची पाने त्यांच्या तोंडाला पुसून इज्जत काढतात.)
११/२१
यापेक्षा दुर्भाग्य ते काय म्हणावे. प्रत्येक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनाची नाही तर मनाची तरी “लाज” वाटायला हवी होती.
निदान भविष्यात तरी या शब्दात बदल करावा ही नम्र विनंती.(बऱ्याचदा शब्दापेक्षा भावार्थ महत्वाचा असतो आणि यात नेमका तोच चुकतोय)
तर मुद्दा हा की अशा
१२/२१
शाळांमधे आपण मुलांना टाकण्यापेक्षा बाहेरच्या देशात उच्चशिक्षणासाठी पाठविण्याचा ट्रेंड मोठा होऊ शकतो.
अगदी पदवीसाठीच पुढील काही वर्षात मुले परदेशी जाऊ शकतात. त्यासाठी आजमितीसही २५ ते ५० लाखाचा खर्च तरी अपेक्षित असतोच. अगदी भारतात जरी आपली मुले शिकली तरी ५ ते १० लाख खर्च हा
१३/२१
येणारच असतो.
आता आपली प्रत्येकाचीच मुले मेरीटमध्ये येणार नाहीत.बरे,आली तरी खर्च चुकत नसतो. त्यामुळे या सर्व खर्चाचा जर एकत्रित विचार केला तो साधारणपणे २५ ते ३० लाखाच्या आजूबाजूला जातो.
आर्थिकदृष्ट्या विचार केला तर साधारणपणे १५ ते १८ वर्षांत व्यवस्थितपणे नियोजन केले तर ही
१४/२१
बाब फार कठीण जात नाही पण जर आपल्याला जागच आली नाही तर मात्र मुलांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहायला लागू शकते.
आपण कोणीही असा, खासगी कंपनीत काम करणारा कर्मचारी, अधिकारी, सरकारी नोकरदार, पोलिस, शिक्षक, वकिल, डॅाक्टर, सॅाफ्टवेअर मधील सो कॅाल्ड पांढरपेशी साहेब, पत्रकार,
१५/२१
दुकानदार वा छोटे मोठे व्यावसायिक.
आपल्यापैकी आपल्यासारखेच काम करणारे, तेवढाच पैसा कमविणारे त्यांच्या मुलामुलींसाठी पाहिजे तो खर्च करू शकतात मग आपण का नाही?
तर याचे एकमेव उत्तर म्हणजे- त्यांचे याबाबतीतले आर्थिक नियोजन, जेवढे उत्पन्न येते त्याच्या खर्चाचे, बचतीचे आणि योग्य
१६/२१
ठिकाणी पैसा गुंतवण्याची बुद्धी आणि कला.
पूर्वी घरात आलेला मुलगा/मुलगी घराचे भविष्य निश्चित करायचे.
सरकारी शाळा आणि “डेडिकेटेड शिक्षकांच्या” भरवश्यावर हे होत होते.
(एकच डिसले गुरूजी चालणार नाहीत, ते त्यांच्या कर्तृत्वाने पुढे आले- त्यांचा अभिमान आहेच)
यापुढे अगदी कितीही
१७/२१
वेगाने देशात, राज्यात शिक्षणात बदल झाला तरी बरीच वर्ष जातील.
तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल भूतकाळ विसरा, तयारीला लागा.
आर्थिक नियोजन आणि अर्थसाक्षरतेचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक रुपया शेवटचा आहे म्हणून खर्च करा.
Assets आणि Liability मधला फरक समजून घ्या.
१८/२१
मोक्कार प्रसिद्धी आणि तुलनेच्या नादात भरकटण्यात काही अर्थ नाही.
समाजमाध्यमातील वाद, राजकारण, क्रिकेट आणि धार्मिक हेवेदावे टाळा.
(ज्यांच्यासाठी हे करताय त्यांची मुले/नातू लहानपणापासूनच युरोप,अमेरिकेत शिक्षण घेताहेत.)
मोठी झाल्यावरही तिकडेच राहतील किंवा इकडे येऊन तुमचे/आमचे
१९/२१
‘छोटे साहेब’ पुढे ‘मोठे साहेब’ बनतील) त्यांना पूरक भूमिका घेऊ नका. त्यांचा हा विखारी गनिमी कावा ओळखा.
शिक्षण आणि वाचन ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
आपल्या मुलांना जगातील सर्वोच्च शिक्षणसंस्थामध्ये शिकवायचे असेल तर आजपासूनच त्यासाठी बचत आणि गुंतवणूक करा.
२०/२१
आपल्या लहान लेकरांसाठी तरी आर्थिक साक्षर व्हा, त्यांचे भविष्य घडवायचेय तर आजपासूनच त्यांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करा.
आधुनिक,विज्ञानवादी जगात उत्तम शिक्षण हीच यशाची गुरूकिल्ली आहे.
तेवढ्यात अचानक केबिनचा दरवाजा उघडून एक सहकारी आत आला आणि म्हणाला की माझा एक अत्यंत महत्वाचा व्हीडीओ कॅाल चालू आहे आणि तो बराच वेळ चालणार आहे.
आता ट्रेनी इंजिनियर पदासाठी एक मुलगा इंटरव्हूवला आलाय.
खरतर त्याला सकाळची वेळ दिली होती पण कदाचित प्रवासाचे कोणतेच साधन उपलब्ध
२/१४
न झाल्याने तो उशीरा आलाय आणि आता कोविडकाळात इतका वेळ त्याला बसवून ठेवणे योग्य नाही. तुम्हाला वेळ असेल तर त्याला भेटता का?
मी तसाही निवांतच होतो आणि बरेच दिवस असा इंटरव्हूव घेतला नव्हता, तसं माझ्यासाठीच ती संधी वाटली आणि लगेच त्या मुलाला आत पाठवून द्यायला सांगितले.
३/१४
या लेखाचे फक्त वाचन न होता त्यावर चर्चा व्हावी, त्यातल्या सूचनांवर योग्य पातळीवर विचार व्हावा,त्यासाठी तुमची मदत झाली तर मनापासून आनंद असेल.
आपण दिलेल्या प्रेम आणि आदराबद्दल मनापासून आभार! #सकाळ परिवाराचे आज विशेष आभार हा लेख सर्वदूर पोहचविण्यासाठी!
१/२३ #SundayThread#शिवमोहर
महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची समाज सुधारकांची, बुद्धीवंतांची तसेच फक्त भारतालाच काय पण जगाला नवी दिशा देणाऱ्या आणि आपल्या देशाची कित्येक आघाड्यांवर ओळख करून देणाऱ्या महामानवांची समृद्ध भूमी आहे.
त्यांच्या कर्तृत्वाची “शिवमोहर” लखलखीत पणे सर्वत्र चमकते आहे.
२/२३
बऱ्याचदा मराठी माणसं आपण औद्योगिक क्षेत्रात थोडे मागे आहोत असे सर्रास बोलतात पण मला ते अजिबात मान्य नाही.गेल्या 20/25 वर्षात खुप बदल झालाय आणि तो अत्यंत सकारात्मक आहे.
खरंतर महाराष्ट्र ही जागतिक औद्योगिक विकासाची गेल्या २५० वर्षाहून जास्त काळ परंपरा असलेली भूमी आहे.
३/२३
आजमितीस महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरी आपण महाराष्ट्राच्या बाजूलाच ऊभे रहायला हवे. हाच महाराष्ट्रधर्म आहे.
या देशावर अन महाराष्ट्रावर आतोनात प्रेम आहे म्हणूनच ही मातृभूमी “कर्मभूमी” म्हणून निवडलीये.
आज राज्यसरकार लस मोफत
१/९
प्रत्येक सुज्ञ नागरिकाला हे कळतेय की आज सरकारची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. परंतु या अवस्थेतही लोकांचे जीव अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम ऊपाय आहे.
सरकारच्या या निर्णयाचे फक्त टाळ्या वाजवून स्वागत करण्यापेक्षा त्यांना
२/९
आपल्याला जी शक्य असेल ती आर्थिक मदत “ऐच्छिक” स्वरुपात देणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजतो.
जर आपल्या मदतीने कोणाचे प्राण वाचणार असतील तर त्यासारखे दुसरे पुण्यकर्म कोणतेही नाही.
खरतर मी अशा केलेल्या मदतीचा बाजार मांडत नाही,परंतु काही सहृदयी मित्रांच्या आग्रहामुळे व्यक्त झालोय.
३/९
त्यांना साथ देणारे नकली पत्रकार, सुट्टीवरील न्यायव्यवस्था आणि नाकर्ते प्रशासन याला जेवढे कारणीभूत आहेत तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त आपली “बेशिस्त” जनता याला कारणीभूत आहे. (या प्रत्येकात अगदी काही अपवाद आहेत, त्यांची मी क्षमा मागतो)
पण वस्तुस्थिती ही आहे की प्रत्येक
२/१२
क्षेत्रात, ऊद्योग असो, खाजगी वा सरकारी नोकरी असो वा घरगुती वा लघु ऊद्योग असो आपल्याला नियम आणि कायदे वाकवायची, मोडायची भितीच वाटत नाही, आणिबाणीच्या, महामारीच्या काळातही कोणी कायद्याला किंमत देईना.
एकंदर अघळपघळपणा आणि “चलता है” ॲटिट्यूड आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलाय.
३/१२
मग ठरल्याप्रमाणे लस्सी घेतली,अजून काही पार्सल घेतले आणि एकदम खुशीत गाडीकडे आलो. कार चालू केली आणि निघणार एवढ्यात काचेवर टकटक झाली, मी एकदम दचकलो, बाहेर पाहिले तर वयस्कर काका मला काच खाली घ्यायला सांगत होते, मी काच खाली घेऊन त्यांना “काय झालं?” असं विचारणार एवढ्यात त्यांनीच
२/१२
“टायर पंक्चर झालाय,तो पहा म्हणून मला हाताने टायरकडे बोट दाखवले. मी ताबडतोप गाडीतून उतरलो आणि कपाळावरच हात मारला, टायर पुर्णच फ्लॅट/ अगदी सपाट.
मला घामच फुटला,गाडी चालवायला तर येत होती पण ही पंक्चरची भानगड नवीच होती.
माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि घाम पाहून, काकांनी विचारले
३/१२
परेशभाई (नाव बदललेय),माझ्यापेक्षा १०/१२ वर्षांनी मोठे. माझा परिचय झाला साधारणपणे १७/१८ वर्षांपूर्वी, त्यांच्या काही हिटींग प्रोसेसमधे त्यांना नवे बदल करायचे होते म्हणून कंपनीने मला एनर्जी ॲाडीट करण्यासाठी त्यांच्याकडे पाठविले. #SaturdayThread#आर्थिकसाक्षरता#सत्यकथा#मराठी १/१८
त्यांचा स्वभाव अत्यंत बोलका आणि हरहुन्नरी. नॅानटेक्निकल असले तरी प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने लक्ष देणार.
परेशभाईंचा मुंबईतील सुखवस्तू गुजराती कुटूंबात जन्म, हायस्कूलपासून शिक्षण करतच वडीलांच्या किरानामालाच्या दुकानात धंदा करायला शिकले. पुढे नियामाप्रमाणे बी.कॅाम केलं आणि
२/१८
एखाद दोन वर्षात स्वत:चा फॅब्रिकेशनचा छोटासा गाळा घेऊन काम सूरू केलं.व्यवसाय वाढविताना मोठ्या कंपन्यासोबत ज्या ओळखी झाल्या त्याचा पुरेपुर वापर करत त्यांचे व्हेंडर झाले. समाजाकडून बिनव्याजी आर्थिक मदत घेतली. वडिलांचे दुकानही सुरूच होते आणि त्यामुळे इकडे चांगला जम बसविला.
३/१८