गेल्यावर्षी एक तरूण माझ्या परिचितांच्या रेफरंन्सने भेटायला आलेला. त्यांचे काही प्रोडक्ट आम्ही घ्यावे अशी त्याची अपेक्षा होती. पण अगदी २/५ मिनिटात माझ्या लक्षात आले की यांच्या एकाही उत्पादनाचा आपल्याला काहीएक उपयोग नाही आणि त्याच्याही हे
तो मुलगा मात्र एकदम हुशार दिसत होता त्यामुळे संवाद सुरुच होता.तसे त्याचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे ज्यांनी त्याला माझ्याकडे पाठविले होते ते मला गुरूसमान होते,मी या मुलाच्या वयापेक्षाही लहान असताना त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला बरीच काम मिळवून दिली
२/१५
होती.
तो मुलगा काही फार स्ट्रॉंग रेकमेंडेडही नव्हता. त्यांनी मला फक्त पाच मिनिटे भेट म्हणून सांगितलेले तरी मलाच त्या मुलात एक वेगळाच स्पार्क जाणवला होता आणि त्यामुळे मी त्याच्याशी गप्पा सूरू ठेवल्या.
मुलगा गुजराती होता पण तो माझ्याशी इंग्रजी आणि मराठीतून संवाद साधण्याचा
३/१५
प्रयत्न करत होता.
त्याचे प्रॅाडक्ट जरी मला आता लागत नसले तरी पुढे लागतील यावर तो ठाम होता,इतकेच नाही तर माझ्याच व्यवसायाबद्दलच्या काही महत्त्वाच्या प्रॅाब्लेमवर अगदी होमवर्क केल्यासारखा बोलत होता.
मला नवल वाटत होते हा हार्डली तिशीतही नसलेला मुलगा एकतर नोकरी करतोय,तसा याचा
४/१५
माल मी घेतला नाही तरी याचा बॅास याला काहीच म्हणणार नाही कारण मला ते प्रॅाडक्ट लागतच नाही.तरीही हा एवढी मेहनत घेतोय. मी त्याला ५/१० मिनिट म्हणता म्हणता तासभर दिला. मला त्या तासाभरात मुलाचा प्रामाणिकपणा भावला, त्याचे प्रॅाडक्टही बऱ्यापैकी कळाले आणि लगेच माझ्या ओळखीचे चार-पाच
५/१५
रेफरंन्सेस त्याला दिले. अगदी मी तिथूनच स्वत: त्या सर्वांशी त्याचे बोलणेही करून दिले.
त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मलाही सुख देऊन गेला. कारण तो केबिनमधून गेल्यानंतर दहाच मिनीटात मला माझ्या परिचितांचा फोन आला आणि त्यांना मी केलेल्या मदतीचा अत्यानंद झाला.
त्यांनी मनापासून खुप
६/१५
खुप धन्यवाद दिले वर एक गुपित सांगितले तो मुलगा त्यांचा नातू होता.
बरं त्या साहेबांना पक्के माहित होते कि मला त्यांचे काहीच प्रॅाडक्ट लागणार नाहीत तरी त्यांनी नातवाला माझ्याकडे पाठवले.
बरं मी तर गुरूदक्षिणेत पास झालोच पण नातू मात्र डिस्टींगशन मधे पास झाला होता.
७/१५
मी पाचएक मिनिट सुन्न झालो. हा गुजराती -मारवाडी समाज व्यवसायाबाबतीत इतका जागृत आणि चिकट असण्याची कारणं त्यांच्या या सेल्समधल्या झोकून देण्याच्या वृत्तीत आहे.
तुम्ही कोणत्याही कपड्याचा दुकानात जा, तिथला मुलगा कधी कपडे दाखवून थकत नाही, ५० डिझाईन दाखवेल. एखादा कलर नसला तर तसे
८/१५
न सांगता वेगळे कलर कसे भारी आहेत हे नकळत पटवून द्यायचा प्रयत्न करेल… “त्यांचे शिक्षण भले आपल्यापेक्षा कमी असेल पण त्यांचा धंदा त्यांना आपल्यापेक्षा चांगला कळतो.”
कोणतेही दुकान घ्या,मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, कोणताही छोटा, मोठा ऊद्योग.
सण-सुद, काहीही असुदेत हे १२ महिने सूरू
९/१५
बरं बोलण्याची, पैसे मागण्याची पद्धत एकदम लाघवी, प्रेमळ घरगुती पण पैशांच्या बाबतीत घरच्यांकडूनही एक रूपया सोडणार नाहीत.
तो मुलगा तासभर माझ्यासोबत बसला पण कुठेही तो तिसऱ्या पिढीतील ऊद्योजक आहे किंवा त्यांचा शंभरएक कोटींचा व्यवसाय आहे किंवा तो युरोपातून उच्च शिक्षण घेऊन आलाय
१०/१५
याचा अस्पष्टही उल्लेख नव्हता. अतिशय नम्र, साधा अत्यंत गरजवंत असा त्याचा ॲप्रोच होता.
आता आपल्याकडच्या परिस्थितीवर काय बोलावे? एखादे घर, एखादी गाडी, दोन वा तीन-चार वर्षाचा व्यवसाय आणि काही शेतीच्या तुकड्यावर लोक लगेच “ऊद्योगपती” “आंत्रप्र्युनियर” “युवा ऊद्योजक” लावतात.
११/१५
लागलीच पाच-दहा ॲवार्ड भिंतीवर टांगलेले असतात. काही मोठ्या राजकीय मंचावर हजेरी आणि लगेच लोकांसमोर भाषणबाजी! नजर खाली राहण्याचा तर प्रश्नच नाही.
हे बदलायला हवे. आपल्या DNA मधे सेल्स अन मार्केटिंग शिरायला हव,त्यासाठी नम्रता अंगी बाळगायला हवी. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हवा
१२/१५
यशाची हवा डोक्यापर्यंत न जाता चप्पलबुटांसोबत दरवाज्याच्या बाहेरच रहायला हवी. खुप गोष्टी शिकायला हव्या. सर्वांकडूनच.
कोणताही माणूस घ्या, तो आपल्या उपयोगी पडेल म्हणून फक्त त्याच्याशी संबंध वाढवू नयेत. मदत करताना कोणतीही अपेक्षा न ठेवताच करत रहायची.
तो मुलगा त्यांचा नातू
१३/१५
होता हे कळाल्यानंतर वीज चमकावी तसा माझ्या डोक्यात विचार होता
“जर यदाकदाचित माझ्याकडून त्या मुलाला चुकीची वागणूक मिळाली असती, किंवा मी त्याला काहीच मदत केली नसती आणि भविष्यात जेंव्हा मला हे सत्य कळाले असते तर त्या गुरूसमान मानणाऱ्या माणसाच्या नजरेला मी कशी नजर मिळवली असती?”
१४/१५
आपल्याला अजून खुप पुढे जायचेय खुप शिकायचेय-अर्ध्या हळकुंडात पिवळे होण्याची संस्कृती बदलायला हवी!
फक्त द्वेष, राजकारण,क्रिकेट, गावगप्पा आणि इतिहासात रमण्यापेक्षा नवी झेप घेण्याची तयारी करायला हवी.
‘आमच्या आईवडिलांनी आम्हाला चांगले शिक्षण व संस्कार दिले’, हे वाक्य आपण बऱ्याचदा ऐकतो,वाचतो. माझ्या किंवा मागच्या एकदोन पिढ्यातले अनुभवी लोक हे नेहमी म्हणायचे.
सृष्टीचा, मानवजातीचा हा अलिखित नियमच आहे की प्रत्येकाला वाटते माझ्या मुलाने/मुलीने खूप मोठे व्हावे, जग जिंकावे.
आपण मराठी लोक तर मुलाबाळांबाबतीत फार भावूक असतो. अगदी कोणताही त्याग करायला तयार असतो.
पण हे सर्व ते लहान असतानाच. जेव्हा
२/२१
खरच वेळ येते,तेव्हा बरेच मराठी “मध्यमवर्गीय” पालक आपल्या मुलांना वास्तवाची जाणीव करून देतात.(अंथरूण पाहून पाय पसरावे,चित्ती असू द्यावे समाधान,बाबांना बीपीचा त्रास आहे,त्यांना ‘टेन्शन’ नको वगैरे वगैरे.
ती स्वप्न जणू आपल्यासाठी नाहीतच वा मग त्यांचा मार्गच बदलायला भाग पाडतात.
३/२१
तेवढ्यात अचानक केबिनचा दरवाजा उघडून एक सहकारी आत आला आणि म्हणाला की माझा एक अत्यंत महत्वाचा व्हीडीओ कॅाल चालू आहे आणि तो बराच वेळ चालणार आहे.
आता ट्रेनी इंजिनियर पदासाठी एक मुलगा इंटरव्हूवला आलाय.
खरतर त्याला सकाळची वेळ दिली होती पण कदाचित प्रवासाचे कोणतेच साधन उपलब्ध
२/१४
न झाल्याने तो उशीरा आलाय आणि आता कोविडकाळात इतका वेळ त्याला बसवून ठेवणे योग्य नाही. तुम्हाला वेळ असेल तर त्याला भेटता का?
मी तसाही निवांतच होतो आणि बरेच दिवस असा इंटरव्हूव घेतला नव्हता, तसं माझ्यासाठीच ती संधी वाटली आणि लगेच त्या मुलाला आत पाठवून द्यायला सांगितले.
३/१४
या लेखाचे फक्त वाचन न होता त्यावर चर्चा व्हावी, त्यातल्या सूचनांवर योग्य पातळीवर विचार व्हावा,त्यासाठी तुमची मदत झाली तर मनापासून आनंद असेल.
आपण दिलेल्या प्रेम आणि आदराबद्दल मनापासून आभार! #सकाळ परिवाराचे आज विशेष आभार हा लेख सर्वदूर पोहचविण्यासाठी!
१/२३ #SundayThread#शिवमोहर
महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची समाज सुधारकांची, बुद्धीवंतांची तसेच फक्त भारतालाच काय पण जगाला नवी दिशा देणाऱ्या आणि आपल्या देशाची कित्येक आघाड्यांवर ओळख करून देणाऱ्या महामानवांची समृद्ध भूमी आहे.
त्यांच्या कर्तृत्वाची “शिवमोहर” लखलखीत पणे सर्वत्र चमकते आहे.
२/२३
बऱ्याचदा मराठी माणसं आपण औद्योगिक क्षेत्रात थोडे मागे आहोत असे सर्रास बोलतात पण मला ते अजिबात मान्य नाही.गेल्या 20/25 वर्षात खुप बदल झालाय आणि तो अत्यंत सकारात्मक आहे.
खरंतर महाराष्ट्र ही जागतिक औद्योगिक विकासाची गेल्या २५० वर्षाहून जास्त काळ परंपरा असलेली भूमी आहे.
३/२३
आजमितीस महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरी आपण महाराष्ट्राच्या बाजूलाच ऊभे रहायला हवे. हाच महाराष्ट्रधर्म आहे.
या देशावर अन महाराष्ट्रावर आतोनात प्रेम आहे म्हणूनच ही मातृभूमी “कर्मभूमी” म्हणून निवडलीये.
आज राज्यसरकार लस मोफत
१/९
प्रत्येक सुज्ञ नागरिकाला हे कळतेय की आज सरकारची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. परंतु या अवस्थेतही लोकांचे जीव अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम ऊपाय आहे.
सरकारच्या या निर्णयाचे फक्त टाळ्या वाजवून स्वागत करण्यापेक्षा त्यांना
२/९
आपल्याला जी शक्य असेल ती आर्थिक मदत “ऐच्छिक” स्वरुपात देणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजतो.
जर आपल्या मदतीने कोणाचे प्राण वाचणार असतील तर त्यासारखे दुसरे पुण्यकर्म कोणतेही नाही.
खरतर मी अशा केलेल्या मदतीचा बाजार मांडत नाही,परंतु काही सहृदयी मित्रांच्या आग्रहामुळे व्यक्त झालोय.
३/९
त्यांना साथ देणारे नकली पत्रकार, सुट्टीवरील न्यायव्यवस्था आणि नाकर्ते प्रशासन याला जेवढे कारणीभूत आहेत तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त आपली “बेशिस्त” जनता याला कारणीभूत आहे. (या प्रत्येकात अगदी काही अपवाद आहेत, त्यांची मी क्षमा मागतो)
पण वस्तुस्थिती ही आहे की प्रत्येक
२/१२
क्षेत्रात, ऊद्योग असो, खाजगी वा सरकारी नोकरी असो वा घरगुती वा लघु ऊद्योग असो आपल्याला नियम आणि कायदे वाकवायची, मोडायची भितीच वाटत नाही, आणिबाणीच्या, महामारीच्या काळातही कोणी कायद्याला किंमत देईना.
एकंदर अघळपघळपणा आणि “चलता है” ॲटिट्यूड आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलाय.
३/१२
मग ठरल्याप्रमाणे लस्सी घेतली,अजून काही पार्सल घेतले आणि एकदम खुशीत गाडीकडे आलो. कार चालू केली आणि निघणार एवढ्यात काचेवर टकटक झाली, मी एकदम दचकलो, बाहेर पाहिले तर वयस्कर काका मला काच खाली घ्यायला सांगत होते, मी काच खाली घेऊन त्यांना “काय झालं?” असं विचारणार एवढ्यात त्यांनीच
२/१२
“टायर पंक्चर झालाय,तो पहा म्हणून मला हाताने टायरकडे बोट दाखवले. मी ताबडतोप गाडीतून उतरलो आणि कपाळावरच हात मारला, टायर पुर्णच फ्लॅट/ अगदी सपाट.
मला घामच फुटला,गाडी चालवायला तर येत होती पण ही पंक्चरची भानगड नवीच होती.
माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि घाम पाहून, काकांनी विचारले
३/१२