या लेखाचे फक्त वाचन न होता त्यावर चर्चा व्हावी, त्यातल्या सूचनांवर योग्य पातळीवर विचार व्हावा,त्यासाठी तुमची मदत झाली तर मनापासून आनंद असेल.
आपण दिलेल्या प्रेम आणि आदराबद्दल मनापासून आभार! #सकाळ परिवाराचे आज विशेष आभार हा लेख सर्वदूर पोहचविण्यासाठी!
१/२३ #SundayThread#शिवमोहर
महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची समाज सुधारकांची, बुद्धीवंतांची तसेच फक्त भारतालाच काय पण जगाला नवी दिशा देणाऱ्या आणि आपल्या देशाची कित्येक आघाड्यांवर ओळख करून देणाऱ्या महामानवांची समृद्ध भूमी आहे.
त्यांच्या कर्तृत्वाची “शिवमोहर” लखलखीत पणे सर्वत्र चमकते आहे.
२/२३
बऱ्याचदा मराठी माणसं आपण औद्योगिक क्षेत्रात थोडे मागे आहोत असे सर्रास बोलतात पण मला ते अजिबात मान्य नाही.गेल्या 20/25 वर्षात खुप बदल झालाय आणि तो अत्यंत सकारात्मक आहे.
खरंतर महाराष्ट्र ही जागतिक औद्योगिक विकासाची गेल्या २५० वर्षाहून जास्त काळ परंपरा असलेली भूमी आहे.
३/२३
जर आपण औद्योगिकीकरणाचा अभ्यास केला तर लक्षात येईल की पहिली औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली. पुढे इंग्रज भारतात आल्यानंतर कापूस आणि इतर कच्चामाल ते लोक महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रदेशातूनच घेऊन जायचे.
जगाच्या इतिहासातील दुसऱ्या क्रांतीमधेही रेल्वे, बंदरं, दळणवळणाच्या
४/२३
इतर सुविधा, शहरीकरण, तार सेवा, तसेच विविध शैक्षणिक संस्था आणि चांगल्या आरोग्य सुविधा या सर्व प्रथम आपल्या महाराष्ट्रातच आल्या.
भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत महाराष्ट्राचा वाटा हा अत्यंत मोठा आणि विस्मयकारक आहे.आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की
५/२३
याच तिसऱ्या क्रांतीतील महाराष्ट्राच्या कामगिरीमुळे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी बनली.
जगभरात मुंबईला स्वप्ननगरी आणि पैशांची खाण असलेले शहर ऊगीचच म्हणत नाहीत. आजमितीस भारतातील कोणताही मोठा ऊद्योगसमुह असो कि जागतिक दर्जाची महाकाय, नावाजलेली कंपनी त्यांना मुंबईत स्वत:चे
६/२३
कार्यालय ठेवावे लागते हिच आपणा सर्वांसाठी किती भूषणावह बाब आहे.
आता आपण संपुर्ण जगभरात होत असलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे पाहूया.आजमितीस जर चौफेर विचार केला तर औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचे वजन नक्कीच कमी होतेय. आपण आपल्या बलस्थानांपासून भरकटत चाललोय.अतिआत्मविश्वास
७/२३
तसेच जागतिक बदलांकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन सोडाच,देशातील इतर राज्य जे आपल्याशी स्पर्धा करताहेत, प्रगती करताहेत त्यांच्याकडेही आपले पुर्ण दुर्लक्ष स्पष्टपणे दिसतेय.विचार संकुचित आणि कृती आळसाकडे झुकत चालली आहे.
वर नमुद केल्याप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या निश्चितच
८/२३
प्रगत अन प्रगल्भ आहे परंतू आपल्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात विकेंद्रीकरणाला वाव आहे आणि त्यात सुधारणा करण्याची खुप गरज आहे. मुंबई,पुणे आणि इतर शहरांमधे जागेच्या किंमती अमाप वाढल्यामुळे बरेच उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले अन जाताहेत.
त्या उद्योगांशी बोलून त्यांना महाराष्ट्रातच
९/२३
विविध भागात,माफक दरात जागा तसेच सुरक्षा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच ज्या अतिरिक्त सवलती इतर राज्य देत आहेत त्या दिल्या तरी होत असलेली गळतीही रोखता येईल शिवाय बरेच नवे उद्योग राज्यात येतील.
पुणे मुंबई सारख्या शहरात फक्त कॅार्पोरेट ॲाफीसेस राहिली आणि इतर राज्यात कारखाने१०/२३
गेले तर पुढील दहाच वर्षात आपला बंगाल व्हायला वेळ लागणार नाही.
आजही आपण भारतातील इतर औद्योगिक ठिकाणी मग ते तामिळनाडू, कर्नाटक,आंध्रप्रदेश,राजस्थान, गोवा, हरियाणा,पंजाब तसेच पुर्वेकडील राज्यातील अनेक कंपन्यात गेलात तर मराठी सुशिक्षित लोक मोठ्या प्रमाणात उच्च पदांवर दिसतील.
११/२३
त्यांना पाहून नक्कीच आनंद होतो पण याची दुसरी बाजू म्हणजे यांना हल्ली बाहेर का पडावे लागतेय यावरही विचार व्हावा.माझ्या मते हा पण एक “ब्रेन ड्रेनचाच प्रकार” आहे.
कोविडनंतर जगभरात चौथ्या औद्योगिक क्रांतीची मोठी लाट येणार आहे.पुढील ५ वर्षात जगात प्रत्येक क्षेत्रात अमुलाग्र बदल
१२/२३
होणार आहेत.आपण एक राज्य म्हणून त्यावर खुप दूरदर्शीपणे काम करणे आवश्यक आहे.
पहिल्या तीन औद्योगिक क्रांत्यांमधे तसे आपण Receiving End लाच होतो. पण या चौथ्या क्रांतीमधे आपल्याला औद्योगिक क्षेत्रात जगात नाव कमवायची “न भूतो ना भविष्याती” अशी संधी आहे.आपल्याला पुढे यायचे असेल तर १३/२३
अजूनही वेळ गेली नाही,त्यासाठी आपल्या सरकारची,प्रशासनाची Priority ही Presentation च्या पलिकडे जायला हवी. प्रशासकीय पातळीवरील दिरंगाई आणि प्रत्येक उद्योजकाकडे चोराप्रमाणे पाहणे हा आजमितीस मोठा दुर्गुण आपल्या यंत्रणेला लागला आहे.
महाराष्ट्र हा नक्कीच या आंतरराष्ट्रीय घडामोडीत
१४/२३
जगात महत्वाची, निर्णायक भूमिका निभावू शकतो. जी “कल्पनाशक्ती, कौशल्याची अमाप संपदा असलेलं मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा असलेले मोठमोठे कारखाने या क्रांतीसाठी हवेत, ते सर्व महाराष्ट्रात असल्याने ही क्रांती आपल्या कवेत घेणे फार कठीण नाही.
महाराष्ट्र हे नेहमीच चांगल्या बदलांना
१५/२३
स्विकारत पुढे जाणारे राज्य आहे. या काळात Automation, Instrumentation, IOT, Blockchains, Robotics आणि Energy Conservation या प्रत्येक क्षेत्रात आपण प्रभुत्व गाजवू शकतो.
यासाठी आपल्याकडे अजून IIT सारख्या चांगल्या, आणि आंतरराष्ट्रीय उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था, तसेच
१६/२३
Skill Development वर खुप जोर द्यायला हवा. ITI आणि इतर नवे व्यावसायीक अभ्यासक्रम नव्याने सुरू व्हायला हवेत.
श्रेष्ठ आणि ऊत्कृष्ट कौशल्यांचे, उपजत बुद्धीमत्तेचे आणि सोबत प्रामाणिकपणे काम करण्याचे लेणं ही आपल्या मराठी मातीची ओळख आणि दागिना आहे. महाराष्ट्राने विविध औद्योगिक
१७/२३
तंत्रज्ञानाच्या विकासासाठी, विज्ञानातील नव्या शोधांसाठी अनोख्या अशा जागतिक पातळीवरील स्पर्धा भरावायला हव्या असे मला मनोमन वाटते. त्यातून जगभरातील बुद्धीमान लोक इकडे यावेत त्यांना ऐकून, पाहून आपल्या बऱ्याच मराठी तरुणांनाच्याही नवकल्पनांना धुमारे फुटतील आणि ती खरी एका नव्या
१८/२३
जागतिक महाराष्ट्राची नांदी ठरेल.
या माझ्या, तुमच्या, आपल्या महाराष्ट्राच्या मातृभूमीला जगातल्या सर्व बुद्धीवंतानी कर्मभूमी बनवावी. बुद्धीचे अभिसरण व्हावे. यात मी मुद्दामहून मराठी, अमराठी उद्योग असा भेदाभेद करणार नाही. आपले स्वप्न जेंव्हा जागतिक स्तरावर जायचे असते तेंव्हा
१९/२३
सर्वसमावेशक विचार घेऊनच पुढे जायला हवे.
महाराष्ट्र सरकारने भूमिपुत्रांसाठी काही विशेष सवलती दिल्या तर याचा अत्यानंदच होईल यामुळे मराठी ऊद्योजकही जगाच्या पटलावर जातील. दुसरे अत्यंत महत्वाचे म्हणजे इथल्या मुजोर अधिकाऱ्यांना सौजन्याचे प्रशिक्षण मात्र अग्रक्रमाने देण्यात यावे,
२०/२३
वेळोवेळी त्यांच्या कामाचे आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मुल्यमापन केले जावे.
यापुर्वी या महाराष्ट्रात जन्मल्याचा, इथल्या मातीत वाढल्याचा, शिकल्याचा अभिमान होताच पण आता हीच “कर्मभूमी” म्हणून निवडल्याचा सार्थ “अभिमान” आयुष्यभर राहिल.
आपल्याला औद्योगिक क्षेत्रात खुप पुढे जायचेय
२१/२३
जग जिंकायचेय.
महाराष्ट्र एक दिवस औद्योगिक क्षेत्रात जगात अग्रेसर असेल असा घडवू आणि सर्व मिळून प्रगती करू.
भविष्यात येणाऱ्या संधी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आपल्याकडील प्रत्येक इंडस्ट्रीवर होणारे परिणाम याविषयी येणाऱ्या काळात लेखन आणि विचारमंथन करणे क्रमप्राप्तच आहे.
२२/२३
स्वप्न पाहणे आणि त्या स्वप्नांच्या मागे झपाटल्या सारखे लागणे हा या मातीने आपल्याला दिलेला मोठा आशिर्वाद आहे.
आजमितीस महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरी आपण महाराष्ट्राच्या बाजूलाच ऊभे रहायला हवे. हाच महाराष्ट्रधर्म आहे.
या देशावर अन महाराष्ट्रावर आतोनात प्रेम आहे म्हणूनच ही मातृभूमी “कर्मभूमी” म्हणून निवडलीये.
आज राज्यसरकार लस मोफत
१/९
प्रत्येक सुज्ञ नागरिकाला हे कळतेय की आज सरकारची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. परंतु या अवस्थेतही लोकांचे जीव अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम ऊपाय आहे.
सरकारच्या या निर्णयाचे फक्त टाळ्या वाजवून स्वागत करण्यापेक्षा त्यांना
२/९
आपल्याला जी शक्य असेल ती आर्थिक मदत “ऐच्छिक” स्वरुपात देणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजतो.
जर आपल्या मदतीने कोणाचे प्राण वाचणार असतील तर त्यासारखे दुसरे पुण्यकर्म कोणतेही नाही.
खरतर मी अशा केलेल्या मदतीचा बाजार मांडत नाही,परंतु काही सहृदयी मित्रांच्या आग्रहामुळे व्यक्त झालोय.
३/९
त्यांना साथ देणारे नकली पत्रकार, सुट्टीवरील न्यायव्यवस्था आणि नाकर्ते प्रशासन याला जेवढे कारणीभूत आहेत तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त आपली “बेशिस्त” जनता याला कारणीभूत आहे. (या प्रत्येकात अगदी काही अपवाद आहेत, त्यांची मी क्षमा मागतो)
पण वस्तुस्थिती ही आहे की प्रत्येक
२/१२
क्षेत्रात, ऊद्योग असो, खाजगी वा सरकारी नोकरी असो वा घरगुती वा लघु ऊद्योग असो आपल्याला नियम आणि कायदे वाकवायची, मोडायची भितीच वाटत नाही, आणिबाणीच्या, महामारीच्या काळातही कोणी कायद्याला किंमत देईना.
एकंदर अघळपघळपणा आणि “चलता है” ॲटिट्यूड आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलाय.
३/१२
मग ठरल्याप्रमाणे लस्सी घेतली,अजून काही पार्सल घेतले आणि एकदम खुशीत गाडीकडे आलो. कार चालू केली आणि निघणार एवढ्यात काचेवर टकटक झाली, मी एकदम दचकलो, बाहेर पाहिले तर वयस्कर काका मला काच खाली घ्यायला सांगत होते, मी काच खाली घेऊन त्यांना “काय झालं?” असं विचारणार एवढ्यात त्यांनीच
२/१२
“टायर पंक्चर झालाय,तो पहा म्हणून मला हाताने टायरकडे बोट दाखवले. मी ताबडतोप गाडीतून उतरलो आणि कपाळावरच हात मारला, टायर पुर्णच फ्लॅट/ अगदी सपाट.
मला घामच फुटला,गाडी चालवायला तर येत होती पण ही पंक्चरची भानगड नवीच होती.
माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि घाम पाहून, काकांनी विचारले
३/१२
परेशभाई (नाव बदललेय),माझ्यापेक्षा १०/१२ वर्षांनी मोठे. माझा परिचय झाला साधारणपणे १७/१८ वर्षांपूर्वी, त्यांच्या काही हिटींग प्रोसेसमधे त्यांना नवे बदल करायचे होते म्हणून कंपनीने मला एनर्जी ॲाडीट करण्यासाठी त्यांच्याकडे पाठविले. #SaturdayThread#आर्थिकसाक्षरता#सत्यकथा#मराठी १/१८
त्यांचा स्वभाव अत्यंत बोलका आणि हरहुन्नरी. नॅानटेक्निकल असले तरी प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने लक्ष देणार.
परेशभाईंचा मुंबईतील सुखवस्तू गुजराती कुटूंबात जन्म, हायस्कूलपासून शिक्षण करतच वडीलांच्या किरानामालाच्या दुकानात धंदा करायला शिकले. पुढे नियामाप्रमाणे बी.कॅाम केलं आणि
२/१८
एखाद दोन वर्षात स्वत:चा फॅब्रिकेशनचा छोटासा गाळा घेऊन काम सूरू केलं.व्यवसाय वाढविताना मोठ्या कंपन्यासोबत ज्या ओळखी झाल्या त्याचा पुरेपुर वापर करत त्यांचे व्हेंडर झाले. समाजाकडून बिनव्याजी आर्थिक मदत घेतली. वडिलांचे दुकानही सुरूच होते आणि त्यामुळे इकडे चांगला जम बसविला.
३/१८
माझ्या आयुष्यातील कॅार्पोरेट करियर मधील तो सुवर्णकाळ होता. भारलेले, झपाटलेले दिवस. वयाच्या अत्यंत कमी टप्प्यात २४/२५ व्या वर्षीच मला थरमॅक्ससारख्या प्रतिथयश,संपुर्णपणे भारतीय मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर पदाची संधी मिळाली होती. सतत #SaturdayThread#BusinessDots#मराठी#सत्यकथा १/१८
काम,नवीन शिकण्याची आस त्यामुळे सतत दौरे आणि मिटींगा चालू असायच्या.
त्या काळात मी बॉयलर्स आणि औष्णिक ऊर्जा विभागात आंतरराष्ट्रीय सल्लागार (जे बऱ्याच कारखान्यांना इंजिनियरींग सर्विसेस देतात) हे डिपार्टमेंट पहायचो. औष्णिक तंत्रज्ञान आणि इंधनाचे ज्वलन हा माझा आवडीचा विषय त्यात
२/१८
वायुरूप इंधनाची भारतातील जवळजवळ प्रत्येक केस माझ्या नजरेखालून जायचीच.
एक दिवस संध्याकाळी घरी जायच्या तयारीत असताना मोबाईल वाजला आणि पलीकडून ऊद्या सकाळी १० वाजता दिल्लीत मिटींगसाठी हजर व्हा असा निरोप मिळाला.
ही अत्यंत प्रतिष्ठेच्या कंपनीसाठीची किक ॲाफ मिटींग होती आणि जर
३/१८
२००९ हा आयुष्यातील तोपर्यंतचा अत्यंत कठीण आणि भावनिकदृष्ट्या कधीही न विसरता येणारा काळ होता.
बाबांना दोनवेळा हृदयविकाराचा झटका आणि पुढे मेंदूचे ऑपरेशन,त्याचवेळी भावाचा मोटारसायकलवरून पडून अपघात आणि पाय फ्रॅक्चर,माझ्या एका पायात #SaturdayThread#BusinessDots#मराठी#सत्यकथा १/१८
साईटवर दगड घुसल्याने पाय सुजलेला तर कंपनीत प्रचंड गोंधळ...
नवा व्यवसाय,प्रस्थापितांच्या समोर फक्त तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान एवढेच काय ते आमचे भांडवल. बरं त्यात आमची सर्व टिम १९/२२ वयोगटातली,प्रचंड मेहनती,कष्टाळू पण आम्हा सर्वांकडेच तशी बऱ्याच इतर गोष्टींची, अनुभवाची कमतरता
२/१८
होती. त्यात कौंटूबिक पातळीवर प्रचंड संकटाची मालिका.
कोणत्याही कंपनीत सेल्स जेवढे महत्वाचे तेवढेच परचेसही. मला तर सर्वच आघाड्यांवर पळावे लागायचे, आमच्याकडे त्याकाळी बरेचशे व्हेंडर नवे होते. (आज तेच आमचे ७०% हून जास्त व्हेंडर आहेत जे आता १४ वर्षापासून आम्हाला सेवा देताहेत)
३/१८