तेवढ्यात अचानक केबिनचा दरवाजा उघडून एक सहकारी आत आला आणि म्हणाला की माझा एक अत्यंत महत्वाचा व्हीडीओ कॅाल चालू आहे आणि तो बराच वेळ चालणार आहे.
आता ट्रेनी इंजिनियर पदासाठी एक मुलगा इंटरव्हूवला आलाय.
खरतर त्याला सकाळची वेळ दिली होती पण कदाचित प्रवासाचे कोणतेच साधन उपलब्ध
२/१४
न झाल्याने तो उशीरा आलाय आणि आता कोविडकाळात इतका वेळ त्याला बसवून ठेवणे योग्य नाही. तुम्हाला वेळ असेल तर त्याला भेटता का?
मी तसाही निवांतच होतो आणि बरेच दिवस असा इंटरव्हूव घेतला नव्हता, तसं माझ्यासाठीच ती संधी वाटली आणि लगेच त्या मुलाला आत पाठवून द्यायला सांगितले.
३/१४
तो मुलगाही पाचएक मिनिटात दरवाजा उघडून आत आला, नीटनेटका पोशाख, हातात चांगली बॅग, शुज पॅालिश्ड, चकाचक होऊन इंटरव्हूला आलेला दिसला.
माझी परवानगी घेऊन समोर बसला.
मी तेवढ्या वेळात आमची नक्की काय requirement आहे ती पाहिली, आम्हाला प्रोजेक्टसाठी काही ट्रेनी इंजिनियर हवे होते.
४/१४
मग मी त्याला पहिलाच प्रश्न विचारला - “What is stoichiometric ratio?” त्यावर तो गालातल्या गालात हसला (मला वाटलं मी फारच सोपा प्रश्न विचारला कारण हे एकदमच बेसिक होत) तर तो हसून मला मराठी मिश्रित हिंदीत म्हणे - “यह मैंने कॉलेज मे सुना है, लेकीन अब एक्झॅक्ट याद नही आ रहा है!”
५/१४
मग मी दुसरा प्रश्न विचारला - “Do u know what is calorific value means?” तो कावराबावरा होऊन सिलिंगकडे पहायला लागला, मी पण आश्चर्याने वर पाहिले, त्याला विचारले - काय आहे वर?
तो पुन्हा तसाच हसला - फारच विचित्र ऊत्तर दिले त्याचा आणि त्या व्याख्येचा दुरान्वयेही संबंध नव्हता.
६/१४
मग त्याला अजून ५/६ बेसिक इंजिनियरींगचे प्रश्न विचारले, एकाही प्रश्नाचे त्याला धड उत्तर देता आले नाही.
त्याच्या इंग्रजीचीही बोंब लक्षात आली, मग मीच मराठीत संवाद सुरू केला.
शेवटी-शेवटी मला त्याच्या शैक्षणिक पात्रतेवरच शंका आली, पुन्हा बायोडेटा पाहिला, मुलगा तर खरच BE(Mech)
७/१४
होता. मग मी त्यात त्याच्या आवडी पाहिल्या.
यात त्याने Hobbies -Reading Books लिहीले होते.
त्यावर मी त्याला विचारले आता कोणते पुस्तक वाचतोय ?
म्हणे - मृत्युंजय!
मी विचारले - कोण लेखक आहेत?
तो - पुन्हा सिलिंग कडे पाहून, आता हलकेच नजर चोरून म्हणाला - “नक्की आठवत नाही सर.”
८/१४
मी चेहरा निर्विकार ठेऊन त्याला विचारले - तुला कॅालेजमधे काय सर्वात जास्त आवडायचे?
पोरगा या प्रश्नावर जो खुलला - तसा घडा घडा बोलायला लागला, म्हणे मला इव्हेंट, गॅदरिंग, वेगवेगळे सण, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कार्यक्रम घ्यायला, उत्सव साजरे करायला फार आवडायचे, आमच्या कॅालेजमधे
९/१४
सलग दोन वर्ष मी हे केलेय. माझे CommunicationSkills यामुळे खुप चांगले डेव्हलप झालेय,मी त्यामुळे धीट झालोय. मला कंप्युटरही चांगला येतो. मी PPT पण खुप चांगल्या बनवतो.
गडी थांबायलाच तयार नव्हता.
शेवटी मीच त्याला मधे थांबवून विचारले, तुला इथे कोणत्या डिपार्टमेण्टमधे काम करायची
१०/१४
इच्छा आहे ?
तर तो म्हणे - डिझाईन मिळाले तर फार बरे होईल!
मी - 🤦♂️🤦♂️🤦♂️🤯🤯🤯🤯🤯 मनातल्या मनात कपाळावर हात मारला, माझचं डोकं दोन्ही हातांनी धरलं, स्वत:लाच समजावलं आणि त्याला शांतपणे त्याच जागेवरच सांगितले -
“तुम्ही जावू शकता. आमच्याकडे तुमच्यासाठी कोणतीही जागा नाही.”
११/१४
माझी तरूण मित्रांना विनंती आहे - कोणत्याही कंपनीला एक फ्रेशर इंजिनियरकडून फार मोठ्या ज्ञानाच्या अपेक्षा नसतात, अगदी तुमच्याकडून १ रूपयाचे उत्पन्नही अपेक्षित नसते पण निदान ज्या बेसिक गोष्टी आपण शिकलो त्याची ऊत्तरे यायला हवीत.
मुलाखतीतल्या प्रश्नांना कशी उत्तर द्यावीत याचे
१२/१४
मुलभूत ज्ञान हवे. इंग्रजी भाषेचे ज्ञान “आवश्यकच” आहे.ते शिकायलाच हवे. बाकी तुम्ही आवडी म्हणून लिहीता त्या तरी निदान खऱ्या लिहा. तुमची ध्येय आणि त्याबद्दलचे ज्ञान याची काहीतरी सांगड हवी.
तुम्हीच तुमच्या आयुष्याचा असा विनोद केला तर त्या बिचाऱ्या आईवडीलांनी कोणाच्या तोंडाकडे
१३/१४
पहायचे. तुमच्या करियरविषयी आईबाबा किती काळजी करत असतील याची जाणीव ठेवायला हवी.
तुम्हीच गंभीर नसाल तर, कोणतीही कंपनी तुमच्यासाठी गंभीरपणे विचार करणार नाही.
या लेखाचे फक्त वाचन न होता त्यावर चर्चा व्हावी, त्यातल्या सूचनांवर योग्य पातळीवर विचार व्हावा,त्यासाठी तुमची मदत झाली तर मनापासून आनंद असेल.
आपण दिलेल्या प्रेम आणि आदराबद्दल मनापासून आभार! #सकाळ परिवाराचे आज विशेष आभार हा लेख सर्वदूर पोहचविण्यासाठी!
१/२३ #SundayThread#शिवमोहर
महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची समाज सुधारकांची, बुद्धीवंतांची तसेच फक्त भारतालाच काय पण जगाला नवी दिशा देणाऱ्या आणि आपल्या देशाची कित्येक आघाड्यांवर ओळख करून देणाऱ्या महामानवांची समृद्ध भूमी आहे.
त्यांच्या कर्तृत्वाची “शिवमोहर” लखलखीत पणे सर्वत्र चमकते आहे.
२/२३
बऱ्याचदा मराठी माणसं आपण औद्योगिक क्षेत्रात थोडे मागे आहोत असे सर्रास बोलतात पण मला ते अजिबात मान्य नाही.गेल्या 20/25 वर्षात खुप बदल झालाय आणि तो अत्यंत सकारात्मक आहे.
खरंतर महाराष्ट्र ही जागतिक औद्योगिक विकासाची गेल्या २५० वर्षाहून जास्त काळ परंपरा असलेली भूमी आहे.
३/२३
आजमितीस महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरी आपण महाराष्ट्राच्या बाजूलाच ऊभे रहायला हवे. हाच महाराष्ट्रधर्म आहे.
या देशावर अन महाराष्ट्रावर आतोनात प्रेम आहे म्हणूनच ही मातृभूमी “कर्मभूमी” म्हणून निवडलीये.
आज राज्यसरकार लस मोफत
१/९
प्रत्येक सुज्ञ नागरिकाला हे कळतेय की आज सरकारची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. परंतु या अवस्थेतही लोकांचे जीव अत्यंत महत्वाचे असून त्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम ऊपाय आहे.
सरकारच्या या निर्णयाचे फक्त टाळ्या वाजवून स्वागत करण्यापेक्षा त्यांना
२/९
आपल्याला जी शक्य असेल ती आर्थिक मदत “ऐच्छिक” स्वरुपात देणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजतो.
जर आपल्या मदतीने कोणाचे प्राण वाचणार असतील तर त्यासारखे दुसरे पुण्यकर्म कोणतेही नाही.
खरतर मी अशा केलेल्या मदतीचा बाजार मांडत नाही,परंतु काही सहृदयी मित्रांच्या आग्रहामुळे व्यक्त झालोय.
३/९
त्यांना साथ देणारे नकली पत्रकार, सुट्टीवरील न्यायव्यवस्था आणि नाकर्ते प्रशासन याला जेवढे कारणीभूत आहेत तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त आपली “बेशिस्त” जनता याला कारणीभूत आहे. (या प्रत्येकात अगदी काही अपवाद आहेत, त्यांची मी क्षमा मागतो)
पण वस्तुस्थिती ही आहे की प्रत्येक
२/१२
क्षेत्रात, ऊद्योग असो, खाजगी वा सरकारी नोकरी असो वा घरगुती वा लघु ऊद्योग असो आपल्याला नियम आणि कायदे वाकवायची, मोडायची भितीच वाटत नाही, आणिबाणीच्या, महामारीच्या काळातही कोणी कायद्याला किंमत देईना.
एकंदर अघळपघळपणा आणि “चलता है” ॲटिट्यूड आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक बनलाय.
३/१२
मग ठरल्याप्रमाणे लस्सी घेतली,अजून काही पार्सल घेतले आणि एकदम खुशीत गाडीकडे आलो. कार चालू केली आणि निघणार एवढ्यात काचेवर टकटक झाली, मी एकदम दचकलो, बाहेर पाहिले तर वयस्कर काका मला काच खाली घ्यायला सांगत होते, मी काच खाली घेऊन त्यांना “काय झालं?” असं विचारणार एवढ्यात त्यांनीच
२/१२
“टायर पंक्चर झालाय,तो पहा म्हणून मला हाताने टायरकडे बोट दाखवले. मी ताबडतोप गाडीतून उतरलो आणि कपाळावरच हात मारला, टायर पुर्णच फ्लॅट/ अगदी सपाट.
मला घामच फुटला,गाडी चालवायला तर येत होती पण ही पंक्चरची भानगड नवीच होती.
माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि घाम पाहून, काकांनी विचारले
३/१२
परेशभाई (नाव बदललेय),माझ्यापेक्षा १०/१२ वर्षांनी मोठे. माझा परिचय झाला साधारणपणे १७/१८ वर्षांपूर्वी, त्यांच्या काही हिटींग प्रोसेसमधे त्यांना नवे बदल करायचे होते म्हणून कंपनीने मला एनर्जी ॲाडीट करण्यासाठी त्यांच्याकडे पाठविले. #SaturdayThread#आर्थिकसाक्षरता#सत्यकथा#मराठी १/१८
त्यांचा स्वभाव अत्यंत बोलका आणि हरहुन्नरी. नॅानटेक्निकल असले तरी प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने लक्ष देणार.
परेशभाईंचा मुंबईतील सुखवस्तू गुजराती कुटूंबात जन्म, हायस्कूलपासून शिक्षण करतच वडीलांच्या किरानामालाच्या दुकानात धंदा करायला शिकले. पुढे नियामाप्रमाणे बी.कॅाम केलं आणि
२/१८
एखाद दोन वर्षात स्वत:चा फॅब्रिकेशनचा छोटासा गाळा घेऊन काम सूरू केलं.व्यवसाय वाढविताना मोठ्या कंपन्यासोबत ज्या ओळखी झाल्या त्याचा पुरेपुर वापर करत त्यांचे व्हेंडर झाले. समाजाकडून बिनव्याजी आर्थिक मदत घेतली. वडिलांचे दुकानही सुरूच होते आणि त्यामुळे इकडे चांगला जम बसविला.
३/१८
माझ्या आयुष्यातील कॅार्पोरेट करियर मधील तो सुवर्णकाळ होता. भारलेले, झपाटलेले दिवस. वयाच्या अत्यंत कमी टप्प्यात २४/२५ व्या वर्षीच मला थरमॅक्ससारख्या प्रतिथयश,संपुर्णपणे भारतीय मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर पदाची संधी मिळाली होती. सतत #SaturdayThread#BusinessDots#मराठी#सत्यकथा १/१८
काम,नवीन शिकण्याची आस त्यामुळे सतत दौरे आणि मिटींगा चालू असायच्या.
त्या काळात मी बॉयलर्स आणि औष्णिक ऊर्जा विभागात आंतरराष्ट्रीय सल्लागार (जे बऱ्याच कारखान्यांना इंजिनियरींग सर्विसेस देतात) हे डिपार्टमेंट पहायचो. औष्णिक तंत्रज्ञान आणि इंधनाचे ज्वलन हा माझा आवडीचा विषय त्यात
२/१८
वायुरूप इंधनाची भारतातील जवळजवळ प्रत्येक केस माझ्या नजरेखालून जायचीच.
एक दिवस संध्याकाळी घरी जायच्या तयारीत असताना मोबाईल वाजला आणि पलीकडून ऊद्या सकाळी १० वाजता दिल्लीत मिटींगसाठी हजर व्हा असा निरोप मिळाला.
ही अत्यंत प्रतिष्ठेच्या कंपनीसाठीची किक ॲाफ मिटींग होती आणि जर
३/१८