#गुंतवणूक कराच!
तर... मागे म्हंटल्याप्रमाणे मंदी काही सांगून येत नसते. ती अचानकच येत असते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. काही अंशी अंदाज होताच पण एका सत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पडझड होईल असं कोणीच गृहीत धरून चाललं नव्हतं.
👇👇👇
19 डिसेंबरला सांगितलं होतंच की "मंदीची लाट" येण्यासाठी काय निमित्तमात्र ठरू शकेल. पडझड सुरू झाली आहे आणि काही काळ ती सुरू राहील असा अंदाज आहेच. इतके दिवस करेक्शनची वाट पाहणारे आजच्या बाजारातील रक्तपात बघून घाबरले असतील. पण खरं सांगायचं झालं तर हीच संधी आहे!
👇👇👇
माझ्या वैयक्तिक पातळीवर मी माझं मत व्यक्त करतो. उद्यापासूनच शेअर्स खरेदी करायची आहे हे सर्वात महत्वाचं. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे "चांगले शेअर्स" खरेदी करायचे. सर्वात आधी विविध सेक्टरमध्ये शोधून चांगल्या शेअर्सची यादी ठरवा.
👇👇👇
त्या शेअर्सला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी घ्यायचं आहे हे निश्चित करा. सध्या जवळचा विचार करता FMCG आणि Pharma सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग आहेत. त्यानंतर पुढील वर्षाचा विचार केला तर Auto अन Tourism उत्तम राहतील असं माझं वैयक्तिक मत आहे.
👇👇👇
बाकी सेक्टरमध्ये सुध्दा गुंतवणूक करायचीच आहे पण ती थोडी सावकाशपणे!
उद्यापासून काय करायचं.?
कोणाचं काही ऐकत बसू नका. बाजार पडेल किंवा वाढेल हे निश्चितपणे कोणीही सांगू शकत नसतं. मग तुम्ही निवडलेल्या शेअर्सच्या यादीतील प्रत्येक शेअरला उद्यापासून थोडं-थोडं Buy करा.
👇👇👇
थोडं म्हणजे किती.? तर तुम्हाला जी काही गुंतवणूक करायची आहे त्याच्या तुलनेत हे प्रमाण ठरवा. मुख्यतः Quantity चा नाही तर Valuation चा विचार करा. म्हणजे काय तर प्रत्येकाचे 300₹ चे शेअर्स घ्यायचे असं ठरवा.
👇👇👇
मग त्यात किती Quantity येतील ते बघा आणि एक दोन दिवसाआड ते शेअर्स (आपल्या पाकिटाला झेपेल इतकंच) घेत रहा. फक्त उदाहरण म्हणून सांगतो, या कसला गुंतवणूक सल्ला समजून हेच शेअर्स घ्या असं नाही सांगत.
👇👇👇
तर ऑटो सेक्टरमध्ये असलेला Tata Motor चे 2 शेअर्स घ्या. FMCG मधील Dabur चा एकच शेअर घ्या. PSU बँक मधील SBI चे 2 शेअर्स येतील. Hdfc Amc चा आठवड्यात एखादा शेअर येईल. Bajaj Finserv चा एखादाच येईल. Wipro चे 2 येतील. Hindalco चे 2 येतील. Tata Chemical चा एक येईल.
👇👇👇
विनाकारण एकरकमी गुंतवणूक करून अडकून राहू नका. सावकाशपणे आपण निवडलेले शेअर्स एक-दोन (किंवा तुमची गुंतवणूक मोठी असेल तर त्याप्रमाणे) शेअर्स घेत रहा. यालाच SIP म्हणता येईल. यामुळे बाजार पडणार की वाढणार याची चिंता करायची गरज नाही.
👇👇👇
वेगवेगळ्या रेटला शेअर्स येत राहतील आणि उत्तम पोर्टफोलिओ बनेल. फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प असतो त्यावेळेस बाजाराचा मूड सुधारलेला असू शकतो. गुंतवणूक करण्याची योग्य संधी ही नेहमीच असते!
आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं झाल्यास, उगा गडबड करू नका रे, समद्याली खायले मिळल!
✍🏻 अभिषेक बुचके
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#कोरोना_वायरस मुळे भारतात “Work From Home” हा मार्ग अवलंबला जात आहे. या निमित्तानेच आपण शेअर बाजारातील मूलभूत संकल्पना घरबसल्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी काही लेख मी या थ्रेडमधून पोस्ट करत आहे. फार विचार न करता पेपरमधील लेख निवांतपणे वाचतो तसे हे लेख वाचा. #Thread
येस बँक का बुडाली?
वाचा #thread
बँका का बुडतात हा एक महत्वाचा प्रश्न आहे। त्याआधी बँका काम कशा करतात हा मुद्दा जाणून घेऊयात!
कुठल्याही व्यवसायात काहीतरी भांडवल, रॉ प्रॉडक्ट म्हणजे वस्तू किंवा सर्विस असते। बँकेकडे "पैसा" हेच भांडवल आणि पैसा हेच रॉ मटेरियल आहे। #मराठी_गुंतवणूकदार
बँकेकडे ग्राहक (सामान्य ग्राहक व संस्था) पैसे ठेवतात अन त्या ठेवींवर त्यांना व्याज मिळतं। साधारणपणे FD (Fixed Deposits) वर ते 7% वगैरे असतं आणि बचत खात्यावर 4% वगैरे असतं। यात काही अंशी कमी जास्तही असेल।
दुसरा भाग असतो कर्जाचा। बँकेकडून कर्ज घेणारे असतात। त्यात सामन्य ग्राहक, शेतकरी, उद्योजक ते अगदी मोबाईल घेण्यासाठीही कर्ज दिलं जातं। त्याच्यावर व्याज आकारला जातो। तो वेगवेगळा असतो। पण सरासरी तो 10% च्या अधिक असतो।