हटयोगशास्त्री, आंदोलनजीवी, उद्योगपती, अतिमहापरमपूज्य #बाबा_रंगदेव यांची मुलाखत
बाबाजींना अनेक दिवसांपासून मुलाखतीकरिता वेळ मागत होतो पण बाबाजी इतके व्यस्त की त्यांना आम्हाला मुलाखत देण्यासाठी वेळच मिळत नव्हता
अखेर तो योग आलाच
आम्ही बाबाजींच्या आश्रमात पोहोचलो तेंव्हा बाबाजी योगासने करण्यात व्यस्त होते. बाबाजींच्या शिष्याने आम्ही आल्याची खबर दिली आणि आम्हास बाजूच्या कुटीत बसविण्याची व्यवस्था केली
बाबाजींना तब्बेत पाणी विचारणे म्हणजे, साक्षात देवास त्याचे अस्तित्व विचारण्यासारखे होईल म्हणून आम्ही तो विषय टाळला
आम्ही-उद्योग पाणी कसं चाललंय बाबाजी?
बाबाजी - कोरोनामुळे थोडा फटका बसला, पण आयुर्वेदामुळे टिकून आहोत
कोरोना वरून आठवलं म्हणून आम्ही विचारलं-पण ते कोरोनाची लस आपण बनविणार होते ?
प्रत्येक वेळी आपल्यालाच श्रेय नको म्हणून आम्हीच लसीचे सूत्र शिरम वाल्यांना देऊन टाकलं
आम्ही-काय ते
औदार्य!!
आम्ही - काही नवीन उत्पादनं येणार आहेत असं ऐकलं आम्ही
बाबाजी(आपल्या चिरपरिचित लकबीने हसत बोलले)- हो , महाराष्ट्रातील गाय छाप वाल्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही तंबाखूयुक्त टूथपेस्ट बनविणार आहोत, म्हणजे त्यांचा सकाळचा प्रश्न सुटेल आणि तंबाखूच व्यसन पण.
आणि ब्रश केल्यावर ती
गिळून टाकली की नाश्ता करण्याचीही गरज राहणार नाही
व्वा.... आमच्या तोंडून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलं
बाबाजी पुढे बोलले-असा साबण बनविणार आहोत की ज्याच्यात लिपस्टिक, मेकअप साहित्याचे गुणधर्म, हेअर डाय, हेअर ऑइल सर्व असेल म्हणजे युवतींना अंघोळ केली की मेकअप मध्ये वेळ घालवण्याची गरजच
राहणार नाही
काय मस्त आयडिया आहेत बाबाजींच्या, आम्ही मनोमन आश्चर्यचकित झालो
बाबाजी पुढे बोलले- आता आयुर्वेदिक मोटरगाडी बनविण्याचा आमचा विचार आहे.
आयुर्वेदिक कार? आम्ही जागच्या जागी उडालो
बाबाजी-हो हो आयुर्वेदिक मोटरगाडी, जी आयुर्वेदिक तेलावर चालेल आणि कार्बन ऐवजी ऑक्सिजन
हवेत सोडेल
आता आश्चर्याने भोवळ यायला लागली म्हणून विषय बदलण्यासाठी आम्ही विचारले
बरं बाबाजी काही वर्षांपासून आपली आंदोलने बंदच झालीत
बाबाजीनी एक डोळा मिटत आम्हालाच प्रतिप्रश्न केला- राम राज्यात आंदोलनाची गरजच काय ?
हो तेही खरेच, आम्ही बोललो
आम्ही सहजच विचारले- गांधीजी आणि तुमच्यात खूपच साम्य आहे, तेही अंगावर एकच वस्त्र परिधान करायचे आणि आपणही एकच वस्त्र परिधान करता
बाबाजी - पण त्यात विचारांचा फरक आहे
आम्ही - कसा?
बाबाजी- संपूर्ण देशातील जनतेला अंगभर वस्त्रे मिळणार नाहीत तोपर्यंत असेच राहणार हा गांधीजींचा निश्चय
होता
आणि देशातील संपूर्ण जनता आमच्यासारखी एका वस्त्रावर येणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे उद्योग असेच सुरू ठेवणार,
हा आमचा निश्चय आहे
हा हा हा हसत बाबाजी उठले
मुलाखतीची वेळ संपली होती
आम्ही कृतकृत्य होऊन बाहेर पडलो #तिरकस #काल्पनिक
कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही 🙏
कथा #स्टूल_खरेदीची
तालुक्याच्या ठिकाणी एका कार्यालयात निकाली काढलेल्या , जुन्या झालेल्या फाईल्स चे गठ्ठे उंचावरील छपडी वर ठेवण्यासाठी स्टूल खरेदी करावयाचा होता
अर्थातच वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं.
सायबाच्या सहीनं स्टूल खरीदेची परवानगी मागणारं पत्र गेलं
काही दिवसांनी वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र आलं
'आपले पत्र मिळाले परंतु स्टुलाची उंची किती हे पत्रात नमूद नाही'
स्टुलाची उंची नमूद करून वरिष्ठ कार्यालयाला पत्र गेलं
काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं
'स्टुलाची उंची तर नमूद आहे, परंतु स्टूल लाकडी, प्लास्टिक अथवा फायबर चा ? याचा
उल्लेख नाही '
पुन्हा स्टुलाची , लाकडी स्टूल खरेदी करावयाच पत्र गेलं
वरिष्ठ कार्यालयाकडून काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं
'स्टूल चार पायाचा खरेदी करणार की तीन पायाचा ? हे पत्रात नमूद नाही'
पुन्हा वरिष्ठ कार्यालयास पत्र गेलं , चार पायाच्या स्टूल खरेदीस परवानगी
मामा गावचे ग्रामपंचायत सदस्य (माजी सरपंच) आणि मामी तालुक्याच्या ठिकाणी बँकेत चेअरमन. तसे यावेळी पण मामाच सरपंच होणार होते , प्रचारावेळी सारखे म्हणायचे 'मीच हुनार' 'परत मीच हुनार' पण काय होणार हे सांगायला ते विसरले
पॅनल थोडक्यात गेलं, तरीपण मामांनी वरच्या आळीच्या 'दादा बारापटे' ना फोडून आपल्या पॅनल मध्ये सामील केलं पण दादांनी ऐनवेळी दगा दिला आणि मामा 'माजीच'राहिले.
तर असं हे सगळं सुरळीतच चाललं होतं.
मामी चेअरमन आहेतच पण मामींना आणखी एक जबरदस्त शौक-"गाण्याचा".
गावातल्या इतर बायांच्या अंगात देव्या येतात मामींच्या अंगात मात्र वर्षातून कमीतकमी चार-पाचदा 'गाणं येतं'
आणि अंगात गाणं कधी येणार हे मामा आणि मामींना बरोब्बर माहिती असतं