माझी अम्ब्रेला काढ बर!! तसे सहायकाने तज्ञांचे डोक्यावर छत्री धरली
तज्ञांनी सोबतच्या एका तरुण मुलाला विचारलं आज-काल गव्हर्मेंट इतक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देतं ,तरीही शेती का फायद्यात येत नसेल बरं?
असं बोलता बोलता रस्त्यावरील एका खड्ड्यात पाय पडून तज्ञ पडता पडता वाचले, त्या तरुण मुलाला उत्तर देण्याची गरजच भासली नाहि
असं गप्पागोष्टी करत तज्ञ ,सहाय्यका सह बांधावर पोहोचले
शेतात आबा, त्यांची दोन मुलं आणि शेतमजूर काम करत होते आबांच्या धाकट्या मुलानं बांधावरुन आवाज दिला तसे आबा लगबगीनं बांधावर आले ,
मुलांनं शेती तज्ञांची ओळख करून दिली
शेती तज्ञांनी आजूबाजूला नजर फिरवत म्हटलं ट्रॅडिशनल फार्मिंग मध्ये काहीच नाही ठेवलं हो आता, ट्रॅडिशनल फार्मिंग सोडा
आमच्यासारखं कुंडीतली, पाण्यातली आणि हवेतली शेती करा.
बघा फायदाच फायदा आहे आबांनी मनातल्या मनात म्हटलं ,
(एकतर गांजा पिऊन असणार किंवा गांजाची शेती करत असणार!!)
तज्ञ- तिकडे ऑस्ट्रेलिया ,अमेरिका, इंग्लंडमध्ये कॉर्पोरेट शेती केली जाते आपण अजूनही ट्रॅडिशनल फार्मिंग मध्ये गुंतून आहोत
असं बोलत बोलत तज्ञांनी ट्विटर वर दोन-तीन लोकांना सल्ले पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु मोबाईल ला रेंज नसल्यामुळे काहीच फायदा झाला नाही
तज्ञ वैतागून बोलले- व्हॉट द ** इज दिस ?
सहाय्यक बोलला - सर इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग असेल तर मोबाईल ला रेंज असायलाच पाहिजे!!
तज्ञ बाबांना बोलले -गव्हर्मेंट इतकी सबसिडी देतं, अवकाळी पाऊस, पूर दुष्काळ पडला की शेतकऱ्याची मदत करतं तरी शेती फायद्याची का होत नसेल बरं ?
आबा बोलले, आपण कपड्याच्या दुकानात गेलो तर भाव कोण ठरवतं?
तज्ञ बोलले अर्थात शॉपचा मालक,
आबा बोलले आपण सोने खरेदी करायला गेलो तर सोन्याचा
भाव कोण ठरवतो?
तज्ञ बोलले-दुकानदार
आबा बोलले- शेतकऱ्यांच्या मालाचा भाव कोण ठरवतो?
तज्ञ कसेबसे बोलले -सरकार
तज्ञांनी विषय बदलविण्यासाठी एक सल्ला दिला,
ही जी वांग्याची शेती आहे त्याचं किती उत्पादन येतं ?
तज्ञांनी मोबाईल उघडला आणि आबांना बोलले मी सांगतो ते मार्गदर्शन घ्या ,
या वांग्याच्या झाडांना एकरी किमान दोन टन वांगी पिकतील
आबा हसून बोलले बाळा ही वांग्याची नाही ,टोमॅटो ची शेती आहे
तज्ञांना काय बोलावं सुचेना,
तज्ञ आपल्या बॅगेतून मिनरल वॉटर काढून पिले आणि निरोप घेत निघाले
तज्ञ गावात पोचले आणि मोबाईलची चार्जिंग संपत आल्याचं त्यांना दिसलं
आबांनी आपल्या धाकट्या चिरंजीवास , तज्ञांना चहा पाणी करूनच रवाना करा असं सांगितलं होतं
तज्ञ आबांच्या घरी पोहोचले मोबाईल चार्जिंगला लावावा अशी त्यांची इच्छा होती पण त्यानी विचारलं असता लाईट नसल्याचं
आबांच्या चिरंजिवाने सांगितलं
जाता जाता आबांच्या चिरंजीवांनी अर्धा पोते गहू आणि शेतातील ताजी भाजी तज्ञांच्या गाडीच्या डिकीत टाकली
तज्ञ अंतर्मुख होऊन विचार करत आपल्या सहाय्यकासह परतीच्या प्रवासाला निघाले
सदुभाऊ बायकोला म्हटले, आज आमची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे,
थोडं लवकर नाश्तापाणी तयार करा बायको बोलली गॅस संपलाय,
कालपासून सांगतीय
संस्कारी सदू बोलला आणू आणू सिलेंडर
आणि सदून खिसा चाचपला
कार्यकर्त्याला फोन लावला आणि लवकर ये म्हणून निरोप दिला
कार्यकर्ता बोलला- गाडीत पेट्रोल नाही
सदुभाऊ बोलले टाक ना शंभर चं आणि निघ लवकर
कार्यकर्ता गाडी घेऊन हजर झाला आणि सदुभाऊ मागच्या सीट वर बसून पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले.
जाता जाता हॉटेलात चहा नाश्ता झाला (उधारी लिहून ठेव असं सांगायला सदुभाऊ विसरले नाहीत)
पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचायच्या आधीच शंभर मीटर वर गाडी बंद पडली
हटयोगशास्त्री, आंदोलनजीवी, उद्योगपती, अतिमहापरमपूज्य #बाबा_रंगदेव यांची मुलाखत
बाबाजींना अनेक दिवसांपासून मुलाखतीकरिता वेळ मागत होतो पण बाबाजी इतके व्यस्त की त्यांना आम्हाला मुलाखत देण्यासाठी वेळच मिळत नव्हता
अखेर तो योग आलाच
आम्ही बाबाजींच्या आश्रमात पोहोचलो तेंव्हा बाबाजी योगासने करण्यात व्यस्त होते. बाबाजींच्या शिष्याने आम्ही आल्याची खबर दिली आणि आम्हास बाजूच्या कुटीत बसविण्याची व्यवस्था केली
कथा #स्टूल_खरेदीची
तालुक्याच्या ठिकाणी एका कार्यालयात निकाली काढलेल्या , जुन्या झालेल्या फाईल्स चे गठ्ठे उंचावरील छपडी वर ठेवण्यासाठी स्टूल खरेदी करावयाचा होता
अर्थातच वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं.
सायबाच्या सहीनं स्टूल खरीदेची परवानगी मागणारं पत्र गेलं
काही दिवसांनी वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र आलं
'आपले पत्र मिळाले परंतु स्टुलाची उंची किती हे पत्रात नमूद नाही'
स्टुलाची उंची नमूद करून वरिष्ठ कार्यालयाला पत्र गेलं
काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं
'स्टुलाची उंची तर नमूद आहे, परंतु स्टूल लाकडी, प्लास्टिक अथवा फायबर चा ? याचा
उल्लेख नाही '
पुन्हा स्टुलाची , लाकडी स्टूल खरेदी करावयाच पत्र गेलं
वरिष्ठ कार्यालयाकडून काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं
'स्टूल चार पायाचा खरेदी करणार की तीन पायाचा ? हे पत्रात नमूद नाही'
पुन्हा वरिष्ठ कार्यालयास पत्र गेलं , चार पायाच्या स्टूल खरेदीस परवानगी