गावाकडच्या #पारावरील_गोष्ट

गावातले लोक संध्याकाळी सहा वाजता पिंपळाच्या झाडा खाली पारावर आरामात गप्पा मारत बसले होते.

तेवढ्यात चार पाच गाड्या धूळ उडवत आल्या

सर्वांना उत्सुकता लागली कोण आलंय?

तालुक्याचे अधिकारी आणि जपान चं शिष्टमंडळ ग्राम भेटीसाठी गाडीतून खाली उतरलं
पारावरच्या मंडळी नी नमस्कार घातला

शिष्टमंडळात ला एक जण अरे पाराखाली काय बसले ,काम करा काम

शिरप्या न विचारलं मग काय हुईल?

शिष्टमंडळातला एक जण- शेतात धान्य पिकेल
अण्णा मग काय हुईल?

शिष्टमंडळा तला एक जण- मग त्याच्यावर प्रक्रिया होईल

शिरप्या पुन्हा बोलला मग काय हुईल?

शिष्टमंडळात ला एक जण- मग तो विक्री होईल

अण्णा बोलले मग काय हुईल?

शिष्टमंडळ- मग तो माल बाजारात विक्री होईल

अण्णा मग काय हुईल ?
मग त्या कारखान्यातल्या माला ला भाव मिळेल आणि तुम्हाला पण चार पैसे मिळतील

तात्या बोलले मग काय हुईल ?

शिष्टमंडळातला एक जण बोलला- चांगले घर बांधाल

शिरप्या बोलला मग काय होईल ?

शिष्टमंडळ- मग चांगलं घर बांधाल

अण्णा बोलले -मग काय हुईल?
शिष्टमंडळातला एक जण बोलला मग आराम कराल

शिरप्या बोलला
"मग आता काय करतोय" ????
#तिरकस
#ऐकलेलं
आता काय हुईल माहीत नाही

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with नानाची टांग

नानाची टांग Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @nanachi_tang202

21 Feb
#संस्कारी_सदूची पत्रकार परिषद

सदुभाऊ बायकोला म्हटले, आज आमची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे,
थोडं लवकर नाश्तापाणी तयार करा बायको बोलली गॅस संपलाय,
कालपासून सांगतीय
संस्कारी सदू बोलला आणू आणू सिलेंडर
आणि सदून खिसा चाचपला

कार्यकर्त्याला फोन लावला आणि लवकर ये म्हणून निरोप दिला

कार्यकर्ता बोलला- गाडीत पेट्रोल नाही

सदुभाऊ बोलले टाक ना शंभर चं आणि निघ लवकर
कार्यकर्ता गाडी घेऊन हजर झाला आणि सदुभाऊ मागच्या सीट वर बसून पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले.

जाता जाता हॉटेलात चहा नाश्ता झाला (उधारी लिहून ठेव असं सांगायला सदुभाऊ विसरले नाहीत)

पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचायच्या आधीच शंभर मीटर वर गाडी बंद पडली
Read 12 tweets
20 Feb
ट्विटरवरील स्वयंघोषित #शेती_तज्ञाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन दिलेली भेट

ट्विटर वर रात्रंदिवस शेतीवर ज्ञान देणाऱ्या स्वयंघोषित शेती तज्ञाने एकदा प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्याची भेट घेतली

शेती तज्ञांनी घेतलेल्या या भेटीचा जसाच्या तसा वृत्तान्त
ट्विटरवरील स्वयंघोषित शेती तज्ञ आपल्या सहाय्यकाला घेऊन भर दुपारी बारा वाजता गावी पोहोचले , थोडा उशीरच झाला.

कारण रात्री उशिरापर्यंत वाईन चे पेग रिचवत ट्विटर वर शेतीचे ज्ञानही द्यायला उशीर पर्यंत जागाव लागतं ना.

आपल्या एसी गाडीतून खाली उतरत आपल्या सहाय्यकाला शेतीतज्ञ बोलले
आज-काल आपला शेतकरी खूपच लेझी आणि व्यसनाधीन झाला आहे असं नाही वाटत तुला ?
Read 16 tweets
18 Feb
हटयोगशास्त्री, आंदोलनजीवी, उद्योगपती, अतिमहापरमपूज्य #बाबा_रंगदेव यांची मुलाखत

बाबाजींना अनेक दिवसांपासून मुलाखतीकरिता वेळ मागत होतो पण बाबाजी इतके व्यस्त की त्यांना आम्हाला मुलाखत देण्यासाठी वेळच मिळत नव्हता

अखेर तो योग आलाच
आम्ही बाबाजींच्या आश्रमात पोहोचलो तेंव्हा बाबाजी योगासने करण्यात व्यस्त होते. बाबाजींच्या शिष्याने आम्ही आल्याची खबर दिली आणि आम्हास बाजूच्या कुटीत बसविण्याची व्यवस्था केली
बाबाजी थोड्या वेळाने घाम पुसत आले, आम्ही बाबांना साष्टांग दंडवत घातला

बाबाजी आसनस्थ झाले आणि आम्हीही

बाबाजींना तब्बेत पाणी विचारणे म्हणजे, साक्षात देवास त्याचे अस्तित्व विचारण्यासारखे होईल म्हणून आम्ही तो विषय टाळला
Read 13 tweets
17 Feb
#वाघालाच_टांग मारली

आम्ही आणि आमचा मित्र एकदा बाईक ने जंगलातून जात होतो

जंगलातील सौंदर्य बघत बघत रमत गमत चाळीस च्या स्पीड ने आम्ही चाललो होतो

तेवढ्यात मागे बसलेल्या मित्राला बाईक च्या आरशात वाघ दिसला

तो आमचा खांदा दाबत ओरडला , अबे गाडी पळव, आपल्या मागे वाघ लागलाय
आम्ही आरशात पाहिले आणि आम्हालाही दरदरून घाम फुटला , गाडीवरचा ताबा सुटतो की काय असं वाटायला लागलं

पण लगेच सावरत आम्ही गाडीचा स्पीड वाढवला

आता गाडी साठ च्या स्पीड ने पळविली पण वाघानेही आपली स्पीड वाढविली

आम्ही गाडी सत्तर वर नेली, वाघानेही स्पीड वाढविली
मित्र मागे उभाच होऊन ओरडत होता वाढव अजून स्पीड

आम्ही थेट नव्वद च्या स्पीड ने गाडी भगवली

पण वाघानेही त्याची स्पीड वाढविली

मित्र आता खूप मोठ्याने किंचाळायला लागला

आम्हाला पुढे एक कच्चा रस्ता उजवीकडे जाणारा आणि एक रस्ता डावीकडे जाणारा दिसला

आमच्या डोक्यात लगेच आयडिया चमकली
Read 6 tweets
16 Feb
कथा #स्टूल_खरेदीची
तालुक्याच्या ठिकाणी एका कार्यालयात निकाली काढलेल्या , जुन्या झालेल्या फाईल्स चे गठ्ठे उंचावरील छपडी वर ठेवण्यासाठी स्टूल खरेदी करावयाचा होता

अर्थातच वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं.
सायबाच्या सहीनं स्टूल खरीदेची परवानगी मागणारं पत्र गेलं
काही दिवसांनी वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र आलं

'आपले पत्र मिळाले परंतु स्टुलाची उंची किती हे पत्रात नमूद नाही'

स्टुलाची उंची नमूद करून वरिष्ठ कार्यालयाला पत्र गेलं

काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं

'स्टुलाची उंची तर नमूद आहे, परंतु स्टूल लाकडी, प्लास्टिक अथवा फायबर चा ? याचा
उल्लेख नाही '

पुन्हा स्टुलाची , लाकडी स्टूल खरेदी करावयाच पत्र गेलं

वरिष्ठ कार्यालयाकडून काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं

'स्टूल चार पायाचा खरेदी करणार की तीन पायाचा ? हे पत्रात नमूद नाही'

पुन्हा वरिष्ठ कार्यालयास पत्र गेलं , चार पायाच्या स्टूल खरेदीस परवानगी
Read 6 tweets
16 Feb
#अतीगुप्त_बैठक

सेठ आणि मोटाभाई यांच्यात अतीगुप्त ठिकाणी ,अतीगुप्त बैठक पार पडली त्या बैठकीत चाय देणारा नौकर आमच्या खास ओळखीचा.

त्याने दिलेल्या माहितीनुसार गुजराती भाषेत पार पडलेल्या त्या बैठकीचा मराठी अनुवाद
मोटाभाई आधीच पोहोचले होते सेठ गाडीतून उतरून बैठकीच्या हॉल मध्ये नेहमीच्या सवयीने इकडे तिकडे हात दाखवत आत आले

मोटाभाई-पण सेठ इथे कॅमेरे , चॅनलवाले कुणीच नाहीत
सेठ- (बोट दाखवत) सी सी टीव्ही कॅमेरा तर आहे !!

दोघेही स्थानापन्न झाले

मोटाभाई - (सरळ मुद्द्याला हात घालत)
तर आपल्या योजनेनुसार जवळ जवळ अखंड हिंदुस्थान तर आपल्या ताब्यात आलाच आहे आता बाहेर लक्ष द्यायला काय हरकत आहे ?

सेठ- म्हणजे? आम्हाला समजलं नाही
मोटाभाई - बाहेरच्या देशात ही आपलं ऐकणारं सरकार स्थापन केलं पाहिजे आपण

सेठ- (दाढीतल्या दाढीत हसत) याची सुरुवात झाली आहे मोटाभाई !!
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!