सदुभाऊ बायकोला म्हटले, आज आमची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे,
थोडं लवकर नाश्तापाणी तयार करा बायको बोलली गॅस संपलाय,
कालपासून सांगतीय
संस्कारी सदू बोलला आणू आणू सिलेंडर
आणि सदून खिसा चाचपला
कार्यकर्त्याला फोन लावला आणि लवकर ये म्हणून निरोप दिला
कार्यकर्ता बोलला- गाडीत पेट्रोल नाही
सदुभाऊ बोलले टाक ना शंभर चं आणि निघ लवकर
कार्यकर्ता गाडी घेऊन हजर झाला आणि सदुभाऊ मागच्या सीट वर बसून पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले.
जाता जाता हॉटेलात चहा नाश्ता झाला (उधारी लिहून ठेव असं सांगायला सदुभाऊ विसरले नाहीत)
पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचायच्या आधीच शंभर मीटर वर गाडी बंद पडली
पेट्रोल संपले होते,गाडी ढकलून कार्यकर्ता वैतागला,
तसे सदुभाऊ बोलले - देशकार्यासाठी एवढं तर करावंच लागणार
आणि तिथे सांगू नको कुणाला पेट्रोल संपलं होतं म्हणून
धावत पळत सदुभाऊ पत्रकार परिषदेत पोहोचले एकदाचे.
पत्रकार- सदुभाऊ नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला त्यावर आपलं काय मत आहे
सदुभाऊ- हिंदुस्तानच्या पाचशे वर्षाच्या इतिहासात असा अप्रतिम अर्थसंकल्प सादर झाला नव्हता इतका सुंदर अर्थसंकल्प आमच्या निर्मलाक्कांनी सादर केला आहे
पत्रकार - महागाई वाढली आहे असं नाही वाटत आपल्याला ?
सदुभाऊ - कुठाय महागाई ? आम्हाला तर ,यत्र तत्र सर्वत्र विकासच दिसतोय, तुम्हाला कुठून दिसली महागाई ?
पत्रकार- नाही म्हणजे पेट्रोल शंभरी गाठत आलं आहे, डिझेल पण नव्वदी पार गेलंय
सदुभाऊ- दर वाढले म्हणून काय झालं सरकार विकासासाठीच वापरत ते पैसे
राज्य सरकारने त्यांचा टॅक्स कमी करायला पाहिजे, तर स्वस्त होईल पेट्रोल-डिझेल
आणखी एक पत्रकार- घरगुती गॅस पण महागला, गरिबांचं कसं होईल?
सदुभाऊ - घरचं परवडत नसेल तर हॉटेल मध्ये जेवा.
आम्हीपण हॉटेल मधूनच नाश्ता करून आलोय
आणि गॅस दराची एवढी काळजी नका करू, एकदा का आमच्या सेठ नी नालीतून गॅस काढण्याचा शोध लावला की मग बघा फुकटात गॅस देऊ सर्व जनतेला
पत्रकार- देशाचा विकासदर ही घटलाय, यावर काय मत आहे आपलं?
सदुभाऊ (पत्रकार कोणत्या न्युज चॅनल चा आहे हे बघत)- कोरोनामुळे थोडा परिणाम झाला आहे पण येत्या काळात तोही वाढवेल सरकार
सदुभाऊंनी आम्हाला 'आउट ऑफ इंडिया' घरी जायचं आहे म्हणत आपली पत्रकार परिषद आटोपती घेतली
एका कार्यकर्त्याला जवळ बोलवून हे असले अवघड प्रश्न विचारणारे पत्रकार यापुढे बोलवू नकोस असं हळूच कानात सांगितलं आणि
घरी जाण्यासाठी दुसऱ्या कार्यकर्त्याची गाडी शोधू लागले
#तिरकस #काल्पनिक
'घोड्या' च्या ही भावना दुखावण्याचा हेतू नाही
हटयोगशास्त्री, आंदोलनजीवी, उद्योगपती, अतिमहापरमपूज्य #बाबा_रंगदेव यांची मुलाखत
बाबाजींना अनेक दिवसांपासून मुलाखतीकरिता वेळ मागत होतो पण बाबाजी इतके व्यस्त की त्यांना आम्हाला मुलाखत देण्यासाठी वेळच मिळत नव्हता
अखेर तो योग आलाच
आम्ही बाबाजींच्या आश्रमात पोहोचलो तेंव्हा बाबाजी योगासने करण्यात व्यस्त होते. बाबाजींच्या शिष्याने आम्ही आल्याची खबर दिली आणि आम्हास बाजूच्या कुटीत बसविण्याची व्यवस्था केली
कथा #स्टूल_खरेदीची
तालुक्याच्या ठिकाणी एका कार्यालयात निकाली काढलेल्या , जुन्या झालेल्या फाईल्स चे गठ्ठे उंचावरील छपडी वर ठेवण्यासाठी स्टूल खरेदी करावयाचा होता
अर्थातच वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं.
सायबाच्या सहीनं स्टूल खरीदेची परवानगी मागणारं पत्र गेलं
काही दिवसांनी वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र आलं
'आपले पत्र मिळाले परंतु स्टुलाची उंची किती हे पत्रात नमूद नाही'
स्टुलाची उंची नमूद करून वरिष्ठ कार्यालयाला पत्र गेलं
काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं
'स्टुलाची उंची तर नमूद आहे, परंतु स्टूल लाकडी, प्लास्टिक अथवा फायबर चा ? याचा
उल्लेख नाही '
पुन्हा स्टुलाची , लाकडी स्टूल खरेदी करावयाच पत्र गेलं
वरिष्ठ कार्यालयाकडून काही दिवसांनी पुन्हा पत्र आलं
'स्टूल चार पायाचा खरेदी करणार की तीन पायाचा ? हे पत्रात नमूद नाही'
पुन्हा वरिष्ठ कार्यालयास पत्र गेलं , चार पायाच्या स्टूल खरेदीस परवानगी