(तो बेडवरून उठला आणि कपडे घालु लागला. ती तशीच पडुन होती.
तो तिच्याकडे पहात स्मितहास्य करत आहे.)
तो : उठ, आवर, जायचय आपल्याला..
ती : हममम
(ती तशीच पडुन आहे.)
ती : ऐक ना.. थॅन्क्स
तो : कशासाठी?
ती : मला जेव्हा गरज वाटते तेव्हा तु नेहमी माझी गरज पुर्ण करतोस म्हणून 👇
(तो फक्त स्माईल देतो)
तो : मला असं वाटत की आपण लग्न करावं
ती : वेडा आहेस का?
तो : कदाचित
ती : नको असा विचार करू.. तुला मी बेस्ट फ्रेंड मानते
तो : तु पण माझी बेस्ट फ्रेंड आहेस. पण त्या पलिकडे जाऊन मला तुझ्याबद्दल प्रेम वाटते..
👇
ती : आता नाहि रे प्रेम वगैरे यावर विश्वास बसत. एवढ्या खोलवर जखमा झाल्यात मनात की आता पुन्हा त्या भरून येणं खुप अवघड आहे.
तो : मान्य आहे.. पण सगळेच सारखे नसतात ना..
ती : हो.. पण आता मी आनंदी आहे.. मला लग्न वगैरे याची गरज नाहि वाटत.. मला कोणत्या बंधनात नाहि अडकायचं..
👇
तो : राग नको मानु पण जरा स्पष्ट बोलतो.. हे जे काहि तुझं बिनधास्तपणे चालु असतं त्याचे विपरित परिणाम होतील पुढे.. वाटेल तेव्हा वाटेल ते करणं, पार्ट्या करणं, कोणासोबत ही रात्र घालवणं हे आता जरी तुला चांगलं वाटत असलं तरी नंतर याचा तुला त्रास होणार आहे.. 👇
आत्ता तरूण आहेस त्यामुळे काहि वाटत नाहि पण आयुष्य जगायचं म्हणलं तर कोणीतरी हक्काचा जोडीदार पाहिजेच की.
ती : बरोबर आहे तुझं, कळतं हे मला पण नको वाटतं..
तो : मला तुला एवढंच सांगायचय की कोण्याच्या टाइमपास ची वस्तु होऊ नकोस.
ती : मला काहिच फरक पडत नाहि.. मला जे करू वाटतं ते करते.
👇
तो : पण मला फरक पडतो..
ती : का?
तो : मला तु आवडतेस.
ती : का? चांगली दिसते म्हणून ?
तो : दिसण्यावर प्रेम करणार्यातला मी नाहि..
ती : मग? माझी तर अनेक अफेअर्स झालीत.. सगळीच तुला माहित आहेत..
तो : तु कशीही असलीस आणि तुझा भूतकाळ काहिही असला तरी तुझं मन खुप साफ आहे.👇
तुला मी आज नाहि ओळखत... तुझ्या मनावर प्रेम करतो मी.. तुझं सौंदर्य तुझं शरीर जसं आज आहे तसं शेवटपर्यंत नसणार आहे, पण तुझं मन जसं आज आहे तसचं शेवटपर्यंत असणार आहे. आणि तुझ्या मनावर प्रेम करतो मी. तुझ्यातला प्रामाणिकपणा मला जास्त आवडतो.
👇
ती : हे बघ, मला माहित आहे तु हे मनापासून बोलतोय. तु माझी काळजी करतोस, मला समजून घेतोस.. तु खुप चांगला आहेस. माझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात पडून कशाला स्वतःची वाट लावुन घेतोस. तु एवढा चांगला आहेस की तुला कोणीही चांगली मुलगी मिळेल.
तो : बघ तुला पण माझी काळजी वाटते.
👇
ती : हो.. पण मी तुझ्यासाठी योग्य नाहिये.
तो : तु जशी आहेस तशी मी तुला स्विकारायला तयार आहे.
ती : तु स्वीकारशील पण घरातले?
तो : त्याचा तु नको विचार करू. मी समजावेन.
ती : तरीहि मला वाटतं की तु माझा विचार करू नये. मला ज्या सवयी लागल्या आहेत त्यातुन बाहेर पडणं एवढं सोप नाहि..👇
रात्री दोन पेग लावल्याशिवाय मला झोप येत नाहि. घरात चालणारे का हे?
(तिचा हात हातात घेत)
तो : तुझे जे काहि प्रोब्लेम आहेत ते तुझ्या एकटेपणामुळे आहेत. तु एकटी रहाते, मन मोकळं करून बोलत नाहिस यामुळे तुझा ताणतणाव वाढतोय. त्यातुन बाहेर पडायला मग हे मार्ग सुचतात तुला. 👇
ती : करू काय मग? आई बाबा लागलेत पैशाच्या मागे.. माझ्याशी दोन शब्द प्रेमाने बोलायला वेळ नाहि त्यांना... प्रेमात पडले आणि फसले गेले... कोण आहे मला जवळचं? मला समजून घेणार कोणीच नाहि.. तु आहेस.. पण एवढा चांगला आहेस की तुझ्याशी बोलताना कधीकधी मला माझीच लाज वाटते..👇
तो : बघ तु स्वतःच मान्य करतेय की तुला कोणितरी हक्काच प्रेमाचं हवयं.. आणि तु पुन्हा एकदा तुझं मन किती चांगलं आहे हे पण सिध्द केलं.
(त्याच्या नजरेला नजर भिडवत)
ती : तुला काय वाटतं तुझा विचार माझ्या डोक्यात आला नसेल? पण मी नाहिये रे त्या लायकीची..👇
तो : पहिली गोष्ट म्हणजे लग्नासाठी वर्जिनीटी हा माझा क्रायटेरिया अजिबात नाहि. त्यामुळे तो गिल्ट मनातून काढून टाक. मनाने चांगली मुलगी मिळावी एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि तुला मी खुप चांगला ओळखतो त्यामुळे मला तुझ्यासोबत लग्न करायला काहि प्रोब्लेम नाहिये. 👇
दुसरं म्हणजे तुझे जे काहि प्रोब्लेम आणि सवयी आहेत त्यावर चांगला उपचार होऊ शकतो. सद्ध्या तु मेंटली खुपच डिस्टर्ब आहेस. आपण चांगल्या डॉक्टर ची ट्रिटमेंट घेऊ. होइल की सगळ चांगलं..
ती : तुला खरच एवढा विश्वास वाटतो? खरच होईल सगळ नीट?
तो : का नाहि होणार?
👇
ती : खरं सांगु का, मला पण माझ्या आयुष्याची किव येते. मला छान हॅप्पी लाईफ जगायचय रे.
तो : तु शांतपणे विचार कर सगळा.. मागे जे काय झालं ते विसरून जा. आत्ता आजपासून पुढे तुला कसं आयुष्य हव आहे त्याचा विचार कर. तुला कसा पार्टनर पाहिजे ते ठरव. 👇
इथुन पुढे आयुष्य सुंदर करण्यासाठी काय करता येईल त्याचा विचार कर. तुला मी चांगला वाटलो, विश्वास ठेवावा वाटला तर आपण लग्न करू. फक्त तु आता जे जगतेय त्यातुन बाहेर पड. आयुष्य सुंदर आहे त्याला अजून सुंदर कर. मी आहे तुझ्या सोबत.
ती : पटतय मला तुझं.. मी करते विचार.. मला जरा वेळ दे.
👇
तो : ठिक आहे.
(ती त्याला मिठी मारते)
ती : ऐक ना.
तो : काय?
ती : एवढं नको ना चांगलं वागत जाऊ, प्रेमात पडते रे मी तुझ्या.
(दोघांच्याही चेहर्यावर स्मितहास्य आणि नजरेत विश्वास. दोघांनी पण प्रेमाने मिठी मारली.)
तो : चल आता, आवर पटकन.
ती : हमम थॅन्क्स
तो : कशासाठी?
ती : सांगते नंतर.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
राजर्षी शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे पराकोटीचे शत्रुत्व जगजाहीर होते मात्र दोघेही एकमेकांचे मोठेपण जाणून होते. त्यामुळे एकमेकांवर प्रखर टीका करताना दोघांनीही कधीच मर्यादा ओलांडली नाही. ना शाहू महाराज टिळकांना कधी 'समाजद्रोही' म्हणाले, 👇
ना लोकमान्य कधी शाहू महाराजांना 'स्वराज्यद्रोही' म्हणाले. परंतु ही नैतिक मर्यादा टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांना पाळता आली नाही. केळकर, खापर्डे, भोपटकर इत्यादी टिळक अनुयायींनी शाहू महाराजांविरुद्धची विखारी चळवळ कायम धगधगती ठेवण्यासाठी अखंड प्रयत्न केले. 👇
शाहू महाराजांना लोकांच्या नजरेत बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न केले, १८ मे १९२१ रोजी तासगावात झालेली 'कुलकर्णी परिषद' त्यापैकीच एक.
१७ मे रोजी 'केसरी'चे संपादक केळकर यांनी खास अंक काढून शाहू महाराज आणि ब्रिटिश अधिकारी यांच्यात संस्थानातील दहशतवादी कारवाया निपटून काढण्यासाठी 👇
आपल्याच देशबांधवांना स्वातंत्र्याचे हक्क नाकारणाऱ्या, पण इंग्रजांकडे स्वातंत्र्याचे हक्क मागणाऱ्या लोकांविषयी
१. स्वामी विवेकानंद म्हणाले होते -
"भारताचा उद्धार करावयास हवा. गरिबांना पोटभर अन्न द्यावयास हवे. शिक्षणाचा प्रसार करायला हवा; आणि पुरोहितगिरी नष्ट करायला हवी. 👇
पुरोहितांचा जुलूम नको. सामाजिक अत्याचार नको..
इंग्रजांकडून अधिक सत्ता मिळावी म्हणून आपल्यातील काही खुळे तरुण सभा भरवतात. त्यांचे हे प्रयत्न पाहून इंग्रज लोक नुसते हसतात. ज्याला इतरांना स्वातंत्र्य देण्याची इच्छा नसते तो स्वतःच स्वातंत्र्याला लायक नसतो..! 👇
कल्पना करा,इंग्रजांनी सारी सत्ता तुम्हाला दिली तर परिणाम काय होईल?जे सत्ताधारी होतील ते बाकीच्यांना दडपून टाकण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यापर्यंत काही ती सत्ता पोहोचू देणार नाहीत..!अशा गुलामांना सत्ता हवी असते इतरांना गुलाम बनविण्यासाठी."
उत्तर : अजिबात नाही. जातिभेदाविरुद्ध लढणारा व्यक्ती एखाद्या जातीचा द्वेष करू शकेल काय? नक्कीच नाही.
मग ब्राम्हण आणि ब्राह्मणेतर असा संघर्ष का उभा राहिला?
शाहू महाराजांना समाजातील विषमता संपायची होती, 👇
जातीभेद संपवून मागासलेल्या जातींना त्यांचे सामाजिक हक्क मिळवून द्यायचे होते. ब्रिटिशांच्या काळात सर्व प्रशासनयंत्रणा ब्राम्हण समाजाच्या हातात होती कारण सरकारी नोकरी शिकलेल्याला मिळे आणि शिक्षण ही फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी होती. शाहू महाराजांकडे राजसत्ता होती आणि 👇
सत्तेच्या जोरावर त्यांनी खंबीर पावले उचलून ही शिक्षणातली आणि प्रशासनातली ब्राह्मणांची मक्तेदारी मोडून काढली. बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी वसतिगृह चळवळ आणि अनेक शिक्षणविषयक कायदे / आदेश काढून शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर समाजासाठी शिक्षणाची गंगा वाहती केली.👇
भारताला शेतकरी आंदोलनाचा फार मोठा इतिहास आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी साहजानंद सरस्वती, प्रोफ. एन जी रंगा, सर छोटूराम, चौधरी चरणसिंग, महेंद्रसिंग टिकैत अशा अनेक दिग्गजांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले आहे. 👇
इंग्रजांपासून ते तत्कालीन काँग्रेस सरकारपर्यंत जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलने झाले तेव्हा सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले, पण कधी आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानी अतिरेकी, लाल बावटे, देशद्रोही, विरोधी पक्षाने प्रेरित ठरवण्याचा प्रयत्न झाला नाही.
१९८७ साली केंद्रात काँग्रेसचे/राजीव गांधी 👇
यांचे बहुमताचे सरकार होते तर उत्तरप्रदेशात काँग्रेस नेते वीरबहादूर सिंग मुख्यमंत्री होते. पश्चिम उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर मधील कर्नूकखेडी गावात शेतीला वीज मिळण्याबाबत काहीतरी समस्या निर्माण झाली. त्याचवेळी विजेचे दर सुद्धा वाढवले गेले होते. 👇
खरंतर १८९६ सालीच शाहू महाराजांनी कोल्हापुरात उच्चशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम कॉलेजला जोडून एक वसतिगृह स्थापन केले होते. यात सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश होता. या वसतिगृहाचे व्यवस्थापन ब्राम्हण मंडळींकडे होते. शिक्षण ही आपलीच मक्तेदारी आहे 👇
अशी मानसिकता या मंडळींची होती त्यामुळे ब्राह्मणेतर मुलांची संख्या हळूहळू कमी झाली, कालांतराने ते वसतिगृह फक्त ब्राह्मणांचेच बनले. शाहू महाराजांच्या डोक्यात शिक्षण क्षेत्रातील ही मक्तेदारी नाहीशी करण्याबाबत चक्रे फिरत होती. याला वेग आला तो पी.सी.पाटलांमुळे (थोर कृषीतज्ञ).👇
मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पी.सी.पाटलांनी त्यांना आलेल्या समस्या शाहू महाराजांना सांगितल्या. गावाचा राजा समजल्या जाणाऱ्या पाटलांच्या पोरांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर मागासलेल्या जातींची काय अवस्था होत असेल या विचाराने महाराज अस्वस्थ झाले.👇
मासिक पाळीच्या दिवसांत स्त्री खरंच अपवित्र किंवा अशुद्ध असते का?
उत्तर : अजिबात नाही. मासिक पाळीचे चक्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालूच असते, त्यामुळे रक्तस्राव होण्याच्या ४ दिवसांपुरती स्त्री अपवित्र आणि इतर दिवशी पवित्र असं असूच शकत नाही.👇
ज्याप्रमाणे आपण अन्न खातो, ते पचवतो त्यातून ऊर्जा तयार होते आणि नको असलेल्या गोष्टी आपले शरीर बाहेर फेकते, हे जसे एक चक्र आहे तसेच मासिक पाळी हे देखील एक चक्र आहे. साधारण २८ ते ३२ दिवसांचे हे चक्र असते, ज्यामध्ये स्त्रीबीज तयार होऊन त्याची वाढ होते. 👇
परिपक्व झालेले स्त्रीबीज मासिक पाळीच्या शेवटच्या टप्प्यात रक्तस्रावाच्या स्वरूपात बाहेर फेकले जाते आणि पुन्हा नवीन स्त्रीबीज निर्माण होऊन परिपक्व होण्याची प्रक्रिया सुरु होते. ही सगळी प्रक्रिया का होते? तर गर्भधारणेसाठी होते. गर्भधारणा झाली नाही तर मग ते स्त्रीबीज शरीराबाहेर👇