#घोडचूक
... इजरायल पॅलेस्टाईन संघर्षात आपल्या बाजूने कोणकोणते देश उभे आहेत... त्यांचे ध्वज आपल्या ट्विट वर फडकवत... इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी त्या देशांचे आभार मानले... मात्र त्या २५ देशांमध्ये भारताचा तिरंगा नसल्यामुळे भारतीय समाजमन अस्वस्थ झालं... ते सहाजिकच
आहे पण... आंतरराष्ट्रीय राजकारणात एवढ हळवं होऊन चालत नाही... आंतरराष्ट्रीय राजकारण भावनेवर देखील चालत नाही... ते चालतं विशुद्ध पणे आपल्या देशाच्या होणाऱ्या फायदा नुकसान या गणितावर...
... याबाबतीत इस्रायलचे उदाहरण देता येईल... १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिक मध्ये आपल्या ११ खेळाडूंच्या
हत्येचा बदला घेण्यासाठी मोसादने ऑपरेशन सुरू केले... रोम पॅरिस येथे या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या पॅलेस्टाईनच्या म्होरक्यांना मोसादने वेचून वेचून मारायला सुरुवात केली...
... आणि या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ब्लॅक सप्टेंबर या पॅलेस्टाईन मधील आतंकवादी संघटनेच्या ऑपरेशन्स
+
प्रमुख अली हसन सलामेहच्या ऐवजी भलताच माणूस गोळ्या घालून ठार मारला...
... नॉर्वे मधल्या लीलीहॅमर या छोट्याशा शहरात आपल्या गरोदर पत्नी बरोबर चित्रपटाचा शेवटचा खेळ बघून परतणाऱ्या अहमद बोचीखी नावाच्या मोरोक्कन वेटरला मिस्टेकन आयडेंटिटी मुळे मोसादने अक्षरश: शरीराची चाळण करून ठार
+
मारला... अहमदचा कोणत्याही आतंकवादी संघटनेशी दुरान्वयेही संबंध नव्हता...

... मोसाद सारख्या चतुरस्त्र चाणाक्ष आणि अचूक कामगिरी पार पाडणाऱ्या गुप्तहेर संघटनेकडून एवढी प्रचंड गफलत अपेक्षित नव्हती... जगभर गदारोळ माजला... मोसादची विश्वासार्हता पणाला लागली... आश्चर्य म्हणजे इजरायल
+
सरकारने अक्षरशः कानावर हात ठेवले... त्या गुप्तचरांना ओळखण्यास ही नकार दिला... नॉर्वे सरकारला तुमच्या देशाच्या कायद्यांप्रमाणे अपराध्यांना शिक्षा द्या म्हणून इजराइल सरकारने हात झटकले... मोसादचे सहा एजंट नॉर्वे पोलिसांनी पकडले... लिलीहॅमर अफेअर या नावाने हे प्रकरण जगभर गाजलं..
+
पंतप्रधान गोल्डा मायर यांना आंतरराष्ट्रीय दबावापुढे ते ऑपरेशन काही काळ स्थगित करावं लागलं...
... अहमदच्या पत्नीला व मुलांना मोसादने हस्ते परहस्ते लक्षावधी डॉलर्सची मदत पोहोचवली... साधारणत: दोन वर्षांनी मोसाद चे एजंट नॉर्वेच्या कारागृहातून सुटले...
... प्रत्यक्षात अधिकृत रित्या
+
इजराइल सरकारने आपल्या गुप्तहेरां बाबत कानावर हात ठेवले असले तरी... पडद्यामागून जे करायचं होतं ते शक्य तेवढं सगळं त्यांनी केलं...
... कानावर हात ठेवणे हा आंतरराष्ट्रीय डावपेचांचा भाग होता आणि पडद्यामागून त्यांना शक्य ती मदत करणे हे बावन कशी राष्ट्रप्रेम होतं... आपण दोन्ही चा
+
सन्मान केला पाहिजे...

.... गुंतागुंतीचे आंतरराष्ट्रीय राजकारण आपण आपल्या पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री यांच्या वर सोडून देऊ... भावनेच्या भरात वाहवत न जाता... ते बावनकशी सोन्यासारखा राष्ट्र हिताचाच निर्णय घेतील याची खात्री बाळगू या...
+
या जगातला शंभर कोटी हिंदू समाज आपल्या पाठीशी आहे ही खात्री ही इजरायल ला हत्तीचं बळ देणारी ठरेल... आपण सोशल मीडियावर इजरायल च्या पाठिंब्यासाठी जिवाचं रान करूया...

#IndiaStandWithIsrael

🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishram Parab

Vishram Parab Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishramParab2

19 May
आणि उत्तराची वाट बघावी!

मोदींकडे उत्तर देण्यासारखे काही नाही असा अनेकांचा समज झाला. परंतु, मोदींचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी विरोधकांना झोपविण्याची उत्तरे दिली आहेत, हे आपल्याला लक्षात येईल.

नरेंद्र मोदी सध्या विरोधक आणि हितचिंतक यांच्या कठोर टीकेचे धनी झालेले आहेत.
+
त्यांच्यावर चित्रपट करणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर म्हणतात, “प्रतिमा बनविण्यापेक्षा जीव वाचविणे गरजेचे आहे. सरकारने आव्हानांचा सामना करावा आणि ज्यांनी निवडून दिले आहे, त्यांच्यासाठी काम करावे. अनेक प्रकरणांवर सरकारवर टीका करणे गरजेचे आहे. नद्यांमध्ये वाहत असलेल्या मृतदेहांना
+
पाहून एखादा क्रूर व्यक्तीच विचलित होणार नाही, आपण संताप व्यक्त केला पाहिजे. जे काही होत आहे, त्याला सरकारला जबाबदार धरणं गरजेचं आहे.” पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या. ममतादीदींचे अभिनंदन करताना सर्वांनी नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. ममतादीदी विजयी
+
Read 26 tweets
17 May
नक्की वाचा....

विमान प्रवासात भेटलेल्या एका अमेरीकन माणासाचे उद्गार फार सूचक आहेत. तो म्हणाला “मला तुम्हा भारतीय लोकांमधे एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. तुम्हा लोकांना आपल्या देशावर टिका करण्यामधे कमीपणा वाटत तर नाहीच, उलट एकप्रकारचा आनंद आणि अभिमान वाटतो. जगात असे कुठेच घडत नाही
अगदी आफ्रिकेच्या जंगलातुन आलेला माणूस सुद्धा आपल्या जंगलाला एव्हडी नावे ठेवत नाही. अमेरिकेमधे आपल्या देशाला नावे ठेवणे हे आपल्या आईला नावे ठेवण्यासमान समजतात. तुमच्या देशात बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तसे आमच्या देशात पण आहेत. म्हणून आपण आपला देश वाईट ठरवायचा का?” हा अमेरीकन माणुस
+
स्टॅनफोर्ड या प्रसिद्ध विद्यापिठातील नोबेल पारितोषीक विजेता प्रोफेसर होता.अशाच एका थोर अमेरीकन विद्वानाची गाठ पडली. त्याला भारताविषयी फार जिव्हाळा आहे. त्याने सांगीतले, “तुम्ही भारतीय लोक एक चुक नेहमी करत असता. तुम्ही भारताची तुलना नेहमी इग्लंड, अमेरिकेशी करत असता. पण या देशांना
Read 19 tweets
15 May
फडणवीस म्हणजे एक मेट्रोपोलिटन कल्चर मधून आलेले, फ्लूएन्ट इंग्रजी बोलणारे, स्टाईल आणि फॅशनची जाण असणारे, फक्त पब्लिक-लाईफ मध्ये आहोत म्हणून आपली पत्नी सोबत दिसणे याला रिग्रेसिव्ह किंवा पोलिटिकली इन-करेक्ट न मानणारे एक 'अर्बन' नेते! गावाकडून आलेल्या इतर नेतेमंडळींप्रमाणे 'गावच्या
+
साधेपणा'चा खोटा आव आणणे, नौटंकी करणे या सध्या माणसाला कधी जमले नाही. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही, तर महाराष्ट्र भाजपसाठी पण हे सगळं तसं नवीनच होतं. बदललेल्या काळात जनतेसाठी मात्र त्यांची ही इमेज आणि बॅकग्राऊंड 'एक रिफ्रेशिंग चेंज' होता. जर जनतेच्या डोळ्यात हे खुपत असते
तर त्यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणूकीत, त्यांना तेल लावलेल्या पैलवानांसमोर (१०५) घवघवीत यश मिळालेच नसते! आणि म्हणूनच, फडणवीस यांना मी फक्त एक मेट्रोपॉलिटन कल्चर मधून आलेले एक अर्बन नेते एवढंच नाही, तर एक नवीन आणि Aspirational महाराष्ट्राचे प्रभावी Brand Ambassador आहेत असंही
+
Read 27 tweets
13 May
गेल्या काही दिवसात काही लोकं महाराष्ट्रात "बुद्धीभेदाचा" खेळ खेळत आहेत.

"गडकरींना पंतप्रधान करा,मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, निवडणूकीआधी मोदीच्या जागी गडकरीही पंतप्रधान म्हणुन चालतील....ईत्यादी.....ईत्यादी!"

पण या मागण्या काय मराठी माणसासाठी प्रेम आहे म्हणुन किंवा नीतिन
+
गडकरींच्या कामाने ते प्राभावित झाले आहेत म्हणुन नाही तर फक्त मोदींना हटवण्यासाठी या मागण्या आहेत, या मागणीची सुरवात करणारा व्यक्ती तोच आहे ज्याने चाय पार्टी करून अटलजींचं सरकार एका मताने पाडलं होतं

पण भविष्यात कधी मोदी राजकारणात नसताना संघ-भाजपाने गडकरींना पंतप्रधान पदाचं
+
उमेदवार घोषित केलं तर महाष्ट्रातल्या तथाकथित पुरोगामी जनतेला गडकरींमध्ये "मराठी माणूस" दिसणार नाही, गडकरींमध्ये "ब्राह्मण माणूस" दिसायला लागेल.

गडकरी आज फक्त त्यांच्या कामाबाबत बोलतात ईतरांवर टीका टिप्पणी करत नाहीत,स्वताच्या कामांची तुलना ईतरांबरोबर करत नाहीत म्हणुन सर्वपक्षीय
+
Read 7 tweets
13 May
कोणी हे सांगू शकेल का एशियाई देशात फ़क्त भारतातच ही कोरोणाची दूसरी लाट का आली? ती ही मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून? पाकिस्तान, बांग्लादेश, भूटान, नेपाल, म्यांमार, थायलैंड, अफगानिस्तान, श्रीलंका या देशांची भौगोलिक परिस्तिथि ही भारत देशा सारखीच आहे, मग तिथे का दूसरी लाट
+
नाही?
इतर एशियाई देश सिंगापूर, मलेशिया, वियतनाम, अरब देश ताइवान, मंगोलिया, किर्गिस्तान, उछ्बेकिस्तान या देशांची भौगोलिक परिस्तिथि थोड़ीफार भारत देशासारखीच आहे. तिथे ही दूसरी लाट नाही,
का? का? का?
का हे देश जास्त Disciplined आहेत?
का तेथील नागरिक जास्त सुशिक्षित आहेत?
+
का तेथील आरोग्य व्यवस्था भारतापेक्षा चांगली आहे?

काय म्हणायचे आहे तुम्हाला?
पाकिस्तानमधील, बांग्ला देशातील लोक जास्त डिसिप्लिनड आहेत? तेथील आरोग्य व्यवस्था चांगली आहे?
भूटान, नेपाल आपल्या पेक्षा पुढारलेले देश आहेत?
मंगोलिया, अरब देश जास्त सुशिक्षित आहे? मग फ़क्त आणि
+
Read 13 tweets
10 May
′′Modi ji has to be brought to his knees, government has to be proved unsuccessful′′
This kind of thinking has created so much havoc.

If you don't believe then read..........

You will be shocked to know this truth.

It is notable that the Country has a total of 36 States
+
including 28 complete States and 8 Union Territories (UT).

But the shocking fact is that as of 8 am today, out of the 208330 deaths due to Corona in the Country, more than 107602 (51.65% deaths have occurred in only 6 states.

Out of these 6 States, 5 States are ruled by
+
Chhattisgarh (8312,) Punjab (8909) Rajasthan (4084) Jharkhand (2540), and Maharashtra (67985) Congress and Congress alliance.

The Sixth State is that Delhi (15772) whose Chief Minister is Kejriwal. Isn't it shocking that the number of Deaths due to Corona in these 6 States is
+
Read 20 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(