आणि उत्तराची वाट बघावी!

मोदींकडे उत्तर देण्यासारखे काही नाही असा अनेकांचा समज झाला. परंतु, मोदींचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी विरोधकांना झोपविण्याची उत्तरे दिली आहेत, हे आपल्याला लक्षात येईल.

नरेंद्र मोदी सध्या विरोधक आणि हितचिंतक यांच्या कठोर टीकेचे धनी झालेले आहेत.
+
त्यांच्यावर चित्रपट करणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर म्हणतात, “प्रतिमा बनविण्यापेक्षा जीव वाचविणे गरजेचे आहे. सरकारने आव्हानांचा सामना करावा आणि ज्यांनी निवडून दिले आहे, त्यांच्यासाठी काम करावे. अनेक प्रकरणांवर सरकारवर टीका करणे गरजेचे आहे. नद्यांमध्ये वाहत असलेल्या मृतदेहांना
+
पाहून एखादा क्रूर व्यक्तीच विचलित होणार नाही, आपण संताप व्यक्त केला पाहिजे. जे काही होत आहे, त्याला सरकारला जबाबदार धरणं गरजेचं आहे.” पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या. ममतादीदींचे अभिनंदन करताना सर्वांनी नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले. ममतादीदी विजयी
+
झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. नरेंद्र मोदी यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राजकीय विश्लेषकांनी भविष्य सांगायला सुरुवात केली की, २०२४च्या निवडणुकीत मोदी जिंकून येणार नाहीत. ममतादीदींनी त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या टीकेलाही मोदींनी काही
उत्तर दिले नाही, ते मौन आहेत.

कोेरोनासंबंधीच्या याचिका न्यायालयात सुनावणीला येतात. तेव्हा न्यायमूर्ती ताशेरे मारतात आणि सरकारला खडे बोल सुनावतात. त्यावर सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू होते. ‘ऑक्सिजन’चा तुटवडा, ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा तुटवडा, यांना मोदींना जबाबदार धरण्यात येते. मोदी
त्यावर काही बोलत नाहीत, ते मौन असतात. विदेशी वर्तमानपत्रांतून मोदींवर कडक ताशेरे ओढले जातात. भारतातील कोरोना परिस्थिती अतिभयानक आहे, असे चित्र रंगविले जाते. याला मोदी शासन जबाबदार आहे, असे म्हटले जाते. जगातील प्रमुख देशांनी आपल्या नागरिकांनी भारतात जाऊ नये, असे आदेश काढले आहेत.
+
यासंबंधीच्या बातम्या ठळकपणे दिल्या जातात. मोदींवर हल्ला करण्यात राहुल गांधी आघाडीवर असतात. सोनिया गांधींनीदेखील त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील शिवसेना नेते रोजच मोदींविरुद्ध काही ना काही तरी बोलतच असतात. ममताने भाजपचा पराभव केला, याचा आनंद ते लपवून ठेवू शकले नाही.
+
दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांनी संकेत मोडून पंतप्रधानांसोबतची बैठक ‘लाईव्ह टेलिकास्ट’ केली. मोदी हे सर्व शांतपणे पाहत आहेत. ते मौन आहेत.

नरेंद्र मोदी मौन का आहेत, या सर्वांना ते उत्तर का देत नाहीत, असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात. मौन राहणे हा मोदींचा स्वभाव आहे, याची
+
माहिती बहुदा अनेकांना नसावी. त्याची काही उदाहरणे पाहण्यासारखी आहेत. ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना ‘गोध्रा’ प्रकरणावरून गुजरातमध्ये मुसलमानांविरुद्ध मोठा हिंसाचार झाला. हजारो मुसलमान त्यात मारले गेले. हा हिंसाचार मोदींच्या आशीर्वादाने घडला, असा आरोप त्यांच्यावर ठेवून त्यांना ‘
+
हत्यारा’ ठरविण्यात आले. मोदींनी तेव्हा या आरोपाला काही उत्तर दिले नाही.मुस्लीमविरोधी ही मोदींची प्रतिमा बनविण्याचा योजनापूर्वक प्रयत्न झाला. सोनिया गांधींनी त्यांना ‘मौत का सौदागर’ असे म्हटले. मोदी जेव्हा राष्ट्रीय राजकारणात आले, तेव्हा मान्यवरांनी जाहीर घोषणा केली होती, मोदी जर
पंतप्रधान झाले तर आम्ही देश सोडून जाऊ. मोदींनी तेव्हा काही उत्तर दिले नाही, ते मौन राहिले. मोदींकडे उत्तर देण्यासारखे काही नाही असा अनेकांचा समज झाला. परंतु, मोदींचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी विरोधकांना झोपविण्याची उत्तरे दिली आहेत, हे आपल्याला लक्षात येईल.

आरोपांना उत्तर
देण्याऐवजी मोदी सकारात्मक कामांच्या मागे लागले. विकासाचा मुद्दा त्यांनी अग्रक्रमाचा केला. विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ त्यांनी उभे केले. अर्थशास्त्री त्याची चर्चा करू लागले. गुजरातमध्ये २४ तास वीज हे त्यांनी करून दाखविले. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना आखल्या. त्या
+
पूर्ण केल्या. गुजरातला भ्रष्टाचारमुक्त करण्यात त्यांनी मोठा पुढाकार घेतला. ‘मी पैसा खात नाही आणि कुणाला खाऊ देत नाही’ याचा अंमल त्यांनी करून दाखविला.मोदी संघ स्वयंसेवक आहेत. प्रचारक होते. संघ स्वयंसेवकांची प्रेरणा डॉ. हेडगेवार असतात. डॉ. हेडगेवारांची शिकवणूक अशी आहे की,
+
कोणत्याही टीकेला उत्तर द्यायचे नाही, वांझोटे वाद करीत बसायचे नाही. सर्व शक्ती आपल्या कामावर लावायची. ज्यांना चर्चा आणि सल्ले द्यायचे आहेत, त्यांना तेवढेच काम करायचे असते. प्रत्यक्ष काम करण्यासाठी यापैकी कुणीही पुढे येत नाही. शांतपणे आपले काम आपण करीत राहिले पाहिजे. नरेंद्र मोदी
+
हे डॉ. हेडगेवारांचा विचार जगणारे पंतप्रधान आहेत.

असाच प्रसंग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या जीवनात आलेला आहे. गृहयुद्ध सुरू झालेले आहे. हजारोंनी अमेरिकन जवान मरत आहेत. करोडो रुपयांची संपत्ती नष्ट होत आहे. अशा वेळी ‘बिनकामाचा राष्ट्रपती’ म्हणून त्यांच्यावर टीका
+
झाली, सल्ल्यांचा पाऊस पडला. एकाने सल्ला दिला की, अन्नधान्यावर खर्च न करता सैन्याला खायला मिळेल अशी योजना मी तयार केली आहे. त्यांनी आपली योजना अब्राहम लिंकन यांच्यापुढे मांडली. तो म्हणाला की, “ही योजना अमलात आणली तर आपले सैन्य गलेलठ्ठ होईल.” लिंकन त्याला म्हणाले, “तेे जाडे झाले तर
लढणार कसे, मला सडपातळ सैनिकांची आवश्यकता आहे.” सल्ला देणार्‍या व्यक्तींविषयी लिंकनचे मत असे होते की, सल्ला देणार्‍यांनी एकत्र येऊन प्रतिपक्षाला कसे गारद करता येईल, याचा विचार केला पाहिजे. राज्याच्या प्रमुख कार्यकारी अधिकार्‍याने (म्हणजे राष्ट्राध्यक्षाने) काय करायला पाहिजे, हे
+
सांगण्याचा आवाज जेवढा कमी होईल तेवढे बरे आणि नेहमीप्रमाणे अब्राहम लिंकनने एक कथादेखील सांगितली.वादळात सापडलेला एक शेतकरी देवाची प्रार्थना करताना म्हणतो, “हे परमेश्वरा, ढगांच्या कडकडाटांच्या आवाजापेक्षा विजांचा प्रकाश तू मला दाखव, त्यामुळे मला वाट चालणे सोयीचे जाईल तू आवाज कमी कर
आणि प्रकाश दाखव.” आपल्या देशातील विरोधकांची स्थिती अशी आहे. आवाजाचा गडगडाट आहे. कामाचा मात्र ठणठणाट आहे.

सर्व विपरित वातावरणात जो शांत असतो आणि मौन धारण करतो, तो सर्वात सामर्थ्यशाली ठरतो. भगवद्गीतेच्या दहाव्या आध्यायातील ३८वा श्लोक असा आहे,
‘दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्॥
भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात, “दंडनीती मी आहे आणि विजयनीतीदेखील मीच आहे. गोपनीय भावात मी मौन आहे. आणि ज्ञानवानांतील ज्ञान मीच आहे.” श्रीकृष्णाने या अध्यायात जे सांगितले आहे, ते मोदींना लागू पडते, असे मला वाटते. मौन धारण करणारे मोदी
+
कृतीने उत्तर देतात. ही कृती पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची असते. दहशतवादी अड्ड्यावर हवाई हल्ला करण्याची असते आणि भारत-पाक सीमेवर चिनी सैनिकांना यमसदनास पाठविण्याची असते. मोदी बोलत नाहीत, मोदी कृती करतात. एक संस्कृत सुभाषितकार म्हणतो, “तोंडातून सतत शब्द काढण्यामुळे गाणारे
पक्षी बंदीवान होतात. काहीही न बोलणारा बगळा कधीही बंदीवान होत नाही. त्याला पिंजर्‍यात आणून कोणी ठेवीत नाही.”

पंचतंत्रामध्ये बडबड्या कासवाची कथा आहे. या कासवाला आकाशातून जग बघायचे होते. दोन राजहंस एक काठी घेऊन येतात. कासवाला म्हणतात की, “तोंडाने ही काठी पकडून ठेव. परंतु, तोंड
+
अजिबात उघडू नकोस.” काठीची दोन टोके चोचीत धरून राजहंस उडतात. काठीला लटकलेला कासव बघून मुले घोळका करून गलबला करायला लागतात. कासवाला ते सहन होत नाही. तो काही बोलण्यासाठी तोंड उघडतो आणि खाली येऊन आपटतो आणि मरतो. ही पंचतंत्रातील कथा आहे. नको त्या वेळी तोंड उघडू नये, शांत राहावे. मोदी
असे शांत आहेत.या सर्वाला त्यांचे उत्तर कोणते असेल, हे सांगणे फार अवघड आहे. अफजलखानाच्या स्वारीला उत्तर कोणते, हे अफजलखानाचे पोट फाडल्यावर जगाला समजले. अफजलखानाला काय उत्तर द्यायचे, हे शिवाजी महाराजांनाच माहीत होते, तसे नरेंद्र मोदींचे आहे.
यासाठी आपणही शांत आणि मौन राहून उत्तराची वाट बघितली पाहिजे.

रमेश पतंगे....

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishram Parab

Vishram Parab Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishramParab2

18 May
#घोडचूक
... इजरायल पॅलेस्टाईन संघर्षात आपल्या बाजूने कोणकोणते देश उभे आहेत... त्यांचे ध्वज आपल्या ट्विट वर फडकवत... इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी त्या देशांचे आभार मानले... मात्र त्या २५ देशांमध्ये भारताचा तिरंगा नसल्यामुळे भारतीय समाजमन अस्वस्थ झालं... ते सहाजिकच
आहे पण... आंतरराष्ट्रीय राजकारणात एवढ हळवं होऊन चालत नाही... आंतरराष्ट्रीय राजकारण भावनेवर देखील चालत नाही... ते चालतं विशुद्ध पणे आपल्या देशाच्या होणाऱ्या फायदा नुकसान या गणितावर...
... याबाबतीत इस्रायलचे उदाहरण देता येईल... १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिक मध्ये आपल्या ११ खेळाडूंच्या
हत्येचा बदला घेण्यासाठी मोसादने ऑपरेशन सुरू केले... रोम पॅरिस येथे या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या पॅलेस्टाईनच्या म्होरक्यांना मोसादने वेचून वेचून मारायला सुरुवात केली...
... आणि या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ब्लॅक सप्टेंबर या पॅलेस्टाईन मधील आतंकवादी संघटनेच्या ऑपरेशन्स
+
Read 11 tweets
17 May
नक्की वाचा....

विमान प्रवासात भेटलेल्या एका अमेरीकन माणासाचे उद्गार फार सूचक आहेत. तो म्हणाला “मला तुम्हा भारतीय लोकांमधे एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. तुम्हा लोकांना आपल्या देशावर टिका करण्यामधे कमीपणा वाटत तर नाहीच, उलट एकप्रकारचा आनंद आणि अभिमान वाटतो. जगात असे कुठेच घडत नाही
अगदी आफ्रिकेच्या जंगलातुन आलेला माणूस सुद्धा आपल्या जंगलाला एव्हडी नावे ठेवत नाही. अमेरिकेमधे आपल्या देशाला नावे ठेवणे हे आपल्या आईला नावे ठेवण्यासमान समजतात. तुमच्या देशात बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तसे आमच्या देशात पण आहेत. म्हणून आपण आपला देश वाईट ठरवायचा का?” हा अमेरीकन माणुस
+
स्टॅनफोर्ड या प्रसिद्ध विद्यापिठातील नोबेल पारितोषीक विजेता प्रोफेसर होता.अशाच एका थोर अमेरीकन विद्वानाची गाठ पडली. त्याला भारताविषयी फार जिव्हाळा आहे. त्याने सांगीतले, “तुम्ही भारतीय लोक एक चुक नेहमी करत असता. तुम्ही भारताची तुलना नेहमी इग्लंड, अमेरिकेशी करत असता. पण या देशांना
Read 19 tweets
15 May
फडणवीस म्हणजे एक मेट्रोपोलिटन कल्चर मधून आलेले, फ्लूएन्ट इंग्रजी बोलणारे, स्टाईल आणि फॅशनची जाण असणारे, फक्त पब्लिक-लाईफ मध्ये आहोत म्हणून आपली पत्नी सोबत दिसणे याला रिग्रेसिव्ह किंवा पोलिटिकली इन-करेक्ट न मानणारे एक 'अर्बन' नेते! गावाकडून आलेल्या इतर नेतेमंडळींप्रमाणे 'गावच्या
+
साधेपणा'चा खोटा आव आणणे, नौटंकी करणे या सध्या माणसाला कधी जमले नाही. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही, तर महाराष्ट्र भाजपसाठी पण हे सगळं तसं नवीनच होतं. बदललेल्या काळात जनतेसाठी मात्र त्यांची ही इमेज आणि बॅकग्राऊंड 'एक रिफ्रेशिंग चेंज' होता. जर जनतेच्या डोळ्यात हे खुपत असते
तर त्यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणूकीत, त्यांना तेल लावलेल्या पैलवानांसमोर (१०५) घवघवीत यश मिळालेच नसते! आणि म्हणूनच, फडणवीस यांना मी फक्त एक मेट्रोपॉलिटन कल्चर मधून आलेले एक अर्बन नेते एवढंच नाही, तर एक नवीन आणि Aspirational महाराष्ट्राचे प्रभावी Brand Ambassador आहेत असंही
+
Read 27 tweets
13 May
गेल्या काही दिवसात काही लोकं महाराष्ट्रात "बुद्धीभेदाचा" खेळ खेळत आहेत.

"गडकरींना पंतप्रधान करा,मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, निवडणूकीआधी मोदीच्या जागी गडकरीही पंतप्रधान म्हणुन चालतील....ईत्यादी.....ईत्यादी!"

पण या मागण्या काय मराठी माणसासाठी प्रेम आहे म्हणुन किंवा नीतिन
+
गडकरींच्या कामाने ते प्राभावित झाले आहेत म्हणुन नाही तर फक्त मोदींना हटवण्यासाठी या मागण्या आहेत, या मागणीची सुरवात करणारा व्यक्ती तोच आहे ज्याने चाय पार्टी करून अटलजींचं सरकार एका मताने पाडलं होतं

पण भविष्यात कधी मोदी राजकारणात नसताना संघ-भाजपाने गडकरींना पंतप्रधान पदाचं
+
उमेदवार घोषित केलं तर महाष्ट्रातल्या तथाकथित पुरोगामी जनतेला गडकरींमध्ये "मराठी माणूस" दिसणार नाही, गडकरींमध्ये "ब्राह्मण माणूस" दिसायला लागेल.

गडकरी आज फक्त त्यांच्या कामाबाबत बोलतात ईतरांवर टीका टिप्पणी करत नाहीत,स्वताच्या कामांची तुलना ईतरांबरोबर करत नाहीत म्हणुन सर्वपक्षीय
+
Read 7 tweets
13 May
कोणी हे सांगू शकेल का एशियाई देशात फ़क्त भारतातच ही कोरोणाची दूसरी लाट का आली? ती ही मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून? पाकिस्तान, बांग्लादेश, भूटान, नेपाल, म्यांमार, थायलैंड, अफगानिस्तान, श्रीलंका या देशांची भौगोलिक परिस्तिथि ही भारत देशा सारखीच आहे, मग तिथे का दूसरी लाट
+
नाही?
इतर एशियाई देश सिंगापूर, मलेशिया, वियतनाम, अरब देश ताइवान, मंगोलिया, किर्गिस्तान, उछ्बेकिस्तान या देशांची भौगोलिक परिस्तिथि थोड़ीफार भारत देशासारखीच आहे. तिथे ही दूसरी लाट नाही,
का? का? का?
का हे देश जास्त Disciplined आहेत?
का तेथील नागरिक जास्त सुशिक्षित आहेत?
+
का तेथील आरोग्य व्यवस्था भारतापेक्षा चांगली आहे?

काय म्हणायचे आहे तुम्हाला?
पाकिस्तानमधील, बांग्ला देशातील लोक जास्त डिसिप्लिनड आहेत? तेथील आरोग्य व्यवस्था चांगली आहे?
भूटान, नेपाल आपल्या पेक्षा पुढारलेले देश आहेत?
मंगोलिया, अरब देश जास्त सुशिक्षित आहे? मग फ़क्त आणि
+
Read 13 tweets
10 May
′′Modi ji has to be brought to his knees, government has to be proved unsuccessful′′
This kind of thinking has created so much havoc.

If you don't believe then read..........

You will be shocked to know this truth.

It is notable that the Country has a total of 36 States
+
including 28 complete States and 8 Union Territories (UT).

But the shocking fact is that as of 8 am today, out of the 208330 deaths due to Corona in the Country, more than 107602 (51.65% deaths have occurred in only 6 states.

Out of these 6 States, 5 States are ruled by
+
Chhattisgarh (8312,) Punjab (8909) Rajasthan (4084) Jharkhand (2540), and Maharashtra (67985) Congress and Congress alliance.

The Sixth State is that Delhi (15772) whose Chief Minister is Kejriwal. Isn't it shocking that the number of Deaths due to Corona in these 6 States is
+
Read 20 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(