काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून 1999 साली राष्ट्रवादीचा जन्म झाला, शाहू - फुले- आंबेडकरांचे नाव घेऊन पुरोगामीत्वाची झुल पांघरत चालण्याला आज 22 वर्षे झालीत. मला राष्ट्रवादीबद्दल प्रेम, आस्था किंवा आपुलकी अजिबात नाही, कारण मी त्यांचा कार्यकर्ताही नाही अन हितचिंतकही नाही, पण या+
दगाबाज राष्ट्रवादीने इतक्या वर्षात मिळवलं काय? हे कोण सांगेल! कधी त्यांच्या कार्यकर्त्यांना तरी हे कळलंय का!वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा इतिहास कुणीही विसरणार नाही.
पण या 22 वर्षात काँग्रेसपासून फारकत घेत नेमकं काय सिद्ध केलं? आणि काँग्रेसपासून वेगळं होण्याचं कारण काय तर+
विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा म्हणे! असो...

नाही म्हणलं तरी शरद पवार यांनी राष्ट्रवादी स्थापन केली ती पंतप्रधान होण्यासाठीच. कारण काँग्रेसमध्ये राहिले असते तर पंतप्रधान पदासाठी नंबर लागणार नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना असेल, इकडे राष्ट्रवादीची आपल्या 22 वर्षातली आजची स्थिती+
म्हणजे 4 खासदार, अन तेही साडे तीन जिल्ह्यात विस्तरारलेला, धनदांडग्याच्या पुण्याईने तेवत राहिलेला हा घराणेशाहीचा पक्ष.
ज्या काँग्रेससोबत फारकत घेतली त्यांच्यासोबतच आघाडी करून राज्यात सत्ता मिळवत राहिले, शरद पवारांना ना दोन आकडी खासदार कधी निवडून आणता आले, ना स्वबळावर राज्यात कधी+
सत्ता आणता आली, ना इथे तीन आकडी आमदार कधी निवडून आणता आले.
पण, दगाबाज पवार, राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टवादी ही बिरुदं मात्र राजकारणात नेहमी चर्चेत राहिली. राष्ट्रवादीला तुमच्या स्थापनेपासूनची आजची उपलब्धी काय विचारलं तर चार व्हाइट कॉलर नेते अन त्यांनी राबविलेली सत्ता सोडली तर+
हाताच्या बोटावर मोजण्याइतकंही काही उरत नाही.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांना "चाणक्य" समजणाऱ्या कार्यकर्त्यांनो चाणक्यांनी कमीत कमीत 22 वर्षात एकदा तरी स्वबळावर विधानसभेत सत्ता स्थापन करायला हवी होती,एव्हाना सर्वात जास्त आमदार निवडून आणून "राजकीय पॉवर" तर दाखवायला+
हवी! असो!

कालच जयंत पाटील म्हणाले, येणाऱ्या 2024 ला राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल हा विश्वास आहे, असो, त्या दांडग्या इच्छाशक्तीला सलाम... करून दाखवा.😁
साहेबांना, भावी पंतप्रधान पदासाठी आणि कार्यकर्त्यांना तो देखणा सोहळा पाहण्यासाठी 22+
व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा!😷🌷

- विकास विठोबा वाघमारे
#vikaswaghamare

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with vikas waghamare

vikas waghamare Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @WaghamareVikas

28 May
थ्रेड🌷👇
राजकारणातल्या काही डागाळलेल्या माणसांनी हे क्षेत्रच बदनाम करून टाकलं, पण या दलदलीतही समाज, समर्पण आणि सेवा याला समोर ठेऊन काम करणाऱ्या माणसांची कमी नाही. ही माणसं प्रसिद्धीच्या झोतात कमी आली असतील पण यांनी कामात कसर ठेवली नाही. जिल्ह्यातल्या, राज्यातल्या मीडियाने यांना+
हिरो नसेल केलं पण मतदारसंघातल्या माणसांसाठी हेच खरे हिरो आहेत, कारण संकटात धावून आलेल्या माणसांना चिखलामातीत राबणारी माणसं कधीच विसरत नसतात. हे आहेत अक्कलकोट तालुक्याचे युवा आणि तडफदार आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी!

सचिन दादांनी, आपल्या अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी कोरोनाच्या+
काळात आपल्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या सहयोगातून अवघ्या 15 दिवसात ऑक्सिजनयुक्त 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभा केलंय. त्यामध्ये 10 बेडला हे बायपॅपचीही व्यवस्था केली आहे. एवढेच नाही तर तालुक्यातल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी आणि कोरोनातुन मुक्त करण्यासाठी अजून 100 बेडची तयारी+
Read 13 tweets
27 May
अनाथांचा नाथ!🧡🌺
तुमची राजकारणातली खुर्ची ही दगाफटका करून काढून घेतली जाऊ शकते, पण तुमचं राजकारणातलं अढळ स्थान कोणीही काढून घेऊ शकत नाही, तुमचं नेतृत्व, कर्तृत्व आणि हृदयाची विशालता काढून घ्यायला समोरच्याला तेवढं "मोठं" व्हावं लागतं. अन त्यासाठी त्यांच्याकडे तेवढं समर्पण, त्याग+
आणि अंत्योदयासाठी काम करण्याची तळमळ असावी लागते. आज देवेंद्रजींनी कोरोनामुळे अनाथ झालेल्या १०० मुलांचं संपूर्ण पालकत्व स्वीकारलं! सिद्धिविनायक सेवा ट्रस्टकडे नोंदणी केलेली ही मुलं होती.
अनाथ मुलांना आज परत एकदा देवेंद्रजींच्या रूपाने आधार मिळाला! एवढंच नाही तर दक्षिण - पश्चिम+
नागपूर विधानसभेत अजून जेवढी अनाथ मुलांची नोंदणी होईल तीही स्वीकारण्याची तयारी देवेंद्रजींनी ठेवली आहे. ज्यांच्या नावातच "देव" आहे, तो अनाथांचा नाथ झालाय.☺️
राजकारणाच्या चिखलफेकीतही काळीज असलेली अशी लाखमोलाची माणसं पाहिली की अभिमान वाटतो. आणि ही माणसं आपले नेते आहेत याने तर अजून+
Read 4 tweets
10 May
पंढरीच्या कौलाचे गुपित..🌷👇
पंढरपूर - मंगळवेढ्याच्या संतभूमीत भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले अन सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. हा विषय खरंच राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणारा आहे, याची अनुभूती लवकरच दिसेल. मात्र हा निकाल घोषित झाल्यानंतर महाआघाडीच्या काही महत्वाच्या नेत्यांच्या+
चुकीच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मात्र मला स्वस्थ बसवेना..

मंगळवेढा आणि पंढरपूर ही संतांची भूमी आहे, कर कटेवरी ठेऊन उभा असलेला विठूमाऊली अन मंगळवेढ्यावर दृष्टी ठेऊन असलेले दामाजीपंत! सोबतीला ज्ञानोबा, तुकोबाराय, मुक्ताई, जनाई, नामदेव आणि अशा अनेक महान संतांचे अधिष्ठान या भूमीत+
आहे. या महान भूमीतल्या निवडणूकीत यंदा भाजपाचाच पठ्ठा विजय करायचा हा खुद्द पांडुरंग परिवाराचाच निश्चय! त्याप्रमाणे विजय झालाही!

पण या विजयामागे असलेलं एक गुपित म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, ती लोकांना माहिती नाही. आघाडीच्या नेत्यांना कळेना की सगळं काही ठीक असताना आपण निवडणूक हरली+
Read 12 tweets
9 May
अत्यंत महत्वाचा थ्रेड👇
राज्यातल्या कोरोनाग्रस्त लाखो सामान्य रुग्णांना दिलासा देणाऱ्या एका याचिकेची नुकतीच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी ही याचिका दाखल केली होती, त्यांचा आक्षेप असा होता+
की, शासनाने 23 मे 2020 रोजी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ केवळ व्हेंटिलेटरवरील गंभीर कोविड रुग्णांनाच देण्यात येतो, तो कोविडच्या सर्व रुग्णांना त्या योजनेंतर्गत लाभ देण्याची मागणी केली होती. दरम्यान या याचिकेवर सुनावणी सुरू असताना+
न्यायालयाने सरकारची भूमिका विचारली त्यावेळी या आघाडी सरकारने न्यायालयात शपथपत्रासह सांगितले की, व्हेंटिलेटरवरील 8 उपचारासहित 20 अन्य उपचार कोविड रुग्णांना महात्मा फुले योजनेत मोफत देण्यात येईल.
मात्र वस्तुस्थिती अशी होती की, सरकार केवळ घोषणा करून कागदी घोडे नाचवत आहे, वास्तविकता+
Read 15 tweets
26 Apr
महत्वाचा थ्रेड👇🌷
राज्य सरकार नेमकं मोफत काय देणार! आणि फुकटच्या क्रेडिटसाठी राज्य नेमकं कितीवेळा तोंडचलाखी करणार हे सांगणं तसं अवघड आहे. आयजीच्या जीवावर बायजी उधार म्हणजे काय खाली सांगतो बघा! उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री म्हणून तर सपशेल अपयशी आहेतच, पण माणूस म्हणूनही ते त्या+
पात्रतेत बसत नाहीत, कारण या मरणासन्न काळात सर्वात जास्त राजकारण आणि द्वेष जर कुणी केला असेल तर उद्धव ठाकरे यांनीच केलाय.

काल मीडियाच्या माध्यमातून अजून एक दलाली करण्याचा प्रयत्न केला आणि राज्यातल्या लोकांना एक मेसेज पोहचवण्याचा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे सरकारने केला की,+
"केंद्र सरकार विकत लस देत आहे, आणि राज्य सरकार आपल्या पैशातून सर्व नागरिकांना मोफत लस देत आहे." मग सगळे पाळलेले दलाल आणि गुलाम वाहवा करायला लागले. पण तुम्हाला मी सत्यता सांगतो. सोबतच गुलामांच्या आणि राज्य सरकारची दलाली करणाऱ्यांच्या तोंडावर हाणायला लिंकसुद्धा देतो.👇

◆ सर्वात+
Read 15 tweets
24 Apr
होय! हे तेच @AjitPawarSpeaks आहेत, ज्यांनी पंढरपूर - मंगळवेढ्याच्या विधानसभा पोटनिवडणुकीत येऊन प्रचार केला. केवळ जाहीर सभाच नाही तर गल्लोगल्ली फिरून याच दादांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
त्या भागात आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना मात्र हेच अजित दादा बेताल वक्तव्ये करत+ Image
सुटले आहेत. हे म्हणतात की, "या कोरोनाच्या उद्रेकाला तिथली जनताच जबाबदार आहे".
खरंतर अशा प्रकारचे वक्तव्ये हे लाजिरवाणे आहे, दादा हे वागणं बरं नव्हं. जर त्या भागात तुमचे अर्धा डझन मंत्री आणि तुम्ही स्वतः येऊन सभा घेतली नसती तर कशाला लोक जमले असते?लोकांना दोष देणं बंद करा.
भाजपाने+
प्रचार केला, मात्र अशाप्रकारे जबाबदारी ढकलली नाही, ना बेताल वक्तव्ये केलीत. उलट त्या ठिकाणी कोविड सेंटर व्हावे यासाठी भाजपा नेतेच प्रयत्नशील आहेत.

पण दादांनी आजच आपली पंढरपूर - मंगळवेढ्याची हार मान्य केली आहे, मतांचा जोगवा मागूनही लोकांनी इंद्रायणी काठ दाखवला असल्याची कुणकुण+
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(