पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत राबविण्यात येत असलेल्या नवीन एकात्मिक दुमजली उड्डाणपूल, भुयारी मार्ग व इतर उपाययोजना बांधकाम करणेबाबत महापौर कार्यालयात बैठक पार पडली.
बैठकीत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गमधील सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रस्तावित असलेल्या दुमजली उड्डाणपूल भुयारी मार्ग व इतर उपाययोजना बांधकाम करणेबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सौ सुनिता ताई वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेते सौ दिपालीताई धुमाळ, सेना गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेस गटनेते आबा बागूल, फर्जाना शेख अश्विनी लांडगे, साईनाथ बाबर ,आयुक्त विक्रम कुमार,
मुख्य अभियंता प्रकल्प श्रीनिवास बोनाला, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे व मुख्य अभियंता विवेक खरवडकर आदी उपस्थित होते.
आपल्या पुणे शहरातील पाषण ते कोथरूड वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि सेनापती बापट रस्त्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या पंचवटी, पाषाण ते कोथरूड आणि पंचवटी, पाषाण ते गोखले नगर या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती येणार आहे.
असून या संदर्भात पालकमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी या दोन्ही बोगद्यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.
बोगद्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि कामाला गती देण्याच्या उद्देशाने आज बैठक पार पडली.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला उपस्थित होते.
कोथरूड ते पाषाण हे सध्याचे अंतर चांदणी चौकमार्गे साडे आठ किलोमीटर तर सेनापती बापट रोडमार्गे हेच अंतर साडेनऊ किलोमीटर इतके आहे.
शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील लसीकरण केंद्रात आपण हा विशेष ड्राईव्ह राबवणत असून नोंदणी न करता थेट 'वॉक इन' पध्दतीने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
यासाठी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले असून सकाळी १० ते ५ या वेळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना लस उपलब्ध होईल. यासाठी लसीकरणावेळी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेश निश्चित झाल्याचे पुरावे सादर करणे बंधनकारक असेल.
पुणे शहरातील लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा सक्षमपणे सामना करण्यासाठी आपले विविध पातळ्यांवर सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहेत. याचाच एक भाग म्हणून @MCCIA_Pune आणि @ppcr_pune ने पुढाकार घेत ऑनलाईन बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला माझ्यासह स्थायी समिती अध्यक्ष श्री. हेमंत रासने, सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, आयुक्त श्री. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, 'पीपीसीआर'चे मुख्य समन्वयक श्री. @sudhirmehtapune,
सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, पुणे सिटी कनेक्टचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी रुची माथूर, श्री. मुकेश मल्होत्रा, श्री. मनोज पोचट आदी यावेळी उपस्थित होते.
पुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना उद्या कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या मिळणार आहे.
त्यासाठी संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून पुणेकरांना लसीकरणासंदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
लसीकरणासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आता punevaccination.in या संकेतस्थळावर मिळणार असून याचे लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आले.
पुणे महानगरपालिका आणि एमसीसीआयए यांच्या माध्यमातून या डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आली आहे.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष श्री. हेमंतजी रासने, सभागृह नेते श्री. गणेशजी बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, आयुक्त श्री. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होते.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना !
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना पुणे महानगरपालिका सक्षमपणे करत असून तज्ञांची मते लक्षात घेता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्जता ठेवण्यास प्राधान्य देत आहोत.
याचाच एक भाग म्हणून लहान मुलांच्या कोरोना उपचारांसाठी आणि त्यांच्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील बालरोग तज्ञांची महत्वाची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
यात तज्ञांची सर्वांगीण मते जाणून घेत लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बैठकीत ५३ बालरोग तज्ञ सहभागी झाले होते. यावेळी महापौर कार्यालयातून माझ्या सोबत उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर,
#Thread | पुणे महापालिकेच्या वतीनं आपण उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार !
पुणे शहराबाबत मुंबई उच्च न्यायालयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जुनी सादर करण्यात आली असावी. पूर्वीसारखी परिस्थिती पुण्यात आता नाही. म्हणूनच या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संभ्रम आणि...
(१/८)
भीती निर्माण होऊ नये, या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तसेच पुण्यात आणखी कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नसल्याचीही आपली भूमिका आहे.
पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जी उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
(२/८)
ती सध्याची असू शकत नाही. कारण गेल्या दोन आठवड्यात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्य सरकारकडून सध्या आकडेवारीत घोळ सुरू आहे. त्यांच्याकडून जी आकडे जाहीर केली जात आहे. यामध्ये प्रचंड विसंगती दिसून येत आहे. मात्र मागील पंधरा दिवसात पुणे शहरात चांगली परिस्थिती पाहण्यास
(३/८)