🌹घाल घाल पिंगा वाऱ्या
माझ्या परसात 🌹🙏.
एक दिवस सांगावा येतो मुलगी पसंत आहे दिवाळीत तारिख निघतेय ,मग पाच महिन्यात लग्न आणि अल्लड वयातली मुलगी दोन नद्या आणि चार डोंगर सोडून तिच्या खटल्याच्या घरात माप ओलांडून संसारी होते.काल परवापर्यंत बाप रागावला की माय च्या पदराआड लपणारी ,
भावाबरोबर भांडणारी, हट्ट करून जे पाहिजे ते मिळवणारी ती अबोध आज कोणाच्या तरी घरची "सून " झालीय .दिवसभराच्या कामातून थोडा वेळ मिळाला म्हणून दुपारी परसातल्या धुणे धुवायच्या दगडावर थोडा वेळ विसावा घ्यावा म्हणून बसते. नदीपलीकडच्या माहेरच्या दिशेने वाऱ्याची झुळूक येते आणि माहेरच्या
वाऱ्या बरोबर जिवाभावाच्या गप्पा होतात आणि मग कृ ब निकुंभ यांच्या लेखणी तुन एक नितांत सुंदर कविता लिहिले जाते
💐
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात !
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊ साठी परी मन खंतावल !
विसरली का ग भादव्यात वर्ष झालं
माहेरच्या सुखाला ग मन आचवले !
फिरून फिरून सय येई जीव वेडावतो ,
चंद्रकळे चा ग शिव ओलाचिंब होतो !
काळ्या कपिलची नंदा खोडकर फार
हुंगुहुंगुनिया करी कशी ग बेजार !
परसात पारिजातकचा सडा पडे
कधी फुले वेचायला नेशील तू गडे !
कपिलच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय !
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला !
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुखाची रे कर बरसात 🌹.
वारा विचारतोय मुलीला की तुझ्या घरी जातोय काही निरोप देऊ का ? मुली ला माहिती आहे वडील भाऊ शेतात गेले असतील काम करून थकून जातात आपली काळजी Image
त्यांना पण असतेच तरी नको त्यांना काही बोलू नको आणि घरी जाशील तर स्वयंपाक करून आई चुली च्या थोडी दूर अंगावर साडी चा पदर घेऊन दुपारी थोडी झोपली असेल धडडम धूम आवाज करून झोपडीत जाऊ नको .हळूच जा अंदाज घे मग बोल "सुखी आहे पोर सांग आईच्या कानात "आणि तिने विचारले तर सांग मला सगळ्यांची Image
खूप खूप आठवण येते .भावाची ,बाबांन ची आई ची आणि गोठ्यातल्या कपिला गाई ची तिच्या दुधाची त्या दुधावरच्या दाट सायी ची आणि आईच्या दाट मायेची मला आठवण येते.माहेरच्या बहरलेल्या पारिजातकाच्या फुलांची पण आठवण येते .आणि माहेरच्या आठवणी ने जीव गलबलतो आई ला भेटायला जीव व्याकुळतो Image
फिरून फिरून आई ची आठवण येते आणि मग साडीचा पदर डोळ्याला लावून तो ओला होतो ही कविता सुमन कल्याणपूर यांनी 1972 मध्ये गृहिणी गीते या अल्बम मध्ये गायली आहे.बालभारती मध्ये आम्हाला अभ्यासाला होती .बाहेर शिकायला गेलेले किंवा परदेशात गेलेल्या मुला मुलींना आई चे घर म्हणजे माहेरचं असते.
आज ही घर सोडून बाहेर राहणाऱ्या मुला मुलींना सणासुदी गोड पदार्थ करून जेवायला बसलेल्या आई ला घास कडूच लागतो मग मोबाईल वर विचरपुस चालू होते काय ग काय जेवली ?? आणि मग सकाळी कुठेतरी मेस मध्ये किंवा ऑफिस जवळच्या हॉटेल मध्ये घाईघाईत दोन वडेपाव खाणारी मुलगी आई ला आपण सणा सुदी गोड नाही
खाल्ले ते तर वाईट वाटलं म्हणून सांगते "अग आई आज मैत्रिणी च्या आई ने पुरणपोळ्या पाठवल्या होत्या एकदम भारी 👌 तुझ्या सारख्या नाही पण भारी मी तीन खाल्या पोटभर झोप येतेय मला ऑफिसमध्ये .इकडे एक घास न खाता पोरगी पोटभर जेवली हे ऐकूनच आईचे पोट भरते .कवितेतली आणि आजच पोरगी भावना एकच
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात .
🌹🙏 .
आभारी लेट्स रीड कवितेचि आठवण करून दिलित
@LetsReadIndia

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Shekhar P

Shekhar P Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Godfath52464383

18 Sep
मवाली कुणिकडचे 😡🌑
कॉलोनी ,गल्ली ,सोसायटी चे आवार जवळचा चौक इथे ही प्रजाती हमखास सापडते. विचित्र रंगांनी आणि स्टाईल ने सजवलेली हेयरस्टाईल /कानात डुल कुठे बिकबाळी /हातात कडे/ पॅंट अतिशय घट्ट नाहीतर अर्धी फाटलेली काय तर फेशन आहे .टपरीवर उभे तोंडात सिगरेट ,भर पावसात गॉगल 😎
हे नेहमी बाईक वर ट्रिपल च बसणाऱ् ,सिग्नल वरच्या पोलिसाला जमले तर मुदाम हात दाखवून जाणार.26 जानेवारी ला चौकात रांगोळी घालून कुठूनतरी स्पीकर आणून देशभक्ती पर गाणे लावणार .रंगपंचमीला कपडे फाडून विद्युत तारांवर फेकणार.नुसता धांगडधिंगा आरडाओरडा मवाली कुणीकडचे .
तुम्ही टू व्हीलर
वरून जात असतात आणि ती बंद पडते ,किक मारून जीव जातो इकडे तिकडे बघतात ,स्वछ इस्त्री आणि पॉलिश केलेले बूट घालणाऱ्या कडे आशाळ भूत नजरेने मदत करतील म्हणून पाहतो तितक्यात एक मवाली येतो "काय झाले हो काका ? सरका बाजूला म्हणून गाडीचा ताबा घेतो काहीतरी खाड खुड करतो किक मारतो गाडी चालू
Read 12 tweets
14 Aug
मंजुश्री सारडा 👈🙏
खून खटला एक चक्रव्युव्ह
In fact this is a case of circumstantial evidence 🙏
स्थळ पुणे .
मंजुश्री सारडा लग्न 11 फेब्रुवारी 1982 मृत्यू 11 जून 1982 .शरद बिरदी सारडा घरचा पिढीजात कापडाचा व्यवसाय ,शरद केमिकल इंजिनियरआणि भोसरी ला केमिकल ची फेक्टरी असलेला धनाढ्य
कुटुंबातील मुलगा ,मंजुश्री पण केमिस्ट ची डिग्री घेतलेली ,सुंदर ,सुस्वभावी आणि बरीच भावनाळू मुलगी.खरे तर लग्नानंतर चे एक वर्ष शब्दशः झोपाळ्या विना झुलायचे असते चोरट्या खाणाखुणा ,कुटुंबियांच्या लक्षात येऊ नये म्हणून केलेले कटाक्ष ,नजरेचे लाडिक खेळ आणि हवाहवासा वाटणाराचोरटा स्पर्श
पण हे सुख मंजुश्री च्या ललाटावर लिहिले नव्हते .फेब्रुवारी त लग्न झाले आणि नवरा बायको चतुश्रूंगी च्या जवळपास तक्षशिला अपार्टमेंट ला लगेचच रहायला गेले.आणि महिन्याभरात मंजुश्री चे पत्र तिच्या बहिणीला आणि मैत्रीणी ला आले.दिसते तसे नसते इकडे बरच वेगळे चित्र आहे.नवरा शरद ने त्याच्या
Read 13 tweets
12 Aug
अफगाणिस्तान 🙏.
अतिशय स्पष्ट शब्दात म्हणजे क्रिस्टल क्लियर असे म्हणतो त्या शब्दात बीडन ने अफगाणिस्तान ला सांगितलेकी त्यांना स्वतःकरता लढावेच लागेल.34 पैकी 9 राज्य तालिबान कब्जात आहेत.काबुल एक महिन्यात पडेल असा अंदाज आहे.भारताने बरीच गुंतवणूक केली आहे दुर्दैवाने तिची माती होणार.
जसे नशीब फुटके असते ना तसे या देशाचे नशीब खराब आहे.अमेरिका आणि रशिया हे दोन राहू केतू यांच्या हस्तरेषेत गेले 40 /50 वर्ष बसले आहेत.आज US ने सैन्य माघार घेतली आणि तालिबान ने 9 राज्ये घशात घातली.2 महिन्यात 90 हजार लोक बेघर झाली आहेत.एकाच वर्षात 4 लाख बेघर.या लोकांना मदत करण्यास Image
अडचण आहे.आजच जर्मनी आणि नेदरलँड ने मदत थाम्बवली आहे. अफगाण सैन्य तालिबानला शरण जात आहे.काबुल पासून 80 km वर च्या गांझी शहरात आज तालिबानी घुसले आहेत. अफगाण अर्थमंत्री देश सोडून गेले आहेत. बाकी पण त्याच मार्गावर आहेत.जवळजवळ 70 % अफगाणिस्तान तालिबान ने घेतला आहे. एक देश सोडून Image
Read 5 tweets
3 Aug
देवाक काळजी रे 😭
थोडा व्यक्त होतोय बाकी लोकांना ही विनंती आहे खास करून शिक्षण क्षेत्रात असलेल्या नि जरूर व्यक्त व्हा .मी जे अनुभवतो आहे ते लिहितोय .आज ना मुलांना ना त्यांच्या पालकांना निकालाची ना हुरहूर , ना उत्साह ,ना भीती ना उत्कंठा ,ना देवाचा धावा ना पेढ्यांचा गोडवा ,
हा सगळा निकाल अंतर्गत मूल्यमापन यावर आधारित खरे तर दीड ते दोन वर्षे अभ्यास, टेस्ट, परीक्षा हजेरी, निकाल सगळेच ऑनलाइन आहे .आज उत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थ्यांची आकडेवारी आणि टक्केवारी वाचाल तर डोळे पांढरे होतील एकूण 93435 विदयार्थी 90%
1350 विद्यार्थ्यांना 95% तर 46 विद्यार्थी
100% मिळवून आहेत.दहावी चे पण तेच आणि 12 वी चे ही तेच. लाखो मुले पास झाली आहेत आणि ही काही आनंदाची बातमी नाही .10 वि 12 विच्या पौगंडावस्थेतील मुला मुलींन चे भावविश्व काचेच्या पेल्या सारखे तडकणार आहे .,मुले आणि पालक डिप्रेशन मध्ये जाणार.काही डॉक्टर इंजिनियर CA होणार बाकी काय ?
Read 7 tweets
31 Jul
अलबेला 🌹
भगवान आबाजी पालव जन्म 1 ऑगस्ट 1913 अमरावती .वाचतांना किती साधे सरळ नाव वाटते ना ? दादर मध्ये वडील गिरणी कामगार म्हणून काम करत होते म्हणून यांचे बालपण पण मुंबईतच गेले .मध्यमवर्गीय कुटुंबातला हा आहे पहिला मराठी आणि हिंदी महानायक.हा होता 'शापित गंधर्व " प्रतिभेचे दान जरी
ईश्वराने पदरात टाकले तरी प्रारब्ध किंवा हाताच्या रेषांचे जाळे तुम्हाला त्यांनी आखून दिलेल्या रिंगणाबाहेर जाऊ देत नाही .भगवान दादा चे पण रिंगण वरतून आखून दिले होते दादर ची चाळ, चाळीतून जुहू चा समुद्र काठचा 20 खोल्यांचा बंगला ,आलिशान 8 दहा मोटारी उत्तुंग यश अमाप पैसा ,प्रसिद्धी
मग अपयश, घर दार गाड्या पैसा सर्व गायब आणि परत दादरची चाळ .लहानपणा पासून चित्रपटाची आवड वडील गिरणीत गेले की दादा परळ च्या स्टुडियोत चक्कर मारणार. एक मुकपट करून झाला ,दादा ला दिग्दर्शन करायची आवड एक दोन चित्रपट ही काढून झालेले.1951 मध्ये दादांनी बनवलेल्या "अलबेला " ने आयुष्याला
Read 13 tweets
30 Jul
संस्कार ठेवा रे 😡
अजित पवार आज म्हणाले ही महाराष्ट्र ची भाषा नाही पण हे तितके खरे नाही .खरे तर शिवराळ भाषा राजकारणात आणण्याचे श्रेय सेने कडे जाते .भुजबळांना मैद्याचे पोते ,पवारांना बारामती चा मल्ल , ही उपाधी बाळासाहेब यांनीच दिली .मागे फडणीस यांचा वारु मोकाट उधळत होता तेव्हा
छगन उठ कमळ बघ ,शरद कमळ घे असे हलके वक्तव्य करून हा वारसा सुरू केला .आज राणे न चे पोर म्हणतात हे भाडखाऊ सरकार आहे .ही भाषा नाही हे संस्कार आहेत.जनाब सेना ,सोनिया सेना ,जितृदिन आव्हाड, संघोट्या , टरबूज ,चम्पा , बोबड्या , फावड्या , पेंग्विन , धरण मुत्र्या, बेडूक .अरे काय लावलय काय
इतकीच खुमखुमी आहे ते सरळ आई बहिणीवरून शिव्या चालू करा ना .शिव्या पेक्षा ही खालची पातळी राजाकारण्यांनी धरली आहे,त्यात सर्व पक्षीय महिला पदाधिकारी पण चौखूर उधळल्या आहेत.मुख्य म्हणजे महिलांच्या अशा वक्तव्ये किंवा ट्विट ला हजारो लाईक करणारे त्यांचे चाहते आहेत. संजय राऊत यांनी शायरी
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(