#Thread
#ज्ञानेश्वरी_जयंती
-:अद्वैतामृतवर्षिणी भगवती ज्ञानेश्वरी जयंती :-
आज मराठी भाषेतील सर्वच पैलूने श्रेष्ठ ठरणारा ग्रंथ कुठला असा जर प्रश्न विचारला गेला तर याचे सर्वानुमते केवळ एकच उत्तर आहे तो ग्रंथ म्हणजे 'भगवती ज्ञानेश्वरी'.
१/
@Kal_Chiron @ShefVaidya @swamiyogeshji Image
कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मज्ञानाचा सागर,भक्तीचा रसकल्लोळ तर मराठी साहित्याचा अद्वितीय आविष्कार आहे.
केवळ संस्कृत भाषेच्या जाणकार लोकांमध्ये सीमित झालेले ब्रह्मज्ञानाचे भांडार ज्ञानेशांनी अगदी सामान्य लोकांना ज्ञानेश्वरीद्वारे खुले करून दिले व त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज
२/ Image
साधकांची 'माऊली' झाली..! आणि त्यानंतर मग जो अमृताचा वर्षाव सगळ्या महाराष्ट्र भूमीवर झाला की अगदी आजपर्यंत साधक लोक त्यात अखंड न्हाहून आपल्या जीवनाची इतिकृत्यता करून घेत आहेत.
योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी गलितगात्र झालेल्या अर्जुनाच्या निमित्ताने भगवद्गीतेचा साक्षात्कार अखिल
३/
विश्वास करून दिला आणि भगवद्गीता ही प्रस्थानत्रयी मध्ये समाविष्ट झाली. त्यानंतर होऊन गेलेल्या भगवान शंकराचार्यादि अनेक प्रभृतींनी यावर आपले भाष्य लिहिले व भगवंताने सांगितलेले गुह्यज्ञान लोकांना आपल्या आपल्या ज्ञानाच्या जोरावर पटवून सांगितले.महाराष्ट्रात भगवान ज्ञानेश्वर
४/
महाराजांचा अवतार झाला व त्यांनी केवळ वयाच्या १६ व्या वर्षी ९००० ओव्यांचा ज्ञानेश्वरीचा अमूल्य ठेवा आपल्याला दिला.पण शंकराचार्यादि आचार्यांच्या भाष्यांमधे व ज्ञानेश्वरीत मुख्यत्वे फरक असा आढळतो की यांनी केवळ गीतेचा मुख्य गाभा ब्रह्मज्ञान हा विषय धरून भाष्य केले आणि इथे आपल्याला
५/
ज्ञानेश्वर महाराजांचे वेगळेपण दिसून येते ते म्हणजे त्यांनी ब्रह्मज्ञान प्रतिपादित केलेच पण त्याबरोबर त्यांनी विविध अन्य विषयांवर देखील प्रकाश टाकला. जसे की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे संबंध,अर्जुनाचे व्यक्तित्व इत्यादी. त्याचबरोबर त्यांनी सगळ्या मराठी साहित्यालंकारांचा वापर
६/
इतक्या चपखलपणे केला आहे की वाचणाऱ्याला निश्चितच प्रश्न पडतो की हा ग्रंथ आध्यत्मिक आहे की साहित्यिक..!वाचकांना संबोधित करताना स्वतः ज्ञानेश्वर महाराज सांगतात की श्रोतेजन हो,
जैसें शारदीचिये चंद्रकळे| माजि अमृतकण कोंवळे|
ते वेंचिती मनें मवाळें| चकोरतलगें ||५६||
७/
तियापरी श्रोतां| अनुभवावी हे कथा|
अतिहळुवारपण चित्ता| आणूनियां ||५७||
हें शब्देंवीण संवादिजे| इंद्रियां नेणतां भोगिजे|
बोलाआधि झोंबिजे| प्रमेयासी ||५८||
जैसे भ्रमर परागु नेती| परी कमळदळें नेणती|
तैसी परी आहे सेविती| ग्रंथीं इये ||५९||
८/
कां आपुला ठावो न सांडितां| आलिंगिजे चंद्रु प्रकटतां|
हा अनुरागु भोगितां| कुमुदिनी जाणे ||६०||
ऐसेनि गंभीरपणें| स्थिरावलोनि अंतःकरणें|
आथिला तोचि जाणें| मानूं इये ||६१||
चांदणे हेच ज्याचे अन्न आहे असा चकोर पक्षी ही एक कविकल्पना.शरदऋतूतील स्वच्छ चांदणे पडले असताना ज्याप्रमाणे
९/
चकोराची पिले हे अमृतकण अतिशय हळुवारपणे हे कोवळे अमृतकण टिपतील त्याप्रमाणे अतिशय हळुवार अंतःकरणाने ही ज्ञानेश्वरी तुम्ही श्रोतेजन अनुभवा.
शब्दांशिवाय संवादण्याची, इंद्रियांना जाणू न देता भोगण्याची ही गोष्ट आहे. थेट सिद्धांतांनाच भिडण्याची अपेक्षा माऊली करताहेत.
जसे भुंगे हे
१०/
इतक्या हळुवारपणे कमळातील परागकण नेतात की त्या कमळाला पत्ताही लागत नाही त्याप्रमाणे श्रोत्यांनी अतितरलपणे या ग्रंथाचा अनुभव घ्यावा.
चंद्रविकासी कमळाची अजून एक उपमा माऊली देतात - चंद्र उगवला की हे कमळ फुलते जणू काही आपली जागा न सोडता ते जणू चंद्राला आलिंगन देते अशा अतिशय
११/
भावविभोर पद्धतीने, स्थिर अंतःकरणाने जो हे वाचेल (अनुभवेल) त्याच्याच हे सारं लक्षात येईल.
ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाल्यानंतर पुढील काळात ज्ञानेश्वरीत अनेक बदल झाले व तिची मूळ संरचना बिघडून गेली. त्यांनतर पैठणक्षेत्री संत एकनाथ महाराज होऊन गेले त्यांनी ज्ञानेश्वरीची
१२/
शुद्ध प्रत तयार केली व ती आजतागायत कायम आहे. ती शुद्ध प्रत भाद्रपद कृष्ण षष्ठीस अर्थात आज संपूर्ण झाली म्हणून आजचा दिवस 'ज्ञानेश्वरी जयंती' म्हणून साजरा करतात. एकनाथ महाराज ज्ञानेश्वरी विषयी सांगताना लिहितात,
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी ।कृपा करी हरी तयावरी ।।
१३/ Image
स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु।
श्रीगीता हा प्रश्नू अर्जुनेशी ।।
तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे ।
भय कळीकाळाचे नाही तया ।।
एका जनार्दनी संशय सांडोनी ।
दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी II
नामदेव महाराज ज्ञानेश्वरीचे वर्णन करताना लिहितात,
१४/
ज्ञानराज माझी योग्यांची माउली ।
जेणें निगमवल्लि प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ।
ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रुप ।
चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव।
भवार्णवीं नाव उभारिली ॥४॥
१५/
श्रवणाचे मिषें बैसावें येउनी ।
साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ।
एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥
याचे शेवटचे पद अत्यंत महत्वाचे आहे त्यात आपल्याला महाराज सांगतात की वाचक लोकांनी ज्ञानेश्वरीतील केवळ एक जरी ओवी अनुभवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा
१६/
आपले जीवन कृतार्थ होऊन जाईल.
तेंव्हा नामदेव महाराजांच्या सांगण्याचा विचार करून सगळ्यांना हीच विनंती की आपण जेवढं शक्य होईल तेवढं ज्ञानेश्वरीचे वाचन,श्रवण,मनन करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण या भवरुपी संसारातून सहज तरून जाऊ...!
राम कृष्ण हरी..!
@Aabhas24
@GaikwadAnkur

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा।

Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा। Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishwambharMule

8 Aug
#दीपअमावस्या
दीपसूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेजमुत्तमम्‌।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव।।
आज आषाढ वद्य अमावस्या. आजच्या अमावस्येला 'दीप अमावस्या' देखील म्हणतात. आपल्या सनातन धर्मात आपल्याला आपल्या कार्यात आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी
१/
काही ना काही व्यवस्था केलेली आहे. जसं की सूर्य आपल्याला पाणी प्रदान करतो म्हणून आपण दररोज जल 'अर्घ्य' देऊन त्याविषयी कृतज्ञता दाखवतो. त्याचप्रमाणे दीप हा आपल्याला प्रकाश प्रदान करतो, प्रत्येक जीवास 'तिमिरातून तेजाकडे' जाण्याची प्रेरणा देतो म्हणून ह्या विषयी कृतज्ञता व्यक्त
२/
व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस आहे.
आजच्या दिवशी घरातील सर्व समई नीरांजन वैगरे गोष्टी धुवून स्वच्छ केल्या जातात व नंतर त्याची पूजा केली जाते. आजच्याचं दिवशी समई निरांजन स्वच्छ करण्याचं व पूजा करण्याचं कारण हेच की उद्यापासून श्रावण महिना चालू होणार व
३/
Read 5 tweets
23 Jul
#Thread
#गुरुपौर्णिमा
श्रीगुरु आणि सद्गुरु :-
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस भारतवर्षात 'गुरुपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक जीवाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्व आहे. आज भारतातील दिव्य ज्ञानामृत केवळ आणि केवळ 'गुरू - शिष्य' परंपरारुपी
१/
#GuruPurnima2021
@ShefVaidya
गंगेतूनचं प्रवाहित होत होत आपल्यापर्यंत आले आहे.
भारतवर्षातील अनेक थोर ऋषीमुनींनी व संत मंडळींनी आपल्या दिव्यवाणीद्वारे गुरुमहिमा सांगितला आहे. त्यापुढे माझा हा लेख म्हणजे सूर्यप्रकाशासमोर एखाद्या पणतीच्या प्रकाशासारखे आहे. पण ह्या थोरामोठ्यांकडून जे
२/
काही मतीस कळाले ते मांडण्याचा प्रपंच इथे करत आहे.
आता महत्वाचा प्रश्न म्हणजे की 'गुरु' या शब्दाची व्याख्या काय? तर शास्त्रकारांनी गुरु ह्या शब्दाची व्याख्या अशी केली आहे की,
गुरु -
गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः।अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते ।।
३/
Read 16 tweets
11 Jul
#कालिदासदिन
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं । वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
आज "आषाढस्य प्रथम दिवसे" अर्थात आषाढाचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन..!
महाकवी कालिदासांनी आपल्या दिव्य काव्यप्रतिभेच्या जोरावर अनेक रचना करून संस्कृत
१/
@Kal_Chiron @ShefVaidya
भाषेला अधिकच सुंदर केले आणि समस्त रसिक लोकांना उपकृत केले.
"उपमा कलिदासस्य" ही उक्ती नेहमी सांगितली जाते ज्याचा अर्थ उपमा असावी तर कालिदासासारखी..!
आपण जर कालिदासाच्या काही रचनांवर ओझरती नजर जरी फिरवली तरी आपल्याला त्याचा प्रत्यय येईल..!
रघुवंशात कालिदास म्हणतात,
२/
क्व सूर्यप्रभवो वंशः क्व चाल्पविषयामतिः ।
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनाऽस्मि सागरम् ॥
अर्थात - कुठे तो सूर्यापासून उत्पन्न झालेला वंश आणि कुठे मी (कालिदास) त्यांचं गुणगान करण्याचा प्रयत्न करणारा अत्यंत अल्पमति. हे म्हणजे एखाद्या लहानशा नावेने मोठा सागर पार करण्याचे दिव्य
३/
Read 8 tweets
10 Jul
ही ऐतिहासिक स्थळे आपली उर्जाकेंद्रे आहेत..!
यातून ऊर्जा घेऊन आपण आपल्या कार्यात कार्यरत होऊन आपल्या राष्ट्राला एका नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो..!
ही स्थळे म्हणजे आपल्या दिव्य इतिहासाची व आपल्या थोर पुरुषांची साक्ष देतात. तेंव्हा ही स्थळे
१/
@Vinay1011 @malhar_pandey @HearMeRoar21
सुस्थित राहणे ही एका सशक्त राष्ट्राची गरज आहे.
पण खंत आज अशी आहे की आपल्या देशात आपल्या थोर राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांना कायम उपेक्षित ठेवून शासनाने केवळ आक्रमकांचा उदो उदो केला आणि ही सर्व दिव्य स्थळे दुर्दशेत गेली.
आता परिस्थिती बदलत आहे हे पाहून हायासे वाटते.
पण सगळा भार
२/
शासनावर का सोडायचा??
आपण पण प्रत्येक नागरिक या राष्ट्राचे आणि या थोर पुरुषांचे काही देण लागतो, तेंव्हा हाच विचार करून @Jhunj_Org ने श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या समाधीचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.
हे काम अत्यंत भव्य आहे कोणा एका व्यक्तीकडून हे पूर्ण होणारे नाही.
३/
Read 4 tweets
6 Jun
#थ्रेड
#शिवराज्याभिषेक_सोहळा
#हिंदू_साम्राज्य_दिवस
-:युगकर्ते शिवराय:-
साधारण तीनशे वर्षांपूर्वी या दिवशी सूर्य एक नवीन सकाळ घेऊन आला. तुम्ही म्हणाल की सूर्यासोबत दरोजचं सकाळ होते, मग या दिवसाच्या सूर्योदयात काय विशेष होते.? तर,आजच्या दिवसाचा सूर्य एक नवीन
१/
उषःकाल घेऊन आला होता तो म्हणजे स्वातंत्र्याचा. कारण ३०० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अभिषिक्त झाले आणि शेकडो वर्षांच्या म्लेंच्छ अत्याचारांपासून महाराष्ट्र मुक्त झाला.
महाराज छत्रपती झाले यात अनेक वीरांचे मोलाचे योगदान होते. स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेऊन
२/
हे मावळे स्वराज्यासाठी व महाराजांसाठी प्राणाची ही किंमत मोजायला तयार होते. आई भवानीच्या व भगवान रायरेश्वराच्या आशीर्वादाने महाराजांनी स्वराज्याचा उद्योग आरंभला व त्यानंतर पुढील काळात महाराजांनी आपल्या विश्वासू मावळ्यांसह अखंड अहोरात्र स्वराज्य चळवळ चालवली.
३/
Read 8 tweets
6 Jun
#Thread
#KnowYourDharma
#HinduDharma
The logic of 33 Koti (Crores) Devtas :-
Many a times people say we have '33 Koti' i.e. Crores of Devtas in our Hindu Dharma. So is it true? Do we really have that many Devtas in Hindu Dharma.
Technically speaking we have 33 Koti Devtas in
1/
in the Hindu Dharma but here the word 'कोटी (Koti)' does not mean crores.The word 'कोटी(Koti)' is a Sanskrit word,which has different meanings. In '33 Koti' the meaning of word 'Koti' is "प्रभेदाः" i.e 'Types' not crores. So there are 33 types of 'Devtas' mentioned in many
2/
scriptures of Sanatan Hindu Dharma. In 9th ब्राह्मण (Brahman) of Brihadaranyaka Upnishad, when Maharshi Yadnyavalkya is asked about 'how many devtas are there?' He answered,
3/
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(