गांधींचे राष्ट्रपितापण हे कुणाच्या मानण्या न मानण्यावर अवलंबून नाही आणि कुणाच्या मेहेरबानीने ते महात्माजींना मिळालेले नव्हते. शतकानुशतके अन्याय आणि शोषणामुळे अवनत झालेल्या करोडो भारतीयांच्या उत्थानाचा आशय गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडला.
अस्पृश्य, दलित, शेतकरी, कष्टकरी, महिला अशा सर्वानीच आपले उत्थान भारतीय स्वातंत्र्यलढय़ात पाहिले. सर्वाच्या दु:खांवर गांधींनी आपल्या करुणेची केवळ फुंकरच घातली नाही, तर त्यांच्यातील स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करून समतेवर आधारलेला राष्ट्रवाद गांधींनी उभा केला.
गांधीजींनी कृश आणि दुबळ्या हाताने मूठभर मीठ उचलले आणि एका बलाढय़, गौरवशाली साम्राज्याचा पाया खचून गेला. कारण कोटी कोटी भारतीय जनतेच्या तन-मन-धनाची प्रेरणा त्या कृश आणि दुबळ्या हातांत एकवटली होती. गांधींनी राष्ट्रही जागविले आणि नवा राष्ट्रवादही जागविला.
म्हणूनच सर्वच बाबतीत विभिन्नता असलेल्या देशात सर्वाना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समतेच्या संधी देणाऱ्या एका सेक्युलर संविधानाची, एका आधुनिक नव्या राष्ट्राची निर्मिती शक्य झाली. त्यामुळे गांधी राष्ट्रपिता ठरतात.
ईद का दिन था
सुबह-सुबह किसी ने टोका,“ईद मुबारक हो!”
मैंने कहा, “आपको भी ईद मुबारक हो!”
सवाल हुआ, “नमाज़ पढ़ने नहीं गए, “लेकिन स्वीमिंग करने जा रहे हो!”
मैंने कहा, “हां, मैं नहीं गया”
क्यूंकि मैं नाराज़ हूं उस ख़ुदासे जो ये दुनिया बना के भूल गया है
जो कहीं खो गया है या शायद सो गया है
या जिसकी आंखें फूट गई हैं
जिसे कुछ दिखा नहीं देता
कि उसकी बनाई हुई इस दुनिया में क्या-क्या हो रहा है
हां, मैं नाराज़ हूं
और तब तक मस्जिद में क़दम नहीं रखूंगा
जब तक गोरखपुर के बाबा राघव दास मेडिकल कॉलेज में मरे
उन तीस बच्चों की सांसें फिर से चलने नहीं लगतीं
जिनकी मौत अस्पताल में ऑक्सीजन की कमी से हुई थी
जब तक आयलन कुर्दी फिर से ज़िन्दा नहीं होता
जब तक दिल्ली की वो दो लड़कियां
सही सलामत वापस नहीं आतीं
जिन्हें जलते हुए तारकोल के ड्रम में
सिर्फ़ इसलिए डाला गया था
पर्यावरण संदर्भात भारत सरकार कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेऊन उद्योगपतींच्या फायद्यासाठी EIA च्या कायद्यामध्ये बदल करत आहे. त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे कृपया सर्वांनी वाचा आणि पर्यावरण वाचवण्यासाठी @Nirmiti4Change सोबत प्रयत्न करा...🙏🏻
EIA - Environmental Impact Assessment (पर्यावरणीय प्रभाव अभ्यास)
१५ मार्च २०२० ला सरकारने EIA कायद्यात बदल करण्यासंदर्भात माहिती जाहीर केली. लोकांची मते जाणून न घेणे आणि कोरोनाचा गैरफायदा घेऊन उद्योगपतींच्या फायद्याचे कायदे बनवणे हा मुख्य हेतू.
त्यासाठी सरकारने अंतिम मुदत ३० जून दिली होती. पण कोर्टाने ही मुदत वाढवून 11 ऑगस्ट केली आहे. तर हा EIA काय आहे आणि कायद्यातील कोणते बदल पर्यावरणासाठी घातक आहेत ते जाणून घेऊया...👇🏻
देशात आजही अनेकांना दलित आरक्षण संपावे असे वाटते. पण देशात दलितांची परिस्थिती कोणी जाणून घेत नाही. त्यांच्यावर होणारे अन्याय आजही थांबलेले नाहीयेत. उच्च जातीकडून दलितांवर होत असलेले अन्याय आणि त्यांची परिस्थीती आपण पाहू शकता..👇
National Family Health Survey Data अनुसार दलित महिलांचे सरासरी मृत्यू वय ३९.५ वर्ष इतके आहे. तर उच्च जातीतील महिलांचे हेच वय ५४.१ वर्ष इतके आहे. जवळ जवळ १४ वर्षाचा फरक आहे.
रस्ता, गटारी, Manholes, संडास वगैरे साफ करणाऱ्या एकूण सरकारी कर्मचाऱ्यांपैकी ९०% कर्मचारी आजही दलितच आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निम्मित मानाचा मुजरा...🙏🙏💐
शाहू महाराज यांच्या माहितीवर आधारित मालिका सुरू केली होती त्या मालिकेची लिंक दिली आहे ज्यांना शाहू महाराज समजून घ्यायचे असतील त्यांनी सर्व थ्रेड नक्की वाचा..👇🙂
छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांची शेवटची भेट...
"दीनदुबळ्यांच्या भवितव्यावरचा सर्चलाईट विझला..."
शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला दिलेला आश्रय‚ त्यांच्या जलशांना दिलेले उत्तेजन‚ ब्राह्मणेतर पक्षाची केलेली स्थापना आणि त्या माध्यमातून घेतलेला कायदे मंडळीच्या निवडणुकीतील सहभाग‚ अस्पृश्यता निवारणाचे कायदे‚ कुलकर्णी वतन बरखास्ती अशा एक ना दोन उपक्रमांमुळे
महाराज बहुजन समाजाच्या गळ्यातील ताईत बनले होते‚ तर ब्रह्मवर्गाचे नंबर एक शत्रू झाले होते. ब्रिटिश सरकारकडे त्यांच्याविषयी खोट्यानाट्या तक्रारी करण्यापासून ते त्यांच्या चारित्र्यहननाच्या कंड्या पिकविण्यापर्यंत सर्व शस्त्रास्त्रांचा वापर हा ब्रह्मवर्ग करत होता.
"राजर्षी शाहू महाराज" आणि "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांच्या उपस्थितीत झालेली प्रसिद्ध 'अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्णाची माणगाव परिषद...' 👇
माणगावच्या बहिष्कृत मंडळांनी
अस्पृश्य समाजातील उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणाचा म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्याचे ठरवले. या मंडळींचे जातीभेद मोडून काढून एकीने लढण्यासाठी परिषद घ्यायची असे ठरले. या चर्चेत खुद्द नाना मास्तर, गणू मसू सनदी, नागोजी यल्लापा कांबळे,
कृष्णा तुकाराम कांबळे, कृष्णाजी देवू, यमालिंगू, दत्तू सिंघ, कासीम मास्तर आदी कार्यकर्ते होते. मानगावच्या बहिष्कृत मंडळांनी शाहू महाराजांची भेट घेतली. महाराजांना आनंदच झाला. सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.एवढेच नव्हे तर मी स्वतःच डॉ. आंबेडकराना निमंत्रण देतो म्हणाले