निर्मोही
जुगारी 🌹🙏.
नाना माझ्या पेक्षा वयाने 10 एक वर्ष मोठा .सायकल च्या दुकानावर संपूर्ण सायकल असेंम्बल करणारा कारागीर .त्या काळी नवीनच कॅफे उघडले जात होते 30 रुपये तास .मी ऑफिसच्या कांमा करता नियमित एका कॉम्प्लेक्स मध्ये जायचो त्या कॅफे समोर नाना बसायचा,मळकट पायजमा
पांढरा शर्ट ,तोंडात बारा महिने बिडी .नाना सकाळीच दुकान उघडण्याचा वेळी हजर आणि चार वाजले की गायब .मला नंतर कळाले की नाना रोज दुपारनंतर पत्ते कुटायला क्लब वर जातो.कमावतो किती मग उडवतो किती हजार प्रश्न .एक दिवस एक बाई त्याला भेटायला दुकानावर आली .नाना चे आणि तिचे भांडण झाले.
मागून कळाले नाना ची बायको कधीच गेली पण या बाईबरोबर नाना रिलेशन मध्ये होता.मी रिकाम्या वेळी नाना बरोबर बोलत बसायचो पण त्याचे रेकॉर्ड ऐकून थोडा लांब राहायला लागलो आणि ते त्याच्या ही लक्षात आले होते. एक दिवस तोच बोलला सर तुम्ही बोलणे कमी केलंय आमच्या बरोबर ? .मी म्हटले नाही हो नाना
कम्पनी चे टेन्शन आहे थोडे बाकी काही नाही.एक आठवडा किंवा जास्त नाना गायब मी इंटरनेट कॅफे च्या मालकाला विचारलं का रे जुगारी दिसत नाही बरेच दिवस झालेत. अहो काका त्याचा बाप आलाय ना म्हणून गप्प बसलाय म्हातारा 🤔कोण रे ? त्याचा मुलगा आलाय न्युझिलँड वरून 🙄.C A आहे त्याचा मुलगा काका .
जुगाऱ्याचा मुलगा Bcom करतांना च C A झाला ,मग मुंबई ला दोन तीन वर्षे एक ऑफिस ला कामे केलीत मग परदेशात गेला.किती मुले रे ?हा एकच दिवटा आहे त्याला. मुलगा नेत नाही का रे त्याला परदेशात ? अहो काका तुम्ही मुलगा बघाल ना तर नाना ला शिव्या द्याल.जुगारी चे रंगढंग बरोबर नाही ना हो काका .
एक दिवस परत नाना कामावर हजर नमस्कार चमत्कार झालेत .मी दोन तीन दिवसांनी नाना ला आवाज दिला या हो नाना चहा घ्या. हात धुवून नाना आला.नाना एक विचारू का ? तुम्ही का नाही जात परदेशात की मुलगा नेत नाही ? अहो सर तो भांडण करतो विनवणी करतो चला म्हणतो बरोबर .पैसे पण खूप पाठवतो. एव्हढे तर
पाहिले बी नाही मी कधी .सर मी त्याला फक्त वह्या पुस्तका करता पैसे दिले .अभ्यास कधी घेतला नाही कधी विचारला नाही .तो त्याचा पास व्हयचा आणि शिकून मोठा झाला.नाना तुमचे हे बाकी कार्यक्रम माहीत का त्याला ? हो सर माहिती आहे त्याच्या मायवर गेला आहे काहीच तक्रार नसते त्याची.एकदा जाऊन या,
नको लाख भर पैसे वाया जातील भाड्यातोड्या त आणि जाऊन करू काय ? कोणी विचारले काय करता वडील तर पोराला संकटात टाकायचे का बाप सायकल दुकानावर आहे म्हणून ? अरे मग सोड काम आराम कर.नाही सर पोराच्या पैसे ला हात नाही लावत आपण.तुम्ही कधी बोलले नाही नाना मुलगा परदेशी आहे .नाही सर आपले छंद
शोकपाणी वेगळे ,कशाला गावभर सांगत फिरायचं माझा मुलगा परदेशात आहे म्हणून ? पोरग बदनाम नको व्हयला बापा मुळे .🤔मला आठवले पांढरपेशे'मुलाचा पासपोर्ट करायला जातील तर गावभर बातमी पसरवणारे नाहीतर कोणालाच सांगू नका आपला मुलगा परदेशी जातो आहे लोकांची नजर लागते म्हणून न सांगणारे सुशिक्षित.
बाळंतपण करायला परदेशात जाणाऱ्या मुलांच्या आई आणि वडिलांचा तोरा आणि कोतुक करणारे खोटारडे शेजारी पाजारी मध्यमवर्गीय .नाना ने बिडी काढली नवीन लायटर काढले ते काही चालू होईना 😂 शेवटी आगपेटी ने पेटवली आणि चहा वाल्याच्या अंगावर आगपेटी फेकली. पोरगा इतका शिकला पण याला लायटर लावयची
अक्कल नाही आली म्हणत सगळे नाना ची मजा करायला लागले .मी निघालो टू व्हीलर चालू केली सहज नाना कडे पाहिले .आपल्या सारख्या व्यसनी बापाची मुला च्या आयुष्यावर सावली पडू नये म्हणून कोणाला तो परदेशात आहे हे न सांगणारा ,सायकल रिपेअर करणारा बाप सांगताना पोराच्या मनाची घालमेल नको म्हणून
त्याचबरोबर कुठे ही ना जाणारा ,आपल्या सारख्याच हातावर पोट भरणाऱ्या दोस्ता न सोबत बिडी पिऊन मनमुराद हसणारा मनस्वी माणूस
एक
बाप
निर्मोही
जुगारी 🌹🙏.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Shekhar P

Shekhar P Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Godfath52464383

18 Sep
मवाली कुणिकडचे 😡🌑
कॉलोनी ,गल्ली ,सोसायटी चे आवार जवळचा चौक इथे ही प्रजाती हमखास सापडते. विचित्र रंगांनी आणि स्टाईल ने सजवलेली हेयरस्टाईल /कानात डुल कुठे बिकबाळी /हातात कडे/ पॅंट अतिशय घट्ट नाहीतर अर्धी फाटलेली काय तर फेशन आहे .टपरीवर उभे तोंडात सिगरेट ,भर पावसात गॉगल 😎
हे नेहमी बाईक वर ट्रिपल च बसणाऱ् ,सिग्नल वरच्या पोलिसाला जमले तर मुदाम हात दाखवून जाणार.26 जानेवारी ला चौकात रांगोळी घालून कुठूनतरी स्पीकर आणून देशभक्ती पर गाणे लावणार .रंगपंचमीला कपडे फाडून विद्युत तारांवर फेकणार.नुसता धांगडधिंगा आरडाओरडा मवाली कुणीकडचे .
तुम्ही टू व्हीलर
वरून जात असतात आणि ती बंद पडते ,किक मारून जीव जातो इकडे तिकडे बघतात ,स्वछ इस्त्री आणि पॉलिश केलेले बूट घालणाऱ्या कडे आशाळ भूत नजरेने मदत करतील म्हणून पाहतो तितक्यात एक मवाली येतो "काय झाले हो काका ? सरका बाजूला म्हणून गाडीचा ताबा घेतो काहीतरी खाड खुड करतो किक मारतो गाडी चालू
Read 12 tweets
15 Sep
🌹घाल घाल पिंगा वाऱ्या
माझ्या परसात 🌹🙏.
एक दिवस सांगावा येतो मुलगी पसंत आहे दिवाळीत तारिख निघतेय ,मग पाच महिन्यात लग्न आणि अल्लड वयातली मुलगी दोन नद्या आणि चार डोंगर सोडून तिच्या खटल्याच्या घरात माप ओलांडून संसारी होते.काल परवापर्यंत बाप रागावला की माय च्या पदराआड लपणारी ,
भावाबरोबर भांडणारी, हट्ट करून जे पाहिजे ते मिळवणारी ती अबोध आज कोणाच्या तरी घरची "सून " झालीय .दिवसभराच्या कामातून थोडा वेळ मिळाला म्हणून दुपारी परसातल्या धुणे धुवायच्या दगडावर थोडा वेळ विसावा घ्यावा म्हणून बसते. नदीपलीकडच्या माहेरच्या दिशेने वाऱ्याची झुळूक येते आणि माहेरच्या
वाऱ्या बरोबर जिवाभावाच्या गप्पा होतात आणि मग कृ ब निकुंभ यांच्या लेखणी तुन एक नितांत सुंदर कविता लिहिले जाते
💐
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात !
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊ साठी परी मन खंतावल !
विसरली का ग भादव्यात वर्ष झालं
Read 11 tweets
14 Aug
मंजुश्री सारडा 👈🙏
खून खटला एक चक्रव्युव्ह
In fact this is a case of circumstantial evidence 🙏
स्थळ पुणे .
मंजुश्री सारडा लग्न 11 फेब्रुवारी 1982 मृत्यू 11 जून 1982 .शरद बिरदी सारडा घरचा पिढीजात कापडाचा व्यवसाय ,शरद केमिकल इंजिनियरआणि भोसरी ला केमिकल ची फेक्टरी असलेला धनाढ्य
कुटुंबातील मुलगा ,मंजुश्री पण केमिस्ट ची डिग्री घेतलेली ,सुंदर ,सुस्वभावी आणि बरीच भावनाळू मुलगी.खरे तर लग्नानंतर चे एक वर्ष शब्दशः झोपाळ्या विना झुलायचे असते चोरट्या खाणाखुणा ,कुटुंबियांच्या लक्षात येऊ नये म्हणून केलेले कटाक्ष ,नजरेचे लाडिक खेळ आणि हवाहवासा वाटणाराचोरटा स्पर्श
पण हे सुख मंजुश्री च्या ललाटावर लिहिले नव्हते .फेब्रुवारी त लग्न झाले आणि नवरा बायको चतुश्रूंगी च्या जवळपास तक्षशिला अपार्टमेंट ला लगेचच रहायला गेले.आणि महिन्याभरात मंजुश्री चे पत्र तिच्या बहिणीला आणि मैत्रीणी ला आले.दिसते तसे नसते इकडे बरच वेगळे चित्र आहे.नवरा शरद ने त्याच्या
Read 13 tweets
12 Aug
अफगाणिस्तान 🙏.
अतिशय स्पष्ट शब्दात म्हणजे क्रिस्टल क्लियर असे म्हणतो त्या शब्दात बीडन ने अफगाणिस्तान ला सांगितलेकी त्यांना स्वतःकरता लढावेच लागेल.34 पैकी 9 राज्य तालिबान कब्जात आहेत.काबुल एक महिन्यात पडेल असा अंदाज आहे.भारताने बरीच गुंतवणूक केली आहे दुर्दैवाने तिची माती होणार.
जसे नशीब फुटके असते ना तसे या देशाचे नशीब खराब आहे.अमेरिका आणि रशिया हे दोन राहू केतू यांच्या हस्तरेषेत गेले 40 /50 वर्ष बसले आहेत.आज US ने सैन्य माघार घेतली आणि तालिबान ने 9 राज्ये घशात घातली.2 महिन्यात 90 हजार लोक बेघर झाली आहेत.एकाच वर्षात 4 लाख बेघर.या लोकांना मदत करण्यास Image
अडचण आहे.आजच जर्मनी आणि नेदरलँड ने मदत थाम्बवली आहे. अफगाण सैन्य तालिबानला शरण जात आहे.काबुल पासून 80 km वर च्या गांझी शहरात आज तालिबानी घुसले आहेत. अफगाण अर्थमंत्री देश सोडून गेले आहेत. बाकी पण त्याच मार्गावर आहेत.जवळजवळ 70 % अफगाणिस्तान तालिबान ने घेतला आहे. एक देश सोडून Image
Read 5 tweets
3 Aug
देवाक काळजी रे 😭
थोडा व्यक्त होतोय बाकी लोकांना ही विनंती आहे खास करून शिक्षण क्षेत्रात असलेल्या नि जरूर व्यक्त व्हा .मी जे अनुभवतो आहे ते लिहितोय .आज ना मुलांना ना त्यांच्या पालकांना निकालाची ना हुरहूर , ना उत्साह ,ना भीती ना उत्कंठा ,ना देवाचा धावा ना पेढ्यांचा गोडवा ,
हा सगळा निकाल अंतर्गत मूल्यमापन यावर आधारित खरे तर दीड ते दोन वर्षे अभ्यास, टेस्ट, परीक्षा हजेरी, निकाल सगळेच ऑनलाइन आहे .आज उत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थ्यांची आकडेवारी आणि टक्केवारी वाचाल तर डोळे पांढरे होतील एकूण 93435 विदयार्थी 90%
1350 विद्यार्थ्यांना 95% तर 46 विद्यार्थी
100% मिळवून आहेत.दहावी चे पण तेच आणि 12 वी चे ही तेच. लाखो मुले पास झाली आहेत आणि ही काही आनंदाची बातमी नाही .10 वि 12 विच्या पौगंडावस्थेतील मुला मुलींन चे भावविश्व काचेच्या पेल्या सारखे तडकणार आहे .,मुले आणि पालक डिप्रेशन मध्ये जाणार.काही डॉक्टर इंजिनियर CA होणार बाकी काय ?
Read 7 tweets
31 Jul
अलबेला 🌹
भगवान आबाजी पालव जन्म 1 ऑगस्ट 1913 अमरावती .वाचतांना किती साधे सरळ नाव वाटते ना ? दादर मध्ये वडील गिरणी कामगार म्हणून काम करत होते म्हणून यांचे बालपण पण मुंबईतच गेले .मध्यमवर्गीय कुटुंबातला हा आहे पहिला मराठी आणि हिंदी महानायक.हा होता 'शापित गंधर्व " प्रतिभेचे दान जरी
ईश्वराने पदरात टाकले तरी प्रारब्ध किंवा हाताच्या रेषांचे जाळे तुम्हाला त्यांनी आखून दिलेल्या रिंगणाबाहेर जाऊ देत नाही .भगवान दादा चे पण रिंगण वरतून आखून दिले होते दादर ची चाळ, चाळीतून जुहू चा समुद्र काठचा 20 खोल्यांचा बंगला ,आलिशान 8 दहा मोटारी उत्तुंग यश अमाप पैसा ,प्रसिद्धी
मग अपयश, घर दार गाड्या पैसा सर्व गायब आणि परत दादरची चाळ .लहानपणा पासून चित्रपटाची आवड वडील गिरणीत गेले की दादा परळ च्या स्टुडियोत चक्कर मारणार. एक मुकपट करून झाला ,दादा ला दिग्दर्शन करायची आवड एक दोन चित्रपट ही काढून झालेले.1951 मध्ये दादांनी बनवलेल्या "अलबेला " ने आयुष्याला
Read 13 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(