एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले. गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते. अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला आणि राधा शांतचित्त होती.
गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली "कसे आहात द्वारकाधीश ? जी राधा त्याला
'कान्हा' 'कान्हा' म्हणायची तिने "द्वारकाधीश" असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला,
"राधे, मी आज ही तुझा कान्हाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस …! खूप दिवसांनी भेटतो आहोत, एकमेकांशी सुख दुःखाच्या गप्पा मारू. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची तेव्हा तेव्ह
ा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती."
राधा म्हणाली " खरं सांगू ? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही. कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही. आणि माझ्या नजरेत तूच होतास त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून
जावू नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही. प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू?"
श्रीकृष्ण ऐकतच राहिले.
राधा म्हणाली "तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे, गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणाला कधीच भेटला नाहीस, तू खूप मोठा झालास, तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली.
पण ह्या प्रगतीमध्ये तुझी किती अधोगती झाली? यमुनेच्या पवित्र, गोड पाण्यानी तुझे आयुष्य सुरु झाले, त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी जावून पोहोचलास ( द्वारका समुद्रकिनारी होती/आहे ).
एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास पण दहा बोटांनी
वाजणाऱ्या बासरीला विसरलास? कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस?
कान्हा आणि द्वारकाधीश ह्यांत काय फरक आहे सांगू ….? तू कान्हा असतास तर तू सुदामाच्या
घरी गेला असतास, सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं!! प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे … 'युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो'. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही !! तू तर त्रैलोक्याचा स्वामी आहेस,
महान भगवद्गीता तू जगाला सांगितलीस पण तू स्वतः काय निर्णय घेतलास?
तू राजा होतास, प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू कौरवांना देवून टाकलेस? तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास, त्याचा मार्गदर्शक बनलास, ज्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्यासमोर मारून टाकले? तुझे सैन्य तुझी
प्रजा होती ना आणि प्रजा ही स्वतःच्या मुलांप्रमाणे असते ना? तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास !!
इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा? मग जा, पृथ्वीवर जावून बघ …. तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध. नाही सापडणार तुला शोधूनही !! जिथे जाशील तिथे
घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन.
"होय, कान्हा मला गीतेचे महत्व माहिती आहे. आजही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते. माणसं ही गीतेला पुज्य मानतात, पण ते भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारकानरेश श्रीकृष्णावर नाही, तर प्रेम करणाऱ्या
कान्हावर ठेवतात. गीतेमध्ये माझा - राधेचा - तर दुरून ही उल्लेख नाहीये, पण आजही लोकं गीतेचा- तुझ्या महान भगवद् गीतेचा- समारोप करताना 'राधेकृष्ण राधेकृष्ण' असाच जप करतात !!
हीच ती प्रेमाची खरी ताकद...!
लेखक: अज्ञात...🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
A star brat has been caught in a narcotics raid. Every one is happy. Including the brat and his parents.
The brat has got a lot of publicity. In BollyDawood, there's no bad publicity.
There are many who are already sympathizing with the young 23 year old 'victim', who is as innocent as the lamb that his father slaughters on Bakrid. When he gets bail today or tomorrow, he'll be booked by twenty film producers who would want to star him in their next
project to encash on the victim's current fame.
The father of the brat- whose career was sagging- will get a new lease of life- he's now become another victim of a totalitarian regime, when he's actually a distressed parent who's already in deep pain because his son went
लग्नानंतर प्रथमच माहेरी आलेल्या मुलीचे माहेरपण आठवडाभर चालले. सगळा आठवडा तिला हवं ते करण्यात सरला.
परत सासरी जातांना वडिलांनी तिला एक सुगंधी अगरबत्ती पुडा दिला. "जेव्हा सकाळी पुजेला बसशील तेव्हा ही अगरबत्ती लाव बेटा", असं आठवणीने सांगितले.
आई म्हणाली "असं अगरबत्ती देतं का कुणी, ती प्रथमच माहेरपण करून सासरी जाते आहे, काहीतरी मोठं द्यायला हवे होते "
तसं वडिलांनी खिशात हात घातला अन् असतील तेवढे पैसे तिच्या हातात दिले.
सासरी पोहचल्यावर सासुने सुनेच्या आईने दिलेल्या सगळ्या वस्तु बघितल्या. बाबांनी दिलेला अगरबत्ती पुडा बघुन नाक मुरडले.
सकाळी मुलीने अगरबत्तीचा पुडा उघडला. आत एक चिठ्ठी होती.
"बेटा ही अगरबत्ती स्वतः जळते, पण संपूर्ण घराला सुगंधी करून जाते.
पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...
टप्पा १:- १९५० ते १९७५
या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती.
सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक...
मोठे वाडे...
दांडगा रुबाब...
निसर्गावर चालणारी शेती...
अगदी १० वी-१२ वी शिकलेले सुद्धा शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले. तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळावायचे.
अनेक पदवीधर PSI, Dy. SP, तहसीलदार त्या काळात झाले.
नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...
उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती.
हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता.
टप्पा २:- १९७५ ते १९९५
देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली.
शेतीची विभागणी सुरु झाली, २० एकराचे मालक ५ एकरावर आले.
बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले.
कृष्ण अंधारात जन्माला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
एक बाप मुलाला म्हणाला, " आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ. "
मुलगा भिंतीवर चढला.
बाप म्हणाला, " आता खाली उडी मार. मी आज तुला मोठा धडा शिकवत आहे."
मुलगा घाबरला. दहा फूट खाली उडी मारायची हिंमत होत नव्हती.
बाप म्हणाला, " मार उडी. काळजी करू नकोस,
मी तुला झेलून घेईन."
मुलाने डोळे बंद केले आणि उडी मारली. बाप बाजूला निघून गेला. मुलगा धाडकन खाली आदळला. जोरात आपटला. बापाने मुलाला सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवून उडी मारायची चूक केलीस. म्हणून पडलास. डोळे उघडे ठेवून, तुझ्या बळावर उडी मारली असती तर काही झालं नसतं.