शेअर मार्केटमध्ये संभाव्य करेक्शनचं वारं वहात असताना, वैचारिक मार्केटमध्ये शेफाली वैद्यंच्या #NoBindiNoBusiness चा धुमाकूळ सुरु आहे. पुरोगामी विश्वाने ज्याप्रकारे हा झंझावात हॅन्डल केलाय त्यावरून त्यांच्यात कसलंही करेक्शन होण्याची अजूनही चिन्हं दिसत नसल्याचं सिद्ध झालंय.
१+
भारतातील सेक्युलर फ्रॅगमेंट तुटतोय, हिंदूंमध्ये असहिष्णुता वाढत जातीये म्हणून कळवळून उठणाऱ्या लोकांमध्ये "हे असं का घडतंय?" यावर विचार करून कसलंही कोर्स करेक्शन करण्याची कुवतच दिसत नाही.
२+
@ShefVaidya चांगल्या आहेत की वाईट, त्यांचं म्हणणं योग्य आहे की अयोग्य हे मुद्दे दुय्यम आहेत. त्यांच्या एका साध्या ट्विटला मिळणारा जोरदार प्रतिसाद, ऐतिहसिक दृष्ट्या इन्क्लुजिव्ह, ब्रॉड माईंडेड असणाऱ्या हिंदू समाजातील एका मोठ्या समूहाला त्यांचं म्हणणं पटणं, आवडणं आणि -
प्रचंड प्रमाणात उचलून धरावंसं वाटणं - हा कळीचा मुद्दा आहे. हे मी म्हणतोय म्हणून नव्हे. फॅक्ट्स तेच दर्शवतात - खुद्द शेफाली सुद्धा तेच म्हणतात. हे चूक असतं तर विविध ब्रॅण्ड्सनी गेल्या काही तासांमध्ये आपापल्या जाहिरातींमध्ये बदल केले नसते.
४+
एकट्या शेफारलींमुळे हे घडलं नाही. एका माणसामुळे हे घडतच नसतं.
म्हणूनच, हिंदू समाज एका "साध्या टिकलीमुळे" इतका उत्तेजित कसा काय होतोय, का होतोय - आणि - सर्वात महत्वाचं - तथाकथित पुरोगामी विश्वाला हे नकोसं असेल तर - हे कसं टाळायला हवं - हाच विचार महत्वाचा ठरतो.
५+
पण गेले ३-४ दिवस काय दिसतंय? हा विचार, हे मंथन घडतंय का? या संपूर्ण प्रकरणात पुरोगामी विश्वाचं वर्तन कसं राहिलंय?
भडकलेल्या हिंदूंना समजून घेण्याचा, त्यांचं म्हणणं ऐकण्याचा - त्यावर शांतपणे चर्चा करण्याचा अंश तरी दिसतोय का?
६+
अजिबात नाही. यांचा सगळा रोख सदर मुद्द्यावर एकमत असणाऱ्या सर्वांना खिजवणं, चिथवणं, मुर्खात काढण्याकडेच.
(बाय द वे - तुम्हाला एक कुणी माणूस आवडत नसेल तर त्याच्याशी चर्चा करू नका. पण हा ट्रेंड उचलून धरणारे हिंदू मात्र तुमचे शत्रू नाहीत ना? -
७+
की तुम्हाला आवडत नाही ते म्हणणं, ती बाजू उचलून धरणारे सगळे थेट शत्रू असतात तुमचे? हे फॅसिस्ट लक्षण वाटत नाही का?! असो.)
हे मतभेदाचा आदर वगैरे पोपटपंची करणाऱ्या गांधीवादी सोज्वळ सोवळ्यातल्या लोकांचं वर्तन आहे.
इथेच हिंदूंच्या भडकून उठण्याचं मूळ सापडतं.
८+
हिंदू आस्था, परंपरा, प्रथांच्या बाजूने बोलणाऱ्या प्रत्येकाला तुसडेपणाच्या वागणुकीला सामोरं जावं लागतं.फक्त भगवे कपडे परिधान केलेत म्हणून नाकं मुरडले जातात. सणवार उत्साहाने साजरे करणाऱ्यांना बावळट ठरवलं जातं.
९+
का? काय वाईट आहे आपली संस्कृती जपण्यात? त्याबद्दल बोलण्यात, त्या गोष्टी एन्जॉय करण्यात?
इथे मुस्लिम स्त्रियांच्या बुरखा परिधान करण्याबद्दल "दॅट्स हर चॉईस अँड राईट" छाप हास्यास्पद दुटप्पी वर्तन करण्याचा संदर्भही द्यायला नको. ते तर फारच पुढचं झालं.
१०+
हिंदूंनी हिंदू म्हणून आपली लक्षणं जपली तर तुमचं पोट का दुखावं? - इतकाच नि हाच विचार करा.
तुम्हाला ती लक्षणं "झुगारून" देण्याची जाहिरात करावीशी वाटते, त्यात मोठी क्रांती घडवून आणत असल्याचा अभिमान वाटतो, तसाच तीच लक्षणं मिरवणाऱ्याना अभिमान वाटूच शकतो.
११+
त्याला बुरसटलेले, मागास वगैरे म्हणा. तुमचा हक्क आहे तो. पण मग हिंदू पेटून का उठतो - याबद्दल वांझोट्या रडतराहू चर्चा करू नका.
हा आऊटरेज तुमचंच प्रोडक्ट आहे. तुमचंच कर्म आहे.
१२+
हिंदू सणांच्या निमित्ताने होणाऱ्या मोठ्या आर्थिक उलाढालीत तुम्हाला हिंदूंच्या खिशातील पैसे हवे असतील तर त्यासाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये त्याच हिंदू सणांचं प्रतिबिंब असावं : हे म्हणणं तुम्हाला इल्लॉजिकल वाटू शकतंच.
पण एका मोठ्या समूहाला ते म्हणणं पटत असेल तर -
१३+
आधी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन - त्यांना ते तसं का वाटतंय - हे समजून घेऊन - मग तुमचं म्हणणं शांतपणे समजावून सांगणं : हा मॅच्युअर्ड, प्रबोधनात्मक मार्ग झाला.
१४+
'शोले' मध्ये शंकराच्या मूर्तीमागे उभा राहून धर्मेंद्र विनोद करू शकला, तसं आज शक्य नाहीये, याचं दुःख कुरवाळत बसायचं - की - ही वेळ का आली - आपण कुठे चुकतोय - यावर विचार करत आत्मपरीक्षण करायचं?
अर्थात - तुमची चॉईस स्पष्टच आहे.
१५+
तुम्हाला विरोधी मताच्या सर्वांना मुर्खात काढून, शिव्या घालुन त्यांना दूर ढकलणं अधिक श्रेयस्कर वाटतं.
म्हणूनच तिकडे शेअर मार्केटमध्ये कितीही करेक्शन होऊ द्या, तुमच्यात वैचारिक करेक्शन होणं अशक्य आहे.
पैश्याने पैसा बनतो हे वाक्य सर्वांना माहितीये. पण त्या तत्वावर चालण्याची मानसिकता सिस्टिमॅटिकली डेव्हलप होत नाही.
आपण नोकरी करत असतो - ठराविक पगार मिळत असतो - तो वाढावा असं वाटत असतं - त्यासाठी अॅन्यूअल अप्रेजल किंवा नोकरी बदलणे हे २ पर्याय माहिती असतात - पण -
१+
अप्रेजल असो वा स्विच, कोणत्याही पर्यायातून मॅग्झिमम आऊटपुट मिळण्यासाठी पैसा खर्च करून करिअर ग्रोथ करण्याचा विचार कितीसा करतो आपण?!
प्रमोशन मिळवण्यासाठी माझ्यात कोणत्या स्किल्स हव्यात, त्या डेव्हलप करायला काय लागेल - इतकंच नाही, मला माझं अपियरन्स सुधारावं लागेल का?
२+
चकचकीत रहावं लागेल का? बाकी सगळं सोडा - फक्त चटकदार इंग्रजी येत नाही म्हणून मी अडकलोय - मग इंग्रजी शिकायला जरा पैसे खर्च करावेत का?
हा विचारच करत नाही आपण.
एमबीएत कॉलेजात आलेल्या पहिल्याच कंपनीत जॉब मिळाला. छान पॅकेज होतं.
३ महिन्यांनी वर्ष संपणार.
२०२२ च्या सुरुवातीला नव्याने संकल्प वगैरे घेतले जातील.
यावेळी उलटा गेम खेळता येऊ शकतो.
अर्थात, जीवनाबद्दल सिरीयस असणाऱ्या लोकांनाच.
१+
२०२२ सुरु व्हायच्या आत कायकाय साध्य करता येऊ शकतं हे आत्ताच ठरवता येऊ शकतं. पेनडायरी हातात घेऊन माईलस्टोन्स आखता येऊ शकतात.
टार्गेट्स भव्य असणारेत. उण्यापुऱ्या ३ महिन्यांत हर्क्युलिस होता येत नसतंच. पण हर्क्युलिस होण्याकडे वाटचाल सुरु होऊन एक पल्ला नक्कीच गाठता येऊ शकतो.
२+
कोणत्या सेलिब्रिटीच्या घरात नेमकं काय घडलंय, कोणत्या राजकीय पक्षात कोणतं नवं वादळ उभारलंय, बिग बॉस मध्ये काय होतंय - मोदी ठाकरे सध्या काय करताहेत (आणि जोडीला उकडीचे की तळलेले!) या सर्व गदारोळात पर्सनल डेव्हलपमेंट -
सिंह दरबारातली एकेक प्रकरणं संपवत होता. या दोघांचं प्रकरण समोर आलं.
"महाराज, गवत निळं आहे ना?" गाढवाने किंकाळत विचारलं.
"हो, गवत निळं आहे." सिंह म्हणाला.
"महाराज! हा वाघ माझं ऐकतच नाहीये! गवत हिरवं आहे असं रेटून बोलतोय! त्यामुळे मी माझं मानसिक स्वास्थ्य हरवून बसलोय...
२+
माझी बदनामी झालीये...याला कठोरात कठोर शिक्षा द्या महाराज!" गाढव वदलं.
"बरोबर आहे. वाघाला उद्या सकाळपासून पुढील ५ वर्षे कुणाशीही नं बोलण्याची - पूर्ण मौनात राहण्याची - शिक्षा फर्मावण्यात येत आहे!" सिंहाने गर्जून निर्वाळा दिला, दरबार पुढील प्रकरणाकडे सरकला.
"थिंक पॉझिटिव्ह" ही "सक्सेस टिप्स"च्या यादीतील सर्वात कॉमन टिप. आत्मविश्वास असला की यश मिळतंच! - असं सांगितलं जातं.
वास्तवात यश मिळवण्यासाठी "पात्रता" हा मूलभूत निकष असतो.
१+
स्वतःत क्षमता असूनही पुढे जाण्याची भीती वाटत असेल तर सकारात्मक विचार महत्वाचा. ही स्टेप टू किंवा थ्री किंवा फोर झाली. स्टेप वन किंवा स्टेप झिरो नव्हे!
फक्त स्वतःवर विश्वास आहे म्हणून परीक्षेत मार्क्स मिळत नाहीत.
सेंच्युरी मारता येत नाही.
धंदा यशस्वी करता येत नाही.
२+
त्यासाठी क्षमता विकसित कराव्या लागतात. प्लॅन आखावा अन काटेकोरपणे पाळावा लागतो.
त्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून किंवा हे सगळं करूनही पुढे जाण्यास कचरत असाल - तर मग सकारात्मक विचार इंधन म्हणून वापरायला हवा.