✍️✍️
एव्हाना रोज रोज हाताला सॅनिटायझर लावून लावून थकायला झालं होतं. तोंडाला मास्क लावून गरम श्वास घेऊनही कंटाळा आला होता. दिवसभर लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही, आजूबाजूचं रोजचं जग आणि मनातली घुसमट घेऊन मी जगत होतो. नाविन्यपूर्ण असं काही नव्हतं. जणू वेड्यासारखे झटकेच येत होते मला.👇👇👇👇
मनातली सल बोलून दाखवावी असं जवळ कोणी नव्हतं. ज्यांना सांगावं ते मित्र मस्करी करायचे. बरं हे सगळं मनात साठवून साठवून आत्मविश्वास कमी होत होता. का जगतोय आपण? कशासाठी जगतोय? हे अनेकप्रश्न मनाला सतावत होते. अशा जगण्याचा कंटाळा आला होता. फायनली ठरवलं उद्या शनिवार आहे.
उद्या तिच्या सोबत बाहेर पडूयात. हो हो तीच ती जिचा माझा जवळपास एक वर्ष संपर्क नव्हता. ना फोन, ना मेसेज, ना भेट, ना तिचा आवाज ऐकला! तरीही भेटण्याची ओढ किंचितशीही कमी झाली नव्हती. घाबरत घाबरतच मी तिला मेसेज केला. उद्या भेटुयात का? त्यावर क्षणाचाही विलंब न करता तिकडून हो उत्तर आलं.
माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला स्थळ जागा कळवलं आणि सकाळी ७ वाजता भेटुयात हे सांगून मी झोपी गेलो. पहाटे ६ वाजता लवकर उठून सगळं आवरलं आणि मस्तपैकी नवे कोरे कपडे घालून टापटीप अवतारात मी बाईकवर निघालो. एक वर्षाने तिला मला पाहता येणार होतं. डोळे भरून तिला पहायचं, ऐकायचं आणि
स्वतःत सामावून घ्यायचं हे माझं सगळं ठरलं होतं. तिने बोलावलेल्या ठिकाणावर मी पोहोचलो. लांबूनच तिला पाहिलं. पांढरा शुभ्र ड्रेस परिधान करून ती आली होती. काय गोड दिसत होती त्यात ती. रंग गोरा, काळेभोर केस, गुलाबी ओठ पांढऱ्या ड्रेसवर अधिक खुलून गेले होते. थेट एक वर्षाने भेट घडली होती.
दुरावा, गैरसमज, भांडण हे सगळं आज मिटवायचं आणि तिला लग्नासाठी मागणी घालायची. हे मी मनोमन ठरवून आलो होतो. मला पाहताच ती माझ्याजवळ आली. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर ती खुलून दिसत होती. कोणाचीही नजर लागू नये म्हणून तिच्या डोळ्यातल्या काजळाला मी हात घालून ते हळूच तिच्या गालावर लावलं.
ती स्मितहास्य करत होती. माझ्या ह्या कृतीने ती लाजून लाजून चुर चुर झाली होती. मला वाटलं वर्षभर भेट नाही, मेसेज नाही, फोन नाही ती खुप चिडली असेल राग राग करेल, प्रश्न उत्तरे विचारेल, इथूनच भांडायला सुरुवात करेल पण तसं काही नव्हतं. ती अतिशय सौम्य आणि आनंदी वाटत होती.
ती बाईकवर बसली आणि आम्ही निघालो. आभाळ भरून आलं होतं. सिमेंट काँक्रीटचं जंगल सोडून आम्ही लोणावळ्याच्या दिशेने डोंगर दऱ्याकडे हिरवळीकडे सरकू लागलो. अधून मधून पावसाचा हलकासा शिडकावा पडत होता. त्यात आम्ही भिजत होतो. गाडी जसजशी पुढे सरकत होती. तसतसं ती मला बिलगून बसली.
त्या एका क्षणात वर्षभरातला सगळा दुरावा, राग, वाद विवाद सगळं सगळं संपुष्टात आल्यासारखं वाटलं. ती खुप खुश होती तिचे केस हवेशी खेळत होते. तिची ओढणी वाऱ्याला साद घालत होती. प्रवास सुरु होता एव्हाना गाडी लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचली. बाईक पार्क करून आम्ही आजूबाजूच्या डोंगरदऱ्या
न्याहाळू लागलो. दोन हात लांब करून दीर्घ श्वास घेत शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये मी मोकळा श्वास घेतला. इतके दिवस सॅनिटायझर आणि मास्कच्या जगापासून दूर येऊन मी मोकळेपणाने जगत होतो. खुप छान वाटत होतं. ती मला न्याहाळत होती. आम्ही निघालो लोहगड चढू लागलो. पायऱ्या चढताना तिचा हात मी हातात
घेतला. पाऊस जोरात बरसू लागला. आम्ही भिजत भिजत लोहगडाच्या पायऱ्या चढू लागलो. तिने डोक्यावर ओढणी घेतली होती. आता ती अधिकच मोहक दिसू लागली होती. माझी नजर तिच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. या क्षणाला तिला पहावं आणि कायमच पहात रहावं इतकी सुंदर दिसत होती ती. भिजत भिजत आम्ही लोहगडावर आलो.
लोहगड धुक्यात हरवला होता. अगदी जवळच अस काहीच दिसत नव्हतं. जिकडे पहावं तिकडे पहावं धुकं आणि फक्त धुकं. जोरदार सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी अगदी एखाद्या चित्रपटातला रोमँटिक सिन असं वातावरण होतं.
थंडीने तिच्या अंगावर शहारा फुटला होता. पावसाचा जोर वाढला. भिजतच आम्ही गड सर केला.
ती थंडीने कुडकुडत होती. तिचे दात वाजत होते. तो आवाज माझ्या कानात घुमत होता. ती सकाळीपासून काहीच बोलली नव्हती. आताही बोलत नव्हती पण ती खुश मात्र नक्की होती. तिच्या मनात काय चाललंय याचा अंदाज मला येत नव्हता. कदाचित गेल्या वर्षभरातल्या दुराव्यामुळे ती अस वागत असावी असं मला वाटलं.
पावसाचा जोर वाढला आम्ही भिजत भिजत गडावरून खाली उतरलो आणि मग रिसॉर्टच्या दिशेने निघालो. ती गप्प गप्प होती. ती कधी संवाद साधतेय याची वाट मी पाहत होतो पण ती मात्र निशब्द होती. रिसॉर्ट आलं तिकडे बुकिंग दाखवून आम्ही आत प्रवेश केला आणि आमच्या रूम मध्ये आलो.
एव्हाना संध्याकाळचे ६ वाजले होते. रूममधला हिटर चालू केला त्याने वातावरण गरम झालं. इतक्यात वेटर कॉफी घेऊन आला. बाहेर पाऊस नयनरम्य वातावरण होतं. ते पाहत आम्ही दोघांनी बाल्कनीत बसून कॉफी घेतली आणि जेवणाची ऑर्डर केली. जेवण ८ वाजता येणार होतं. तो पर्यंत आम्ही रिसॉर्ट फिरायचं ठरवलं.
मग तिचा हात हातात घेऊन मी आणि ती जोडीने फिरू लागलो. मला तिच्याशी बोलायचं होतं. मला तिला ऐकायचं होतं पण जणू ती अबोल राहण्याची शपथच घेऊन आली असावी. ती बोलायला तयार नव्हती पण खरं सांगू आम्ही चालत असतांना त्या निरव शांततेतही दोघांच्या मनात मनमोकळा संवाद सुरू होता. दोन तास कसे गेले
कळालं नाही. त्या दोन तासातही ती काहीच बोलली नाही. तिचा आवाज ,एक शब्द ऐकायला मी तरसून गेलो होतो. दिवसभर सोबत असूनही ती एकदाही माझ्याशी बोलली नव्हती. हे मला फार अस्वस्थ करत होतं. मी कमालीचा अस्वस्थ होतो. वेटरने आम्हांला जेवणासाठी हाक दिली. शेकोटी जवळच टेबल लावून त्यांनी जेवण वाढलं.
आम्ही जेवायला बसलो. वातावरण थंड होतं. त्यात शेकोटीच्या ज्वाळा आम्हांला धीर देत होत्या. मी तिला घास भरवला तिनेही तो आश्चर्यचकित होऊन आनंदाने स्वीकारला. तेव्हा तिचा हसलेला चेहरा मला द्विगुणित आनंद देऊन गेला. आता रात्र झाली होती. रातकिडे किरकर करू लागले. बेडकं डराव डराव करू लागली.
पाऊस संथपणे पडत होता. आम्ही रूममध्ये आलो. तिथे मी लपवून ठेवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या. ती स्वतःला आरशात न्याहाळताना गुपचूप तिच्या अंगावर टाकल्या. ती दचकली आणि पाकळ्या आणि गुलाब पाहून ती खळखळून हसू लागली. रूममध्ये अंधार झाला होता. ती माझ्या फार जवळ आली. दोघांच्यातलं अंतर कमी झालं.
दोघांच्या हृदयाची धडधड वाढली. श्वासांचा जोर वाढला. दोघांचे डोळे एकमेकांच्या डोळ्यात बुडाले. ओठ जवळ जवळ येऊ लागले. मला दरदरून घाम फुटला होता. मी थरथरत होतो. मनात गुदगुल्या होत होत्या. मी पुढे सरकण्यासाठी पुढाकार घेतला.
इतक्यात मी बेडवरून खाली कोसळलो. पाहतो तर काय मी घरीच होतो.
शनिवार उजाडला होता. मी तिला रात्री केलेल्या मेसेजला रिप्लाय आलाच नव्हता. मोबाईलची स्क्रीन लॉक झाल्यावर मी पुन्हा मोबाईल अनलॉक केला. माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवर तिचाच तो पांढऱ्या रंगाच्या ड्रेस मधला फोटो होता आणि फोटोच्या खाली. छोट्या अक्षरात तिचा मृत्यू दिनांक लिहिला होता.
मी भानावर आलो. कोरोना झाल्यामुळे ती हे जग सोडून कायमची निघून गेली. हे माझ्या लक्षात आलं. मी रात्री स्वप्नात तर होतो पण मला नेहमीप्रमाणे आलेला तो वेडेपणाचा झटका होता.
स्वप्नात येऊनही ती माझ्याशी काहीच बोलली नाही. हे शल्य मला जास्त टोचत होतं.आता असंच जगावं लागणार हे मनाने स्वीकारलं
पुन्हा सकाळी सगळं आवरलं. हातावर ईच्छा नसताना नेहमीप्रमाणे सॅनिटायझर फवारलं. तोंडाला जबरदस्तीने मास्क चढवलं आणि लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही आणि मनाच्या घुसमटीला घेऊन खिन्न मनाने व्यथित होऊन मी पुन्हा माझ्या विश्वात रमायला तयार झालो.
समाप्त
✍️✍️
चार महिन्यांपूर्वीची गोष्ट. मी ऑफिसला जात होतो. गाडी चालवत होतो.एक महिला माझ्याविरुद्ध दिशेने गाडी घेऊन येत होती. ती माझ्याकडे खुप कुतूहलाने पाहत हसत होती. कोणीतरी अनोळखी महिला माझ्याकडे का पाहतेय? चेहऱ्यावर काही लागलयं का? म्हणून आरशात पाहत होतो इतक्यात समोरून👇👇👇👇
एक गाडी आली आणि मला जोरदार धडक दिली. मला भानावर यायला अगदी १० मिनिटे लागली. लोक धावले त्यांनी माझी मदत केली. सगळं स्थिरसावर व्हायला मला वेळ लागला. पण या सगळ्या गडबडीत त्या महिलेचा चेहरा काही डोळ्यासमोरून जात नव्हता. मी ऑफिस मध्ये पोहचलो. जखमांवर मलम लावायला सुरुवात केली.
तशा जळजळत असलेल्या जखमा थंड होऊ लागल्या. डोळे बंद करून खिडकीतून बाहेर दिसत असलेला हिरवागार निसर्ग मी न्याहाळत होतो. इतक्यात वीज चमकावी तशी अगदी त्याच गतीने ती महिला मला पुन्हा आठवली. आता बंद डोळ्यानेच तिचा चेहरा मला स्पष्टपणे दिसत होता आणि मला धक्काच बसला.
✍️✍️
नियतीने मागच्या जन्मी न जुळू दिलेल्या नात्याची रेशीमगाठ पुन्हा जुळवण्यासाठी नियती या जन्मात एक संधी देते. असा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच माझ्याही आयुष्यात आला
ते साल असावं २०१३. मला नोकरीमुळे ऑफिसमधून बाहेर जावं लागतं असायचं. याच प्रवासात काय घडलं? वाचा हा धागा👇👇👇
एक दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर मला कळालं की उद्या मला ताम्हिणी घाटाखाली असलेल्या विळे बागाड एमआयडीसी मध्ये जायचं आहे. हे अंतर ऑफिसपासून १०० किलोमीटर. अडवळणी घाटरस्ता त्यामुळे प्रवासाला किमान अडीच तास लागणार हे मी गृहीत पकडलं होतं. दुसरा दिवस उजाडला ड्रायव्हर मला घ्यायला घरी आला.
आम्ही निघालो वाटेतचं माझा एक सहकारी होता. त्यालाही सोबत घेतलं. प्रवास सुरु झाला. ताम्हिणी घाट म्हणजे निसर्गाने नटलेल्या आणि हिरवाईने भरून पावलेल्या निर्मनुष्य रस्त्याचा प्रवास. प्रवास सुरु होता तसं डोक्यात नेहमीप्रमाणे विचारचक्र सुरू झालं होतं.
आम्ही कामाच्या ठिकाणी पोहचलो.
तिची आठवण रोजचं येते पण #ValentinesDay ला जरा जास्तच. हो, मी तिच्याचंबद्दल लिहितोय. माझ्या आयुष्यातली 'ती'. असं म्हणतात प्रेमाला वयाचं बंधन नसतं. मला पहिलं प्रेम झालं मी इ.१० वीत असताना माझ्यापेक्षा ५ वर्षांने मोठ्या असलेल्या मुलीशी. पुढे काय झालं वाचा या धाग्यात.
👇👇👇👇👇👇👇
मी दहावीत होतो. प्रेम वगैरे काही कळत नव्हतं पण आयुष्यात एक वळण येतं जिथे काहीही कळत नसताना तुम्ही अनावधानाने पाय घसरून पडता एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात. माझ्याबाबतीत असंच झालं. मी दहावीत होतो तसा सगळ्यांच बाबतीत हुशार. थोडक्यात ऑल राऊंडर मग शाळेतही 'आपलीच हवा'.
दिवस मस्त चालू होते. अभ्यास,खेळणं, बागडणं, धम्माल, मज्जा,मस्ती जे तुम्ही आम्ही सगळे करायचो तेच. आमच्या शाळेत मुली नसायच्या फक्त मुलांची शाळा होती. त्यामुळे शाळेत 'मुली' हा शब्द आम्हांला विस्मयकारी वाटायचा. एक दिवशी सहज कानावर पडलं.
सांगलीत गेल्यावर तिथली परिस्थिती पाहिल्यावर आता या पुढे सांगली-कोल्हापूर मध्ये काय हवं ? काय नको? मदतीचं स्वरूप कसं असावं? याबद्दल माझी मतं लिहितोय. तुमचीही मतं या धाग्याखाली मांडा.
आता पूरग्रस्त क्षेत्रात अन्नाचा पुरवठा मुबलक प्रमाणात व सुरळीत होतोय.
आपलं प्राधान्य आता👇👇👇👇
अन्न-धान्य, डाळी, कडधान्ये हे तेथील सेवाभावी संस्थांना देण्यात यावं. त्याचे उत्तम जेवण बनवून ते पुरग्रस्तांना रोजचं पोहोचवत आहेत. त्यामुळे आपोआपच जेवणाचा प्रश्न सुटतोय. पुढे महत्वाचं पिण्याचे पाणी. अजूनही लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे त्यावर भर द्यावा.
पाण्याची खरी गरज आता शाळेत वास्तव्यास आणलेल्या लोकांना नसून पूर ओसरताच घरी गेलेल्या साफसफाईत दंग असलेल्या लोकांना आहे. त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांची मदत करणं आणि त्यांना पिण्याचं पाणी पोहचवणे आवश्यक आहे. मदतीसाठी येणाऱ्या साहित्य, अन्न धान्य, खाऊ घेऊन येणाऱ्या लोकांनी आधीच