#हलालोनॉमिक्स : #हलालचे धार्मिक आयाम! #थ्रेड#Thread
ज्यांचे स्वप्नच भारतावर राज्य करायचे आहे, ते सरकारकडून एक मागणी पूर्ण झाली की, शांत न बसता पुढची मागणी करत आहेत. त्यातच शरीयत आधारित इस्लामिक बँक भारतात चालू करण्याची मागणी चालू झाली; मात्र पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या
सरकारने ही मागणी फेटाळून लावली. बँक स्थापन करण्यासाठी सरकारी अनुमती लागते; मात्र कोणताही ग्राहक संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा लाभ घेऊन त्याच्या धर्मानुसार संमत साहित्य आणि पदार्थ यांचा आग्रह धरू शकतो. याच्या आधारे मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध
अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.त्यासाठी ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’ घेणे अनिवार्य बनले. याद्वारे इस्लामी अर्थव्यवस्था, म्हणजे ‘हलाल इकॉनॉमी’ धार्मिकतेच्या आधारावर असूनही अतिशय चातुर्याने निधर्मी भारतात लागू करण्यात आली! आश्चर्य म्हणजे निधर्मी भारतातील
रेल्वे, एअर इंडिया यांच्यासारख्या सरकारी आस्थापनांतही हलाल अनिवार्य करण्यात आले. देशात केवळ १५-१८ टक्के असणार्या अल्पसंख्य मुसलमान समाजाला इस्लामनुसार संमत हलाल मांस खायचे आहे, म्हणून उर्वरित ८५ टक्के जनतेवरही ते लादण्यात येऊ लागले. आता तर हे हलाल प्रमाणपत्र केवळ
मांसापुरते मर्यादित न राहता,खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था, मॉल यांसाठीही चालू झाले. इस्लामिक देशांत निर्यात करणार्यांसाठी तर ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’ बंधनकारकच बनले आहे. या हलाल अर्थव्यवस्थेने विश्वभरात दबदबा निर्माण केला असून तिने भारताच्या
अर्थव्यवस्थेइतका, म्हणजे २ ट्रिलीयन (१ ट्रिलीयन म्हणजे १ वर १२ शून्य – १००० अब्ज) डॉलर्सचा टप्पाही गाठला आहे. जेव्हा समांतर अर्थव्यवस्था उभी राहते, तेव्हा देशाच्या विविध यंत्रणांवर त्याचा परिणाम निश्चितच होतो. येथे तर धर्मावर आधारित एक समांतर अर्थव्यवस्था उभी राहत आहे.
त्यामुळे तिचा निधर्मी भारतावरही निश्चित परिणाम होणार आहे. या दृष्टीने भविष्यात याचा स्थानिक व्यापारी, परंपरागत उद्योग करणारे यांना, तसेच अंतिमतः राष्ट्राला काय धोका संभवतो, याचा विचार करणे आवश्यक आहे. हा विचार समजून घेण्यासाठीच या लेखाचे प्रयोजन आहे.
१. हलाल म्हणजे काय ?
‘हलाल’ या अरबी शब्दाचा अर्थ आहे, इस्लामनुसार वैध, मान्यता असलेले; तर याच्या विरुद्ध अर्थी शब्द आहे, ‘हराम’ म्हणजेच इस्लामनुसार अवैध/निषिद्ध/वर्जित असलेले. ‘हलाल’ हा शब्द प्रामुख्याने खाद्यान्न आणि द्रवपदार्थ यांच्या संदर्भात वापरला जातो.
इस्लामी कायद्यांनुसार ५ ‘अहकाम’ (निर्णय किंवा आज्ञा) मानल्या आहेत. त्यात फर्ज (अनिवार्य), मुस्तहब (अनुशंसित, शिफारस), मुबाह (तटस्थ), मकरूह (निंदात्मक) आणि हराम (निषिद्ध) यांचा समावेश आहे.‘हलाल’ संकल्पनेत पहिल्या ३ किंवा ४ आज्ञांचा समावेशाविषयी इस्लामी जाणकारांमध्ये मतभेद आहेत.
‘हलाल’ शब्दाचा मुख्य वापर मांस मिळवण्यासाठी पशूहत्या करण्याच्या संदर्भात केला जातो.
अ. यात मुख्यतः कुर्बानी करणारा (कसाई) इस्लामी कायद्याचे पालन करणारा, म्हणजे मुसलमान असला पाहिजे.
आ. ज्या प्राण्याला हलाल करायचे आहे, तो निरोगी आणि सुदृढ असला पाहिजे.
इ. त्याला मोकळ्या वातावरणात ठेवले पाहिजे.
ई. त्याला मारतांना (जबिहा करतांना) अगोदर इस्लामी रितीनुसार ‘बिस्मिल्लाह अल्लाहू अकबर’ म्हटले पाहिजे.
उ. गळ्यावरून सुरी फिरवतांना त्या प्राण्याचे मुंडके मक्केतील काबाच्या दिशेने केलेले असले पाहिजे.
ऊ. त्यानंतर धारदार सुरीने प्राण्याची श्वासनलिका, रक्त वाहून नेणार्या धमन्या आणि गळ्याच्या नसा कापून त्या प्राण्याचे संपूर्ण रक्त वाहून जाऊ दिले पाहिजे.
ए. या प्राण्याला वेदना होऊ नयेत; म्हणून अगोदर विजेचा झटका देणे किंवा बधीर करणे निषेधार्ह मानले गेले आहे.
पाश्चात्त्य देशांत यामुळे हलाल करण्याला अमानवी मानले जाते; मात्र इस्लामनुसार हलाल मांसच ग्राह्य आणि पवित्र मानले जाते. त्यामुळे आज गैरइस्लामी देशांतही ७० ते ८० टक्के मांस हे हलाल पद्धतीने; म्हणजे वरील निकषांचे पालन करूनच मिळवले जाते.
केवळ मासे आणि समुद्रात मिळणारे जलचर यांच्यासाठी हलाल पद्धत आवश्यक नाही. सध्याच्या काळानुसार हलाल आणि हराम लक्षात येण्यासाठी सोपे नियम बनवण्याकडे कल आहे.
२. ‘हलाल’मध्ये मांसासह समावेश होणारे अन्य पदार्थ
अ. दूध (गाय, मेंढी, बकरी, उंट यांचे)
आ. मध
इ. मासे
ई. नशा न आणणार्या वनस्पती
उ. ताजी, तसेच सुकवलेली फळे
ऊ. काजू-बदाम आदी सुकामेवा
ए. गहू, तांदूळ आदी धान्ये
३. हराम, म्हणजेच इस्लामनुसार निषिद्ध असणार्या गोष्टी
त्यात प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश होतो.
अ. डुक्कर, रानडुक्कर, त्यांच्या प्रजातीतील प्राणी आणि त्यांच्या अवयवांपासून बनवले जाणारे जिलेटिन सारखे अन्य पदार्थ
आ. तीक्ष्ण नखांचे पंजे असणारे आणि टोकदार सुळे असलेले हिंस्र मांसाहारी प्राणी-पक्षी, उदा. सिंह, वाघ, माकड, नाग, गरुड, गिधाड इ.
इ. ज्यांना मारणे इस्लामनुसार निषेधार्ह आहे, उदा. मुंगी, मधमाशी, सुतार पक्षी इ.
ई. भूमी आणि पाणी या दोन्हींवर राहणारे उभयचर प्राणी, उदा. मगर, बेडूक इ.
उ. गाढव आणि खेचर, तसेच सर्व प्रकारचे विषारी प्राणी
ऊ. गळा दाबून किंवा डोक्यावर आघात करून मारलेले प्राणी, तसेच नैसर्गिकरित्या मेलेले प्राणी आणि त्यांचे अवशेष
ए. मानव किंवा पशू यांच्या शरिरातील पोकळीतून बाहेर पडणारे रक्त, मल-मूत्र
ऐ. विषारी, तसेच नशा आणणार्या वनस्पती
ओ. अल्कोहोलचा समावेश असणारे पेय, उदा. दारू, स्पिरिट, सॉसेजेस
औ. विषारी, तसेच नशा आणणारी पेये आणि त्यांपासून बनवलेले पदार्थ, रसायने
अं. ‘बिस्मिल्लाह’ न म्हणता गैरइस्लामी पद्धतीने बळी दिलेल्या पशूचे मांस
या सूचीतून इस्लामनुसार हलाल आणि हराम काय आहे, हे स्पष्ट झाले असेल.
यासंदर्भात कुराणाचा आदेश असल्याने आणि हराम पदार्थ खाल्ल्याने पाप लागत असल्याने, तसेच मृत्यूनंतर दंडित व्हावे लागेल, या भीतीने मुसलमान हलाल अन्नाचा आग्रह धरतात.हलाल पदार्थ बनवतांना त्यात हराम मानले गेलेल्या एखाद्या घटकाचाही समावेश केल्यास ते अन्न हलाल राहत नाही.
त्यामुळे सर्वच देशांत हलाल मांस मोठ्या प्रमाणात उपलब्ध केले जाते. आज भारत गैरइस्लामी देश असूनही भारतातून निर्यात होणारे बहुतांश मांस हे हलाल पद्धतीचेच असते. हलाल मांस असल्याची निश्चिती नसल्यास मुसलमान व्यक्तीने संबंधितांवर धर्मभ्रष्ट केल्याचे खटले प्रविष्ट करून मोठमोठ्या
आस्थापनांना कोट्यवधी रुपये हानीभरपाई म्हणून देण्यास भाग पाडले आहे. यामुळेही ‘हलाल’ संकल्पनेला महत्त्व आले आहे.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (Food Safety and Standards Authority of India – FSSAI)
या, तसेच महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासन (Food and Drugs Administration – FDA) या विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थांशी संबंधित सर्व प्रकारच्या अनुमती देण्याचे अधिकार या विभागाच्या अंतर्गत येतात. त्यासाठी विविध प्रकारच्या पूर्तता कराव्या लागतात.
त्यात जागेच्या
रचनेपासून ते आग प्रतिबंधक व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन या सर्व गोष्टींची पूर्तता करावी लागते.
त्यासाठी शुल्कही आकारले जाते. एकीकडे संबंधित प्रमाणपत्र देणारी सेक्युलर शासनाची व्यवस्था असतांना हलाल प्रमाणपत्र देण्याची अनुमती खासगी इस्लामिक धार्मिक संस्थांना का देण्यात आली आहे?
हलाल संकल्पनेतील आणखी एक महत्त्वाचे सूत्र समजून घेतले पाहिजे की, एखाद्या उत्पादनाला हलाल प्रमाणित करणे आणि एखाद्या उपाहारगृहाला हलाल प्रमाणपत्र देणे हे दोन्ही वेगवेगळे आहे.
उत्पादनाला हलाल प्रमाणित करतांना केवळ त्या उत्पादनाचा संबंध येतो, उदा. हलाल मांसाचे प्रमाणपत्र घेतांना ते मांस हलालच्या नियमांनुसार असायला हवे; मात्र एखाद्या मांसाहारी उपाहारगृहाला हलाल प्रमाणपत्र हवे असल्यास त्या उपाहारगृहात अल्कोहोल, स्पिरीट यांचे मिश्रण असलेल्या कोणत्याही
घटकाचा वापर किंवा विक्री करता येणार नाही. तेथील मांस तर हलाल हवेच, त्यासह तेल, मसाल्याचे पदार्थ, खाद्य रंग, चवीसाठीचे घटक, तांदूळ, धान्य सर्वकाही हलाल प्रमाणित असले पाहिजे. यामुळे हलाल प्रमाणपत्राच्या आधारे मांसासह या अन्य पदार्थांचा व्यवसायही अन्य उद्योजकांकडून बळकावला जात आहे.
हलाल मांसापासून चालू झालेली हलाल व्यवसायाची संकल्पना वेगाने व्यापक होऊ लागली आहे. हलालच्या संकल्पनेत स्थानिक स्थितीनुसार पालट केले जात असल्याने
काही वर्षांपूर्वी हराम मानल्या जाणार्या गोष्टी आज हलाल ठरवल्या जात आहेत.जसे काही वर्षांपूर्वी नमाजासाठी अजानची हाक हा पवित्र ध्वनी मानून ध्वनीक्षेपक यंत्राचा वापर करून अजान देणे हे ‘हराम’ मानले जात होते; मात्र इस्लामच्या प्रसाराच्या दृष्टीने ध्वनीक्षेपक यंत्र साहाय्यक ठरू शकते,
हे लक्षात घेऊन ते नंतरच्या काळात स्वीकारण्यात आले.अशाच प्रकारे इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी जुन्या नियमांची जोड-तोड करून हलाल संकल्पना व्यापक करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी शृंगार (मेकअप) करण्याला हराम मानले जात होते; मात्र आता सौंदर्यप्रसाधनांना हलाल ठरवण्यात येत
इस्लामिक बँक आणि हलाल अर्थव्यवस्था यांत भेद नाही. दोन्ही एकाच इस्लामी विचारांवर आधारित आहेत. इस्लामी अर्थसाहाय्यावर हलाल उत्पादने बाजारात आणली जात आहेत.
शरीयत कायद्यानुसार व्याज घेण्यास प्रतिबंध असल्याने त्या मान्यतेनुसार इस्लामिक बँकेची रचना करण्यात आली. मलेशियामध्ये वर्ष १९८३ मध्ये ‘इस्लामिक बँकिंग अॅक्ट’नुसार ‘इस्लामिक बँकिंग अॅण्ड फायनान्स’ (IBF) ही बँक चालू झाली. ही बँक धार्मिक परंपरांवर आधारित असल्याने
तिला भारतासारख्या अनेक गैरइस्लामिक देशांत मान्यता मिळाली नाही.हलाल उत्पादने पूर्वीपासून वापरात होतीच. वर्ष २०११ मध्ये मलेशियाच्या सरकारने स्थानिक वाणिज्य मंत्रालयाद्वारे ‘हलाल प्रॉडक्ट इंडस्ट्री’ (HPI) चालू केली. वर्ष २०१३ मध्ये क्वालालंपूर येथे ‘वर्ल्ड हलाल रिसर्च’ आणि