इस्लामिक बँक आणि हलाल अर्थव्यवस्था यांत भेद नाही. दोन्ही एकाच इस्लामी विचारांवर आधारित आहेत. इस्लामी अर्थसाहाय्यावर हलाल उत्पादने बाजारात आणली जात आहेत.
शरीयत कायद्यानुसार व्याज घेण्यास प्रतिबंध असल्याने त्या मान्यतेनुसार इस्लामिक बँकेची रचना करण्यात आली. मलेशियामध्ये वर्ष १९८३ मध्ये ‘इस्लामिक बँकिंग अॅक्ट’नुसार ‘इस्लामिक बँकिंग अॅण्ड फायनान्स’ (IBF) ही बँक चालू झाली. ही बँक धार्मिक परंपरांवर आधारित असल्याने
तिला भारतासारख्या अनेक गैरइस्लामिक देशांत मान्यता मिळाली नाही.हलाल उत्पादने पूर्वीपासून वापरात होतीच. वर्ष २०११ मध्ये मलेशियाच्या सरकारने स्थानिक वाणिज्य मंत्रालयाद्वारे ‘हलाल प्रॉडक्ट इंडस्ट्री’ (HPI) चालू केली. वर्ष २०१३ मध्ये क्वालालंपूर येथे ‘वर्ल्ड हलाल रिसर्च’ आणि
‘वर्ल्ड हलाल फोरम’ यांच्या अधिवेशनात हलाल अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडण्यात आली. त्यातून ‘हलाल प्रॉडक्ट इंडस्ट्री’ (HPI) आणि ‘इस्लामिक बँकिंग अॅण्ड फायनान्स’ (IBF) यांच्यात समन्वय साधून त्यांना बळ देण्याचे निश्चित करण्यात आले.
याचा इतरत्र प्रसार करण्यासाठी खासगी गुंतवणुकीद्वारे
‘सोशल अॅक्सेप्टेबल मार्केट इन्व्हेस्टमेंट (SAMI) हलाल फूड इंडेक्स’ चालू करण्यात आला. अशा प्रकारचा हा जगातील पहिला प्रयत्न होता. त्याला प्रतिसादही मोठा मिळाला.
५. हलाल अर्थव्यवस्थेला धार्मिक आधार !
हलाल अर्थव्यवस्थेविषयी कुराण या इस्लामी धर्मग्रंथात कुठेही स्पष्ट उल्लेख नाही; मात्र त्यात ‘कोणत्या गोष्टी हलाल आहेत’, तर ‘कोणत्या हराम आहेत’, यांचा उल्लेख आढळून येतो. कुराणातील ५६ आयतींमध्ये ‘हलाल’ शब्दाचा उल्लेख आलेला आहे, तर २१ आयतींमध्ये
आहाराच्या संदर्भात उल्लेख आहे.‘हदीस’ ग्रंथामध्येही हलालचा विविध प्रकारे कसा वापर केला जाऊ शकतो, याचा उल्लेख आलेला आहे. यांत ‘हराम पदार्थ घेतल्यास किती पाप लागेल आणि किती दंड होईल ?’, याचा उल्लेख आहे.याच्या आधारे सध्याच्या इस्लामिक जाणकारांनी हलाल अर्थव्यवस्था उभी करण्याचा आणि ती
मुसलमानांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न चालू केला आहे.
६. हलालद्वारे जागतिक स्तरावरील बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न !
हलाल उत्पन्नाची मूळ संकल्पना शेतापासून ग्राहकापर्यंत होती. त्यात उत्पादन करणार्यापासून ते ग्राहकापर्यंतची साखळीच निर्माण केलेली होती. ज्या वेळी हलाल अर्थव्यवस्थेचा विचार वाढू लागला,
तेव्हा ‘शेतापासून ग्राहकापर्यंत आणि त्यातून अर्थनियोजन’ करण्याचा विचार मांडला जाऊ लागला.HSBC (बहुराष्ट्रीय गुंतवणूक अधिकोष) अमाना मलेशियाचे कार्यकारी अधिकारी रेफ हनीफ यांनी स्पष्टपणे म्हटले की, जर आपल्याला हलाल अर्थव्यवस्थेकडे पाऊल टाकायचे असेल, तर आपण व्यापक विचार केला पाहिजे
आणि अर्थनियोजनापासून ते उत्पादनापर्यंत संपूर्ण साखळी हलाल करण्याचा प्रयत्न करायला हवा.हलाल उत्पादनांतून लाभ मिळवायचा आणि तो नफा इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वृद्धीसाठी वापरायचा, तसेच इस्लामिक बँकेतून हलाल उत्पादने बनवणार्यांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून द्यायचे आणि जागतिक
स्तरावरील बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करायचा. असे केल्यामुळे संपूर्ण साखळीवर त्यांचे नियंत्रण राहिल्याने इस्लामिक बँकेच्या स्थितीत लक्षणीय पालट झाला. बँकेच्या संपत्तीत वर्ष २००० मधील ६.९ टक्क्यांवरून वर्ष २०११ मध्ये २२ टक्के इतकी वृद्धी झाली. ‘हलाल इंडस्ट्री’ आज जगभरात
सर्वाधिक वेगाने मोठी होणारी व्यवस्था बनलेली आहे. थोडक्यात म्हणजे इस्लामच्या आधारे ‘हलाल इंडस्ट्री’ आणि हलाल अर्थव्यवस्थेच्या आधारे ‘इस्लामिक बँक’ मोठी मोठी बनत चालली आहे.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (Food Safety and Standards Authority of India – FSSAI)
या, तसेच महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासन (Food and Drugs Administration – FDA) या विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
खाद्यपदार्थांशी संबंधित सर्व प्रकारच्या अनुमती देण्याचे अधिकार या विभागाच्या अंतर्गत येतात. त्यासाठी विविध प्रकारच्या पूर्तता कराव्या लागतात.
त्यात जागेच्या
रचनेपासून ते आग प्रतिबंधक व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन या सर्व गोष्टींची पूर्तता करावी लागते.
त्यासाठी शुल्कही आकारले जाते. एकीकडे संबंधित प्रमाणपत्र देणारी सेक्युलर शासनाची व्यवस्था असतांना हलाल प्रमाणपत्र देण्याची अनुमती खासगी इस्लामिक धार्मिक संस्थांना का देण्यात आली आहे?
हलाल संकल्पनेतील आणखी एक महत्त्वाचे सूत्र समजून घेतले पाहिजे की, एखाद्या उत्पादनाला हलाल प्रमाणित करणे आणि एखाद्या उपाहारगृहाला हलाल प्रमाणपत्र देणे हे दोन्ही वेगवेगळे आहे.
उत्पादनाला हलाल प्रमाणित करतांना केवळ त्या उत्पादनाचा संबंध येतो, उदा. हलाल मांसाचे प्रमाणपत्र घेतांना ते मांस हलालच्या नियमांनुसार असायला हवे; मात्र एखाद्या मांसाहारी उपाहारगृहाला हलाल प्रमाणपत्र हवे असल्यास त्या उपाहारगृहात अल्कोहोल, स्पिरीट यांचे मिश्रण असलेल्या कोणत्याही
घटकाचा वापर किंवा विक्री करता येणार नाही. तेथील मांस तर हलाल हवेच, त्यासह तेल, मसाल्याचे पदार्थ, खाद्य रंग, चवीसाठीचे घटक, तांदूळ, धान्य सर्वकाही हलाल प्रमाणित असले पाहिजे. यामुळे हलाल प्रमाणपत्राच्या आधारे मांसासह या अन्य पदार्थांचा व्यवसायही अन्य उद्योजकांकडून बळकावला जात आहे.
हलाल मांसापासून चालू झालेली हलाल व्यवसायाची संकल्पना वेगाने व्यापक होऊ लागली आहे. हलालच्या संकल्पनेत स्थानिक स्थितीनुसार पालट केले जात असल्याने
काही वर्षांपूर्वी हराम मानल्या जाणार्या गोष्टी आज हलाल ठरवल्या जात आहेत.जसे काही वर्षांपूर्वी नमाजासाठी अजानची हाक हा पवित्र ध्वनी मानून ध्वनीक्षेपक यंत्राचा वापर करून अजान देणे हे ‘हराम’ मानले जात होते; मात्र इस्लामच्या प्रसाराच्या दृष्टीने ध्वनीक्षेपक यंत्र साहाय्यक ठरू शकते,
हे लक्षात घेऊन ते नंतरच्या काळात स्वीकारण्यात आले.अशाच प्रकारे इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी जुन्या नियमांची जोड-तोड करून हलाल संकल्पना व्यापक करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी शृंगार (मेकअप) करण्याला हराम मानले जात होते; मात्र आता सौंदर्यप्रसाधनांना हलाल ठरवण्यात येत
#हलालोनॉमिक्स : #हलालचे धार्मिक आयाम! #थ्रेड#Thread
ज्यांचे स्वप्नच भारतावर राज्य करायचे आहे, ते सरकारकडून एक मागणी पूर्ण झाली की, शांत न बसता पुढची मागणी करत आहेत. त्यातच शरीयत आधारित इस्लामिक बँक भारतात चालू करण्याची मागणी चालू झाली; मात्र पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या
सरकारने ही मागणी फेटाळून लावली. बँक स्थापन करण्यासाठी सरकारी अनुमती लागते; मात्र कोणताही ग्राहक संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा लाभ घेऊन त्याच्या धर्मानुसार संमत साहित्य आणि पदार्थ यांचा आग्रह धरू शकतो. याच्या आधारे मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध
अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.त्यासाठी ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’ घेणे अनिवार्य बनले. याद्वारे इस्लामी अर्थव्यवस्था, म्हणजे ‘हलाल इकॉनॉमी’ धार्मिकतेच्या आधारावर असूनही अतिशय चातुर्याने निधर्मी भारतात लागू करण्यात आली! आश्चर्य म्हणजे निधर्मी भारतातील