आयटीसीसारखी बलाढ्य कंपनी आपल्या प्रॉडक्टसच्या पॅकेजिंगवर किती बारीक लक्ष देते याचं एक उदाहरण.
परवा फ्लाईटमध्ये आयटीसीच्या 'बी नॅचरल' ब्रँडचा ज्यूस घेतला. ज्यूस संपवल्यानंतर साहजिकच रिकाम्या बाटलीवरील डिटेल्सवर लक्ष गेलं. तेव्हा आयटीसीच्या पॅकेजिंगमागील कल्पकता लक्षात आली. #ITC
Use the alphabets from the blanks to know that B Natural is made with 100% _ _ _ _ _ N fruit, 0% concentrate.
गोष्ट तशी छोटी आणि साधी. पण आयटीसीच्या पॅकेजिंग विभागाने यातही कल्पकता पणाला लावलेली दिसते. साहजिकच ज्युसची बाटली वापरणारा माणूस ह्या रिकाम्या जागा भरून त्यातून 'इंडिया' हा शब्द तयार करणार. #म#मराठी#ITC
त्या निमित्ताने आयटीसीने वापरकर्त्याला ज्यूस पिता पिता किंवा संपवल्यावर का होईना गुंतवून ठेवलं आहे. हे वाचून मनुष्य स्वभावाला अनुसरून तो माणूस बाटलीवरील इतरही डिटेल्स वाचू शकेल. पुढे जाऊन आयटीसीच्या इतर प्रॉडक्टसवरसुद्धा अशी काही माहिती शोधण्याचा प्रयत्न करेल. #म#मराठी#ITC
मोठे ब्रॅंडस फक्त विक्री करून नफा कमवून मोठे होत नाहीत तर अशा अशा छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊन पुढे जात असतात. इतर ब्रॅंडसच्या अशा काही गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा. #म#मराठी#ITC#Paisapani
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
इतकी वर्ष तुम्ही खात असलेली किटकॅट चॉकलेट नसून वेफर आहे.
किटकॅट खाल्ली नाही असा माणूस भारतात शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. 'हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट' ही त्यांची टॅगलाईन आजही अनेकांच्या ओठांवर असते. बऱ्याच जणांनी आयुष्यभराच्या आणाभाका या किटकॅटच्याच साक्षीने घेतल्या होत्या.
मात्र १९९९ मध्ये याच किटकॅट मुळे एक मोठा वाद निर्माण झाला होता. एवढा की किटकॅट बनवणार नेस्ले कंपनी थेट कोर्टात गेली होती.
त्यांनी किटकॅट हा वेफरचा प्रकार असून त्यावर फक्त चॉकलेटचं कोटिंग आहे असं सांगत किटकॅटला १०% टॅक्स ब्रॅकेटमध्ये बसवलं.
टॅक्सवाले लोकसुद्धा लेचेपेचे नव्हते. त्यांचं म्हणणं होतं, 'किटकॅट हे चॉकलेट आहे ज्याच्या आतमध्ये वेफर आहे.' त्यामुळे त्याला २०% टॅक्स लागला पाहिजे. #म#मराठी
एलआयसीला जेव्हा तोटा होतो...
अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्या यांची सध्याची स्थिती सगळ्यांनाच माहीत आहे. त्याबद्दल काही न बोललेलं बरं. मात्र त्यांची एक कंपनी अशी आहे की जी बुडाल्याने स्वतः अनिल अंबानी यांच्यापेक्षा दुसऱ्या एका कंपनीचा जास्त मोठा तोटा होणार आहे. #म#मराठी#एलआयसी
ती कंपनी म्हणजे रिलायन्स कॅपिटल आणि यामध्ये तोटा होणार आहे तो म्हणजे भारतातील सर्वात मोठी इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कंपनी एलआयसीचा. कसा?
एलआयसीचा रिलायन्स कॅपिटलमध्ये २.९८% स्टेक आहे. या आकडेवारीनुसार ते रिलायन्स कॅपिटलमधील सगळ्यात मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ठरतात. #म
स्वतः अनिल अंबानी यांच्याकडे कंपनीचा १.५१% स्टेक आहे. रिटेल इन्व्हेस्टर्सकडे कंपनीचे एकूण ५७.५३% शेअर्स आहेत.
रामकृष्ण रेड्डी चिंता यांच्याकडे कंपनीचा २.१६% स्टेक आहे तर ते डायरेक्टर असलेली कंपनी आरकेआर इन्व्हेस्टमेंटकडे १.४३% स्टेक आहे. #म#मराठी#अंबानी#रिलायन्सकॅपिटल#एलआयसी