Finally Spider'boy' became Spider'Man' - The Best MCU film!
No way home चा जेव्हा ट्रेलर आलेला तेव्हा हा सिनेमा बघायचाच यामागे २ च कारणं होती एक म्हणजे यातल्या ऑक्टोपसची एन्ट्री आणि एकंदर multiverse ही कॉन्सेप्ट,
बाकी यात आणखीन कोण कोण दिसणार आहे याबाबत तर तेव्हापासूनच सॉलिड चर्चा होतीच, पण मी खरंच सांगतो सध्याच्या काळातला हा पहिला स्पायडरमॅन मुव्ही आहे जो खूप mature आहे. टेक्नीकली तर ही फिल्म बाप आहेच यात काहीच वाद नाही पण खासकरुन टॉम हॉलंडच्या स्पायडरमॅनला ज्याप्रकारे या सिनेमात डेव्हलप
केलंय त्याचं कौतुक व्हायलाच हवं, ही खरी जादू असते कथेची, पटकथेची, पात्रांची. VFX, स्पेशल इफेक्ट हे तर महत्वाचं असतंच पण या सगळ्या गोष्टी सेकंडरी असतात हे आपल्याइथे फार कमी लोकांना माहीत असतं, तुमचं कथानक केवढं स्ट्रॉंग आहे, त्यातली characters लोकांना किती आपलीशी वाटतात हे जास्त
महत्वाचं असतं आणि नेहमीप्रमाणेच MCU च्या या फिल्ममध्येसुद्धा सॉलिड ऍक्शनसोबत एक अफलातून कथानक बघायला मिळतं आणि ते बघताना आपण भारावून जातो, डोळ्यात पाणी येतं, आणि स्पायडरबॉयचा स्पायडरमॅन झाल्याचं बघून खरंच खूप बरं वाटतं!
टॉम हॉलंडच्या स्पायडरमॅनला जेव्हा सिव्हिल वॉरमध्ये introduce केलं तेव्हा वाटलं होतं की ह्याला का घेतलंय? कारण आजवरच्या स्पायडरमॅन कॅटेगरीमधला टॉम हॉलंड हा सर्वात बालिश स्पायडरमॅन होता, असं नाही की tobey किंवा andrew चे स्पायडरमॅन हे खूप mature होते, पण एका
घटनेनंतर त्यांच्यातला बदल हा आपल्याला प्रकर्षाने जाणवलेला, आणि तसाच टर्निंग पॉईंट या फिल्ममध्ये येतो आणि इतके दिवस बालिश वाटणारा टॉम हॉलंड शेवटच्या काही फ्रेम्समध्ये खूपच mature वाटायला लागतो, अर्थात यालाही कारणीभूत "with great powers comes great responsibility" हे वाक्यच ठरतं
आणि तीच तर खरी स्पायडरमॅनची ओळख आहे. फक्त यामध्ये uncle ben ऐवजी aunt may हे बाळकडू पीटरला देते आणि तिथूनच टॉम हॉलंड खरा स्पायडर'मॅन' बनतो, पर्सनली माझी जनरेशन ज्याप्रमाणे tobey च्या स्पायडरमॅनच्या प्रेमात होती तशी सध्याची पिढी ही टॉम हॉलंडच्या स्पायडरमॅनच्या प्रेमात पडेल
खासकरुन हा No way home पाहिल्यावर. खरंतर इतके दिवस टॉम ऐवजी andrew बरा होता असं म्हणणारा मीच आज टॉम हॉलंडचा फॅन झालोय हेही नसे थोडके.
बाकी या सिनेमाविषयी काय बोलू, म्हणजे आजवरची ही पहिली फिल्म असेल ज्यात हिरो बरोबरच व्हिलनची एन्ट्रीसुद्धा
तेवढीच सेलिब्रेट केली जात होती. ऑक्टोपस, लिझर्ड, ग्रीन गोबलिन, इलेक्ट्रो, सँड मॅन सगळ्यांना बघून थिएटरमध्ये नुसता कल्ला सुरु होता, शिवाय तिन्ही spiderman ची एंट्री आणि त्यांचे धमाकेदार सीन्स, एकमेकांमधले धम्माल डायलॉग्स आणि ऍक्शन बघताना अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं राव, खासकरुन
जेव्हा आपला tobey येतो तेव्हा तर खरंच आमचं बालपण आमच्यासमोर उभं असल्यासारखं वाटत होतं. बाकी डॉक्टर स्ट्रेंजच्या mirror dimension मधले ऍक्शन सीन्स आणि त्यामागचं बॅकग्राऊंड स्कोर आठवलं तरी अंगावर शहारे येतात म्हणजे निव्वळ अशक्य वाटणारी गोष्ट अगदी सहसोप्प्या पद्धतीने शक्य करून
दाखवणं हे मार्व्हलकडून खरंच शिकण्यासारखं आहे, डॉक्टर स्ट्रेंजची जादूसुद्धा यात पाहायला मिळते पण स्पायडरमॅन ज्यापद्धतीने त्याला अडकवून बाहेर पडतो तेव्हा हे समजतं की ही फिल्म टॉम हॉलंडची आहे, तसंच Ned आणि MJ शिवाय या फिल्ममध्ये अजिबात मजा आली नसतीहेदेखील तितकंच खरं आहे.
यात दिसणारे सगळेच व्हिलन धमाल आणतात पण यातही सगळ्या स्पायडरमॅनपेक्षासुद्धा भाव खाऊन जातो तो ग्रीन गॉबलिन आणि ते पात्र साकारणारे Willem Dafoe, एकतर यात ऑक्टोपस आणि ग्रीन गॉबलिनला एकत्र पाहूनच लै मजा आली होती, शिवाय त्या पात्रातला essence सुद्धा विल्यम
यांनी अगदी जपून ठेवला असल्याने ग्रीन गॉबलिनला सर्वात कमी स्क्रीनटाईम असूनसुद्धा तोच जास्त भाव खाऊन गेला, बाकी क्लायमॅक्सला जेव्हा ग्रीन गोबलिनला मारण्यापासून tobey टॉम हॉलंडला रोखतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की यामध्ये आधीचे स्पायडरमॅन किंवा इतर व्हीलन्स
असेच टाईमपास म्हणून आणलेले नाहीत, टॉम हॉलंडच्या स्पायडरमॅनला आणखीन mature करण्यासाठी त्यांना ह्यात एकत्र आणलं आहे आणि तो हेतू यात साध्य होतोदेखील. आधीच्या फिल्म्समधले हिरो किंवा व्हीलन्स कारणाविना एका सिनेमात एकत्र आणायला हे काही रोहित शेट्टीचं 'कॉप युनिव्हर्स' नाही. हे MCU आहे.
आणि इथे प्रत्येक गोष्टीला काहीनाकाहीतरी कारण असतंच. बाकी सिनेमातलं म्युझिक, ऍक्शन सीन्स, VFX या सगळ्यावर बोलायची खरंच माझी लायकी नाही, डोळ्याचं पारणं फिटेल अशी ही मार्व्हलची आजवरची बेस्ट फिल्म आहे आणि मार्व्हल फॅन्स किंवा
स्पायडरमॅन फॅन्स असाल तर ती अजिबात चुकवू नका, 2D असो नाहीतर 3D कॉमेडी, ऍक्शन, इमोशन, स्पेशल इफेक्ट हे सगळं बघून चेहऱ्यावर एक हसू आणि आजवरची सर्वात बेस्ट मार्व्हल मुव्ही पाहिल्याचं समाधान घेऊन थिएटरच्या बाहेर पडाल हे नक्की, बाकी याचं जेवढं क्रेडिट मार्व्हलचं त्याहून
काकणभर जास्त क्रेडिट सोनीला द्यायला हवं कारण अजूनही स्पायडरमॅनचे हक्क त्यांच्याकडेच आहेत आणि यापुढे सोनी त्यांच्या एका वेगळ्या युनिव्हर्समध्ये स्पायडरमॅनला continue करणार आहे त्यामुळे लवकरच MCU चा अविस्मरणीय असा स्पायडरमॅन नो वे होम तातडीने बघा, जिथे जसा वेळ मिळेल तसा बघा कारण हे
यूरोपातील लोकांपैकी सगळ्यात पहिले भारतात आले ते पोर्तुगीज.
पोर्तुगीज भाषेत 'फिडलगी' Fidalgo (Portuguese:
[fiˈðaɫɣu] शब्दाचा अर्थ म्हणजे ‘सभ्य गृहस्थ.’
आपल्या लोकांनी ह्या 'फिडलगी' शब्दाचा अपभ्रंश 'फिरंगी' असा केला. आता आपले लोक पोर्तुगीजांना ‘फिरंगी' असे म्हणू लागले.
पोर्तुगीजांपैकी प्रथम भारतात आला तो ‘वास्को दि गामा.' तो आला इसवीसन १४९८ मध्ये. म्हणजे आजपासून बरोबर ५१९ वर्षांपूर्वी. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात तो पहिल्यांदा आला.
इ.स.१५०३ मध्ये कोचीन बंदर घेऊन पोर्तुगीजांनी तेथे वखार घातली. आणि किल्ला बांधला.
ग्यानवापी मशिदीची रेषा पुसण्याचा प्रयत्न न करता, शेजारी काशी काॅरिडाॅरची मोठी रेषा ओढल्यामुळे पोटदुखी सुरू झालेल्या काही स्यूडो मंडळींनी या प्रकल्पाला बदनाम करण्यासाठी एक नवी क्लृप्ती लढविली आहे.
त्यांच्या मते भव्यतेच्या ध्यासामुळे मंदिराचा साधेपणा नष्ट होतो व आपल्या खऱ्या परंपरेला बाधा पोचते. काशीचे गल्ली-बोळ हीच या नगरीची खरी 'कॅरॅक्टर' आहे व या प्रकल्पामुळे या 'कॅरॅक्टर'ला धक्का पोचला आहे.
हे प्रतिपादन दुसरं-तिसरं काही नसून हिंदू मंदिरांचं पुनरुत्थान होत असल्यामुळे सुरू झालेल्या मळमळीवर तात्विक मुलामा चढविण्याचा हास्यास्पद तसंच संतापजनक प्रकार आहे. अरुंद-अंधारे गल्लीबोळ, अस्वच्छता, गटारांचे ओघळ आणि या सगळ्याच्या मध्ये, मूळ मंदिर पाडून त्याच्या
#CinemaGully
पुष्पा - द राईज
''रक्तचंदन तस्करांचं टोळीयुद्ध'
२००४ साली अल्लू अर्जुनचा 'आर्या' सिनेमा आला होता. त्यातलं "आ आंटे आमलापूरम" हे गाणं तेव्हा लग्नाच्या वरातीत वाजायचं. गाण्याचा एक शब्दही कळत नसताना लोक झिंगून नाचायचे तेव्हा आश्चर्य
वाटायचं.या गाण्यानं तेलुगू सिनेमाला
अपार प्रसिध्दी मिळाली. भाषा कळत नसूनही अडीच तीन तास सिनेमा बघायला लावलं ते 'आर्या'नं. अल्लू अर्जुन तेव्हापासून कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेकांचा फेव्हरेट बनला. अवघ्या पंचविशीतल्या देवी श्री प्रसाद यांचं संगीत, वयाच्या पस्तिशीत स्वत:चं काही करू पाहणारे सुकुमार यांचं
दिग्दर्शनातलं पदार्पण आणि अवघ्या एकविस वर्षाच्या अल्लू अर्जुनचा अॅक्शनपॅक्ड परफॉर्मन्स. या तरुणाईच्या सिनेमानं समकालिन तरुणाईला तेलुगू सिनेमाशी जोडलं. आज १७ वर्षांनंतर याबद्दल लिहिण्याचं कारण
भाजपमध्ये बरेच नेते व लोकप्रतिनिधी असे आहेत जे आपल्या मतदारसंघात लोकप्रिय आहेत पण लो-प्रोफाईल ठेऊन आपलं काम करत असतात. ते एवढे लो-प्रोफाईल आहेत की त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून ते जे जबरदस्त कार्य करत आहेत, त्याचं श्रेय सुद्धा त्यांना घ्यायची इच्छा नसते.
मी एक सिरीज बनवत आहे. निस्वार्थ भावनेने व श्रेयवादाच्या भानगडीत न पडणाऱ्या अशा काही केंद्रीय मंत्र्यांच्या कार्याबद्दल, दर २-३ दिवसातून एक पोस्ट टाकून शक्य तेवढी (ज्याबद्दल जास्त चर्चा होत नाही अशी) माहिती मी द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्याची सुरवात आज करत आहे.
डॉ.भारतीताई पवार
आरोग्य मंत्रालय, भारत सरकार.
प्रधानमंत्री जनऔषधी परियोजना, आयुष्यमान भारत अभियान (मोदी-केअर), कोविड लसीकरण अभियान सारख्या अनेक यशस्वी व जगभरात नावलौकिक मिळवलेल्या योजनांवर जोमाने काम तर
आई श्रीतुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही
कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून
येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात. विशेष म्हणजे सर्वांची जगन्माता आई तुळजाभवानी ज्या पालखीत बसून मिरवते व ज्या पलंगावर निद्रा घेते ते तयार करणारे हात एवढे छोटे आहेत की सर्वसामान्यांना काय पण मंदिर प्रशासनालाही त्यांच्या नावाची साधी कल्पनाही नाही.
थर्ड क्लास सिनेमांनी मला अनेक दर्जेदार लेखकांशी ओळख करून दिली. झटपट वाचा आणि लोटपोट व्हा !!!
***
तर मंडळी....
.
.
व्हिएफएक्स नं तरूण केलेलं एक अजय देवगण असतंय.
आणि व्हिएफएक्स च्या बी पाक पलीकडं गेलेलं संजय दत्त असतंय.
संजय दत्त पीके पिक्चरमधल्या गेटअप मधे असतंय.
तेच्या कडं एक कापाकापी करणारी कुऱ्हाड असत्या.
त्या कुऱ्हाडीनं ते लाकडं सोडून माणसं कापत असतंय ती बी समदी शत्रूची.
तेजं कामच असतंय ते.
अजय देवगण भुज एअरपोर्ट चं प्रमुख सरदार असतंय.
आणि तरी बी पाकिस्तान ची विमानं आली की ओम्नीच्या पत्र्यापासनं तयार केलेल्या विमानभेदी तोफेवर चढून विमानं उडवायचं काम तेला असतंय.
सात आठ विमानं आली तरी ते एक किंवा दोनच उडवत असतंय.