१६च्या नोव्हेंबरात नोटबंदी झाली तेंव्हा काळजात एक जखम घर करून होती..नोटबंदीने त्या जखमेवरची खपली काढली..ती जखम म्हणजे त्याच ऑगस्टमध्ये वि.ग. कानिटकर या ऐतिहासिक लेखकाचं निवर्तनं.
जागतिक इतिहास त्याचं आकलन आत्ता गुगल दुनियेत क्षुल्लक..पण कानिटकर जगले तो काळ अखंड सर्व्हर डाऊनचा. #म
यंदा वाचलेलं पुस्तक 'नाझी-भस्मासुराचा उदयास्त' वि. ग. कानिटकर या कसलेल्या लेखकाचं हे पुस्तक.
हिटलर आणि त्याची नाझी संघटना दोघेही कोणत्या परिस्थितीत बळ धरते झाले.. एखादा अख्खा देशच्या देश कशा पद्धतीने सामूहिक भावनेच्या अंकित जातो..ती भावना कशा पद्धतीने नर्चर केली जाते.
हे सगळं टिपून घेण्यात लेखक निर्विवाद यशस्वी झाला आहे.
जसं दुसऱ्या महायुद्धाची बीजं पहिल्याच्या अंतात होती तसं जर्मन जनतेच्या सामूहिक अपमानित भावनेची मूळही पहिल्या महायुद्धाच्या शेवटात होती. हिटलर सारखा हे युद्ध रणांगणाच्या थेट मैदानातून अनुभवलेला माणूस सुडाने पेटने साहजिकच.
हे पुस्तक आज पर्यंतच्या महायुद्धावर लिहल्या गेलेल्या पुस्तकाहून वेगळं आहे.. वेगळा आयाम या पुस्तकाला लाभला आहे.
पहिल्या महायुद्धात फार काही मोठा लष्करी पराभव जर्मनीला सोसावा लागला असं नाही..पण त्या नंतरच्या अपमानित करणाऱ्या जेत्यांच्या तहगोष्टी देश म्हणून भावनेने वेदनादायी होत्या.
हिटलरने नेमक्या त्याच दुखऱ्या नसेवर जाहीर सभांमधून बोट ठेवलं. या अशा अवस्थेत जर्मन सुज्ञ असले तरी विवेकी राहू शकले नाहीत.. हिटलरला हे असंच घडणार हे माहिती होतं.. आणि तेथूनच न्यू जर्मनीचा नवा जन्म झाला.
हे पुस्तक वाचताना भारत आपला देश म्हणून भविष्यात काय होईल हा विचारही मनात येतो.
हिटलर चान्सलर झाला तेंव्हा त्याच्यासमोर बेरोजगारी, ढासळलेली आर्थिक पत, जेत्यांना द्यावी लागणारी खंडणी हे प्रश्न एकाबाजूला तर दुसरीकडे जर्मनीचे गतवैभव परत मिळवून देण्याबाबतची जनतेची मानसिक स्थिती सतत नव्या स्वप्नांनी धगधगती ठेवण्याची मोहीम..हा आडाखेबंद कार्यक्रम सुरू झाला.
१९३३ ला सत्तेत येताना हितलरकडे बहुमत न्हवतं परंतु पुढच्या तीनच वर्षात हिटलरची लोकप्रियता जवळपास शंभर टक्के एवढी झाली.. यावरून त्याने खेळलेली जर्मन पॅट्रीऑटिकतेची खेळी किती नेमकी ठरली हे कळतं.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेंव्हा जर्मन युद्धासाठी सज्ज झाले तेंव्हा ते दोस्त
राष्ट्रांच्या तुल्यबळ झाले होते.. हा बदल जर्मनांना सुखावणारा होता. पण जेंव्हा १९४५ साली दुसरं महायुद्ध जवळपास पावणे सहा वर्षांनी संपलं तेंव्हा जर्मनीची अवस्था घर हरवलेल्या व्याकुळ जिवासारखी झाली.. त्या क्षणी जनतेला कळलं आपण काय करून बसलो आहोत.
लोकशाहीची चिता रचली..
एका हुकूमशहाला पाळलं पोसल्याची किंमत किती मोठी असते..एक देश बघता बघता कसा अनिश्चिततेच्या खाईत लोटला जातो..या सर्वांपलीकडे युद्धाने प्रश्न सुटतात का? हा प्रश्न या पुस्तकात अधोरेखित होतो.
एखादी कट्टरता किती आत्मघातकी असते..ती धार्मिक असेल तर माणसाचा जीव(पक्षी: ज्यू) कसा घेते..कळतं.
हे पुस्तक म्हणजे १९६४ ला 'माणूस' या नियतकालिकातून ही लेखमाला प्रसारित व्हायची.. त्या लेखांचे मिळून हे पुस्तक संपादन आहे..मी परत परत वाचलं हे पुस्तक.
दरवेळी मला आपल्या देशातील घटनांसाठी नवी नजर या पुस्तकातून मिळत गेली..पहिल्या ट्विटमध्ये असणाऱ्या जखमेला ही पार्श्वभूमी आहे.
भारतात व्यक्तिपूजेच्या नादात विवेकास तिलांजली देताना नवा हुकूमशहा तर जन्म घेत नाही ना? हे जाणण्यासाठी वि. ग. कानिटकरांची साहित्यसंपदा वाचायला हवी.. त्यांची हिटलरवरची लेखणी तर आवर्जून वाचायला हवी.. वाचा..!❤️
हॅप्पी रिडींग. @LetsReadIndia@Omkara_Mali@SahilVastad@DrVidyaDeshmukh
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सांज रातीला पडक्या वाड्याच्या पल्याड भिंतीला निवाळसंग तलावाची छबी नाकासमोर ठेवत ती बसलेली असायची..तलावावरचा धुंद वाऱ्याचा झोत..अदबशीर होऊन तिच्या मोकळ्या केसांना बटेसहित कुरवाळायचा.. त्याला यायला नेहमीचा उशीर असायचा यावर तिची लालबुंद नाकाची धार शीतल वातावरणात चमकून उठायची. #म
आज त्याने त्या लेकुरवाळ्या आठवणींसहित तिथल्या दगडी सोपानावर चार गरका घेतल्या...प्रत्येक गरकेसरशी आठवणी आपला विळखा अजूनच तंग करत्या झाल्या.. त्यातून सैलावण्यासाठी त्याला अजून चार गरका घ्याव्या लागल्या.
पुढं होऊन तलावात पाय सोडून बसताना चपळ चंचल मासे धावताना दिसले..
आयुष्यातले क्षण असेच चपळ असतात..आत्ता हा क्षण माझ्या कवेत आहे म्हणेपर्यंत तो निघून गेलेला असतो.. त्या एवढ्याशा क्षणाला..क्षणाच्या आत..त्या आपुलकीच्या घटकेसहित काळजात साठवून ठेवावं लागतं..परत परत तो क्षण काळजाच्या तळात जाऊन अनुभवण्यासाठी.
डाव्याअंगाला वयोवृद्ध वड पानगळ सोसत उभाय..
तांदळाच्या तुलनेत मक्का पिकास पाचपट कमी पाणी लागतं.. तांदळाच्या तुलनेत इतर पिकास लागणारी इनपुट कॉस्टही कमी आहे.. तरीही शेतकरी तांदळाचं उत्पादन घेतात..₹ तीनेक लाख खर्चून बोअरवेलची सोय करतात.. हे सगळं का आणि कशासाठी? तर MSP बाबत भातास आणि गव्हास असलेली कडेकोट व्यवस्था. #म#थ्रेड
अन्न सुरक्षा योजनेस अखंड पुरवठा व्हावा यासाठी फक्त गहू आणि तांदळास MSP द्यायची..त्याद्वारेच त्या दोन पिकांची सरकारी खरेदी उरकायची..आणि बाकीची पिके वाऱ्यावर उफनायची..त्याकडे पहायची सरकारची इच्छा नाही आणि जनतेला स्वतःच्या जीवाचा प्रश्न निर्माण होत नाही तोवर बघण्याचं काही कारण नाही.
देशातील शेती आणि शेतकरी यांचा इतिहास पहाता पंजाब राज्य हरितक्रांतीनंतर उत्पादनासाठी वाढीस लागले..तिथं गहू आणि तांदूळ उत्पादनासाठी जी काही निसर्गाशी प्रतारणा झाली..त्यामुळे तिथल्या शेतीचाच नाही तर माणसांच्याही जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.. कॅन्सर ट्रेन हे त्याचं उत्तम उदाहरण.
कोणाची लेक कोणाच्या घरात दिली.. कोणाचं पोरगं कुठं आहे.. त्यांचं संसारी जीवन नीट चालल का? सगळा हिशोबी ऐवज या जुन्या माणसांच्या तोंडपाठ असायचा..
एकदा दोनदा तुरळक ओळख झाल्यावरसुद्धा नंतरच्या भेटीत न विसरता 'तू आमक्याचा ल्योक न्हवं का?' अशी अदबीने विचारपूस करणारी माणसं ती.
मागे कुठंतरी एक फोटो पाहिला.. म्हाताऱ्या आयांचा घोळका बसलेला..त्याला कॅप्शन होती.. 'गावाकडचा CCTV'. फार सखोल कॅप्शन होती ती..
कोण कुठं गेला? सोबत कोण होतं? परत कधी आला? हातात काय होतं? सगळी सगळी इत्यंभूत माहिती इथं मिळणार म्हणजे मिळणार..
हा माहितीचा साठा आता लोप पावत चाललाय..
जसं टॅक्सी येणं हे टांगेवाल्यांच्या मुळावर आलं.. तसं सांप्रतकाळी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं हे आयुर्वेदाच्या नावाने रस्त्याकडेला तंबूतुन पुड्या विकणाऱ्यांच्या मुळावर आलं.
काही भंपक स्वतःस आयुर्वेदाचार्य, योगाचार्य म्हणवून घेतात..त्यांच्यापासूनच आयुर्वेदास खरा धोका आहे. #थ्रेड#म
आयुर्वेद हा विषय भारतीयांसाठी अगदीच जीवाचा विषय..जिथं जिथं इतिहासाच्या जीवावर मर्दुमकी गाजवावी तिथं तिथं भारतीय मागे हटत नाहीत..हा इतिहास आहे.. गेल्या साताठ वर्षात तर अशा आयुर्वेदाचार्य बाबा-बुवांचे मोठेच पेव अखंड भारतवर्षात फुटले.. हरेक भगवादारी व्यक्ती राजमान्य वैदू होऊन गेला.
नैसर्गिक जीवनपद्धतीने जीवनप्रवास करणे हे मूळ आयुर्वेदाचे तत्व.. आरोग्य हे त्याच नैसर्गिक संसाधनांचा वापर करून उत्तम राखणे हा सांगावा आयुर्वेदाचाच..तो योग्य आणि मान्यच.. पण म्हणून त्या आयुर्वेदिक पद्धतीत इतिहासात कधीही वैज्ञानिक दृष्टिकोनास तिलांजली दिल्याचे ऐकिवात नाही..
आपण सगळे म्हणायला फक्त २१व्या शतकात आलोय..जुने दिवस आठवून त्यात तासनतास रमायला होतं.. पर्यायच नाहीय दुसरा.. मनाला भावेल असं जीवन जगण्याची सोय वर्तमानात नाही..म्हणून मन त्याला हवा असलेला कम्फर्ट शोधत मागे धावत जातं.
मनाला आसरा हवा असतो..शांततेचा..!❤️ #म १
विज्ञानाने क्रांती केली..पण ती आपल्याला सूट होईल अशी पूरक व्यवस्था आपण उभी करू शकलो नाही.
एक स्वतंत्र देश म्हणून आपली तुलना आपण आपल्याशीच न करता.. एका धर्मांध देशासोबत करावी..आणि प्रत्येक निवडणुकीत त्या देशाच्या भावनेवर fluctuate होऊन आपला लोकप्रतिनिधी निवडावा..भयंकर होतंय हे.. २
लोकशाही लवाजमा लोकशाही देशास डोईजड वाटावा..आणि सरतेशेवटी कोणीतरी लोकशाहीच्या नरडीचा घोट घ्यावा.. लोकशाही देशास न पेलणारे पेल्यातील वादळ ते.. पेल्यातच शमेल.. लोकशाहीसह.
हक्क हवे असतात आणि कर्तव्ये पाळायची असतात.. त्यात कसूर झाल्यास कर्तव्ये गहाण पडतात..आणि हक्क विकले जातात. ३