कोणाची लेक कोणाच्या घरात दिली.. कोणाचं पोरगं कुठं आहे.. त्यांचं संसारी जीवन नीट चालल का? सगळा हिशोबी ऐवज या जुन्या माणसांच्या तोंडपाठ असायचा..
एकदा दोनदा तुरळक ओळख झाल्यावरसुद्धा नंतरच्या भेटीत न विसरता 'तू आमक्याचा ल्योक न्हवं का?' अशी अदबीने विचारपूस करणारी माणसं ती.
मागे कुठंतरी एक फोटो पाहिला.. म्हाताऱ्या आयांचा घोळका बसलेला..त्याला कॅप्शन होती.. 'गावाकडचा CCTV'. फार सखोल कॅप्शन होती ती..
कोण कुठं गेला? सोबत कोण होतं? परत कधी आला? हातात काय होतं? सगळी सगळी इत्यंभूत माहिती इथं मिळणार म्हणजे मिळणार..
हा माहितीचा साठा आता लोप पावत चाललाय..
बऱ्याच दिवसांनी पुण्या-मुंबईत राहून आल्यावर.. गावात बस स्टँडवर उतरल्यानंतर जाती-पातीच्या पलीकडचा थरथरणारा हात आपल्या गोबऱ्या गालावरून मायेनं फिरवत स्वतःच्या डोक्याला दोन्हीकडून दाबून कडाकड बोटं मोडणारी म्हातारी आई.. त्या मायेच्या बोटांची कडकड ऐकायला आता जीव कासावीस होतो..
गावाकडं रस्त्यानं जाताना ठिकठिकाणी दिसणारी ही वयस्कर मंडळी पाहिलं की गाव कसं भरल्या भरल्यागत वाटतं.. एकवेळ कामाच्या विचारात आपलं दुर्लक्ष असलं तरी तो वयस्कर कुंद आवाज आपल्याला दुर्लक्षित करणारच नाही.. 'काय बाळ? बरायस का?' एवढी तरी विचारपूस होणारच.. अगदी प्रत्येक ठिकाणी.
नव्या दमाच्या नव्या तंत्रज्ञानाच्या मुशीतील आत्ताची पिढी येणाऱ्या भविष्यात या वयस्कर ऐवजाला पारकी होईल.. तेंव्हा अदबीने रुजवलेल्या संस्कारांची वहिवाट कशी असेल? नुसत्या प्रश्नाने अंगावर काटा येतो..
गावात जातीपातीच्या अभेद्य वाटणाऱ्या भिंतीला आरपार छेदणारी वलय आहेत ही वयस्कर लोकं.
प्रेमानं, मायेनं, आपुलकीनं दैनंदिन कारभार उरकत असताना.. सध्याचा काळ त्या कारभाराचा कस पाहणारा आहे.. त्यालाही पुरून उरेल एवढी ताकद या वयस्कर बुरुजात नक्कीच आहे.. गावागावात पाहिलेल्या बापजाद्यांनी त्या ताकदीची हमी नुसत्या नजरेनं आजवर दिलेली आहे..
त्याच संस्कारी ताकदीचा वसा..आपल्यालाही पुढं चालवावाच लागेल.. पर्याय नाही.. कळावे..!❤️
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
जसं टॅक्सी येणं हे टांगेवाल्यांच्या मुळावर आलं.. तसं सांप्रतकाळी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं हे आयुर्वेदाच्या नावाने रस्त्याकडेला तंबूतुन पुड्या विकणाऱ्यांच्या मुळावर आलं.
काही भंपक स्वतःस आयुर्वेदाचार्य, योगाचार्य म्हणवून घेतात..त्यांच्यापासूनच आयुर्वेदास खरा धोका आहे. #थ्रेड#म
आयुर्वेद हा विषय भारतीयांसाठी अगदीच जीवाचा विषय..जिथं जिथं इतिहासाच्या जीवावर मर्दुमकी गाजवावी तिथं तिथं भारतीय मागे हटत नाहीत..हा इतिहास आहे.. गेल्या साताठ वर्षात तर अशा आयुर्वेदाचार्य बाबा-बुवांचे मोठेच पेव अखंड भारतवर्षात फुटले.. हरेक भगवादारी व्यक्ती राजमान्य वैदू होऊन गेला.
नैसर्गिक जीवनपद्धतीने जीवनप्रवास करणे हे मूळ आयुर्वेदाचे तत्व.. आरोग्य हे त्याच नैसर्गिक संसाधनांचा वापर करून उत्तम राखणे हा सांगावा आयुर्वेदाचाच..तो योग्य आणि मान्यच.. पण म्हणून त्या आयुर्वेदिक पद्धतीत इतिहासात कधीही वैज्ञानिक दृष्टिकोनास तिलांजली दिल्याचे ऐकिवात नाही..
आपण सगळे म्हणायला फक्त २१व्या शतकात आलोय..जुने दिवस आठवून त्यात तासनतास रमायला होतं.. पर्यायच नाहीय दुसरा.. मनाला भावेल असं जीवन जगण्याची सोय वर्तमानात नाही..म्हणून मन त्याला हवा असलेला कम्फर्ट शोधत मागे धावत जातं.
मनाला आसरा हवा असतो..शांततेचा..!❤️ #म १
विज्ञानाने क्रांती केली..पण ती आपल्याला सूट होईल अशी पूरक व्यवस्था आपण उभी करू शकलो नाही.
एक स्वतंत्र देश म्हणून आपली तुलना आपण आपल्याशीच न करता.. एका धर्मांध देशासोबत करावी..आणि प्रत्येक निवडणुकीत त्या देशाच्या भावनेवर fluctuate होऊन आपला लोकप्रतिनिधी निवडावा..भयंकर होतंय हे.. २
लोकशाही लवाजमा लोकशाही देशास डोईजड वाटावा..आणि सरतेशेवटी कोणीतरी लोकशाहीच्या नरडीचा घोट घ्यावा.. लोकशाही देशास न पेलणारे पेल्यातील वादळ ते.. पेल्यातच शमेल.. लोकशाहीसह.
हक्क हवे असतात आणि कर्तव्ये पाळायची असतात.. त्यात कसूर झाल्यास कर्तव्ये गहाण पडतात..आणि हक्क विकले जातात. ३
सध्या आरक्षण मान्य होत नाही ना? ठिकाय,तर समाजास अजून वेगवेगळ्या पद्धतीने कशी मदत करता येईल याचा विचार समाजातील 'आहे रे आणि नाही रे' वर्गांने करायला हवा..हा विचार सध्या महत्वाचा आहे.
कायदेशीर लढाई आणि त्यातील युक्तिवादात कमतरता असल्याने वस्तुस्थिती न्यायालयात समोर आली नाही. #म
ही बाब प्रथमदर्शनी दिसते.. बाकी सविस्तर निकाल आल्यानंतर मराठा समाजाचे प्रतिनिधी योग्य ती कायदेशीर रणनीती आखतील. तो पर्यंत सामाजिक स्थैर्य आणि शांतता राखणं ही आपली जबाबदारी आहे.
समाजाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास मांडताना न्यायालयास काय अपेक्षित आहे?
जेणेकरून मराठ्यांची सत्य परिस्थिती ठळकपणे समोर येईल.. यादृष्टीने नवीन अभ्यास करणे गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं त्या अभ्यास करणाऱ्या समितीस कायद्याचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे.. अन्यथा हा न्यायालयीन पेपर अभ्यास न करताच दिलेल्या चाचणी परीक्षेसम अयशस्वीच होणार.
सणाच्या पहाटेचा पहिला प्रहर..आदल्या दिवशी रात्री १२ वाजेस्तोवर का जागलेली असेना ती.. त्यादिवशी पहाटे ३ च्याटोलला तिनं उठावं..डाळ शिजत घालावी..लगबगीनं पोळ्यांसाठी कणिक मळून ठेवावी आणि पाटा-वरवंटा घेऊन डाळीचं पुरण वाटावं..सणासुदीला आईचा बेत असतो पुरणपोळीचा. #खाद्यसंस्कृती#थ्रेड#म
समाजाला जशी संस्कृती असते..तशी ती खाद्यपदार्थांनाही असते.. पण या दोन्ही संस्कृतींचा भार स्त्रियांच्या खांद्यावर असतो.. बाकी पुरुष नुसते बडेजाव मारण्यातच पुढं असतात..बहुतांश वेळा.
पाट्यावरच्या कणकेला वरवंट्याचे घाव घालणारी आई..प्रत्येक घावाला तिनं प्रेम ओतावं..त्याचीच चव आम्हाला.
लोहाराचा भाता चालावा तशी चूल धगधगावी..त्या धगित तापलेल्या तव्यावर पुरण भरून लाटलेली पोळी पडावी..अखंड दुरडी भरस्तोवर तिनं पोळ्यांचा रतीब घालावा..पोराबाळांना चांगल्या दोनरोज पुरतील एवढ्या पोळ्या तिनं दिवस उगवायला बनवाव्यात.
तांबडं फुटायला तिनं येळवणीच्या आमटीला फोडणी दिलेली असते.
घटना साधारणपणे २०१७ ची..
पुण्यात होतो.शेती विषयक एक कार्यशाळा अटेंड करायचा बेत होता.विषय होता 'शेतीचा अर्थ'.
त्याच दिवशी केंद्र सरकारचे मुख्य अर्थसल्लागार सुब्रमण्यम झंझावाती अस काही बोलले.ते म्हणाले 'शेतकऱ्यांना आता प्राप्तिकराच्या जाळ्यात घ्यायला हवं.' #महाराष्ट्रदिन#म#थ्रेड
बराच खल झाला तेंव्हा या विषयावर.. बरीच टीका झेलावी लागली सुब्रमण्यमनां.
१९२५ साली कर परिषदेत मागणी होती शेतकऱ्यांना कर लावा अशी.. आज आणिएक ४ वर्षांनी शंभरी होईल त्या मागणीची.. आज २१ सालीही निर्णय नाहीय त्यावर..शेती खरंतर भारतीयांना जिव्हाळ्याचा विषय..अलीकडे तर खूपच sympathy.
म्हणजे गेल्या शंभर एक वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहिलं..पण शेतकऱ्यांचं उत्पन्न काही करपात्र करता आलं नाही आपल्याला..म्हणायला फक्त शेती ही काळी आई आणि शेतकरी बळीराजा आहे..गेल्या शतकभरात जी काही वाताहत त्या आईची आणि लेकरांची झालीय ती शब्दात सांगायची सोय नाही.
शेती राज्यसूचीत येते.