तांदळाच्या तुलनेत मक्का पिकास पाचपट कमी पाणी लागतं.. तांदळाच्या तुलनेत इतर पिकास लागणारी इनपुट कॉस्टही कमी आहे.. तरीही शेतकरी तांदळाचं उत्पादन घेतात..₹ तीनेक लाख खर्चून बोअरवेलची सोय करतात.. हे सगळं का आणि कशासाठी? तर MSP बाबत भातास आणि गव्हास असलेली कडेकोट व्यवस्था. #म#थ्रेड
अन्न सुरक्षा योजनेस अखंड पुरवठा व्हावा यासाठी फक्त गहू आणि तांदळास MSP द्यायची..त्याद्वारेच त्या दोन पिकांची सरकारी खरेदी उरकायची..आणि बाकीची पिके वाऱ्यावर उफनायची..त्याकडे पहायची सरकारची इच्छा नाही आणि जनतेला स्वतःच्या जीवाचा प्रश्न निर्माण होत नाही तोवर बघण्याचं काही कारण नाही.
देशातील शेती आणि शेतकरी यांचा इतिहास पहाता पंजाब राज्य हरितक्रांतीनंतर उत्पादनासाठी वाढीस लागले..तिथं गहू आणि तांदूळ उत्पादनासाठी जी काही निसर्गाशी प्रतारणा झाली..त्यामुळे तिथल्या शेतीचाच नाही तर माणसांच्याही जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.. कॅन्सर ट्रेन हे त्याचं उत्तम उदाहरण.
पंजाबात तांदूळ उत्पादनास बिहारच्या तिप्पट जास्त पाणी लागते..म्हणजे बिहारात १किलो तांदूळ १ हजार लिटर पाण्यात येत असेल तर तोच भात पंजाबात पिकवण्यासाठी ३ हजार लिटर पाणी लागेल.
शेतकरी लाख तयार आहेत दुसऱ्या पिकांच्या उत्पादनासाठी..पण त्यातून येणार उत्पन्न त्यांना तस करण्यापासून रोखते.
कारण, तेच..गहू आणि तांदूळ सोडून इतर पिकांसाठी MSP ची कोणतीही गॅरेंटी नाही. वर्षानुवर्षे हेच सुरू आहे..शेतकरी मरेपर्यंत तीच तीच पिकं घेत राहतात..वरून इरिगेशनसाठी काहीही मूल्यात्मक काम नाही..मग त्या पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याची तहान भूजल उपसा करून भागवायची..
यातून पंजाबात दरवर्षी १२०cm एवढी भूजलपातळी आटत चालली आहे.
देशभरात शेतीसाठी लागणाऱ्या एकूण पाण्याचा निम्मा हिस्सा तांदूळ आणि ऊस पिके पिऊन संपवतात आणि उरलेल्या निम्म्या हिश्श्यात गहू राजा असतो.
देशात हल्ली एकाचवेळी तीन ऋतू असतात..कुठं उन्हाळ्यागत ऊन, कुठं मरणाचा गारठा तर कुठं पाऊस.
मध्यंतरी एक अभ्यास जाहीर झाला..त्यात थेट एक वाक्य होतं. 'जेंव्हा आपण ही जादा पाणी पिणारे अन्नधान्य निर्यात करतो तेंव्हा अप्रत्यक्षपणे पाणी निर्यात करत असतो.'
जगभरात सुरू असलेलं वाळवंटीकरण आणि हवामान बदल या अनुषंगाने विचार केल्यास या गोष्टीचे गांभीर्य कळेल.
आपण नेहमी ऐकतो की शेतकरी धसकटे जाळतात त्यामुळे दिल्लीतील हवा प्रदूषण वाढत राहते. पण फक्त एवढ्या कारणाने 'शेतकऱ्यांनो, दुसरं पीक करा' अस सांगण्याने फारसा बदल होणार नाही.. उत्पन्नाच्या आघाडीवर तोडीस तोड पर्याय जोपर्यंत उभा राहणार नाही तोपर्यंत शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळणार नाहीत.
जगभरातील सगळ्या प्रश्नांचे मूळ हे विनिमयाचे साधन म्हणून 'अर्थ' या केंद्रापाशी येऊन थांबते तसेच ते या बाबतीतही आहे..सर्व पिकांना उत्पादन खर्चाच्या विचाराने समान MSP देण्याने बरेचसे प्रश्न परस्पर निकालात निघतील..अन्यथा 'चलता है' या वर्तवणूकिने शेती सहित भारतीयही धोक्यात येतील..!❤️
कोणाची लेक कोणाच्या घरात दिली.. कोणाचं पोरगं कुठं आहे.. त्यांचं संसारी जीवन नीट चालल का? सगळा हिशोबी ऐवज या जुन्या माणसांच्या तोंडपाठ असायचा..
एकदा दोनदा तुरळक ओळख झाल्यावरसुद्धा नंतरच्या भेटीत न विसरता 'तू आमक्याचा ल्योक न्हवं का?' अशी अदबीने विचारपूस करणारी माणसं ती.
मागे कुठंतरी एक फोटो पाहिला.. म्हाताऱ्या आयांचा घोळका बसलेला..त्याला कॅप्शन होती.. 'गावाकडचा CCTV'. फार सखोल कॅप्शन होती ती..
कोण कुठं गेला? सोबत कोण होतं? परत कधी आला? हातात काय होतं? सगळी सगळी इत्यंभूत माहिती इथं मिळणार म्हणजे मिळणार..
हा माहितीचा साठा आता लोप पावत चाललाय..
जसं टॅक्सी येणं हे टांगेवाल्यांच्या मुळावर आलं.. तसं सांप्रतकाळी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं हे आयुर्वेदाच्या नावाने रस्त्याकडेला तंबूतुन पुड्या विकणाऱ्यांच्या मुळावर आलं.
काही भंपक स्वतःस आयुर्वेदाचार्य, योगाचार्य म्हणवून घेतात..त्यांच्यापासूनच आयुर्वेदास खरा धोका आहे. #थ्रेड#म
आयुर्वेद हा विषय भारतीयांसाठी अगदीच जीवाचा विषय..जिथं जिथं इतिहासाच्या जीवावर मर्दुमकी गाजवावी तिथं तिथं भारतीय मागे हटत नाहीत..हा इतिहास आहे.. गेल्या साताठ वर्षात तर अशा आयुर्वेदाचार्य बाबा-बुवांचे मोठेच पेव अखंड भारतवर्षात फुटले.. हरेक भगवादारी व्यक्ती राजमान्य वैदू होऊन गेला.
नैसर्गिक जीवनपद्धतीने जीवनप्रवास करणे हे मूळ आयुर्वेदाचे तत्व.. आरोग्य हे त्याच नैसर्गिक संसाधनांचा वापर करून उत्तम राखणे हा सांगावा आयुर्वेदाचाच..तो योग्य आणि मान्यच.. पण म्हणून त्या आयुर्वेदिक पद्धतीत इतिहासात कधीही वैज्ञानिक दृष्टिकोनास तिलांजली दिल्याचे ऐकिवात नाही..
आपण सगळे म्हणायला फक्त २१व्या शतकात आलोय..जुने दिवस आठवून त्यात तासनतास रमायला होतं.. पर्यायच नाहीय दुसरा.. मनाला भावेल असं जीवन जगण्याची सोय वर्तमानात नाही..म्हणून मन त्याला हवा असलेला कम्फर्ट शोधत मागे धावत जातं.
मनाला आसरा हवा असतो..शांततेचा..!❤️ #म १
विज्ञानाने क्रांती केली..पण ती आपल्याला सूट होईल अशी पूरक व्यवस्था आपण उभी करू शकलो नाही.
एक स्वतंत्र देश म्हणून आपली तुलना आपण आपल्याशीच न करता.. एका धर्मांध देशासोबत करावी..आणि प्रत्येक निवडणुकीत त्या देशाच्या भावनेवर fluctuate होऊन आपला लोकप्रतिनिधी निवडावा..भयंकर होतंय हे.. २
लोकशाही लवाजमा लोकशाही देशास डोईजड वाटावा..आणि सरतेशेवटी कोणीतरी लोकशाहीच्या नरडीचा घोट घ्यावा.. लोकशाही देशास न पेलणारे पेल्यातील वादळ ते.. पेल्यातच शमेल.. लोकशाहीसह.
हक्क हवे असतात आणि कर्तव्ये पाळायची असतात.. त्यात कसूर झाल्यास कर्तव्ये गहाण पडतात..आणि हक्क विकले जातात. ३
सध्या आरक्षण मान्य होत नाही ना? ठिकाय,तर समाजास अजून वेगवेगळ्या पद्धतीने कशी मदत करता येईल याचा विचार समाजातील 'आहे रे आणि नाही रे' वर्गांने करायला हवा..हा विचार सध्या महत्वाचा आहे.
कायदेशीर लढाई आणि त्यातील युक्तिवादात कमतरता असल्याने वस्तुस्थिती न्यायालयात समोर आली नाही. #म
ही बाब प्रथमदर्शनी दिसते.. बाकी सविस्तर निकाल आल्यानंतर मराठा समाजाचे प्रतिनिधी योग्य ती कायदेशीर रणनीती आखतील. तो पर्यंत सामाजिक स्थैर्य आणि शांतता राखणं ही आपली जबाबदारी आहे.
समाजाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास मांडताना न्यायालयास काय अपेक्षित आहे?
जेणेकरून मराठ्यांची सत्य परिस्थिती ठळकपणे समोर येईल.. यादृष्टीने नवीन अभ्यास करणे गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं त्या अभ्यास करणाऱ्या समितीस कायद्याचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे.. अन्यथा हा न्यायालयीन पेपर अभ्यास न करताच दिलेल्या चाचणी परीक्षेसम अयशस्वीच होणार.
सणाच्या पहाटेचा पहिला प्रहर..आदल्या दिवशी रात्री १२ वाजेस्तोवर का जागलेली असेना ती.. त्यादिवशी पहाटे ३ च्याटोलला तिनं उठावं..डाळ शिजत घालावी..लगबगीनं पोळ्यांसाठी कणिक मळून ठेवावी आणि पाटा-वरवंटा घेऊन डाळीचं पुरण वाटावं..सणासुदीला आईचा बेत असतो पुरणपोळीचा. #खाद्यसंस्कृती#थ्रेड#म
समाजाला जशी संस्कृती असते..तशी ती खाद्यपदार्थांनाही असते.. पण या दोन्ही संस्कृतींचा भार स्त्रियांच्या खांद्यावर असतो.. बाकी पुरुष नुसते बडेजाव मारण्यातच पुढं असतात..बहुतांश वेळा.
पाट्यावरच्या कणकेला वरवंट्याचे घाव घालणारी आई..प्रत्येक घावाला तिनं प्रेम ओतावं..त्याचीच चव आम्हाला.
लोहाराचा भाता चालावा तशी चूल धगधगावी..त्या धगित तापलेल्या तव्यावर पुरण भरून लाटलेली पोळी पडावी..अखंड दुरडी भरस्तोवर तिनं पोळ्यांचा रतीब घालावा..पोराबाळांना चांगल्या दोनरोज पुरतील एवढ्या पोळ्या तिनं दिवस उगवायला बनवाव्यात.
तांबडं फुटायला तिनं येळवणीच्या आमटीला फोडणी दिलेली असते.