चांदण्या रात्री मोकळ्याशार आभाळाकडं बघत नजर कुठंतरी एकांतात हरवते..आजूबाजूच्या परिस्थितीचा विसर पडतो.. मनाला फार आवडतं असं रमतगमत भूतकाळात चालायला..
गेलेली घटकान् घटका हिशोबाची वही उघडावी तसं मन भूतकाळ पिंजून काढायला लागतं.. सुखाची अधिकवजा करता करता ओल्या पापण्या खारवटतात.
#म
'मानलं तर सुख' म्हणायला सोपं असतं..आणि सुखाची चटक मनाला लागणं तसं घातकच.. अगदी सुखानं घासून-पुसून ठेवलेली मनंही कसलीही संवेदना नसलेली निपजतात. जणू काही प्रदर्शनात मांडलेला दगडी कोळसाच.
कोळसा कितीही उगळला तरी काळाच.. तसंच ती सुखाची मनंही संवेदनाहीन...मग कळू लागते दुःखाची किंमत..
दुःख सोसलेली मनं संवेदनशील सामग्री असतात. दुःखाचीही दुःख असतात..आणि दुःखाची सुखंही असतात..ती शोधायला रसिक मनाची एकाग्रता असायला लागते.. दुःख कोळून प्यायलं की येते ती एकाग्रता.
आपल्या दुःखाचा सूड स्वतःसाठी सुख कमवून घ्यायचा नसतो..आपलं दुःख दुसऱ्याला मिळू नये याची तजवीज म्हणजे सूड.
त्या सुडातून येणारा आनंद आणि त्या आनंदात मनाने शिळ घालत ठोकलेली मंजुळ 'आकारांती आणि उकारांती' मैफल म्हणत असते....' सूड निरागस ओ🎶🎶🎶' ❤️

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with डेडपूल...

डेडपूल... Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MarathiDeadpool

3 Jun
'आमच्या नातीच्या नणंदेच्या जावच्या भावाला इथली पोरगी दिली.' म्हातारी आई असं काहीतरी नातेसंबंध सांगायला लागली की डोकं नुसतं गरगर फिरायचं..
महाभयंकर कोडं असावं अशी ती नात्यांची वीण चुटकीसरशी तोंडावर थडाथड बोलणाऱ्या जुन्या आयाबाया.. कसलीतरी विलक्षण शक्तीच्या पाईकच त्या...

#म
कोणाची लेक कोणाच्या घरात दिली.. कोणाचं पोरगं कुठं आहे.. त्यांचं संसारी जीवन नीट चालल का? सगळा हिशोबी ऐवज या जुन्या माणसांच्या तोंडपाठ असायचा..
एकदा दोनदा तुरळक ओळख झाल्यावरसुद्धा नंतरच्या भेटीत न विसरता 'तू आमक्याचा ल्योक न्हवं का?' अशी अदबीने विचारपूस करणारी माणसं ती.
मागे कुठंतरी एक फोटो पाहिला.. म्हाताऱ्या आयांचा घोळका बसलेला..त्याला कॅप्शन होती.. 'गावाकडचा CCTV'. फार सखोल कॅप्शन होती ती..
कोण कुठं गेला? सोबत कोण होतं? परत कधी आला? हातात काय होतं? सगळी सगळी इत्यंभूत माहिती इथं मिळणार म्हणजे मिळणार..
हा माहितीचा साठा आता लोप पावत चाललाय..
Read 8 tweets
7 May
जसं टॅक्सी येणं हे टांगेवाल्यांच्या मुळावर आलं.. तसं सांप्रतकाळी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं हे आयुर्वेदाच्या नावाने रस्त्याकडेला तंबूतुन पुड्या विकणाऱ्यांच्या मुळावर आलं.
काही भंपक स्वतःस आयुर्वेदाचार्य, योगाचार्य म्हणवून घेतात..त्यांच्यापासूनच आयुर्वेदास खरा धोका आहे.
#थ्रेड #म
आयुर्वेद हा विषय भारतीयांसाठी अगदीच जीवाचा विषय..जिथं जिथं इतिहासाच्या जीवावर मर्दुमकी गाजवावी तिथं तिथं भारतीय मागे हटत नाहीत..हा इतिहास आहे.. गेल्या साताठ वर्षात तर अशा आयुर्वेदाचार्य बाबा-बुवांचे मोठेच पेव अखंड भारतवर्षात फुटले.. हरेक भगवादारी व्यक्ती राजमान्य वैदू होऊन गेला.
नैसर्गिक जीवनपद्धतीने जीवनप्रवास करणे हे मूळ आयुर्वेदाचे तत्व.. आरोग्य हे त्याच नैसर्गिक संसाधनांचा वापर करून उत्तम राखणे हा सांगावा आयुर्वेदाचाच..तो योग्य आणि मान्यच.. पण म्हणून त्या आयुर्वेदिक पद्धतीत इतिहासात कधीही वैज्ञानिक दृष्टिकोनास तिलांजली दिल्याचे ऐकिवात नाही..
Read 13 tweets
5 May
आपण सगळे म्हणायला फक्त २१व्या शतकात आलोय..जुने दिवस आठवून त्यात तासनतास रमायला होतं.. पर्यायच नाहीय दुसरा.. मनाला भावेल असं जीवन जगण्याची सोय वर्तमानात नाही..म्हणून मन त्याला हवा असलेला कम्फर्ट शोधत मागे धावत जातं.
मनाला आसरा हवा असतो..शांततेचा..!❤️
#म
विज्ञानाने क्रांती केली..पण ती आपल्याला सूट होईल अशी पूरक व्यवस्था आपण उभी करू शकलो नाही.
एक स्वतंत्र देश म्हणून आपली तुलना आपण आपल्याशीच न करता.. एका धर्मांध देशासोबत करावी..आणि प्रत्येक निवडणुकीत त्या देशाच्या भावनेवर fluctuate होऊन आपला लोकप्रतिनिधी निवडावा..भयंकर होतंय हे.. २
लोकशाही लवाजमा लोकशाही देशास डोईजड वाटावा..आणि सरतेशेवटी कोणीतरी लोकशाहीच्या नरडीचा घोट घ्यावा.. लोकशाही देशास न पेलणारे पेल्यातील वादळ ते.. पेल्यातच शमेल.. लोकशाहीसह.
हक्क हवे असतात आणि कर्तव्ये पाळायची असतात.. त्यात कसूर झाल्यास कर्तव्ये गहाण पडतात..आणि हक्क विकले जातात. ३
Read 4 tweets
5 May
सध्या आरक्षण मान्य होत नाही ना? ठिकाय,तर समाजास अजून वेगवेगळ्या पद्धतीने कशी मदत करता येईल याचा विचार समाजातील 'आहे रे आणि नाही रे' वर्गांने करायला हवा..हा विचार सध्या महत्वाचा आहे.
कायदेशीर लढाई आणि त्यातील युक्तिवादात कमतरता असल्याने वस्तुस्थिती न्यायालयात समोर आली नाही. #म
ही बाब प्रथमदर्शनी दिसते.. बाकी सविस्तर निकाल आल्यानंतर मराठा समाजाचे प्रतिनिधी योग्य ती कायदेशीर रणनीती आखतील. तो पर्यंत सामाजिक स्थैर्य आणि शांतता राखणं ही आपली जबाबदारी आहे.
समाजाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास मांडताना न्यायालयास काय अपेक्षित आहे?
जेणेकरून मराठ्यांची सत्य परिस्थिती ठळकपणे समोर येईल.. यादृष्टीने नवीन अभ्यास करणे गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं त्या अभ्यास करणाऱ्या समितीस कायद्याचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे.. अन्यथा हा न्यायालयीन पेपर अभ्यास न करताच दिलेल्या चाचणी परीक्षेसम अयशस्वीच होणार.
Read 4 tweets
30 Apr
सणाच्या पहाटेचा पहिला प्रहर..आदल्या दिवशी रात्री १२ वाजेस्तोवर का जागलेली असेना ती.. त्यादिवशी पहाटे ३ च्याटोलला तिनं उठावं..डाळ शिजत घालावी..लगबगीनं पोळ्यांसाठी कणिक मळून ठेवावी आणि पाटा-वरवंटा घेऊन डाळीचं पुरण वाटावं..सणासुदीला आईचा बेत असतो पुरणपोळीचा.
#खाद्यसंस्कृती #थ्रेड #म
समाजाला जशी संस्कृती असते..तशी ती खाद्यपदार्थांनाही असते.. पण या दोन्ही संस्कृतींचा भार स्त्रियांच्या खांद्यावर असतो.. बाकी पुरुष नुसते बडेजाव मारण्यातच पुढं असतात..बहुतांश वेळा.
पाट्यावरच्या कणकेला वरवंट्याचे घाव घालणारी आई..प्रत्येक घावाला तिनं प्रेम ओतावं..त्याचीच चव आम्हाला.
लोहाराचा भाता चालावा तशी चूल धगधगावी..त्या धगित तापलेल्या तव्यावर पुरण भरून लाटलेली पोळी पडावी..अखंड दुरडी भरस्तोवर तिनं पोळ्यांचा रतीब घालावा..पोराबाळांना चांगल्या दोनरोज पुरतील एवढ्या पोळ्या तिनं दिवस उगवायला बनवाव्यात.
तांबडं फुटायला तिनं येळवणीच्या आमटीला फोडणी दिलेली असते.
Read 12 tweets
29 Apr
घटना साधारणपणे २०१७ ची..
पुण्यात होतो.शेती विषयक एक कार्यशाळा अटेंड करायचा बेत होता.विषय होता 'शेतीचा अर्थ'.
त्याच दिवशी केंद्र सरकारचे मुख्य अर्थसल्लागार सुब्रमण्यम झंझावाती अस काही बोलले.ते म्हणाले 'शेतकऱ्यांना आता प्राप्तिकराच्या जाळ्यात घ्यायला हवं.'
#महाराष्ट्रदिन #म #थ्रेड
बराच खल झाला तेंव्हा या विषयावर.. बरीच टीका झेलावी लागली सुब्रमण्यमनां.
१९२५ साली कर परिषदेत मागणी होती शेतकऱ्यांना कर लावा अशी.. आज आणिएक ४ वर्षांनी शंभरी होईल त्या मागणीची.. आज २१ सालीही निर्णय नाहीय त्यावर..शेती खरंतर भारतीयांना जिव्हाळ्याचा विषय..अलीकडे तर खूपच sympathy.
म्हणजे गेल्या शंभर एक वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहिलं..पण शेतकऱ्यांचं उत्पन्न काही करपात्र करता आलं नाही आपल्याला..म्हणायला फक्त शेती ही काळी आई आणि शेतकरी बळीराजा आहे..गेल्या शतकभरात जी काही वाताहत त्या आईची आणि लेकरांची झालीय ती शब्दात सांगायची सोय नाही.
शेती राज्यसूचीत येते.
Read 27 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(