१२ जानेवारी, १७०८ रोजी साताऱ्यात संभाजीपुत्र शाहू हे छत्रपती झाले.
हिंदुपदपादशाह, अजातशत्रू व पुण्यश्लोक या बिरुदावली ज्या शाहूछत्रपतींसाठी वापरल्या गेल्या ते शाहूछत्रपती कधी कोणाला कळले का? - हा प्रश्न मला नेहमी पडतो.
रियासतकारांनी शाहूंना ‘पुण्यश्लोक’ म्हटलं तर जयसिंगराव पवारांनी शाहूंना ‘शिवाजी कधी कळलाच नाही’ अशी टिपण्णी केली.
पण ह्यात चूक कोणाची होती? ७ वर्षांचा असताना ज्याच्या वडीलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली, पुढची १८ वर्ष ज्याने औरंगजेबाच्या कैदेत काढली अशा राजकुमार शाहूची?
२/११
निश्चितंच नाही. ही चूक होती नियतीची.
जो राजकुमार १८ वर्ष मोगलांचा कैदी होता तो कधी ही स्वराज्यापासून तोडला गेला नाही हे त्याच्या पूर्वजांचे पुण्य होते.
१८ वर्ष जवळून मोगलांचा अनुभव घेतलेल्या शाहूछत्रपतींनी वेळो-वेळी ह्याच अनुभवाचा वापर करुन मोगलांना मात दिली होती.
३/११
करवीरकर संभाजीराजे दगलबाज चंद्रसेन जाधवरावाच्या नादी लागून निजामाशी संबंध वाढवू लागले तेव्हा शाहू महाराजांनी राजसबाईंना लिहीलेलं हो पत्र फैक महत्त्वाचे आहे.
“आमच्या घराण्यापैकी मोगलावर कुणीच विश्वास ठेवला नाही” - हे वाक्य जयसिंगरावांनी वाचलं नसेल का?
४/११
पुण्यश्लोक - ही बिरुदावली उगीच नाही वापरली रियासतकारांनी शाहू महाराजांसाठी.
शाहू महाराजांनी आयुष्यभर सर्वांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला. साधी रहाणीमान व उच्च विचारसरणी हेच शाहूछत्रपतींचे धोरण होते.
अनेक संतांना त्यांनी इनामे दिली. समर्थसंप्रदायाशी तर त्यांचा घरोबाच होता.
५/११
पेशवे, अक्कलकोटकर/नागपूरकर भोसले, तळेगावकर दाभाडे अशी अनेक घराणी त्यांनी पुढे आणली.
लोकांची फार चांगली परख शाहूछत्रपतींना होती.
ते स्वतः एक उत्तम राजकारणी होते. त्यांच्या मुत्सद्दी राजकारणाने आणि त्यांच्या पेशव्यांच्या व इतर सरदारांच्या पराक्रमामुळेच ते अजातशत्रू होते.
६/११
त्यांच्या मृदु स्वभावामुळे त्यांच्यावर सर्वांचेच प्रेम होते.
बहुत लोक मिळवावे।येकविचारें भरावे।
कष्टें करोनि घसरावें।म्लेंच्छांवरी॥
खरंचर हा उपदेश सद्गुरु समर्थ रामदासस्वामींनी धर्मवीर संभाजीराजेंना दिला होता.परंतु हा उपदेश शाहू महाराजांनी तंतोतंत पाळलेला दिसतोय.
७/११
प्रतिनिधी, पेशवे, चिटणीस, सेनापती, सेनासाहेबसुभा - या सर्वांवर महाराजांनी खूप प्रेम केले.
श्रीमंत नानासाहेब पंडित प्रधानांवर तर त्यांचा विशेष लोभ होता. नानासाहेबांनी देखील या लोभाची पूरेपूर जाण ठेवून महाराजांची निस्सीम सेवा व भक्ति केली.
८/११
अशा या पुण्यश्लोक महापुरुषाचा वापर आज बाजारु विचारवंत त्यांच्या फायद्यासाठी करतात - हे या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
किती लोकांनी शाहू रोजनिशी वाचली आहे, किती लोकांनी शाहूछत्रपतींची पत्रे वाचली आहेत - हा ही प्रश्न इथे उपस्थित करावासा वाटतो.
९/११
महाराजांच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी अब्दाली च्या दूतांसमोर श्रीमंत सदाशिवरावभाऊ ह्यांचे उद्गारः
“तीन च्यार लक्ष फौजेचा पातशाहा आमचा पातशाहा छत्रपती महाराज (हिंदुपतपातशाह शाहूछत्रपती) त्याचा जये व प्रताप आमचे मस्तकी असता सर्व पृथ्वीचा जये संपादितो व आजवर संपादित आलो आहोत”.
१०/११
अशा या हिंदुपदपादशाह गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रियकुलावतंस अजातशत्रू पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यस्मृतिस त्रिवार वंदन💐🙏🏼
११/११
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मराठा फौजेचे सेनापती, करवीरकर छत्रपतींचे पेशवा आणि नानासाहेब पेशव्यांचे दिवाण - अशा तिन जबाबदाऱ्या निभावणाऱ्या सदाशिवराव भाऊंना मल्हारबा व इतर थोर सरदार म्हणाले -
“आम्ही काही जिवाचा तमा धरीत नाही. हा जीव तुम्हावरून सदका आहे…
१/१३
…महाराजाचे पुण्य मस्तकी असतां दुरानीचा (अब्दालीचा) तमा तो काये? मारून गर्दीस मेलवितो. भाऊसाहेब तुम्ही काही चिंता न करणे.”
असे पुरुषार्थाचे बोल बोलून सर्व सरदार घोड्यावर स्वार होऊन निघाले.
२ उंच व शक्तिशाली हत्ती - रणरंगधीर व गजराज यांना ऐरावतासारखे तयार करण्यात आले.
२/१३
रणरंगधीरावर स्वतः भाऊसाहेब विराजमान होते तर गजराजावर विश्वासराव.
भीमगर्जनेसारखा तिसरा नगारा होताच हे दोन हत्ती पुढे निघाले.
#Thread: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि एक साहेबप्रेमी
“राजर्षि शाहू छत्रपती आणि लोकमान्य आयुष्यभर भांडले. आरोपांची राळ उडवली. पण लोकमान्य गेल्याची वार्ता शाहू छत्रपतींना कळल्यावर शाहू छत्रपती ‘मोठा लढवय्या पुरूष गेला’ म्हणून जेवत्या ताटावरून उठले”.
- सचिन खोपडे-देशमुख
१/५
फेसबूक वर सक्रिय असणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांसाठी सचिन खोपडे-देशमुख हे नाव काही नवीन नाही.
काल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे निधन झाले. निधनानंतर समाज माध्यमांवर अनेक लोकांनी त्यांचे संस्कार व वैचारिक दारिद्र्य दाखवत बाबासाहेबांच्या निधनावर आनंद व्यक्त केला.
२/५
काल घडलेल्या विकृतीवर सचिन खोपडे-देशमुख यांनी एक लेख लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रत्येकाने हा लेख अवश्य वाचावा👇🏼
माझी आणि सचिन जी ह्यांची विचारधारा आणि राजकीय कल हा पूर्णपणे विरुद्ध आहे.
पण तरी देखील अनेक वेळेला त्यांनी दाखवलेला तर्कशुद्धपणा मला आवडतो.
शिवशाहीर श्रीमंत #बाबासाहेब_पुरंदरे ह्यांच्या अंत्यदर्शनासाठी अथांग जनसागर लोटलेला.
तरुण युवक-युवतींपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने आपल्या लाडक्या बाबासाहेबांचे अंतिम दर्शन घेतले.
सरस्वतीपुत्राने आयुष्यात काय कमवले हे आज लोकांच्या डोळ्यातील आश्रू बघून लक्षात आले.
२/६
पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण या सारख्या पुरस्कारांचे मान वाढवणाऱ्या बाबासाहेबांचे अंत्यविधी शासकीय इतमामात झाले.
२१ बंदूकांची सलामी देण्यात आली. हा मान मोलाचाच. परंतु लोकांच्या डोळ्यातून वाहणारे आश्रू हीच बाबासाहेबांची खरी कमाई होती.
३/६
अनेक मान्यवरांसह, अथांग जनसागराच्या उपस्थितीत बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यात आला.
हजारोंच्या गर्दीत आणि त्या २१ बंदूकांच्या सलामीच्या आवाजात देखील वैकुंठातील स्मशानशांतता इतिहासपुत्राच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव करुन देत होती.
जेव्हा एक १७ वर्षांचा तरुण आपल्या मातोश्रींना उपदेश करतो की -
“वेळ कायम राहत नाही, ती बदलते, तेव्हा आत्ता उदास होऊ नकोस, योग्य वेळ येईपर्यंत थांब. मी सुद्धा त्याकरताच आत्ता नमतं घेतो आहे. एकदा का संधी आली की मग तिचं सोनं करणं हे आपल्या हाती आहे”.
१/५
“…काळ सदैव सारखा असतो असा अर्थ नाहीं…”
- श्रीमंत थोरले माधवराव पेशवे
घरातल्या आणि बाहेरच्या शत्रुंशी लढताना देखील थोरल्या माधवरावांचे हे उद्गार त्यांच्या महानतेबद्दल बरंच काही सांगून जातात.
२/५
माधवरावांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा गुण म्हणजे - परिस्थिती काहीही असो, खचून न जाणे !
१६ व्या वर्षी स्वराज्यची शपथ घेणारे शिवछत्रपती असो वा १६ व्या वर्षी ह्याच साम्राज्याची जबाबदारी घेणारे थोरले माधवराव असो, आजच्या पिढीने ह्या महापुरुषांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.
राम प्रसाद बिस्मील यांच्या नेतृत्वाखाली या गटाने १९२२ मध्ये गया मधील कांग्रेस आधिवेशनात गांधींचा खूप विरोध केला.
या मुळे १९२३ मध्ये कांग्रेस चे २ गट पडले - स्वराज पार्टी (मोतीलाल नेहरु व चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली) आणि बिस्मील व त्यांच्या युवा क्रांतिकारांचा एक गट.
२/९
१९२४ मध्ये बिस्मील यांनी प्रयागराज येथे सच्चिंद्रनाथ सान्याल यांच्याबरोबर या क्रांतिकारी पक्षासाठी एक संविधान लिहीले.
३ ऑक्टोबर, १९२४ रोजी कानपूर मधील बैठकीत ह्या पक्षाचे नाव Hindustan Republican Association (HRA) ठेवण्यात आलं.