मराठा फौजेचे सेनापती, करवीरकर छत्रपतींचे पेशवा आणि नानासाहेब पेशव्यांचे दिवाण - अशा तिन जबाबदाऱ्या निभावणाऱ्या सदाशिवराव भाऊंना मल्हारबा व इतर थोर सरदार म्हणाले -
“आम्ही काही जिवाचा तमा धरीत नाही. हा जीव तुम्हावरून सदका आहे…
१/१३
…महाराजाचे पुण्य मस्तकी असतां दुरानीचा (अब्दालीचा) तमा तो काये? मारून गर्दीस मेलवितो. भाऊसाहेब तुम्ही काही चिंता न करणे.”
असे पुरुषार्थाचे बोल बोलून सर्व सरदार घोड्यावर स्वार होऊन निघाले.
२ उंच व शक्तिशाली हत्ती - रणरंगधीर व गजराज यांना ऐरावतासारखे तयार करण्यात आले.
२/१३
रणरंगधीरावर स्वतः भाऊसाहेब विराजमान होते तर गजराजावर विश्वासराव.
भीमगर्जनेसारखा तिसरा नगारा होताच हे दोन हत्ती पुढे निघाले.
…या सर्वांनी भाऊसाहेबांना मुजरा केला. सर्वांचे मुजरे घेऊन सदाशिवरावभाऊ सेनेसहित उभे राहिले.
भाऊंनी फौजेवर नजर फिरवली तेव्हा मराठ्यांची फौज पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात दिसणाऱ्या सिंधु महासागरासारखी दिसत होती.
४/१३
स्वतःच्या जीवाची परवा न करणारी, मायभूमिच्या रक्षणार्थ उभी असलेल्या वीर मराठ्यांची ती फौज होती.
अफगाणी शत्रूंसमोर डोंगरा सारखे उभे असलेल्या भाऊसाहेबांनी सैन्याकडे बघून गर्जना केली - “आपल्यासारख्या नरकेसरींसमोर हा जंबुक (कोल्हा) दुरानी काय आहे?”
५/१३
मग भाऊसाहेबांनी मल्हारराव होळकर आणि दमाजी गायकवाडांकडे बघितले आणि विचारले, “सेनेची रचना कोणत्या पद्धतीने करावी? शत्रूला कुठल्या प्रकारे घेरावे? मल्हारबा, तुम्ही नेहमी यशस्वीरित्या सैन्याची रचना करुन विजयश्री मिळवली आहे. तुम्हीच सैन्याची व तोफखान्याची रचना करा.”
१२ जानेवारी, १७०८ रोजी साताऱ्यात संभाजीपुत्र शाहू हे छत्रपती झाले.
हिंदुपदपादशाह, अजातशत्रू व पुण्यश्लोक या बिरुदावली ज्या शाहूछत्रपतींसाठी वापरल्या गेल्या ते शाहूछत्रपती कधी कोणाला कळले का? - हा प्रश्न मला नेहमी पडतो.
रियासतकारांनी शाहूंना ‘पुण्यश्लोक’ म्हटलं तर जयसिंगराव पवारांनी शाहूंना ‘शिवाजी कधी कळलाच नाही’ अशी टिपण्णी केली.
पण ह्यात चूक कोणाची होती? ७ वर्षांचा असताना ज्याच्या वडीलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली, पुढची १८ वर्ष ज्याने औरंगजेबाच्या कैदेत काढली अशा राजकुमार शाहूची?
२/११
निश्चितंच नाही. ही चूक होती नियतीची.
जो राजकुमार १८ वर्ष मोगलांचा कैदी होता तो कधी ही स्वराज्यापासून तोडला गेला नाही हे त्याच्या पूर्वजांचे पुण्य होते.
१८ वर्ष जवळून मोगलांचा अनुभव घेतलेल्या शाहूछत्रपतींनी वेळो-वेळी ह्याच अनुभवाचा वापर करुन मोगलांना मात दिली होती.
#Thread: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि एक साहेबप्रेमी
“राजर्षि शाहू छत्रपती आणि लोकमान्य आयुष्यभर भांडले. आरोपांची राळ उडवली. पण लोकमान्य गेल्याची वार्ता शाहू छत्रपतींना कळल्यावर शाहू छत्रपती ‘मोठा लढवय्या पुरूष गेला’ म्हणून जेवत्या ताटावरून उठले”.
- सचिन खोपडे-देशमुख
१/५
फेसबूक वर सक्रिय असणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांसाठी सचिन खोपडे-देशमुख हे नाव काही नवीन नाही.
काल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे निधन झाले. निधनानंतर समाज माध्यमांवर अनेक लोकांनी त्यांचे संस्कार व वैचारिक दारिद्र्य दाखवत बाबासाहेबांच्या निधनावर आनंद व्यक्त केला.
२/५
काल घडलेल्या विकृतीवर सचिन खोपडे-देशमुख यांनी एक लेख लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रत्येकाने हा लेख अवश्य वाचावा👇🏼
माझी आणि सचिन जी ह्यांची विचारधारा आणि राजकीय कल हा पूर्णपणे विरुद्ध आहे.
पण तरी देखील अनेक वेळेला त्यांनी दाखवलेला तर्कशुद्धपणा मला आवडतो.
शिवशाहीर श्रीमंत #बाबासाहेब_पुरंदरे ह्यांच्या अंत्यदर्शनासाठी अथांग जनसागर लोटलेला.
तरुण युवक-युवतींपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने आपल्या लाडक्या बाबासाहेबांचे अंतिम दर्शन घेतले.
सरस्वतीपुत्राने आयुष्यात काय कमवले हे आज लोकांच्या डोळ्यातील आश्रू बघून लक्षात आले.
२/६
पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण या सारख्या पुरस्कारांचे मान वाढवणाऱ्या बाबासाहेबांचे अंत्यविधी शासकीय इतमामात झाले.
२१ बंदूकांची सलामी देण्यात आली. हा मान मोलाचाच. परंतु लोकांच्या डोळ्यातून वाहणारे आश्रू हीच बाबासाहेबांची खरी कमाई होती.
३/६
अनेक मान्यवरांसह, अथांग जनसागराच्या उपस्थितीत बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यात आला.
हजारोंच्या गर्दीत आणि त्या २१ बंदूकांच्या सलामीच्या आवाजात देखील वैकुंठातील स्मशानशांतता इतिहासपुत्राच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव करुन देत होती.
जेव्हा एक १७ वर्षांचा तरुण आपल्या मातोश्रींना उपदेश करतो की -
“वेळ कायम राहत नाही, ती बदलते, तेव्हा आत्ता उदास होऊ नकोस, योग्य वेळ येईपर्यंत थांब. मी सुद्धा त्याकरताच आत्ता नमतं घेतो आहे. एकदा का संधी आली की मग तिचं सोनं करणं हे आपल्या हाती आहे”.
१/५
“…काळ सदैव सारखा असतो असा अर्थ नाहीं…”
- श्रीमंत थोरले माधवराव पेशवे
घरातल्या आणि बाहेरच्या शत्रुंशी लढताना देखील थोरल्या माधवरावांचे हे उद्गार त्यांच्या महानतेबद्दल बरंच काही सांगून जातात.
२/५
माधवरावांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा गुण म्हणजे - परिस्थिती काहीही असो, खचून न जाणे !
१६ व्या वर्षी स्वराज्यची शपथ घेणारे शिवछत्रपती असो वा १६ व्या वर्षी ह्याच साम्राज्याची जबाबदारी घेणारे थोरले माधवराव असो, आजच्या पिढीने ह्या महापुरुषांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.
राम प्रसाद बिस्मील यांच्या नेतृत्वाखाली या गटाने १९२२ मध्ये गया मधील कांग्रेस आधिवेशनात गांधींचा खूप विरोध केला.
या मुळे १९२३ मध्ये कांग्रेस चे २ गट पडले - स्वराज पार्टी (मोतीलाल नेहरु व चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली) आणि बिस्मील व त्यांच्या युवा क्रांतिकारांचा एक गट.
२/९
१९२४ मध्ये बिस्मील यांनी प्रयागराज येथे सच्चिंद्रनाथ सान्याल यांच्याबरोबर या क्रांतिकारी पक्षासाठी एक संविधान लिहीले.
३ ऑक्टोबर, १९२४ रोजी कानपूर मधील बैठकीत ह्या पक्षाचे नाव Hindustan Republican Association (HRA) ठेवण्यात आलं.