गडावर एका सुरक्षित खोलींत बाळंतपणाची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. त्या खोलीला आंतून पांढरा चुनकळीचा रंग देण्यांत आला होता. भिंतीवर कुंकवाने ठिकठिकाणी स्वस्तिके व शुभचिन्हे रेखण्यात आली होती.
दाराला व झरोक्यांना पडदे लावण्यांत आले होते. दाराच्या दोन्ही बाजूंना मंगल देवतांची चित्रे काढण्यांत आली होती.
खोलीत सतत तेवते दीप ठेवण्यात आले होते. पाण्याने भरलेले कलश आणि इतर जरूर त्या त्या वस्तूंचा व औषधांचा संच तयार ठेवलेला होता.
२/१२
खोलीत पांढऱ्या मोहऱ्या टाकण्यात आल्या होत्या.
आता दाटली होती उत्कंठा!
फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली. आकाशांतल्या चांदण्या हळूहळू विरघळू लागल्या. प्रभेचे तीक्ष्ण बाण सोडीत व अंधाराचा विध्वंस उडवीत उषा आणि प्रत्युषा क्षितिजावर आल्या.
३/१२
सगळी सृष्टी उजळू लागली. बालसूर्याच्या स्वागतार्थ स्वर्गाचे देव जणूं पूर्वेकडे ओंजळी भरभरून गुलाल उधळू लागले. पूर्वा रंगली. वारा हर्षावला. पांखरें आकाश घुमवूं लागली. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई-चौघडा वाजू लागला आणि अत्यंत गतिमान् सप्तअश्व उधळीत बालसूर्याचा रथ क्षितिजावर आला!
४/१२
घटकांमागून घटका गेल्या. जिजाबाईचे पोट दुखूं लागलें. सुइणीची, कुळंबिणीची आणि वैद्यांची गडबड सुरू झाली. जिजाबाईने बाळंतपणाच्या खोलीत प्रवेश केला.
विश्वासराव, नारोपंत, गोमाजी नाईक वगैरे सर्वच मायेची माणसे जिजाबाईच्या काळजीत व तितक्याच उत्सुकतेंत चूर झाली.
५/१२
आनंद, औत्सुक्य, भीती, पुन्हा आनंद, पुन्हा काळजी, पुन्हा औत्सुक्य त्या सर्वांच्या मुखांवर आलटूनपालटून उड्या मारीत होतें.
एका जागी त्यांना कसें स्वस्थ बसवलें असेल? फार फार प्रेमळ माणसे हीं. उत्सुकता वाढत होती. मागचा क्षण पुढच्या क्षणाला उत्सुकतेने पुसत होता, ‘काय?’ …
६/१२
…‘अजून काही नाही!' पुढचा क्षण मागच्या क्षणाला उत्तर देत होता.
एकेक निमिष तासासारखे जड जाऊ लागलें होतें. आणि दारावरचा पडदा हलला. एकदम बाजूला झाला. उत्सुकतेच्या भिवया वर चढल्या. माना उंचावल्या. बातमी हसत हसत ओठांवर आली.
काय? काय? काय?
मुलगा!
मुलगा? मुलगा? मुलगा! मुलगा !!
७/१२
आणि किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला. वाद्ये कडाडूं लागली. संबळ झांजा झणाणूं लागल्या. गडावरच्या नगारखान्यांत सनई चौघडा झडूं लागला. नौबत सहस्रशः दणाणूं लागली.
नद्या, वारे, तारे, अग्नी सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा! तो दिवस रत्नांचा! …
८/१२
…तो दिवस कौस्तुभाचा, अमृताचा! छेः हो, छे छे छे:! त्या दिवसाला उपमाच नाही!
शुभ ग्रह, शुभ नक्षत्र, शुभ तारे, शुभ घटका, शुभ पळें, शुभ निमिषे तो शुभ क्षण गाठण्यासाठीच गेलीं तीनशे वर्षे शिवनेरीच्या भवती घिरट्या घालीत होतीं! आज त्यांना नेमकी चाहूल लागली!
९/१२
आज तीं सर्वजण जिजाबाईसाहेबांच्या सूतिकागृहाच्या दाराशी थबकली, थांबलीं, खोळंबलीं, अधीरली आणि पकडलाच त्यांनी तो शुभ क्षण ! तीनशे वर्षांनंतर! तीनशे वर्षांनंतर! कोणत्या शब्दात त्या सुवर्णक्षणाचे मोल सांगूं? अहो, ते अशक्य!
१०/१२
केवळ शतका-शतकांनीच नव्हे, युगायुगांनीच असा शुभ क्षण निर्माण होतो. त्याचे मोल अमोल !!
शालिवाहन शकाच्या १५५१ व्या वर्षी, शुक्लनाम संवत्सरांत, उत्तरायणांत, फाल्गुन महिन्यांत, वद्य तृतीयेला, शिशिर ऋतूंत, हस्त नक्षत्रावर सिंह लग्नावर, …
११/१२
…शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर शुभ क्षणी, अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे पांच ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना जिजाबाईसाहेब आईसाहेबांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला! (दि. १९ फेब्रुवारी, शुक्रवार,१६३०)
सबंध महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून वयाच्या सतराव्या वर्षी स्वराज्याचा श्रीगणेशा केला. व एकाच वेळी दक्षिणेतील शाह्यांशी आणि मोगलांशी तसेच युरोपमधून आलेल्या इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज या सर्वांशी…
१/८
…एकाच आघाडीवर संघर्ष केला, आणि त्यांना त्यात यशही येत गेले.
वेगवेगळ्या साम्राज्यांच्या आणि मुसलमानी शाह्यांच्या सत्तांतरामुळे महाराष्ट्रात जो राजकीय अस्थिरपणा आला होता त्याला योग्य वळणावर नेण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली.
२/८
याच गोष्टीमुळे इतर राजांच्या तुलनेत महाराजांचे वेगळेपण दिसून येते.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराजाचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवरायांचा वारसा चालवत मोगलांशी विश्रांती न घेता सलग ९ वर्षे अविरत लढा दिला.
…हा रोग अत्यंत बिकट असून यात त्या माणसाचे पोट प्रचंड दुखते.
माधवरावांच्या आजारपणा वेळी एक प्रसंग आहे. तो प्रसंग वाचला की त्यांना होणाऱ्या वेदनांचे मूर्तिमंत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.
वासुदेव शास्त्री खरे यांच्या ऐतिहासीक लेख संग्रह खंड ४ मधे शेवटी…
२/६
…माधवरावांच्या आजारपणाचे व मृत्यूच्या संबंधी विपुल पत्र छापले आहेत.
तर तो प्रसंग असा,
“ऑगस्ट १७७२ च्या सुमारास माधवराव चिंतामणीच्या थेऊर मुक्कामी जाऊन राहिले. प्रकृती हळूहळू ढासळत होती. माधवराव भ्रमात जाण्याच्या बेतात होते. …
#Thread
• छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करणारा मुकर्रबखान आणि शंभूछत्रपतींच्या हत्येचा बदला घेणारे सरसेनापती संताजी घोरपडे -
छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर पेशवाई आली आणि तब्बल १३० वर्षांनंतर, १८१८ साली शंभूराजेंच्या हत्येचा बदला घेण्यात आला अशी अनैतिहासिक माहिती…
१/९
…खोडसाळपणा करत सोशल मीडियातून पसरवली जात आहे.
एकीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतरच्या काळातील अनेक पराक्रमी लोकांच्या तसेच छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या इतिहासावर अन्याय करण्याची मानसिकता रूजली असताना आता हे चळवळ, विद्रोह इत्यादी गोंडस नावाखाली बुद्धीभेदाच्या…
२/९
माध्यमातून नवीन फॅड डोक्यात भरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असो मुख्य विषयाकडे वळूयात..
छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे प्रवास करत असताना इकडे मराठ्यांनी मोगलांच्या द्विधा अवस्थेचा आणि राजाराम महाराजांच्या मुत्सद्दीपणाचा फायदा घेत विशाळगडापासून पाटणपर्यंतचा भाग काबिज केला,
#Thread
• इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ह्यांचा आज ९५ वा स्मृतिदिन 🙏💐
इतिहास म्हटलं की पुरावे आणि त्यांचा अभ्यास म्हटलं की वि का राजवाडे यांनी लिहलेले मराठ्यांच्या इतिहासाची साधने आपोआप आलीच. इतिहास अभ्यासा च्या दृष्टीने त्यांचे कार्य न भूतो न भविष्यती आहे.
१/६
भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान होते.
राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने जमविण्यासाठी जो प्रचंड खटाटोप केला, …
२/६
…तसा त्यांच्या आधी कोणी केला नव्हता हे खरेच. मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली.
त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे.
बाजीप्रभू, बांदलांसह अनेक ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या धारोष्ण रक्तांनी आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी.
शिलाहार, यादव राजांपासूनचा इतिहास असलेला हा गड १५व्या शतकात कोण कुठला मलिक रेहानने 7 वेळा घासून मेटाकुटीला येऊन गड घेतला.
१/९
आणि इथं मेल्यावर त्याचं जे थडगं होतं त्याची आज 3 मजली मशीद झालीये तेही पुरातत्व खात्याच्या नाकावर टिच्चून.
कोर्टाने अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिलेले असतानाही प्रशासनाने हिजड्याची भूमिका घेतलेली दिसून येते.
२/९
नवसाला पावणारा मलिक रेहानला बाबा करून काही षंढ हिंदू त्याच्या आलिशान कबरीवर ढुंगनं वर करत डोकं टेकताना रामदासांच एक वाक्य 'देवद्रोही तितुके कुत्ते मारुनी घालावे परते' या वाक्याचा का विसर पडत असेल?
१) सईबाई – सईबाई या शिवरायांच्या प्रथम पत्नी असुन त्या सातारा जवळच्या फलटण येथील निंबाळकरघराण्यातील होत्या. मुधोजीराजे निंबाळकर हे त्यांचे वडील तर बजाजी निंबाळकर हे बंधु होते. …
…शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४० मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना चार अपत्ये झाली.त्यांचा मृत्यु ५ सप्टेंबर १६५७ रोजी राजगडावर झाला.
२/११
२) सगुणाबाई – सगुणाबाई या शिवरायांच्या द्वितीय पत्नी असुन त्या कोकणातील शृंगारपुर येथील शिर्के घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४१ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक अपत्य झाले.