मराठी प्रेमाचे नुसतेच तुणतुणे वाजवून आपली #मराठी मोठी होणार नाही हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जाणले होते.
#भाषा केवळ संवादाचं माध्यम अन अभिव्यक्त होण्याचे साधन नसून,भाषा ही संस्कृतीचं द्योतक आहे; संस्कृतीची वाहक आहे.
१/१३
आपल्या भाषेतून आपले संस्कार प्रतीत होत असतात आणि म्हणूनच 'परकीय भाषेतून आलेल्या शब्दांमुळे मराठी अधिक संपन्न झाली' हे तत्कालीन अन आताच्या भाषातज्ञांचे मत, सावरकरांनी त्यावेळीच खोडून काढले होते.
२/१३
सावरकरांनी १९२४ साली केसरी मधून #मराठी_भाषेचे_शुद्धीकरण ही लेखमाला सुरू करून त्यात आपली भाषाशुद्धीची कल्पना अधिक ठामपणे मांडली.
दत्तो वामन पोतदार आणि सावरकरांचा #भाषाशुद्धी वरील वाद त्याकाळी खूप गाजला.
३/१३
पोतदार सावरकरांना म्हणाले की, "परकीय भाषेतील शब्द आत्मसात करून ते पचवले, ही आमची विजय-चिन्हंच नाहीत का?"
त्यावर तात्याराव सावरकरांचे उत्तर होतं, "ती काही आमची विजयी-चिन्हं नाहीत; ते तर आमच्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत.
४/१३
स्वकीय शब्द नामशेष करून परकीय शब्द बोकाळू देणं, हे म्हणजे औरस मुलांना मारून दुसरी मुले दत्तक घेण्यासारखे आहे.
तो जसा वंशवृद्धीचा मार्ग नव्हे, तसाच हा काही शब्दसंपत्ती वाढवायचा मार्ग नाही. आपली संस्कृत भाषा कीती संपन्न आहे!
५/१३
तिला अव्हेरून इंग्रजी, फारशी इ. परक्या भाषांमधून शब्द घेणे, म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीचे कप हाती घेण्यासारखे नाही का?"
असा प्रश्न उपस्थित करून तात्यारावांनी दैनंदिन वापरातील अनेक परभाषेतील शब्दांना संस्कृतप्रचूर #मराठमोळे प्रतिशब्द सुचवले.
६/१३
परभाषेबद्दल सावरकरांच्या मनी द्वेष नव्हता, पण #मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मातृभूमीप्रमाणेच ती कोणत्याही परकीय मग अगदी शब्दांच्या का असेना शृंखलांमध्ये असता कामा नये हा विचार त्या मागे होता.
७/१३
आज सावरकांनीच सुचवलेले अनेक मराठी शब्द आपण सर्रास वापरतो.
जसे की...
•दिनांक •दूरदर्शन •दूरध्वनी •दूरचित्रवाणी •नगरपालिका •महापालिका •महापौर •हुतात्मा •क्रमांक •वेशभूषा •दिग्दर्शक •नेपथ्य •बोलपट •छायाचित्रण •मध्यंतर •चित्रपट •प्राचार्य •प्राध्यापक
नुकतीच कॉलेजमध्ये जाणारी आणि वकील होण्याची इच्छा असणारी माझी भाची जेव्हा माझ्यासोबत प्रतिवाद करते की, "मामा, तु खूप hard words use करतोस. Its difficult to Understand. समजेल असं बोल."
१०/१३
त्यावेळी ७०-८० वर्षांपूर्वी सावरकरांनी सुरू केलेली भाषाशुद्धीची चळवळ आपल्या पणजोबांनी, आजी-आजोबांनी, आई-वडिलांनी आणि आता आम्ही किती गांभीर्याने घेण्याची गरज होती हे कळून चुकते!
सावरकर आम्हाला कधीच कळले नाहीत याचे अजून एक उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे आपली, आजची बोलीभाषा मराठी!
११/१३
माझे मित्र जेव्हा म्हणतात की, "एवढं शुद्ध बोलायची काय गरज आहे? बोललेलं समजतंय ना; तेवढं पुरेसं आहे", तेव्हा वाटतं की कदाचित हाच विचार आपल्या आधीच्या २-३ पिढ्यानी केला असणार.
आणि म्हणूनच आज...
"पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी !"
१२/१३
हा कुणाला अक्कल शिकवण्याचा, कुणाला कमी लेखण्याचा किंवा माझं ज्ञान पाजळण्यासाठी केलेला प्रयत्न नक्किच नाही.
हा प्रपंच फक्त 'मला वाटलं म्हणून...!'
#आत्मार्पण
तात्या दररोज रात्री निजताना योगविषयक श्लोक म्हणत. त्या वेळी ते आपले दोन्ही हात प्रथम टाळूवर ठेवून मग कपाळ, छाती, पोट यांवर ठेवीत ठेवीत पायांवरून पावलांकडे सावकाश नेत असत.
ते श्लोक पुटपुटत असल्याने ते श्लोक कोणते हे सांगणे कठीण होते; पण ते सदर कृती ३ वेळा करीत.
१/११
हा प्रकार मी लागोपाठ ३-४ दिवस पाहिला. कुतूहल तर निर्माण झाले होते, पण तात्यांना मी हेतुतःच काही विचारले नाही. कदाचित त्यांनी हा परिपाठ बंद केला असता, अशी मला भीती वाटली.
मात्र कुतुहलाने त्या वेळी कामावर असलेल्या शुश्रूषांकडे मी चौकशी केली होती. त्यांनीही तेच सांगितले.
२/११
तेव्हा माझी निश्चिती झाली की, योगविषयक श्लोक ते म्हणत असावेत व त्यातील अर्थाप्रमाणे ते डोक्यापासून हात ठेवत ठेवत पावलांपर्यंत नेत असावेत.
१९ फेब्रुवारी १९६६ ला अमावास्या होती. त्या संध्याकाळपासून त्यांची तगमग होत होती. जीव आत ओढला जात होता.
लोकमान्य टिळकांचे देहावसान झाल्याची दुःखद बातमी अंदमानात येऊन पोहोचली.
सावरकरांनी "हा राष्ट्रीय शोकदिन आहे. म्हणून आपणा सर्वांनी आज उपवास पाळावा" अशी सूचना करताच केवळ राजबंद्यांनीच नव्हे, तर इतर कैद्यांनीही सावरकरांच्या या सूचनेला दुजोरा दिला.
#BlackLivesMatter साठी गुडघ्यावर बसून 'गोऱ्यांच्या चुकीबाबत आम्ही खेद व्यक्त करतो' आविर्भावात झुकला!
का?
फक्त Black Lives Matter करतात का? #HinduLivesMatter करत नाहीत?
हिंदूंमध्ये जीव नसतो?
हिंदू स्त्रियांवरील अत्याचार कृष्णवर्णीय स्त्रियांवरील अन्यायापेक्षा कमी पाशवी आहेत क?
२/४
सातासमुद्रापार गोऱ्यांच्या विकृत मानसिकतेसाठी आम्ही का स्वतःला पापी समजावं?
पाक-तालिबान-बांगलादेशी शांतिप्रिय समुदायाकडून जेंव्हा हिंदू मारले जातात, तेंव्हा त्या शांतिप्रिय समुदायाचे भारतीय नागरिक तोंडातून ब्र सुद्धा काढत नाहीत.
मग आमचे विकसित हिंदू कणे का नाही ताठ राहू शकत?
३/४
वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध #चौकोनीपाव आणि कुद्रे बिस्किट्स
चौकोनी पाव म्हणजे आमच्या वेंगुर्ल्याची खासियत !
#वेंगुर्ले हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किना-यावरील आयात-निर्यातीचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.
(१/६)
वेंगुर्ले बंदराजवळील सागर बंगला, दीपगृह, मंदिरे, फळसंशोधन केंद्र, विस्तीर्ण समुद्रकिनारा ही इथली आकर्षणे !
इथली खाद्यसंस्कृतीही जरा हटकेच आहे. सकाळच्या नाष्ट्याला अगदी दुपारी २ पर्यंत इथल्या लहान-मोठ्या हॉटेलांतून उसळ-चौकोनी पाव, हाफ भजी, कटींग चाय यालाच जास्त मागणी असते.
(२/६)
चाकरमानी देखील हॉटेलात यथेच्छ ताव मारुन चौकोनी पाव पार्सल बांधून घरी नेतात. हे चौकोनी पाव फक्त वेंगुर्ल्यातच बनविले जातात.
इथे सुरेश शिवलकर, नार्वेकर, भैरे, पाटणकर, सुदन रेडकर अशा मोजक्याच चौकोनी पाव बनविणाऱ्या बेकऱ्या आहेत.
(३/६)
लखोबा लोखंडेने बहुजन (खरं तर ते सर्वांचेच आदर्श आहेत) समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान केला म्हणून ज्यांनी कोर्टाबाहेर त्याच्यावर हल्ला केला, इथे twitter वर येऊन 'तो लिमये, म्हणजे ब्राह्मण...म्हणून इतर समाजातील आदर्शांचा अपमान करतो' असं certificate देऊन मोकळे झालेले -
(१/६)
- आपल्या पुरतं सोयीस्कर 'सत्य' शोधून जातीचं राजकारण करणारे #ठेकेदार, हा भय्या पाटील समर्थ रामदास स्वामी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असा जाहीर अपमान करत असताना कुठे लपले आहेत ?
समाजात जातीय तेढ निर्माण करून हा विकृत भैया पाटील काय साधू पाहत आहे?
(२/६)
मा.@sachin_inc हे या भैया पाटीलला follow करतात, म्हणजे काँग्रेसी तर्कानुसार भैया पाटलाच्या या लिखाणाशी सावंत सहमत आहेत का?
सावरकर, हिंदू आणि ब्राह्मणद्वेष घेऊन जन्मास येणाऱ्या काँग्रेसी पिलावळीकडून दुसरी अपेक्षा ती काय करणार!
सावरकरांना गांधीहत्येत गोवण्यात अयशस्वी ठरलेल्या -
३/६
इथे पुण्यात येरवडा तुरुंगात रँड आणि आयर्स्ट यांचा 'कट करून हत्या' प्रकरणी दामोदर हरी चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली आणि तिथे भगूरला अवघ्या साडे चौदा वर्षाचा विनायक त्या बातमीने मात्र प्रचंड अस्वस्थ झाला.
काय करावं, काही सुचेना त्याला !
(१/५)
रात्र उलटून चालली होती.
'काय करावं ?' या विचाराने विनायक नुसता तळमळत होता.
लहानपणापासूनच 'मातृभूमीसाठी कोणताही त्याग करण्याचा' विचार जोपासणाऱ्या विनायकाला चाफेकरांच्या हौतात्म्यातून आपलं जगण्याचं उद्दिष्ट गवसलं.
(२/५)
आणि त्या रात्री आपल्या देवघरातल्या #अष्टभुजा देवीच्या मूर्ती समोर उभा राहून बाल विनायकाने जी शपथ घेतली ती शेवटच्या श्वासापर्यंत पाळली.
"माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीन, चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवरायांसारखा विजयी होऊन -